Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
आमचं सरकार मुस्लीम समाजाला आरक्षण देणारच: बाळासाहेब थोरात
आघाडी सरकारने मुस्लीम समाजाला पाच टक्के आरक्षण देण्याबाबतचा निर्णय घेतला होता. मात्र त्यानंतर आलेल्या देवेंद्र फडणवीस सरकारने त्याचे विधेयकात रुपांतर करून कायदा करण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले नाही. आमचे सरकार कोर्टात टिकेल असे ओबीसी व मराठा समाजाच्या आरक्षणाला कोणताही धक्का न लावता मुस्लिमांना आरक्षण देणारच. हीच कॉंग्रेसची भूमिका असल्याचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.
5 वर्षांपूर्वी -
मंत्री बाळासाहेब थोरातांचं सावरकरांना अभिवादन; राज्य काँग्रेसमध्ये आश्चर्य आणि चर्चा
विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज तिसरा दिवस आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुण्यतिथीचं औचित्य साधून भाजपनं आज विधानसभा अध्यक्षांकडं सावरकरांचा गौरवपर प्रस्ताव दिला आहे. महाविकास आघाडी सरकारमधील पक्षांमध्ये सावरकारांविषयी मतभेद आहेत. त्यामुळं गौरवपर प्रस्तावावरून त्यांना कोंडीत पकडण्याची रणनीती भाजपनं आखल्याचं समजतं.
5 वर्षांपूर्वी -
उद्धव ठाकरेंनाच आधी CAA कायद्याबाबत नीट माहिती दिली पाहिजे: काँग्रेस
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्ली दौऱ्यात सीएए, एनआरसी आणि एनपीआरबाबत केलेल्या वक्तव्यावरुन आता महाविकास आघाडीत धुसफूस होण्यास सुरुवात झाली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी CAA चा अभ्यास करावा, असा सल्ला काँग्रेस नेते मनिष तिवारी यांनी दिला. त्याआधी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही उद्धव ठाकरेंनी सीएएचं जाहीर समर्थन करु नये असं म्हटलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
किमान एकाची नसबंदी करा, अन्यथा....कमलनाथ सरकारचा कर्मचाऱ्यांना फर्मान
मध्य प्रदेश सरकारने कुटुंब नियोजन कार्यक्रम भलताच मनावर घेतल्याचं दिसतंय. कारण ज्या आरोग्य अधिकाऱ्यांनी २०१९-२० मध्ये पुरुष नसबंदीचं ‘टार्गेट’ पूर्ण केलं नाही, त्यांना नोकरी गमवावी लागू शकेल, असा इशारा दिला आहे. मध्य प्रदेशात पुरुष नसबंदीचं प्रमाण घटल्याने राष्ट्रीय आरोग्य अभियान अर्थात (NRHM) ने चिंता व्यक्त केली आहे. किमान एका पुरुषाची नसबंदी करा अन्यथा नोकरीवर गदा येईल, असं फर्मानच आरोग्य विभागाने बजावलं आहे. राष्ट्रीय कुटुंब नियोजन सर्वेक्षणाच्या ताज्या अहवालानुसार मध्य प्रदेशात ०.५ टक्के पुरुषांनी नसबंदी केली आहे.
5 वर्षांपूर्वी -
विखे पाटलांचं नवं संपर्क कार्यालय; ना भाजपचा झेंडा ना नेते
विरोधीपक्ष नेतेपद सोडून सत्ताधाऱ्यांच्या गोटात सहभागी झालेले राधाकृष्ण विखे पाटील पुन्हा एकदा ‘यू टर्न’ मारण्याच्या तयारीत दिसत आहेत. विखे पाटील आता भारतीय जनता पक्षाची साथ सोडून सत्ताधारी महाविकास आघाडीतील एखाद्या पक्षात प्रवेश करणार की काय, अशा चर्चा रंगल्या आहेत.
5 वर्षांपूर्वी -
'लिट्टी चोखे'वर प्रेम उफाळून आलं आहे; बघा बिहारमध्ये निवडणूक नाही ना? रुचिरा चतुर्वेदी
एखाद्या राज्यात निवडणूक आली की त्या राज्यातील एखाद्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी तिथल्या लोकप्रिय गोष्टींना प्रसिद्धीचं माध्यम बनवतात. आजवर त्यांनी असे प्रयोग केले आहेत आणि अजूनही तेच प्रकार सुरु असल्याचं दिसत आहे. दिल्लीतील विधानसभा निवडणुकीनंतर मोदी-शहांची पूर्ण हवाच निघून गेली आहे. त्यात बिहार आणि प. बंगालच्या विधानसभा निवडणुका काही महिन्यांवर आल्या आहेत.
