Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
मोदीजी पाकबद्दल नाही तर भारताविषयी बोला : प्रियंका गांधी
भारतीय जनता पक्षाचे नेते फक्त स्वत:लाच राष्ट्रवादी आणि देशाप्रती प्रेम असणारी मंडळी समजतात. ते खरे असेल, तर देशातील साऱ्या शहीद जवानांचा सन्मान करावा. जर ते राष्ट्रवादी असतील तर लोकसभा निवडणुकांच्या काळात केवळ पाकिस्तानविषयी नव्हे, ता भारताविषयी बोलावे, असे आवाहन काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी केले. काँग्रेसचे स्थानिक उमेदवार राज बब्बर यांच्या प्रचारासाठी काढण्यात आलेल्या प्रचारसभेत त्या उपस्थितांना संबोधित करत होत्या. या सभेत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी देखील मार्गदर्शन केले.
6 वर्षांपूर्वी -
भाजप कार्यकर्त्यांच्या हुल्लडबाजीमुळे एक महिला प्रवासी पडली, काँग्रेस कार्यकर्त्यांकडून चोप
एकीकडे भारतीय जनता पक्षाच्या महिला उमेदवारांना अश्लील टिप्पणीला सामोरे जावे लागत आहे. तर दुसरीकडे काँग्रेसच्या उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार आणि अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांना भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या हुल्लडबाजीचा सामना करावा लागला आहे. यावर मातोंडकर यांनी स्थानिक पोलिसांत तक्रार दाखल केली असून पोलीस संरक्षणाचीही मागणी केली आहे. या हुल्लडबाजींमध्ये एक महिला प्रवासी पडल्याने जखमी झाली आहे. तर या कार्यकर्त्यांना काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी चोप दिला आहे.
6 वर्षांपूर्वी -
प्रियंका गांधींचा आज आसाममध्ये रोड शो
लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील निवडणुकीसाठी मतदान झाल्यानंतर सर्वच पक्षांनी प्रचारासाठी कंबर कसली आहे. कॉंग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी वाड्रा आज पहिल्यांदा उत्तर प्रदेशच्या बाहेर निवडणूक प्रचार करणार आहेत. आज त्या आसाम दौऱ्यावर असून आसामच्या सिलचर मतदारसंघातील कॉंग्रेस उमेदवार सुष्मिता देव यांच्या प्रचारार्थ रोड शो करणार आहेत.
6 वर्षांपूर्वी -
जालियनवाला बाग हत्याकांडातील शहिदांना राहुल गांधींकडून श्रद्धांजली
अमृतसरमध्ये ब्रिटिश काळात झालेल्या जालियनवाला बाग हत्याकांडाला आज, १३ एप्रिलला १०० वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने याठिकाणी या हत्याकांडातील शहिदांना श्रद्धांजली वाहण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात उपराष्ट्रपती वंकय्या नायडू आणि पंजाबचे राज्यपाल शहिदांना श्रद्धांजली वाहणार आहेत.
6 वर्षांपूर्वी -
भाजप चक्रव्यूहात? पक्षाला देणगी देणार्या प्रत्येकाची नावे सांगा: सर्वोच्य न्यायालय
सुप्रीम कोर्टाने ‘निवडणूक रोखे’ प्रकरणात दिलेल्या अंतरिम आदेशाने भारतीय जनता पक्षाला अक्षरश: घाम फुटला आहे. या रोख्यांद्वारे भारतीय जनता पक्षाने देणग्या मिळवून सर्वाधिक रक्कम पक्षाच्या तिजोरीत भरली आहे. परंतु सर्वोच्च न्यायालयाने देणगी देणार्या प्रत्येकाच्या नावाची यादी तयार करून ती यादी मुख्य निवडणूक आयोगाला सादर करण्यास सांगितले आहे.
