Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
चिंता वाढली | राज्यात पुन्हा नव्या कोरोना रुग्णांची उच्चांकी वाढ
राज्यातील रुग्णवाढीचा वेग कायम असून, सलग तिसऱ्या दिवशी राज्यात १४ हजारांपेक्षा जास्त नागरिक करोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. दिलासादायक बाब म्हणजे राज्यात आतापर्यंत ५ लाख ४३ हजार १७० रुग्ण बरे झाले आहेत. तर आज दिवसभरात ११ हजारांहून जास्त रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे.
5 वर्षांपूर्वी -
काँग्रेसचे खासदार वसंत कुमार यांचं कोरोनामुळे निधन
जगभरात थैमान घालणाऱ्या करोना विषाणूचा प्रादुर्भाव भारतातही झपाट्यानं वाढत आहे. भारतात एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या ३३ लाखांच्या पुढे गेली आहे. मागील २४ तासांत ७७ हजार २६६ करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. आतापर्यंतची ही सर्वात मोठी वाढ आहे. मागील दोन दिवसांपासून करोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसाला ७५ हजारांपेक्षा जास्तने वाढत आहे. गेल्या आठवड्यात करोनाबाधित रुग्णांची संख्या दररोज ६० ते ६५ हजाराने वाढत होती.
5 वर्षांपूर्वी -
पुण्यात ऑक्सफर्डची लस घेणाऱ्या स्वयंसेवकांची प्रकृती उत्तम | साइड इफेक्ट नाहीत
ऑक्सफोर्ड कोविड-19 लसीच्या क्लिनिकल ट्रायल्सच्या दुसऱ्या टप्प्यातील परिणाम नॉर्मल असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी गुरुवारी (27 ऑगस्ट) दिली आहे. या चाचणीसाठी पुढे आलेल्या 2 स्वयंसेवकांपैकी दोघांचीही प्रकृती स्थिर असल्याचे समोर आले आहे. 32 आणि 48 वर्षीय दोन स्वयंसेवकांना कोविडशिल्ड लसीचा पहिला डोस देण्यात आला. पुणे स्थित भारती विद्यापीठ मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमधील सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया यांनी या लसीचे उत्पादन केले आहे.
5 वर्षांपूर्वी -
राज्यात आज १४,८८८ रुग्णांची वाढ | तर २९५ कोरोना रुग्णांचा मृत्यू
राज्यात आज कोरोनाचे १४,८८८ नवे रुग्ण वाढले आहेत. तर २९५ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आज ७,६३७ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून आतापर्यंत ५,२२,४२७ रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे.
5 वर्षांपूर्वी -
राज्यात आज १०,४२५ नव्या कोरोना रुग्णांची नोंद | ३२९ रुग्णांचा मृत्यू
राज्यात आज सलग दुसऱ्या दिवशी नवीन रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या अधिक असून आज १२ हजार ३०० रुग्ण बरे झाले तर १० हजार ४२५ नवीन रुग्णांचे निदान झाले. राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढून ते ७३.१४ टक्के झाले. राज्यभरात आतापर्यंत एकूण ५ लाख १४ हजार ७९० रुग्ण बरे झाले आहेत. सध्या १ लाख ६५ हजार ९२१ रुग्णांवर (ॲक्टीव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
5 वर्षांपूर्वी -
कोरोना संकटात विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यास सांगणं अन्यायकारक | ग्रेटा थनबर्गची नाराजी
करोना संकटामुळे नीट आणि जेईई परीक्षा पुढे ढकलली जावी अशी मागणी वारंवार केली जात आहे. केंद्र सरकार मात्र परीक्षा घेण्याच्या निर्णयावर ठाम आहे. सुप्रीम कोर्टात झालेल्या सुनावणीतही न्यायालयाने परीक्षा घेतली पाहिजे असा निर्वाळा दिला आहे. यादरम्यान स्वीडनची १७ वर्षीय पर्यावरण प्रेमी ग्रेटा थनबर्गने परीक्षा घेण्याच्या निर्णयावर टीका केली आहे. करोना संकटात विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यास सांगणं अन्यायकारक असल्याचं ग्रेटा थनबर्गने म्हटलं आहे. तिने ट्विट करत आपलं मत मांडलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
आज राज्यात तब्बल १४,२१९ रुग्णांची कोरोनावर यशस्वी मात
आज राज्यात तब्बल १४ हजार २१९ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. एकाच दिवसात इतक्या मोठ्या संख्येने रुग्ण बरे झाल्याने थोडा दिलासा मिळत आहे. नवीन रुग्णांच्या तुलनेने रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अधिक असल्याची माहिती, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
5 वर्षांपूर्वी -
मुंबई बाहेरील क्षेत्रात कोरोनाची दुसरी लाट येऊ शकते | तयारीत रहावे लागेल - मुख्यमंत्री
जूनपासून मिशन बिगेन अगेन सुरु झाले आहे. त्यानूसार इतर सर्वांनी जगभरात ज्या काही गोष्टी घाईगडबडीत केल्या असतील त्या गोष्टी महाराष्ट्र करणार नाही. आपण ज्या ज्या गोष्टी सुरु केल्या आहेत, त्या पुन्हा बंद होणार नाहीत याची दक्षता घेऊन आपण या गोष्टी सुरु केल्या आहेत. शहरी भाग असेल किंवा ग्रामीण भाग असेल, त्या ठिकाणी महत्वाच्या गोष्टी उघडायला परवानगी दिली आहे. पण, ज्या गोष्टी सध्या उघडता येणो शक्य नाही, किंवा त्या उघडण्याची खात्री होत नाही, तोर्पयत त्या सुरु केल्या जाणार नसल्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सांगितले.