5 वर्षांपूर्वी -
ठाकरे सरकार हाजी अलीत साकारणार मुघल गार्डन; मेकओव्हरसाठी ३५ कोटी
मुंबईतील महत्त्वाचे धार्मिक व पर्यटन स्थळ असलेल्या हाजी अली दर्गाचे नुतनीकरण व सौंदर्यीकरणाचे काम लवकरात लवकर सुरू करण्याचे निर्देश वस्त्रोद्योग, मत्स्यव्यवसाय व बंदर विकास मंत्री तथा मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी आज येथे दिले. हाजी अली दर्गा नुतनीकरण व सौंदर्यीकरणासंदर्भात आज मंत्रालयात अस्लम शेख यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यावेळी त्यांनी या सूचना केल्या. यावेळी दर्गाच्या नुतनीकरण व सौंदर्यीकरणाच्या आराखड्याचे सादरीकरणही करण्यात आले.
5 वर्षांपूर्वी -
सावरकरांबद्दल लिहिलेलं ते मासिक मागे घेणार नाही; काँग्रेसच्या भूमिकेने शिवसेना पेचात
राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मध्य प्रदेश सरकार आणि काँग्रेसवर सडकून टीका करताना शिवसेनेवरही निशाणा साधला. “काँग्रेसने राष्ट्रपुरुषांना अपमानित करण्याची मालिका सुरु केली आहे. मध्य प्रदेशात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तोडला. तर काँग्रेसचं मुखपत्र ‘शिदोरी’मध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांवर अपमानित करणारा लेख लिहिला आहे. याप्रकरणी काँग्रेसने देशाची माफी मागावी”, अशी मागणी फडणवीस यांनी केली. शिवाय सावरकरांचा गौरव राहूद्या पण अपमान तर करु नका, असा अपमान शिवसेना कितपत सहन करणार, असा सवालही फडणवीस यांनी विचारला.
5 वर्षांपूर्वी -
औरंगाबाद महापालिका निवडणुकीत सेना-काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र; स्थानिक सेनेत प्रचंड नाराजी
काही महिन्यांवर आलेली औरंगाबाद महापालिकेची निवडणूक शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र येत महाविकास आघाडीच्या छताखाली एकत्र लढविणार असल्याचं वृत्त समोर आलं आहे. स्वतः शिवसेनेचे विधानपरिषदचे आमदार अंबादास दानवे यांनी ही माहिती दिली आहे. तसेच त्याच अनुषंगाने बैठेका देखील सुरु झाल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
5 वर्षांपूर्वी -
VIDEO: बुलडोझरने हटवला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, काँग्रेसविरुद्ध संताप
मध्य प्रदेशातील छिंदवाडा परिसरात लावण्यात आलेली छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती काँग्रेस सरकारने अशी विचित्र पद्धतीने काढल्यामुळे अनेक शिवप्रेमींनी प्रचंड संताप व्यक्त केला आहे. दरम्यान , महाराष्ट्रातून देखील याचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे. तसेच काही हिंदुत्ववादी संघटनांनी या प्रकरणी छिंदवाडा-नागपूर हायवे रास्ता रोको आंदोलन केले. त्यामुळे मोठ्या प्रमाणात तणाव निर्माण झाला होता. शिवरायांचा अपमान केल्यामुळे परिसरातील दुकाने बंद करण्यात आली होती.
5 वर्षांपूर्वी -
काँग्रेसच्या कार्यसमितीत CAA विरोधात ठराव; तर मुख्यमंत्र्यांचा पाठिंबा; काँग्रेस नाराज
सध्या देशभर CAA वरून आंदोलनं पेटलेली असताना आणि काँग्रेससहित अनेक पक्ष त्या कायद्याला विरोध करत असताना शिवसेनेने वेगळी भूमिका घेतल्याचे काँग्रेस नाराज होण्याची दाट शक्यता आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा हा एकप्रकारे काँग्रेसला धक्का असल्याचं मानलं जातं आहे आणि त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या या भूमिकेकडे काँग्रेस कसं पाहणार ते पाहावं लागणार आहे.