6 वर्षांपूर्वी -
तामिळनाडूमध्ये आरएसएस'ची सत्ता येऊ देणार नाही
तामिळनाडूवर नागपूरची म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची सत्ता कधीही येऊ देणार नाही, असे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी शुक्रवारी जाहीर केले. द्रमुकचे प्रमुख एम. के. स्टॅलिन तामिळनाडूचे लवकरच मुख्यमंत्री होतील, असा ठाम विश्वास देखील त्यांनी जाहीर सभेत व्यक्त केला.
6 वर्षांपूर्वी -
दणका! कार्यक्रमांमधून विशिष्ट पक्षाच्या स्कीम्स प्रमोट केल्याने झी वाहिनीवर कारवाई
मागील काही दिवसांपासून झी वाहिनीवर आचारसंहितेचे सर्व नियम पायदळी तुडवत मालिकांच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीचा प्रचार सुरू होता. वेगवेगळ्या कार्यक्रमांमधून पॉलिटीकल पार्टीच्या स्कीम्स प्रमोट करण्यात येत होत्या. यावर भारतीय निवडणूक आयोगाने आपला आक्षेप नोंदवत कडक कारवाई केली आहे. आचार संहिता लागु असताना अशा प्रकारे प्रचार करणे झी वाहिनीला महागात पडले आहे. त्यामुळे आज झी वाहिनीच्या कार्यक्रमांचे प्रसारण रात्री ८ ते १० यावेळेत बंद करण्यात आले होते. झी वाहिनीने प्रचार केल्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली.
6 वर्षांपूर्वी -
मोदींनी २००४ मधील इतिहास विसरु नये : सोनिया गांधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २००४ मधील इतिहास विसरु नये, अटल बिहारी वाजपेयी देखील अजिंक्य होते परंतु त्यावेळी देखील आम्हीच जिंकलो होतो. दरम्यान, २००४ मध्येही अनेक राजकीय विद्वान मंडळी आणि राजकीय विश्लेषक दावा करत होती अटलबिहारी वाजपेयी पुन्हा निवडून येतील, परंतु त्यांचा दावा फोल ठरला आणि जनतेने पुन्हा काँग्रेसला निवडून दिलं होतं अशी आठवण करुन देत सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर तीव्र शब्दात निशाणा साधला आहे.
6 वर्षांपूर्वी -
लोकसभे दरम्यान यूपीत फटका बसू नये म्हणून अल्पेश ठाकोर यांचा भाजपप्रवेश लांबणीवर?
आज ११ एप्रिल म्हणजेच गुरुवारी लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचं मतदान होत आहे. त्याच्या एक दिवस आधी म्हणजे बुधवारी अल्पेश ठाकोरने राजीनामा देऊन काँग्रेसला मोठा झटका दिला. गुजरातमधील ओबीसी समाजाचा चेहरा म्हणून परिचित असलेले अल्पेश ठाकोर यांनी काँग्रेसला सोडचिट्ठी दिली असली तरी त्यांच्या समर्थकांनी ते भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या वृत्ताला दुजोरा दिला होता.
6 वर्षांपूर्वी -
राहुल गांधी आज अमेठीतून उमेदवारी अर्ज भरणार
कॉंग्रेस राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यंदाच्या लोकसभा निवडणुकीत अमेठी आणि वायनाड अशा २ मतदारसंघांतून निवडणूक लढवणार आहेत. दरम्यान, ४ एप्रिल रोजी त्यांनी वायनाड मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल असून आज ते अमेठी मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरणार आहेत. हा अर्ज भरण्याआधी ते अमेठीत रोड शो करणार आहेत. यावेळी त्यांच्यासोबत सोनिया गांधी आणि प्रियांका गांधी उपस्थित राहणार आहेत. रोड शो सकाळी दहा वाजता मुंशागंजपासून सुरु होणार आहे. तर दुपारी १२.३० वाजता राहुल गांधी जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणूक अर्ज भरणार आहेत.
