Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
धक्का! विधिमंडळ सचिवालयात जयंत पाटील हेच अधिकृत गटनेते अशी नोंद; त्यांचाच ‘व्हीप’ अधिकृत
अजित पवारांचा आदेश न मानल्यास अपात्रतेची कारवाई होईल, अशी भीती नवीन आमदारांना दाखवली जात होती. पण ते चुकीचे आहे. राष्ट्रवादीने अजित पवार यांना गटनेतेपदावरून दूर केले आहे. त्यामुळे आता अजित पवार यांना पक्षादेश काढण्याचा अधिकारच उरलेला नाही, असे राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी आमदारांना मार्गदर्शन करताना स्पष्ट केले. अजित पवार यांनी पक्षादेश काढलाच तर त्यांच्याविरोधात मतदान करणाऱ्यांवर कसलीही कारवाई होणार नाही, अशी ग्वाही पवार यांनी दिली.
6 वर्षांपूर्वी -
काँग्रेस-राष्ट्रवादीच्या भ्रष्ट नेत्यांना आम्ही सोडणार नाही; फडणवीसांची ती जुनी हास्यास्पद ट्विट्स
बहुमतापूर्वीच देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांच्यासोबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. त्यानुसार ते दुसऱ्यांदा मुख्यमंत्री म्हणून विराजमान होतील, मात्र स्पष्ट बोलायचे झाल्यास ते कमीत कमी बहुमत चाचणी होई पर्यंत तरी मुख्यमंत्रीपदी राहणार आहेत. आजही भारतीय जनता पक्षातील नेत्यांच्या आत्मविश्वास नसल्याचं स्पष्ट जाणवत आहे.
6 वर्षांपूर्वी -
आमदारांच्या सह्यांचं पत्र चुकीच्या हेतूनं वापरण्यात आलं: अभिषेक मनू सिंघवी
सिंघवी राष्ट्रवादीच्या वतीनं युक्तीवाद करताना अभिषेक मनू सिंघवी म्हणाले, ‘आमदारांचं पत्र चुकीच्या हेतूनं वापरण्यात आलं. राज्यपालांची फसवणूक करण्यात आली. ते पत्र वेगळ्या कारणासाठी तयार करण्यात आलं होतं. मात्र, ते दुसरीकडं जोडण्यात आलं. दोन्ही पक्ष बहुमत चाचणीसाठी तयार आहे. मग उशीर कशासाठी केला जातोय. एकतरी आमदार भारतीय जनता पक्षासोबत गेला आहे का? तसं सांगणार पत्र आहे का? न्यायालयानं दिलेले जुने आदेश डावलता येणार नाही. त्यामुळं हंगामी अध्यक्ष नेमून बहुमत चाचणी आजच व्हायला हवी,’ अशी विनंती त्यांनी न्यायालयाकडं केली आहे.
6 वर्षांपूर्वी -
जस्टीस खन्ना यांनी विचारलं 'त्या आमदारांचा आता पाठिंबा आहे का'...पुढे?
भाजपाच्या वतीनं बाजू मांडतांना मुकूल रोहतगी यांनी महत्त्वाचा युक्तीवाद केला. ५४ आमदारांचा आम्हाला पाठिंबा असून, एक पवार आमच्या सोबत आहेत. तर दुसरे आमच्या विरोधात आहेत. त्यांच्या कुटुंबातील वादाशी आम्हाला देणंघेणं नाही. राज्यपालांनी पत्रांच्या आधारे निर्णय घेतला आहे,” असं रोहतगी यांनी न्यायालयाला सांगितलं.
6 वर्षांपूर्वी -
बहुमत नसताना शपथविधी हा केवळ आमदार फोडण्यासाठीचा माइंडगेम भाजपवरच उलटणार? सविस्तर
राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी व शिवसेनेचं सरकार स्थापन होणार असं वाटलं असतानाच आज महाराष्ट्राच्या राजकारणाला नाट्यमय कलाटणी मिळाली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी राजभवनात पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. फडणवीस यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. या अनेपक्षित घडामोडींमुळं राज्यभरात आश्चर्य व्यक्त होत आहे.
6 वर्षांपूर्वी -
'निवडणूक रोखे योजना' विरोधात काँग्रेस खासदारांची संसदेबाहेर जोरदार निदर्शनं
सध्या दिल्लीत सुरु असलेल्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या अनुषंगाने काँग्रेसने भारतीय जनता पक्षाची कोंडी करण्यास सुरुवात केली आहे. त्यात देशाच्या अर्थकारणाच्या बाबतीत महत्वाचा आणि चर्चेचा ठरणारी ‘निवडणूक रोखे योजना’ सध्या विरोधकांच्या रडारवर आहे. याच योजनेच्या माध्यमातून भाजपने बक्कळ पक्ष निधी मोठ मोठ्या कोर्पोरेट्स आणि श्रीमंतांकडून प्राप्त केला आहे. देशाची अर्थव्यवस्था खालावत असली तरी भाजपचा पक्ष खजाना मात्र तुडुंब वाहत असल्याचं माहितीच्या अधिकारातच उघड झालं आहे. त्यामुळे काँग्रेसने आज संसद भवनाच्या बाहेर जोरदार निर्दर्शन केली.