5 वर्षांपूर्वी -
महिन्याला ३०० युनिट वीज मोफत, विद्यार्थ्यांना नर्सरी ते PHD'पर्यंत मोफत शिक्षण: काँग्रेस
काँग्रेसने आज दिल्लीमध्ये जाहीरनामा प्रसिद्ध केला. यामध्ये सत्तेत आल्यानंतर महिन्याला ३०० युनिट वीज मोफत देण्यात येणार आहे. तसेच स्वस्तामध्ये जेवण उपलब्ध करण्यासाठी १०० इंदिरा कॅन्टीन सुरू करण्याची घोषणा केली आहे. याशिवाय काँग्रेस लाडली योजना पुन्हा सुरू करणार आहे. विद्यार्थ्यांना नर्सरी ते पीएचडीपर्यंत मोफत शिक्षण देण्याचे वचन दिले आहे. महिला सुरक्षा, शिक्षण, वीज आणि पाण्याचा पुरवठा, रोजगार आणि दलित आदिवासींच्या कल्याणासाठी २० मुद्दे मांडण्यात आले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
गांधींना मारणारा हिंदूच होता; १५% मुस्लिमांच्या नावाने ८५% हिंदूंना भीती दाखविण्याचा प्रयत्न
नागरिकत्व दुरुस्ती कायदा मुस्लिमविरोधी आहेच, पण तो प्रत्येक गरीबाच्या विरोधात आहे, असं विधान अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी केलं आहे. १५ टक्के मुस्लिमांच्या नावाखाली ८५ टक्के हिंदूंना भीती दाखवून त्यांच्यावर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न होत आहे, असंही त्यांनी सांगितलं. पुण्यात एका कार्यक्रमात त्या बोलत होत्या. दरम्यान, या कार्यक्रमात हिंदू राष्ट्र सेनेच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत गोंधळ घातला.
5 वर्षांपूर्वी -
मंत्री अस्लम शेख यांना मनसेच्या मोर्चावर शंका; तर शेख यांना बॉम्बस्फोटातील दोषीची दया आली होती
‘बेकायदेशीरपणे राहणाऱ्या बांगलादेशी आणि पाकिस्तानी मुसलमानांना हाकलून द्या,’ या मागणीसाठी राज ठाकरे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र नवनिर्माण सेना लवकरच एक मोर्चा काढणार आहे. परंतु या मोर्चाबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं घेतलेल्या भूमिकेमुळे नवा पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. मुंबईत ९ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या या मोर्चासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्यांकडून जिजामाता उद्यान, भायखळा ते आझाद मैदानाचा मार्ग मागण्यात आला आहे. मोर्चासंदर्भात आयोजित बैठकीमध्ये मनसे नेत्यांचा हा निर्णय झाला आहे. हा मोर्चा मोहम्मद अली रोडवरुन नेण्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आग्रही आहेत. त्यामुळे पोलिसांसमोरील पेच वाढण्याची शक्यता आहे. मोर्चा संबंधित मान्यता मिळण्यासाठी मनसेच्या नेत्यांनी पोलिसा अधिकाऱ्यांशी चर्चा देखील केली आहे.
5 वर्षांपूर्वी -
इंदिरा गांधींबद्दलच्या वक्तव्यावरून अशोक चव्हाण यांच आव्हाडांना जोरदार प्रत्युत्तर
जितेंद्र आव्हाड यांनी देशातील सद्य:स्थितीला ‘हिटलरशाही’ संबोधत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यावर टीका केली. हा संदर्भ देताना आव्हाड यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचाही उल्लेख करत त्यांच्यावर टीका केली. आव्हाड म्हणाले की, “इंदिरा गांधींनीदेखील लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा अहमदाबादेतून पहिला उठाव झाला आणि विद्यार्थ्यांच्या चळवळीतूनच जयप्रकाश नारायण यांचे नेतृत्व उदयाला आले. अशाच पद्धतीने विद्यार्थ्यांचे आंदोलन देशाला दुसरे स्वातंत्र्य मिळवून देईल” असं आव्हाड म्हणाले होते.