6 वर्षांपूर्वी -
पालघरमधून महाआघाडीची बळीराम जाधव यांना उमेदवारी
पालघर लोकसभा मतदारसंघात काँग्रेस, एनसीपी, बहुजन विकास आघाडी या महाआघाडीतर्फे माजी खासदार बळीराम जाधव यांनी काल मोठं शक्तिप्रदर्शन करत लोकसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज दाखल केला. भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना युतीने राजेंद्र गावित यांना उमेदवारी दिली आहे. शिवसेनेकडे उमेदवार नसल्याने त्यांनी आयत्यावेळी भाजपचे राजेंद्र गावित यांना शिवसेनेकडून तिकीट देत पालघरच्या मैदानात उतरवले आहे.
6 वर्षांपूर्वी -
उत्तर मुंबई उमेदवार उर्मिला मातोंडकर विरोधात भाजपाची पोलिसात तक्रार
काँग्रेसमध्ये लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर प्रवेश करणाऱ्या आणि उत्तर मुंबईतून लोकसभा निवडणुकीच्या आखाड्यात उमेदवार म्हणून उतरलेली अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिच्याविरोधात भारतीय जनता पक्षाने पोलिसात तक्रार दाखल केली आहे.
6 वर्षांपूर्वी -
भाजपा खासदार शत्रुघ्न सिन्हा यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश
भारतीय जनता पक्षाचे विद्यमान खासदार आणि बॉलिवूडचे ज्येष्ठ कलाकार शत्रुघ्न सिन्हा यांनी आज नवी दिल्ली येथे काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. मागील ५ वर्षात मोदी सरकारच्या कारभारावर त्यांनी वारंवार टीका केली होती. तसेच अनेकदा त्यांनी थेटपणे पंतप्रधान मोदींविरोधातही भाष्य केले होते. त्यामुळे ते भाजपापासून दुरावले होते. त्यातच भाजपाने त्यांचे लोकसभेचे तिकीटही कापल्याने अखेर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करीत असल्याची घोषणा केली होती.
6 वर्षांपूर्वी -
राहुल गांधी यांच्या रोड शोला तुफान जनसागर
केरळमधील वायनाड मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीसाठी गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी व सरचिटणीस प्रियांका गांधी यांच्यासमवेत येथे गुरुवारी केलेल्या रोडशोला जनतेचा तुफान प्रतिसाद मिळाला. दरम्यान या रोड शोमध्ये केरळचे माजी मुख्यमंत्री ओमेन चंडी, विधानसभेतील विरोधी पक्षनेते रमेश चेन्नितेला यांची देखील विशेष उपस्थिती होती. तसेच या रोडशोदरम्यान काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सामान्य नागरिकांच्या वाढत्या गर्दीमुळे सुरक्षा रक्षकांची मोठी तारांबळ उडाल्याचे पाहायला मिळाले. राहुल आणि प्रियांका गांधी जनतेला अभिवादन करत होते. राहुल गांधी यांनी रोड शोमध्ये सामील झालेल्या अनेकांशी पुढे येऊन हस्तांदोलन केले.
6 वर्षांपूर्वी -
मुंबईत SRA अंतर्गत ५०० चौरस फुटांचे घर देणार: काँग्रेस
मुंबईत सर्वात महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे गृहनिर्माणचा आणि फोफावत जाणारे लोंढे तसेच त्याच्या घरांचा. काँग्रेसचे सरकार केंद्रात आणि राज्यात सत्तेत येईल तेव्हा गृहनिर्माणचा प्रश्न आम्ही सर्वप्रथम मार्गी लावू त्यानुसार म्हाडा आणि एसआरए यांच्याद्वारे गृहनिर्माण प्रकल्प साकारत नागरिकांना किमान ५०० चौरस फुटांचे घर असावे, अशी आमची योजना आहे, असे काँग्रेसचे दक्षिण मुंबईचे काँग्रेसचे उमेदवार मिलिंद देवरा यांनी आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले. काँग्रेस आघाडीच्या उमेदवारांच्या संयुक्त पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
6 वर्षांपूर्वी -
राहुल गांधी आज वायनाडमधून उमेदवारी अर्ज भरणार
लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी २ मतदार संघातून निवडणूक लढणार आहेत. यूपीतील पारंपरिक असलेला अमेठी आणि केरळातील वायनाड या २ मतदार संघातून राहुल गांधी आपले नशीब आजमावणार आहेत.
