Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
बेरोजगार युवक मोदींच्या २ कोटी रोजगाराची आतुरतेने वाट बघत आहेत : डॉ. मनमोहन सिंग
काँग्रेसचे वरिष्ठ नेते कपिल सिब्बल यांच्या ‘शेड्स ऑफ ट्रूथ- ए जर्नी डिरेल्ड’ पुस्तकाचे प्रकाशन माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या हस्ते काल करण्यात आले. त्यावेळी त्यांनी मोदी सरकारच्या अनेक आश्वासनांचे वाभाडे काढले. त्यावेळी उपस्थितांना संबोधित करताना डॉ. मनमोहन सिंग यांनी मोदी सरकारच्या अनेक फसव्या घोषणांना उजाळा दिला.
7 वर्षांपूर्वी -
अब की बार 'महागाई कंबरडं मोडणार', पेट्रोल आणि डिझेल पुन्हा महाग
पेट्रोल डिझेलचे भाव रोज वाढतच असून त्याचा परिणाम थेट महागाई वाढण्यात होत असल्याने, सामान्य लोकं सणासुदीच्या दिवशी पुरते हैराण झाले आहेत. शनिवारी पेट्रोलचा मुंबईतला दर ८७ रूपये ७७ पैसे असा आहे. तर डिझेलचा दर ७६ रूपये ९८ पैसे इतका झाला आहे. दुसरीकडे, राजधानी दिल्लीतला शनिवारचा दर ८० रूपये ३८ पैसे लिटर इतका आहे, तर डिझेलचा दर ७२ रूपये ५१ पैसे इतका झाला आहे. कालच्या तुलनेत आजचा पेट्रोलचा दर ३८ पैशांनी अधिक झाला आहे.
7 वर्षांपूर्वी -
बॅलेट पेपरने झालेल्या कारगिल स्थानिक निवडणुकीत भाजपला १ जागा तर काँग्रेस व नॅशनल कॉन्फ्रेन्स पार्टीची सरशी
जम्मू काश्मीर मधील महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या कारगिल येथील पहाडी विकास परिषदेच्या २६ जागांसाठी पार पडलेल्या निवडणुकीत काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फ्रेन्स पार्टीने सरशी मारली आहे, तर भाजपला केवळ एका जागेवर समाधान मानावं लागलं आहे.
7 वर्षांपूर्वी -
व्हिडीओ व्हायरल: रुपया १० पैशाने घसरताच सुषमा स्वराज यांना टीव्ही ऑन करताना भीती वाटायची
आज डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण होऊन रुपयाने प्रति डॉलर ७१ रुपये असा निचांक दर गाठला. परंतु नंतर तो नऊ पैशांनी सावरून रुपयाचं मूल्य ७० रुपये ९१ पैशांवर स्थिरावलं आहे. या आर्थिक वर्षात रुपयाचं मूल्य तब्बल १० टक्क्यांनी घसरून आशियातील इतर चलनांच्या तुलनेत भारताच्या रुपयाची ही सर्वात वाईट परीस्थिती आहे. परंतु त्यामुळे २०१३ मधील सुषमा स्वराज यांच्या लोकसभेतील भाषणाची आठवण झाली आहे.
7 वर्षांपूर्वी -
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमाला राहुल जाणार नाहीत: काँग्रेस
आरएसएस’कडून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना कोणत्याही कार्यक्रमाचे निमंत्रण मिळालेले नाही आणि मिळाले असते तरी ते गेले नसते असं प्रदेश काँग्रेसचे प्रभारी मल्लिकार्जून खरगे यांनी बुधवारी प्रसार माध्यमांपुढे स्पष्ट केले. त्यामुळे काँग्रेसने या विषयावर आता पडदा टाकला आहे.
7 वर्षांपूर्वी -
हाच काँग्रेस आणि भाजप'मधील फरक; राजीव गांधींवरील होर्डिंग्जवरून काँग्रेसचं भाजपला सडेतोड उत्तर
कालच भाजपाचे दिल्लीचे प्रवक्ते तेजिंदरपाल सिंग बग्गा यांनी दिल्लीतील अनेक ठिकाणी माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी हे जमावाकडून होणाऱ्या हत्येचे जनक म्हणजे ‘फादर ऑफ द मॉब लिचिंग’ असल्याचे फलक लावले होते. परंतु काँग्रेसने त्यांना समंजस आणि सडेतोड उत्तर दिलं आहे.