5 वर्षांपूर्वी -
कोरोनामुळे राष्ट्रवादीच्या नेत्याच्या कुटुंबातील ३ सदस्यांचा एका महिन्यात मृत्यू
जगभर थैमान घातलेल्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव भिवंडीतही वाढला आहे. सध्या रुग्ण बरे होण्याचा वेग वाढला असला तरी कोरोनाने भिवंडीतील वडूनवघर येथील चौघुले परिवारावर घाला घातला आहे. एका महिन्याच्या आत परिवारातील तीन सदस्यांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.
5 वर्षांपूर्वी -
स्वत:वर कोरोना लशीची चाचणी करायची असल्यास 'या' असतात अटी
अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (AIIMS) करोनावरील लशीच्या (corona vaccine) पहिल्या टप्प्यातील मानवी परीक्षणासाठी (human trial of corona vaccine) स्वयंसेवकाच्या शोधात आहे. या परीक्षणात सहभागी होण्यासाठी काही अटी आहेत. तुम्ही त्या अटी पूर्ण केल्यास तुमच्या इच्छेनुसार करोना लशीची चाचणी तुमच्यावर केली जाऊ शकते. आतापर्यंत या चाचणीत सहभागी होण्याची सुमारे १००० लोकांनी इच्छा व्यक्त केली आहे.
5 वर्षांपूर्वी -
Fact Check | कोरोना लस येत्या ७३ दिवसात भारतात उपलब्ध होण्याचं वृत्त चुकीचं
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे जगभरात हाहा:कार पाहायला मिळत आहे. कोरोनाची लस नेमकी कधी येणार याची सर्व नागरिक वाट बघत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी स्वदेशी बनावटीची कोरोना लस वर्ष अखेरीस येईल, असे ते म्हणाले. एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी याबाबतची माहिती दिली.
5 वर्षांपूर्वी -
सामान वाहतूक आणि नागरिकांच्या प्रवासाला ई-पासची गरज नाही | केंद्राचे राज्यांना निर्देश
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये टप्प्याटप्प्याने शिथिलता आणली जात आहे. त्याचाच भाग म्हणून आता केंद्र सरकारने देशभरात कुठेही सामान आणि प्रवाशी वाहतुकीसाठी ई पासची गरज लागणार नाही, असं स्पष्ट केलं आहे. याबाबतच केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना निर्देश जारी केले आहेत. तसेच या नियमावलीची अंमलबजावणी करण्यास सांगितले आहे.
5 वर्षांपूर्वी -
कोरोनाविरोधात लस महत्त्वपूर्ण साधन | लवकरात लवकर आपल्याकडे ती असेल - WHO
जगभरातील कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असून कोरोना नेमका कधी जाईल, असा प्रश्न प्रत्येकाल सतावत आहे. कोरोनासोबत जगणं सुरू आहे, पण ते तितकच कठिणही आहे. त्यामुळे, कोरोनाला हद्दपार करुन पुन्हा एकदा पूर्वीप्रमाणे आपला दिनक्रम सुरू व्हावा, असे लोकांना वाटते. मात्र, अद्याप ते शक्यच नसल्याचे दिसून येत आहे. यासंदर्भात बोलताना WHO चे प्रमुख टेड्रोस एडहानॉम गेब्रयेसिस यांनी अंदाज व्यक्त केला आहे. साधारपणे 2 वर्षात या व्हायरसचा प्रभाव संपुष्टात येईल, असे गेब्रयेसिस यांनी म्हटलंय. त्यासाठी, जगातील सर्वच देशांनी एकत्र येऊन लसीसाठी प्रयत्न करण्याचे आवाहनही त्यांनी केलंय.
