Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
ठरलं! शिवसेना-राष्ट्रवादीकडे मुख्यमंत्रीपद तर काँग्रेसकडे उपमुख्यमंत्री
राज्यामध्ये शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सत्तास्थापनेचे अंतिम सूत्र ठरल्याची बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्रीपद अडीच अडीच वर्षांसाठी शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये वाटून घेतले जाईल तर पूर्ण पाच वर्षांसाठी उपमुख्यमंत्रीपद हे काँग्रेसकडे राहील या निर्णयावर सर्वपक्षीय नेत्यांचे एकमत झाल्याचे वृत्त आहे. प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना मिळालेल्या वृत्तानुसार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे खासदार आणि सोनिया गांधी यांचे निकटवर्तीय अमहमद पटेल यांच्यामध्ये मुंबईत झालेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आल्याचे समजते.
6 वर्षांपूर्वी -
अखेर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू
महाराष्ट्रात अखेर तिसऱ्यांदा राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या केंद्रीय मंत्रिमंडळाने केलेल्या शिफारशीच्या फाइलवर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी अखेर स्वाक्षरी केली आहे. त्यामुळे आजपासून महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. राष्ट्रपती राजवट लागू असली तरी एखाद्या पक्षाने पुरेसे संख्याबळ दाखवल्यास त्यांना सत्ता स्थापन करण्याची संधी दिली जाईल. त्यानंतर राज्यातील राष्ट्रपती राजवट उठवली जाईल, असं कायदेतज्ज्ञांचं म्हणणं आहे.
6 वर्षांपूर्वी -
राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठी राज्यपालांची केंद्रीय गृहमंत्रालयाकडे शिफारस: दूरदर्शनचं वृत्त
राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा सुटत नसल्यामुळे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केंद्रीय गृहमंत्रालयाला राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस केली आहे. राज्यपालांनी भारतीय जनता पक्ष, शिवसेनेला सत्तास्थापनेचं निमंत्रण दिलं होतं हे दोन्ही पक्ष सरकार बनविण्यात असमर्थ ठरले असून राज्यपालांनी राष्ट्रवादीला निमंत्रण दिलं होतं. मात्र राष्ट्रवादी शिवसेनेच्या पाठिंब्यावर अवलंबून असल्याचं दिसून येत असल्याने राज्यपालांनी कायदेशीर सल्ला घेत केंद्रीय गृहमंत्रालयाला ही शिफारस पाठविली असल्याची माहिती सरकारी वृत्तवाहिनी दूरदर्शनने दिली आहे.
6 वर्षांपूर्वी -
आघाडीची गोड बातमी! अहमद पटेल, खर्गे आणि वेणुगोपाल पवारांच्या भेटीला
राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा सोडविण्यासाठी सोनिया गांधींचे निकटवर्तीय अहमद पटेल, के. सी वेणुगोपाळ आणि महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे मुंबईसाठी रवाना झालेले आहेत. राष्ट्रवादीला राज्यपालांनी दिलेल्या सत्तास्थापनेच्या निमंत्रणानंतर राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे. आज सकाळी शरद पवार यांची सोनिया गांधी यांच्यासोबत फोनवरुन चर्चा झाली असल्याची माहिती के. सी वेणुगोपाळ यांनी दिली.
6 वर्षांपूर्वी -
विधानसभा प्रचाराला न फिरकलेलं गांधी कुटूंब आज राज्यात पवारांमुळे अस्तित्व टिकवून? - सविस्तर
महाराष्ट्र विधानसभा निवडणुका पार पडून निकाल देखील जाहीर झाले असले तरी सत्ता स्थापनेचा घोळ अजून कायम असल्याचं चित्र आहे. विशेष म्हणजे राज्यातील सर्वच प्रमुख पक्षांचे नेते स्वपक्षाच्या प्रचारासाठी मैदानात उतरले होते, तेव्हा देशातील सर्वात मोठं गांधी कुटूंब मात्र राज्यातील नेत्यांना एकाकी सोडून दिल्लीत रममाण होते. किंबहुना आपला सुपडा साफ होणार याची त्यांना खात्री असावी म्हणून त्यांनी मेहनत न घेण्याचा निर्णय घेतला असावा.
