Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
कोरोनावरील दोन स्वदेशी लसींची मानवी चाचणी सुरु : ICMR
जगभरात कोरोना विषाणूने अक्षरश: कहर केला असून देशात कोरोनाचे रुग्ण ९ लाखावर गेले आहे. यामुळे सध्याची परिस्थिती फार गंभीर झाली आहे, अशा स्थितीत एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. भारतात कोरोनावर दोन लसी विकसित करण्यात आल्या असून मानवी चाचणीला देखील परवानगी दिली आहे, अशी माहिती आयसीएमआरचे संचालक डॉ. बलराम भार्गव यांनी दिली आहे. विशेष म्हणजे उंदीर आणि संशयित अशा दोन्ही स्वदेशी लसींची टॉक्सिसिटी स्टडीज यशस्वी झाली आहे, असे देखील ते पुढे म्हणाले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
राज्यात गेल्या २४ तासांत ६ हजार ७४१ नव्या कोरोना रूग्णांची नोंद
राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असून राज्यात गेल्या २४ तासांत ६ हजार ७४१ नव्या रूग्णांची नोंद झाली आहे. तर दिवसभरात २३१ जणांचा कोरोनाने बळी गेला आहे. यामुळे राज्यात आतापर्यंत एकूण २ लाख ६७ हजार ६६५ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच आज दिवसभरात ४ हजार ५०० कोरोना रूग्णांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे राज्यात आजपर्यंत एकूण १ लाख ४९ हजार ७ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
बकरी ईद घरीच साजरी करा, मुख्यमंत्र्यांचं मुस्लीम बांधवांना आवाहन
राज्यात कोरोनाव्हायरचे नवे रुग्ण अजूनही मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत. त्यामुळे कुठल्याही कारणासाठी गर्दी करणं परवडणारं नाही, असं सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बकरी ईद घरीच साजरी करा, असं आवाहन केलं आहे. च्या प्रादुर्भावामुळे यावर्षी वारकऱ्यांनीही चांगला निर्णय घेत वारीला जाणं टाळलं. लालबागच्या राजाच्या कार्यकर्त्यानीही या वर्षी गणेश प्रतिष्ठापना न करता आरोग्योत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मुस्लीम बांधवांनीही घरातच ईद साजरी करावी, असं ठाकरे म्हणाले.
5 वर्षांपूर्वी -
वसई-विरार महापालिका आयुक्तांवर अविनाश जाधव का संतापले? सविस्तर वृत्त
वसई विरार महापालिकेला तीन महिन्यांनी पूर्ण वेळ आयुक्त मिळाले होते. धुळ्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी असलेल्या डी. गंगाथरन यांची एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला वसई-विरार महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली हप्ते. मार्च महिन्यात धुळे जिल्ह्यातील निवडणुकीमुळे गंगाथरन यांच्या नियुक्तीला स्थगिती मिळाली होती.
5 वर्षांपूर्वी -
अखेर सरकारला जाग, गुणपत्रिकेवर प्रमोटेड कोविड-१९ चा शिक्का नसेल याची हमी
कोविड-१९मुळे ज्यांच्या परीक्षा घेतलेल्या नाहीत अशांच्या गुणपत्रिकेवर ‘प्रमोटेड कोविड-१९’ असा शिक्का मारण्याचा अजब प्रकार कृषी विद्यापाठांत दिसून आला. यानंतर विद्यार्थी आणि पालक यांच्यातून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, राज्य सरकारकडून असे काहीही आदेश देण्यात आलेले नाहीत. याबाबत चौकशी करुन कडक कारवाई करण्यात येईल, अशी माहिती कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी प्रसार माध्यमांना माहिती दिली.
5 वर्षांपूर्वी -
कोरोना ग्रॅज्युएट शिक्काबाबतची आशिष शेलार यांची भीती अखेर खरी ठरली, कृषी विद्यापीठाकडून सुरुवात
कोरोना ग्रॅज्युएट आम्हाला ‘कोरोना ग्रॅज्युएट’ तर संबोधले जाणार नाही ना? अशी शंका विद्यार्थ्यांच्या मनात असल्याच्या भावना भाजपचे नेते आणि माजी शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत पत्राद्वारे कळवल्या होत्या. “कोरोना ग्रॅज्युएट अशा नव्या बिरुदावलीने तर आम्हाला ओळखले जाणार नाही ना? एटीकेटी असलेल्या 40% विद्यार्थ्यांना नापास करणार का?” अशा भावना विद्यार्थ्यांच्या मनात असल्याचं शेलार म्हणाले होते.