5 वर्षांपूर्वी -
केंद्रीय आरोग्य मंत्र्यांकडून कोरोना लस उपलब्ध होण्याबाबत माहिती
भारताची कोरोना लस ह्युमन ट्रायलच्या तिसऱ्या टप्प्यात आहे. या लशीकडे आता सर्वांचे डोळे लागले आहेत. ही लस कधी मिळणार याची प्रतीक्षा प्रत्येकाला आहे. आता अखेर केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी ही लस कधी मिळणार याची माहिती दिली आहे. या वर्षा अखेरपर्यंतच मेड इन इंडिया कोरोना लस उपलब्ध होईल, असा दावा आरोग्यमंत्र्यांनी केला आहे.
5 वर्षांपूर्वी -
भारत सरकारकडून कोरोना लस खरेदी करण्याचा विचार | कोणाला प्राधान्य हाच मुद्दा
भारतासह जगातील कोरोना रुग्णांचा आकडा दिवसागणिक वाढत आहे. त्यातच ऑगस्टमध्ये कोरोनानं भारतात अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. हर्ड इम्युनिटी आणि कोरोना लस हेच कोरोनाला रोखण्याचे दोन प्रमुख मार्ग आहेत. त्यातील कोरोना लसीच्या पर्यायाचा विचार करता सर्वात आधी कोणाला लस दिली जाणार हा महत्त्वाचा प्रश्न आहे. प्रत्येक देशाचं याबद्दलचं धोरण वेगवेगळं असणार आहे.
5 वर्षांपूर्वी -
राज्यात गेल्या २४ तासात १४, ४९२ नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण | ३२६ रुग्णांचा मृत्यू
देशभरासह राज्यात करोनाचा प्रादुर्भाव अद्यापही वाढतच आहे. मागील २४ तासांमध्ये राज्यात १४ हजार ४९२ नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून ३२६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, १२ हजार २४३ जणांनी कोरोना वर मात केली आहे. राज्यातील कोरोना बाधितांची संख्या ६ लाख ४३ हजार २८९ वर पोहचली आहे. राज्याच्या आरोग्य विभागाच्या हवाल्याने एएनआयने हे वृत्त दिले आहे.
5 वर्षांपूर्वी -
आज राज्यात कोरोनाचे १३,१६५ नवे रुग्ण | ३४६ जणांचा मृत्यू
राज्यामध्ये एका दिवसात कोरोनाचे १३,१६५ रुग्ण वाढले आहेत, तर ३४६ जणांचा मृत्यू झाला आहे. आजच्या दिवसात कोरोनाचे ९,०११ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातला बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या ४,४६,८८१ एवढी झाली आहे. राज्यातला रुग्ण बरे होण्याचा दर ७१.०९ टक्के एवढा झाला आहे.
5 वर्षांपूर्वी -
आज राज्यात ११ हजार ११९ नव्या कोरोना रुग्णांची नोंद | ४२२ रुग्णांचा मृत्यू
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असतांनाच आज उच्चांकी ४२४ रुग्णांचा मृत्यू झालाय. आत्तापर्यंतची ही सर्वात मोठी संख्या आहे. मंगळवारी राज्यात ११ हजार ११९ नवे रुग्ण आढळले. तर ९ हजार ३५६ रुग्णांना घरी सोडण्यात आलं. कोरोना रुग्णांची एकूण संख्या ही ६ लाख १५ हजार एवढी झाली आहे. तर राज्यात सध्या १ लाख ५६ हजार लोक उपचार घेत आहेत.
5 वर्षांपूर्वी -
देशात गेल्या २४ तासांत ५५,०७९ नव्या कोरोना रुग्णांची नोंद | तर ८७६ रुग्णांचा मृत्यू
भारतात कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. गेल्या 24 तासात देशात 55 हजार 79 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. देशातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 27,02,743 इतकी झाली आहे. भारतात कोरोनामुळे दगावलेल्या नागरिकांचा आकडा 50 हजारच्या पार गेला आहे. भारताच्या लोकसंख्येच्या तुलनेत जरी मृतांचा आकडा कमी असला तरीही जगाच्या तुलनेत भारतातील मृतांचा आकडा वेगाने वाढत आहे. दिवसभरात 876 जणांचा बळी गेला आहे. त्यामुळे भारतात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या 51,797 झाली आहे.
5 वर्षांपूर्वी -
देशात गेल्या २४ तासांत ५७,९८२ नव्या रुग्णांची नोंद | आजपर्यंत एकूण ५०९२१ रुग्णांचा मृत्यू
भारतात करोनाचा संसर्ग वेगाने वाढतच असल्याचे चित्र आहे. गेल्या चोवीस तासांत देशात ५७,९८२ नवे करोनाबाधित आढळून आले आहेत. तर ९४१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील एकूण रुग्णसंख्या आता २६ लाखांच्या पार पोहोचली आहे. आरोग्य मंत्रालयाने सोमवारी सकाळी ही आकडेवारी जाहीर केली.
5 वर्षांपूर्वी