6 वर्षांपूर्वी -
शिवसेनेसाठी गोड बातमी! राज्यात महाशिवआघाडीचं सरकार येणार
महाराष्ट्रातील सत्तेचा पेच सोडवण्यासाठी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी वैचारिक मतभेद दूर लोटून शिवसेनेला पाठिंबा देण्याचा निर्णय घेणार का?, याकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागलेले असताना व याबाबत अनेक उलटसुलट बातम्या क्षणाक्षणाला येत असताना त्याचं उत्तर ‘होय’ असं मिळालं आहे. सोनिया गांधी यांनी शिवसेनेच्या नेतृत्वाखालील सरकारला बाहेरून पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली.
6 वर्षांपूर्वी -
सेनेला पाठिंबा देण्यावरून काँग्रेसच्या राज्यातील नेत्यांना दिल्लीतून बोलावणं; महत्वाची बैठक
राज्यात सत्तास्थापनेसाठी शिवसेनेकडून वेगवान हालचाली सुरू आहेत. राष्ट्रवादी काॅंग्रेस शिवसेनेसोबत जाणार की नाही, यावर अद्याप निर्णय झाला नसल्याचा दावा पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल यांंनी सांगितले. काॅंग्रेसने ठरविल्याशिवाय राष्ट्रवादी आपला निर्णय घेणार नसल्याचेही राष्ट्रवादीने सांगितले आहे.
6 वर्षांपूर्वी -
काँग्रेसमध्ये एकाकी पडलेले संजय निरुपम यांचा सत्तास्थापनेवरून तिळपापड
अडीच वर्षांसाठीच्या मुख्यमंत्रिपदाची शिवसेनेची मागणी भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाला कोणत्याही परिस्थितीत मान्य नसल्याने युतीतील सत्तास्थापनेचा पेच कायम राहिला. त्यातच देशात स्थिर सरकार देणारे नेतृत्व म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिमा तयार झाल्याने त्याला तडा जाईल, असे कोणतेही पाऊल न उचलण्याचा निर्णय भारतीय जनता पक्षाने घेतला व सत्तास्थापनेसाठी असमर्थ असल्याचे भारतीय जनता पक्षाने राज्यपालांना कळवल्याचे समजते.
6 वर्षांपूर्वी -
आज राज्यातील सत्तास्थापनेवरून दिल्लीत खलबतं
बहुमतासाठी आवश्यक असलेला आकडा शिवसेनेकडं नाही. त्यामुळं राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या पाठिंब्यावर शिवसेनेची मदार असणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेला ‘हात’ देते का? यावरच शिवसेनेचं मुख्यमंत्रीपदाच स्वप्न अवलंबून आहे.
6 वर्षांपूर्वी -
राम मंदिर निर्माणाचा मार्ग खुला झाला आणि या मुद्द्याचं राजकारण करणाऱ्यांचं तोंड बंद: काँग्रेस
संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या अयोध्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक निकाल सुनावला आहे. अयोध्येतील वादग्रस्त जमीन रामजन्मभूमी न्यासाकडे द्यावी आणि सुन्नी वक्फ बोर्डाला पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी, असं सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठाने म्हटलं आहे. दरम्यान मुस्लिम याचिकाकर्ते `इकबाल अन्सारी यांनी देखील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्याणाचं स्वागत करत, हिंदू-मुस्लिम समाजाला जातीय सलोखा राखण्याचं आवाहन केलं आहे.