6 वर्षांपूर्वी -
शिवसेना पक्ष अल्पसंख्याकांविरोधात आहे: मिलिंद देवरा
लोकसभा निवडणुकीचा प्रचार सध्या शिगेला पोहोचला असताना मुंबई काँग्रेसने देखील सत्ताधाऱ्यांना लक्ष करण्यास सुरुवात केली आहे. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आणि दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार मिलिंद देवरा यांनी शिवसेनेवर सडकून टीका केली आहे. त्यावेळी उपस्थितांना संबोधित करताना शिवसेना अल्पसंख्याकांविरोधात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. काही वर्षांपूर्वीच शिवसेनेने जैन मंदिराबाहेर मांस शिजवून जैन समाजाचा अपमान केला होता याची आठवण देखील त्यांनी यावेळी करून दिली. आता मतदानातून त्यांना चांगलाच धडा शिकवा, असे जाहीर आवाहन देवरा यांनी जैन समाजाला केले आहे.
6 वर्षांपूर्वी -
चौकीदार भाजप नेते व अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांच्या ताफ्यातून १.८ कोटी रूपये जप्त
अरूणाचल प्रदेशमध्ये पैसे देऊन मत विकत घेण्याचा गंभीर आरोप कांग्रेसने भारतीय जनता पक्षावर केला आहे. काँग्रेसचे प्रवक्ता रणदीप सुरजेवाला यांनी दिल्लीमध्ये जाहीर पत्रकार परिषद घेत भाजपावर हा गंभीर आरोप केला आहे. दरम्यान, पैसे जप्त केलेल्या कारवाईचा व्हिडीओ देखील यावेळी जारी केला आहे. रणदीप सुरजेवाला म्हणाले की, अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांच्या ताफ्यातून तब्बल १.८ कोटी रूपये जप्त करण्यात आले आहे. भारतीय जनता पक्ष हे पैसे मतं विकत घेण्यासाठी वापरणार होते का? हा काळा पैसे आहे का? असे अनेक प्रश्न काँग्रेसने आयोजित पत्रकार परिषदेत उपस्थित केले आहेत.
6 वर्षांपूर्वी -
काँग्रेसच्या राफेल जाहिरातीवर निवडणूक आयोगाचा आक्षेप
लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून राफेल लढाऊ विमानांच्या कराराचा मुद्दा आक्रमकपणे वापरला जात असताना याबाबत काँग्रेसने जाहिरातीत राफेलच्या प्रतिकृतीच्या वापर केल्याने निवडणूक आयोगाने त्याबाबत आक्षेप घेतला आहे. मध्य प्रदेश काँग्रेसच्या ९ पैकी ६ जाहिरातींवर आयोगाने आक्षेप घेतला आहे. ज्यामध्ये राफेलबाबत असलेल्या जाहिरातीचाही समावेश करण्यात आला आहे.
6 वर्षांपूर्वी -
पुण्यातून मोहन जोशींना काॅंग्रेसकडून उमेदवारी
अखेर पुण्यातून काँग्रेस पक्षाकडून कोणाला उमेदवारी मिळणार हा सस्पेन्स संपवत माजी आमदार मोहन जोशी यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. काल रात्री उशिरा मोहन जोशी यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. पुण्यातून काँग्रेसच्या उमेदवारीसाठी नुकतेच पक्षात दाखल झालेले प्रवीण गायकवाड इच्छुक होते. मात्र त्यांना तिकीट मिळाले नाही.
6 वर्षांपूर्वी