7 वर्षांपूर्वी -
‘राजीव गांधी द फादर ऑफ मॉब लिचिंग’, भाजपची दिल्लीत पोश्टरबाजी
लंडन मधील दौऱ्यादरम्यान काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी दिल्लीत १९८४ साली उसळलेल्या शीख विरोधी दंगलीत काँग्रेस पक्षाचा सहभागी नव्हता असा दावा होता. त्याच विषयाला अनुसरून भाजपा आणि पंजाबमधील अकाली दलाने काँग्रेसला डिवचण्याचा प्रकार सुरु केला आहे.
7 वर्षांपूर्वी -
अनिल अंबानींना कर्जाच्या सापळय़ातून वाचवण्यासाठी राफेलचे कंत्राट: राहुल गांधी
जगातील सर्वात मोठ्या संरक्षण खरेदीच्या करारात म्हणजे राफेल लढाऊ जेट विमान खरेदी प्रकरणात भारतीय जनता पक्षाच्या सरकारने कर्जाच्या सापळय़ात अडकलेल्या एका भारतीय उद्योगपतीच्या भल्यासाठी राफेल करारात वाट्टेल ते फेरबदल केले, असा सनसनाटी आरोप काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथे केला.
7 वर्षांपूर्वी -
दाभोलकरांच्या हत्येपूर्वीच आघाडी सरकारने ‘सनातन’वर बंदीचा प्रस्ताव केंद्राला दिला होता
अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येपूर्वीच आघाडी सरकारने ‘सनातन’वर बंदीचा प्रस्ताव केंद्राला दिला होता असा गौप्यस्फोट माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.
7 वर्षांपूर्वी -
राफेल करारातील घोटाळ्याबाबत भाष्य करणाऱ्या काँग्रेस नेत्याला अनिल अंबानी समुहाकडून नोटीस
बहुचर्चित राफेल करारातील घोटाळ्याबाबत भाष्य करणारे काँग्रेस नेते तसेच काँग्रेसचे प्रवक्ते जयवीर शेरगिल यांना अनिल धीरुभाई अंबानी समुहाने कायदेशीर नोटीस पाठवली आहे. त्यामुळे अनिल अंबानी समूह सुद्धा काँग्रेसवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहे का असा प्रश्न विचारलं जाऊ लागला आहे.
7 वर्षांपूर्वी -
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुरुदास कामत यांचे निधन
काल दिल्लीच्या दौऱ्यावर गेलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुरुदास कामत यांचं आज बुधवारी सकाळी ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाल आहे. त्यांना थोडा त्रास होऊ लागल्याने दिल्लीतील चाणक्यपूरी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
7 वर्षांपूर्वी -
राजीव गांधींची ४७वी जयंती; टेलिकॉम, आयटी व पंचायत-राज क्षेत्रात भारताला दिशा देणारे माजी पंतप्रधान
आज माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची ७४वी जयंती आहे. त्यानिमित्त काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, सोनिया गांधी, प्रियंका गांधी यांच्यासह देशातील अनेक दिग्गजांनी दिल्लीतील राजघाट येथे जाऊन राजीव गांधींच्या समाधीस्थळावर आदरांजली वाहिली. देशातील टेलिकॉम, आयटी व पंचायत-राज क्षेत्रातील क्रांतीचे तेच खरे शिल्पकार होते.
7 वर्षांपूर्वी -
जो पक्ष २०१९ च्या निवडणुकीत बक्कळ पैसा खर्च करेल तोच पक्ष जिंकेल: कपिल सिब्बल
काल काँग्रेस नेते कपिल सिब्बल हे नागपूर दौऱ्यावर आले असता ऑल इंडिया प्रोफेशनल कॉंग्रेसतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘लोकशाहीतील संघर्ष’ या परिसंवादात उपस्थितांना संबोधित करताना त्यांनी हे वक्तव्य केलं. या परिसंवादात त्यांनी आगामी निवडणुकीच वास्तव मांडण्याचा प्रयत्न केला.
7 वर्षांपूर्वी -
राहुल गांधींचे तरुण चेहरे मध्य प्रदेश - राजस्थानमध्ये भाजपला आवाहन देणार, मुख्यमंत्री पदाचे उमेदवार?
विधानसभेच्या निवडणुकीत भाजपला राजस्थान आणि मध्य प्रदेशातून नकारात्मक संकेत मिळत असताना, राहुल गांधी या दोन महत्वाच्या राज्यात सचिन पायलट आणि ज्योतिरादित्य शिंदे हे दोन तरुण तडफदार नैतृत्व पुढे येण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपला मोठं आवाहन देण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे असं समजतं.