6 वर्षांपूर्वी -
पुण्यात राष्ट्रवादी-काँग्रेस-शिवसेना झळकले एकाच पोस्टरमध्ये
राज्यात भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेमध्ये मुख्यमंत्री पदावरून वाद सुरू असताना. पुण्यातील कोंढवा भागात एनसीपी’च्या एका कार्यकर्त्याकडून काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचा एकत्रित फोटे असलेला फ्लेक्स लावण्यात आला आहे. या फ्लेक्सची शहरभर चर्चा सुरु आहे.
6 वर्षांपूर्वी -
आमदार खरेदीचे आरोप खोटे; काँग्रेस-राष्ट्रवादीने पुरावे द्यावेत: मुनगंटीवार
भारतीय जनता पक्ष सत्ता स्थापनेसाठी आमदार फोडण्याचा प्रयत्न करत असल्याची खोटी माहिती काँग्रेस आणि राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाने दिली असून येत्या ४८ तासांत या पक्षांनी या आरोपाबाबत पुरावे द्यावे, अन्यथा राज्यातील जनतेचा माफी मागावी, असे आवाहन बारतीय जनता पक्षाचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे. भारतीय जनता पक्षाच्या कोणत्याही नेत्याने कोणत्याही आमदाराला फोन केलेला नाही, कुणाकडे कॉल रेकॉर्डिंग असेल, तर त्यांनी ती सादर करावी, असे आव्हानही मुनगंटीवार यांनी विरोधी पक्षांना दिले आहे. मुनगंटीवार पत्रकारांशी बोलत होते.
6 वर्षांपूर्वी -
नोटबंदीला ३ वर्ष पूर्ण; काँग्रेसची आरबीआय'च्या दिल्ली कार्यालयाबाहेर जोरदार निर्दर्शनं
नोटबंदीच्या निर्णयाला आज ३ वर्ष पूर्ण झाली असून काँग्रेसने भाजप आणि मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. त्यालाच अनुसरून दिल्लीत नोटबंदी निर्णयाच्या निषेधार्त युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दिल्लीतील रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या मुख्य कार्यालयाबाहेर जोरदार निदर्शनं करत सरकारचा निषेध केला आहे. दरम्यान, यावेळी आक्रमक कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे वृत्त आहे.
6 वर्षांपूर्वी -
काँग्रेसच्या १-२ आमदारांना भाजप नेत्यांकडून २५ कोटीची ऑफर मिळाली होती: नितीन राऊत
१३ व्या विधानसभेचा कार्यकाळ संपायचा उद्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांसह सर्व विधानसभा आमदार राजीनामा देतील. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष शिगेला पोहोचला आहे. भारतीय जनता पक्षाने अद्याप सत्तास्थापनेचा दावा केला नाही. या पार्श्वभुमीवर राज्यात आमदार फोडाफोडीचे राजकारण सुरु आहे. शिवसेनेचे सर्व आमदार रंगशारदामध्ये आहेत. काँग्रेसचे नेते जयपूरला गेले आहेत. या पार्श्वभुमीवर विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार यांनी भारतीय जनता पक्षावर घणाघाती आरोप केले आहेत.
6 वर्षांपूर्वी -
शिवसेनेच्या आमदाराला भाजपकडून ५० कोटींची ऑफर: काँग्रेस आ. विजय वडेट्टीवार
१३ व्या विधानसभेचा कार्यकाळ संपायचा उद्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांसह सर्व विधानसभा आमदार राजीनामा देतील. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष शिगेला पोहोचला आहे. भारतीय जनता पक्षाने अद्याप सत्तास्थापनेचा दावा केला नाही. या पार्श्वभुमीवर राज्यात आमदार फोडाफोडीचे राजकारण सुरु आहे. शिवसेनेचे सर्व आमदार रंगशारदामध्ये आहेत. काँग्रेसचे नेते जयपूरला गेले आहेत. या पार्श्वभुमीवर विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार यांनी भारतीय जनता पक्षावर घणाघाती आरोप केले आहेत.