5 वर्षांपूर्वी -
मोदींच्या राजवटीत देशावर कर्जाचा डोंगर; कर्ज तब्बल ९१ लाख कोटींवर
केंद्रात सलग ७वा अर्थसंकल्प सादर करण्यासाठी सज्ज झालेल्या मोदी सरकारने मार्च २०१४ ते सप्टेंबर २०१९ दरम्यान देशावरील कर्जाचे प्रमाण ७१ टक्क्यांनी वाढविल्याचा आरोप काँग्रेसतर्फे मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत करण्यात आला. मार्च २०१४मध्ये ५३ लाख कोटी रुपयांवर असणारे कर्ज सप्टेंबर २०१९’मध्ये तब्बल ९१ लाख कोटींवर पोहोचले आहे. मागील साडेपाच वर्षांमध्ये आर्थिक विकासाचा दर ५.३ टक्क्यांनी वाढला, मात्र त्याच कालखंडात देशातील प्रत्येक व्यक्तीवरील सरासरी कर्ज १०.३ टक्क्यांनी म्हणजे २७,२०० रुपयांनी वाढले. म्हणजे ‘आमदनी अठन्नी, खर्चा रुपय्या,’ अशी स्थिती झाली आहे, अशी टीका आज काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ता प्रा. गौरव वल्लभ यांनी केली.
5 वर्षांपूर्वी -
केवळ मुस्लिमांच्या आग्रहामुळे काॅंग्रेस शिवसेनेसोबत सत्तेत: अशोक चव्हाण
शिवसेना काँग्रेस-राष्ट्र्वादीसोबत महाविकास आघाडी’करून सत्तेत आली खरी, मात्र त्यानंतर काँग्रेस नेत्यांच्या विधानाने अधिकच राजकीय पेचात सापडत आहे असंच म्हणावं लागेल. अगदी काँग्रेसमध्ये सर्वजण शांत झाले की खासदार संजय राऊत कोणत्या ना कोणत्या तरी विधानाने शिवसेनेची अडचण वाढवताना दिसत आहे.
5 वर्षांपूर्वी -
शिवसेनेचा २०१४मध्येही काँग्रेससोबत आघाडीचा प्रस्ताव होता: पृथ्वीराज चव्हाण
“२०१४ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर भारतीय जनता पक्षाला रोखण्यासाठी शिवसेनेने काँग्रेसला सत्ता स्थापनेचा प्रस्ताव दिला होता, मात्र तेव्हा काँग्रसने प्रस्ताव फेटाळला होता,” असा गौप्यस्फोट माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. पीटीआयला दिलेल्या मुलाखतीमध्ये पृथ्वीराज चव्हाण यांनी हा दावा केला. तसंच राज्यातलं सध्याचं सरकार पूर्ण कार्यकाळ पूर्ण करणार का, याबाबत पूर्ण हमी कोणीच देऊ शकणार नाही, असंही पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे. गेल्या काही दिवसांपासून स्वातंत्र्यवीर सावरकर तसंच इंदिरा गांधी-करीम लाला यांच्या भेटीच्या मुद्द्यावरुन काँग्रेस आणि शिवसेनेत शाब्दिक युद्ध सुरु असतानाच पृथ्वीराज चव्हाणांचा हा गौप्यस्फोट खबळब माजवणारा आहे.
5 वर्षांपूर्वी -
सत्तेसाठी विरोधी पक्ष फोडून केलेली मेगाभरती भाजपाला आज चुकीची वाटतेय: सचिन सावंत
विधानसभा निवडणुकीत १०५ जागा जिंकल्यानंतरही भारतीय जनता पक्षाला विरोधात बसावं लागल्याचं मोठं दुःख आहे. त्यात भारतीय जनता पक्षातील जुन्या जाणत्या अनेक निष्ठावंतांना पक्षात तिकीटं मिळाली नाही याचा देखील प्रचंड राग आहे. त्यामुळे खुद्द महाराष्ट्र पक्षाध्यक्षांनीच निवडणूकपूर्व मेगाभरतीला वाचा फोडल्याने भारतीय जनता पक्षातील हा सुप्त असंतोष कदाचित मोठ्या प्रमाणावर वाढीस लागण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. यावरून काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी भारतीय जनता पक्षाला टोला लगावला आहे.
5 वर्षांपूर्वी -
योगेश सोमण सुट्टीवर गेले, गणेश चंदनशिवे मुंबई विद्यापीठाचे प्रभारी संचालक
मुंबई विद्यापीठाच्या थियेटर ऑफ आर्ट्सचे संचालक योगेश सोमण यांना आम्ही सक्तीच्या रजेवर न पाठवता त्यांनी सुट्टीसाठी अर्ज केला असून ते सुट्टीवर गेल्याची माहिती विद्यापीठाने दिली आहे. दरम्यान त्यांच्या जागी प्रभारी संचालक म्हणून प्राध्यापक गणेश चंदनशिवे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
5 वर्षांपूर्वी