7 वर्षांपूर्वी -
भारतातील तंत्रज्ञान आणि डिजिटल इंडियाचे खरे शिल्पकार माजी पंतप्रधान राजीव गांधी
८०च्या दशकात दूरगामी परिमाण करणारी मोठी स्वप्न बघून राजीव गांधी यांनी भारतातील दूरसंचार आणि तंत्रज्ञानाचा खरा अर्थाने पाया रचला होता. केवळ तंत्रज्ञानच नव्हे तर ग्रामीण भागात पिण्याचे पाणी, लसीकरण, साक्षरता, खाद्यतेल, टेलिकॉम आणि डेअरी विकास याला सुद्धा तंत्रज्ञानाच्या मोहिमे सोबत जोडायला सुरुवात झाली होती.
7 वर्षांपूर्वी -
लोकसभेत राहुल गांधींनी घेतली नरेंद्र मोदींची गळाभेट - व्हिडिओ व्हायरल
आज केंद्रातील मोदी सरकारविरोधातील अविश्वास प्रस्तावावरील चर्चेदरम्यान लोकसभेत वेगळंच राजकीय नाट्य अनुभवायला मिळालं. कारण काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी अविश्वास प्रस्तावावर लोकसभेत बोलताना मोदी सरकारवर तुफान आरोप आणि टीकेच्या फैरी झाडल्या. परंतु, दुसरीकडे ते नरेंद्र मोदी आणि भाजपबद्दल माझ्या मनात जराही द्वेष नसल्याचं सांगत त्यांनी लोकसभेत थेट पंतप्रधान नरेन्द्र मोदींची गळाभेट घेतली आणि एकच चर्चा रंगली.
7 वर्षांपूर्वी -
काँग्रेसची सत्ता आल्यास मोदींचा बुलेट ट्रेन प्रकल्प रद्द करणार
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘ड्रीम प्रोजेक्ट’ला महाराष्ट्राबरोबर गुजरातमधून सुद्धा विरोध वाढू लागला आहे. त्यात बुलेट ट्रेन म्हणजे श्रीमंतांचे चोचले असल्याचा संदेश सामान्य लोकांपर्यंत पोहोचला आहे, त्यामुळे विरोध दिवसेंदिवस अजूनच गडद होत जाणार हे काँग्रेसला उमगल्याने आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन अशी घोषणा करण्यात आली आहे. काँग्रेसची सत्ता आल्यास मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प रद्द करू असं वचन पृथ्वीराज चव्हाण यांनी दिल आहे.
7 वर्षांपूर्वी -
काँग्रेस व एनसीपी'ची आघाडी होणार, आठवड्याभरात जागावाटप ठरणार: शरद पवार
आघाडी संदर्भात काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या सोबत आपल्या ३ बैठका पूर्ण झाल्या असल्याचा खुलासा राष्ट्रवादीचे सर्वेसेवा शरद पवार यांनी ‘द हिंदू’ ला दिलेल्या एका मुलाखतीत केला आहे. त्यामुळे शरद पवार हे आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी जोमाने कामाला लागले असल्याचे स्पष्ट झाले आहे.
7 वर्षांपूर्वी -
ऐनवेळी राष्ट्रवादीने दगा दिल्यास स्वबळावर लढायच्या विचारामध्ये काँग्रेस?
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सध्याच्या एकूणच प्रतिक्रिया पाहिल्यास, ऐनवेळी राष्ट्रवादीने दगा दिल्यास काँग्रेस स्वबळावर लढणार असं सांगत महाराष्ट्र काँग्रेसचे नवनियुक्त प्रभारी मल्लिकार्जून खरगे यांनी राष्ट्रवादीच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला आहे. दिल्लीत भरलेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत अनेकांनी राष्ट्रवादीच्या भूमिकेविषयी शंका उपस्थित केली आणि जर राष्ट्रवादी महाराष्ट्रात सोबत आली नाही तर काय निर्णय घ्यायचा असा प्रश्न उपस्थित केला असता मल्लिकार्जून खरगे यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
7 वर्षांपूर्वी -
राज्यातील सुस्त काँग्रेस पक्षामुळे राष्ट्रवादीच्या अडचणी वाढण्याची चिन्ह? सविस्तर
आगामी निवडणुकीसाठी सर्वच पक्ष कामाला लागलेले असताना राज्यातील काँग्रेस मात्र अजून सुद्धा सुस्त असल्याचे स्पष्ट जाणवते. सध्या राज्यात काँग्रेस पक्षाला राज्य स्तरावरील चेहराच नसल्याने अडचणी वाढण्याची चिन्ह आहेत. काँग्रेसचे दोन माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण व पृथ्वीराज चव्हाण हे दोन्ही नेते त्यांच्या मतदारसंघापुरतेच आवडते चेहरे आहेत. परंतु काँग्रेसमधला सुस्तपणा राष्ट्रवादीला आगामी निवडणुकीत अडचणीत टाकू शकतो.
7 वर्षांपूर्वी