6 वर्षांपूर्वी -
महाराष्ट्रात भाजपाचं सरकार येणार नाही: काँग्रेस खासदार हुसेन दलवाई
राज्यात सरकार बनण्याबाबतची अनिश्चितता निर्माण झाल्याने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुढाकार घेतला आहे. त्यातून पुढे जाऊ. मात्र, राज्यात भारतीय जनता पक्षाचं सरकार येणार नाही, असं काँग्रेसचे खासदार हुसेन दलवाई यांनी सांगितलं. दलवाई यांनी आज सामना कार्यालयात जाऊन शिवसेना नेते संजय राऊत यांच्याशी बंद दाराआड सुमारे अर्धा तास चर्चा केली. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना थेट भाष्य केल्याने राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं सरकार येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
6 वर्षांपूर्वी -
शेतकऱ्यांचे प्रश्न अन अजब पाठपुरावा; एक भेटले केंद्रीय गृहमंत्र्यांना तर दुसरे दळणवळन मंत्र्यांना
सध्या राज्यात ओल्या दुष्काळाने थैमान घातले असून, आधीच दुष्काळात होरपळला शेतकरी राजा आता ओल्या दुष्काळाने हैराण झाला आहे. एका बाजूला शेतकरी मदतीच्या आशेने हंबरडा फोडत असताना राज्यातील आणि केंद्रातील नेत्यांच्या भेटीगाठी म्हणजे कशाचा कशाला पत्ता नाही असंच म्हणावं लागेल.
6 वर्षांपूर्वी -
दिल्लीत सोनिया गांधींचे विश्वासू काँग्रेस नेते अहमद पटेल गडकरींना भेटले
तला सरकारस्थापनेचा तिढा अजून सुटलेला नाही. शिवसेना, भारतीय जनता पक्ष या दोन्ही पक्षांना मिळून बहुमत असूनही सरकारस्थापनेचा दावा भारतीय जनता पक्षाने केलेल नाही. मुख्यमंत्रीपदावरून दोहोंमध्ये एकमत होताना दिसत नाही. या पार्श्वभूमीवर तिकडे दिल्लीत आणखी वेगळ्या घडामोडी घडत आहेत. आज सकाळी अचानक काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल भारतीय जनता पक्षाचे नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी पोहोचल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. अहमद पटेल हे काँग्रेसचे चाणक्य मानले जातात. त्यामुळेच या भेटीने सर्वांचे लक्ष वेधले आहे.
6 वर्षांपूर्वी -
काँग्रेसचा एकही आमदार पक्ष सोडायचे धाडस करणार नाही...आणि केल्यास
आमचा कोणताही आमदार पक्ष सोडायचे धाडस करणार नाही, असा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केला. सध्या राज्यात सत्तास्थापनेवरून सुरु असलेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर ते मंगळवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांना काँग्रेसला आमदार फुटण्याची भीती वाटते का, असा प्रश्न विचारण्यात आला.
6 वर्षांपूर्वी -
८ नोव्हेंबरला विधीमंडळ बरखास्त होताच राष्ट्रपती राजवटीची प्रक्रिया सुरु होणार?
अमित शहा यांच्या भेटीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात लवकरच नवीन सरकार स्थापन होईल असा विश्वास व्यक्त केला मात्र यावेळी त्यांनी महायुतीचा उल्लेख टाळल्याने समोर आलं. तत्पूर्वी राज्याची विधानसभा बरखास्त होण्यापूर्वी नवीन सरकार आलं नाही तर राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकते असं विधान भाजप मंत्र्याने केलं होतं. त्यामुळे जर राष्ट्रपती राजवट लागू झाली तर आमदार फुटण्याची भीती निर्माण होऊ शकते. पुढील ६ महिन्यात भारतीय जनता पक्ष सर्वोतोपरी विरोधी पक्षाचे आमदार पक्षात घेण्याची रणनीती आखू शकते. त्यामुळे काँग्रेस-एनसीपी-शिवसेना एकत्र येत सत्ता स्थापनेचा दावा करु शकतील असा अंदाज वर्तविला जात आहे.
6 वर्षांपूर्वी