Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
आगामी गुजरात विधानसभा निवडणुकीत आप पक्षाच्या बाजूने सर्व्हे | तर दिल्लीत आपच्या उपमुख्यमंत्र्यांच्या घरी CBI'ची छापेमारी
दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या घरी सीबीआयची टीम पोहोचली आहे. हे पथक एकाचवेळी २१ ठिकाणी छापे टाकत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सीबीआयने छापे टाकलेल्या 21 ठिकाणांमध्ये तत्कालीन दिल्ली एक्साइज कमिशनर आरव गोपी कृष्णा यांच्या परिसराचा समावेश आहे. नव्या उत्पादन शुल्क धोरणासंदर्भात हा छापा टाकण्यात येत असल्याचे मानले जात आहे.
3 वर्षांपूर्वी -
खासदार-आमदारांच्या प्रकरणात सीबीआयसह ईडीकडून दिरंगाई | सुप्रीम कोर्टाची नाराजी
खासदार आणि आमदारांविरोधातील प्रकरणात ईडी आणि सीबीआयकडे मोठ्या प्रमाणात प्रलंबित प्रकरणे आहेत. त्याबाबत सर्वोच्च न्यायालयातील पीठाचे मुख्य न्यायाधीश, सरन्यायाधीश एन. व्ही. रामणा यांनी नाराजी व्यक्त केली आहे. आमदार-खासदारांच्या विरोधातील तपास प्रकरणात दिरंगाई होण्यामागे कारणही तपास संस्थांनी दिले नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने निरीक्षण नोंदविले आहे.
4 वर्षांपूर्वी -
CBI पिंजऱ्यातील पोपट | केंद्राने सीबीआयच्या सध्याच्या व्यवस्थेमध्ये बदल करण्याची गरज - मद्रास हायकोर्ट
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत देशात गंभीर परिस्थिती उद्भवलेली असताना सुप्रीम कोर्टापासून ते देशातील अनेकविध उच्च न्यायालयांनी केंद्रातील मोदी सरकारला खडे बोल सुनावले होते. निवडणूक आयोगाला दणका दिल्यानंतर आता मद्रास हायकोर्टाने केंद्र सरकारला फटकारले आहे.
4 वर्षांपूर्वी -
प. बंगालच्या राज्यपालांकडून खटला दाखल करण्याची परवानगी घेत TMC नेत्यांवर सीबीआयच्या धाडी
प. बंगालमधील निवडणूक संपून पुन्हा टीएमसीची बहुमताने सत्ता आली असून भाजपाची सर्व स्वप्नं भंगल्याने केंद्रीय गृह मंत्रालय पुन्हा जागं झाल्याचं पाहायला मिळतंय. विशेष म्हणजे भाजपचे नेते जसे सत्ता नसलेल्या राज्यात संबंधित राज्यपालांना भेटतात, त्याप्रमाणे सीबीआयने पश्चिम बंगालच्या राज्य सरकार ऐवजी राज्यपालांमार्फत धाड टाकण्यासाठी मान्यता घेतल्याचं वृत्त आहे.
4 वर्षांपूर्वी -
CBI, ED | निवडक माहिती माध्यमांना देण्यामागे यांचा काही तरी अजेंडा आहे - विधिज्ञ उज्वल निकम
अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर (Sushant Singh Rajput Death Case) मृत्यूनंतर या प्रकरणाचा तपास ईडी, सीबीआय आणि एनसीबी कडून केला जात आहे. या प्रकरणात बॉलिवूडमधील ड्रग कनेक्शन समोर आले आहे. त्यानंतर तपासाची दिशा बदलली. मात्र अद्याप सुशांतने आत्महत्या नेमकी कोणत्या कारणामुळे केली याबाबत तपास सुरूच आहे. याप्रकरणात एम्सच्या फॉरेन्सिक टीमकडून अधिक तपास करण्यात येत आहे.
5 वर्षांपूर्वी -
मोदी सरकार सत्तेत....पण हे काय? सीबीआयकडून सीबीआयच्या मुख्यालयावर छापेमारी?
मोदी सरकार सत्तेत….पण हे काय? सीबीआयकडून सीबीआयच्या मुख्यालयावर छापेमारी?
7 वर्षांपूर्वी -
अमित शहांची अडचण वाढणार, सीबीआयच्या निर्णयाला आव्हान.
भाजप राष्ट्रीय अध्यक्ष यांची सोहराबुद्दीन शेख बनावट चकमक प्रकरणातून मुक्तता झाली त्याला आव्हान न देण्याच्या सीबीआयच्या निर्णयाला बॉम्बे लॉयर्स असोसिएशन या वकील संघटनेने उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.
7 वर्षांपूर्वी