Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत शिवजन्म सोहळा पार पडला
शिवजयंतीनिमित्त आज शिवनेरी किल्ल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थित भव्य कार्यक्रम पार पडत आहे.मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते वृक्षारोपण तर शिवयोग या विशेष टपाल तिकिटाचे प्रकाशन देखील आज होणार आहे. दरम्यान, शिवनेरीवर शिवजयंतीनिमित्त पोलिसांनीही सलामी दिली आहे.
4 वर्षांपूर्वी -
संतापजनक | छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कर्नाटक सरकारने रातोरात हटवला
बेळगाव जिल्ह्यातील मनगुत्ती गावातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा रातोरात हटवण्यात आला आहे. या घटनेमुळे शिवभक्तांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील शिवभक्त रविवारी (9 ऑगस्ट) कर्नाटकात जाऊन आंदोलन करणार असल्याची माहिती स्थानिक माध्यमांनी दिली आहे.
5 वर्षांपूर्वी -
मी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अनुयायी आणि आई भवानीचा उपासक - उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू
काल दिल्लीत राज्यसभेच्या नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी पार पडला. उदयनराजे यांनी शपथ घेतल्यानंतर ‘जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भवानी, जय शिवाजी’ अशी घोषणा दिली. मात्र, राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांनी त्यावर आक्षेप घेत उदयनराजे भोसले यांना समज दिली. हा शपथविधी सोहळा राज्यसभेत होत नसून माझ्या दालनात होत आहे. हे रेकॉर्डवरही घेतलं जात नाही. सभागृहात कोणत्याही घोषणा देण्यास परवानगी नाही. नवीन सदस्यांनी भविष्यात हे लक्षात ठेवावे. हे सांगत असताना उदयनराजेंनी नायडू यांच्याकडे कटाक्ष टाकला.
5 वर्षांपूर्वी -
छत्रपतींच्या वंशजांना पुन्हा मागच्या रांगेत ठेवून इतिहास पुनर्जीवित केला - सचिन राऊत
भाजप नेते उदयनराजे भोसले यांच्या राज्यसभा सदस्यत्त्वाच्या शपथविधीवेळी झालेला वाद ताजा असतानाच आता यामध्ये आणखी नवी भर पडली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी आपल्या निवासस्थानी राज्यसभेच्या नवनिर्वाचित सदस्यांची बैठक बोलावली होती. मात्र, या बैठकीत उदयनराजे यांना मागच्या रांगेत बसावे लागल्याने नवा वाद निर्माण झाला आहे.
5 वर्षांपूर्वी -
तुमचं छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलच बेगडी प्रेम सर्वाना माहीत आहे भाजपच्या बेडकांनो - भाई जगताप
भाजप नेते उदयनराजे भोसले यांनी बुधवारी दिल्लीत राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेतली. यावेळी घडलेल्या एका प्रकारामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. उदयनराजे यांनी शपथ घेतल्यानंतर ‘जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भवानी, जय शिवाजी’ अशी घोषणा दिली. मात्र, राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांनी त्यावर आक्षेप घेत उदयनराजे भोसले यांना समज दिली.
5 वर्षांपूर्वी