6 वर्षांपूर्वी -
सत्तास्थापनासंदर्भात शरद पवारांच्या निवासस्थानी काँग्रेस-राष्ट्रवादीची निर्णायक बैठक
एनसीपी’चे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या घरी काँग्रेस-एनसीपी’च्या नेत्यांची मॅरेथॉन बैठक सुरू झाली आहे. या बैठकीला काँग्रेसचे बडे नेते उपस्थित असून राज्यातील सत्तापेचावर तोडगा काढण्याचा अंतिम निर्णय या बैठकीत होणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.
6 वर्षांपूर्वी -
मोदी शहांनी यापुढे काँग्रेस-मुक्त भारताची कल्पनाही करू नये: काँग्रेस
मागील लोकसभा निवडणुकीपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांनी काँग्रेस मुक्त भारत करण्याचा निर्धार अनेक सभांमधून केला होता. मात्र, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी मोदी-शहांना इशारा दिला आहे. यापुढे मोदींनी काँग्रेस मुक्त भारताची कल्पनाही करू नये, असे गहलोत यांनी म्हटले आहे.
6 वर्षांपूर्वी -
महाशिवआघाडीसाठी सोनिया गांधींचा होकार जवळपास निश्चित असल्याचं वृत्त
महाराष्ट्रातील सत्तास्थापनेबाबत चर्चा करण्यासाठी मंगळवारी काँग्रेस आणि एनसीपी यांच्या नेत्यांमध्ये होणारी बैठक रद्द झाली असून, ही बैठक आज, बुधवारी होणार आहे. शिवसेनेसोबत महाशिवआघाडीत सामील होण्यास काँग्रेसला मुळीच हरकत नसल्याचेही सांगण्यात येत आहे.
6 वर्षांपूर्वी -
राजस्थानातील पालिका निवडणुकीत २३ ठिकाणी काँग्रेसची सत्ता; भाजपचा सुपडा साफ
दोन दिवसांपूर्वी कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला होता. मात्र काँग्रेसने आयत्यावेळी जनता दल सेक्युलरला पाठिंबा देत भाजपाला धक्का दिला होता. मात्र, वर्षभरात कुमारस्वामी यांच्या सरकारविरोधात भाजपने ऑपरेशन लोटस राबवत पुन्हा सत्ता स्वतःकडे खेचून आणली होती.
6 वर्षांपूर्वी -
पवारसाहेब हे मुरब्बी नेते, पण लवकरच महाशिवआघाडी अस्तित्वात येईल: आ. प्रणिती शिंदे
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे मुरब्बी नेते आहेत. त्यामुळे त्यांच्या वक्तव्याचा आत्ताच अनुमान लावणे चुकीचे आहे. मात्र, लवकरच महाशिवआघाडी अस्तित्वात आलेली पाहायला मिळेल, असं मोठं वक्तव्य काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी केले आहे.
6 वर्षांपूर्वी -
शिवसेनेसोबत सरकार स्थापनेबद्दल चर्चा नाही; आघाडीच्या सहकाऱ्यांना विश्वासात घेते आहोत
सरकार स्थापनेचं शिवसेना-भारतीय जनता पक्षाला विचारा असं सांगून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी संभ्रम वाढवलेला असतानाच आज काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासोबत झालेल्या बैठकीत शिवसेनेला पाठिंबा देण्याची चर्चा झालीच नसल्याचं पवार यांनी सांगितलं. पवारांच्या या वक्तव्यामुळे काँग्रेस-एनसीपी शिवसेनेसोबत जाणार की नाही? याबाबतची स्पष्टता अजून आहे.
6 वर्षांपूर्वी -
कॉपी-पेस्ट याचिका! ईडीने देशातील नागरिकांना या पद्धतीची वागणूक देणे योग्य नव्हे: सुप्रीम कोर्ट
मनी लाँड्रिंग प्रकरणी काँग्रेसचे नेते डी.के.शिवकुमार हे सध्या जामिनावर बाहेर आहेत. यादरम्यान शुक्रवारी ईडीनं सुप्रीम कोर्टात एक याचिका दाखल करून शिवकुमार यांच्या जामिनाला विरोध केला. परंतु यादरम्यान ईडीनं एक मोठी चुक केली. ईडीनं या प्रकरणी माजी गृहमंत्री पी.चिदंबरम यांच्या प्रकरणात दाखल केलेली याचिकाच कॉपी पेस्ट केली. दरम्यान, सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांचं या मुद्द्यावर लक्ष गेल्यानंतर त्यांनी ईडीची ही याचिका फेटाळून लावली.
6 वर्षांपूर्वी -
पडद्याआड हालचाली! काँग्रेस-राष्ट्रवादीत फेर-मेगाभरती होण्याची शक्यता? सविस्तर वृत्त
सरकार स्थापनेच्या सुरुवातीलाच बहुमताचा आकडा गाठणं अशक्य असल्याचं लक्षात येताच भाजपच्या नेत्यांनी राज्यपालांची भेट घेऊन सरकार स्थापन करण्यास आम्ही असमर्थ आहोत असं जाहीर केलं. मात्र, मागील दोन दिवसांपासून असमर्थ ठरणारे भाजपचे नेते अचानक पुन्हा आमचंच सरकार येणार असं वारंवार बोलू लागले आहेत. परंतु, त्यामागील मुख्य कारण दुसरंच असल्याचं वृत्त आहे. कारण महाशिवआघाडीचं सरकार स्थापन होताच भारतीय जनता पक्षातील विद्यमान मंडळी भाजपाला सोडचिट्ठी देण्याचा मार्गावर असल्याची चुणचुण भाजपाला लागली आहे.
6 वर्षांपूर्वी -
क्रिकेटमध्ये चेंडू दिसतो, राजकारणात नाही; भाजपला चेंडू दिसलाच नाही: बाळासाहेब थोरात
‘क्रिकेट आणि राजकारणात खूप फरक आहे. क्रिकेटमध्ये चेंडू दिसतो. राजकारणात तसं होतंच असं नाही. भाजपचंही तेच झालं. त्यांना चेंडू दिसलाच नाही,’ असा शब्दांत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना प्रत्युत्तर दिलं.
6 वर्षांपूर्वी -
कर्नाटक: स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीत १५१ जागा जिंकत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष
कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला होता. मात्र काँग्रेसने आयत्यावेळी जनता दल सेक्युलरला पाठिंबा देत भाजपाला धक्का दिला होता. मात्र, वर्षभरात कुमारस्वामी यांच्या सरकारविरोधात भाजपने ऑपरेशन लोटस राबवत पुन्हा सत्ता स्वतःकडे खेचून आणली होती.
6 वर्षांपूर्वी -
VIDEO - महाशिवआघाडीची पहिली संयुक्त बैठक; किमान समान कार्यक्रमावर चर्चा
महाराष्ट्राला स्थिर सरकार देण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी एकत्रितपणे ठोस पावले टाकायला सुरुवात केली असून या तिन्ही पक्षांची पहिली संयुक्त बैठक आज मुंबईत सुरू झाली आहे. या बैठकीत किमान समान कार्यक्रम व सत्ता वाटप यावर चर्चा करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.
6 वर्षांपूर्वी -
पंडित जवाहरलाल नेहरू यांची आज जयंती; अनेक दिग्गज्जांनी श्रद्धांजली वाहिली
देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची आज जयंती आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह दिग्गजांनी नेहरूंना आदरांजली वाहिली आहे. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी गुरुवारी (१४ नोव्हेंबर) शांतीवनला भेट देऊन आदरांजली वाहिली आहे. नेहरू यांची जयंती बलिदान म्हणून साजरी केली जाते. त्यानिमित्ताने सर्वत्र विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
6 वर्षांपूर्वी -
काँग्रेस-राष्ट्रवादीची समन्वय बैठक पत्रकारांना चकवा देत पार पडली
काँग्रेस-राष्ट्रवादीची समन्वय समितीची आजची बैठक अचानक रद्द झाल्याचं खुद्द अजित पवार यांनी सांगितलं. मात्र, त्यानंतर झालेल्या गदारोळानंतर तात्काळ ही बैठक पुन्हा सुरु झाली आहे. किमान समान कार्यक्रम ठरवून शिवसेनेशी युती करण्यासाठी दोन्ही पक्षांनी ही पहिलीच बैठक आयोजित केली होती. आता नव्याने काँग्रेस-राष्ट्रवादीची ही बैठक सुरु असल्याचे फोटो समोर आले आहेत. त्यात बारामतीला जात असल्याचे सांगणारे अजित पवार देखील सहभागी झाल्याचे दिसत आहेत.
6 वर्षांपूर्वी -
सरकार तर स्थापन करणार अन मध्यावधी निवडणूक सुद्धा होणार नाहीत: शरद पवार
भारतीय जनता पक्ष-शिवसेनेतील बेबनावामुळं महाराष्ट्राच्या राजकारणानं अनपेक्षित वळण घेतलं आहे. गेल्या अनेक वर्षांपासून राजकीय विरोधक म्हणून एकमेकांना पाण्यात पाहणारे काँग्रेस-राष्ट्रवादी व शिवसेनेचे नेते मनाने जवळ आले आहेत. इतकेच नव्हे, हे नेते एकमेकांच्या मांडीला मांडी लावून बैठका घेऊ लागले आहेत. त्यांच्यातील या जवळीकीमुळं राज्यात नव्या सरकारच्या स्थापनेची शक्यता बळावली आहे.
6 वर्षांपूर्वी