5 वर्षांपूर्वी -
नजीकच्या काळात पूर्वीसारखी सामान्य स्थिती होणे अत्यंत कठीण - WHO'चं भाकीत
जगात अमेरिका हा देश कोरोना संकटाचा सर्वात मोठा बळी ठरला आहे. अमेरिकेत गेल्या चोवीस तासांत कोरोनाचे 70 हजाराहून अधिक रुग्ण आढळून आले आहेत. कोणत्या देशात 24 तासात झालेली ही सर्वाधिक रुग्ण संख्या आहे. जॉन हॉपकिन्स विद्यापीठाच्या आकडेवारीनुसार अमेरिकेत आतापर्यंत 31,83,856 लोकं कोरोनाग्रस्त झाले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
शाळा सुरु करण्याची घाई नको आणि शाळांना राजकारणात ओढू नका - WHO'चा इशारा
गेल्या काही महिन्यांपासून कोरोनानं जगभरात धुमाकूळ घातला आहे. अनेक देशांनी कोरोनाला थोपवण्यासाठी लॉकडाऊनचा मार्ग स्वीकारलेला आहे. परंतु त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात येत असल्याची शक्यता धूसर वाटू लागली आहे. अमेरिकेला कोरोनाचा सर्वाधिक फटका बसला आहे. एका दिवसात अमेरिकेतील फ्लोरिडामध्ये संसर्ग झालेल्यांच्या संख्येत विक्रमी वाढ झाली आहे.
5 वर्षांपूर्वी -
राज्यात दिवसभरात ६४९७ नवे कोरोना रुग्ण, १९३ रुग्णांचा मृत्यू
राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. आज राज्यात दिवसभरात 6497 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे राज्यातील आतापर्यंतचा कोरोनाग्रस्तांचा आकडा 2 लाख 60 हजार 924 इतका झाला आहे.
5 वर्षांपूर्वी -
धारावी पॅटर्न - पोलीस, आरोग्य यंत्रणा, सफाई कामगार, सरकार आणि महापालिका टीमवर्क
आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी अशी ओळख असणाऱ्या मुंबईतील धारावी परिसरात सुरुवातीच्या काळात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने झाला. कोरोनासारख्या आजाराचा संसर्ग झोपडपट्टी भागात नियंत्रणाबाहेर जाऊ शकतो, असा धोका वर्तवण्यात येत होता. मात्र प्रशासनावर युद्धपातळीने केलेल्या उपाययोजनांमुळे धारावीत कोरोनाला रोखण्यात यश आलं. या कामगिरीचं कौतुक जागतिक आरोग्य संघटनेनंही केलं.
5 वर्षांपूर्वी -
रायगड जिल्ह्यात पुन्हा एकदा १० दिवसांचा लॉकडाउन
कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव पाहता या विषाणूच्या वाढच्या संसर्गावर आळा घालण्यासाठी म्हणून रायगड जिल्ह्यात पुन्हा एकदा ल़ॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्ह्यात १५ जुलैच्या मध्यरात्रीपासून २४ जुलैपर्यंत लॉकडाऊन कायम राहणार आहे.
5 वर्षांपूर्वी -
सचिन पायलट यांचं राजकीय बंडखोरीचं विमान लँडिंगच्या तयारीत
काल सचिन पायलट यांनी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या विरोधात बंड केल्यानंतर आमदारांसमवेत दिल्लीला प्रयाण केल्यानंतर जयपूरमध्ये काँग्रेस पक्षांच्या आमदारांसाठी विधीमंडळ पक्षाची बैठक जाहीर करण्यात आली. त्यासाठी पक्षाने व्हिप जारी केला. दिल्लीत दाखल झालेल्या आणि नंतर गुरगाव येथील हॉटेलात आपल्या १५ काँग्रेस आणि ३ अपक्ष आमदारांना समवेत बसलेल्या सचिन पायलट यांच्याशी काँग्रेसमधून फुटून भाजपमध्ये गेलेल्या ज्योतिरादित्य सिंधिया यांनी ४० मिनिटे चर्चा केली.
5 वर्षांपूर्वी -
RSS'मुळे धारावी कोरोनामुक्त मग नागपुरात संघाचं मुख्यालय तरी कोरोनाचा कहर कसा? - राजू शेट्टी
धारावीतील कोरोनामुक्तीचे श्रेय आरएसएसला देण्यात येत असल्याने राजू शेट्टी यांनी महत्त्वाचा सवाल उपस्थित केला आहे. ते म्हणाले की, जर संघाने धारावी कोरोनामुक्त केली असा दावा केला जात असेल, तर संघाचं मुख्यालय असलेल्या नागपुरात कोरोनाचा कहर कसा? तिथला कोरोना अटोक्यात का नाही.’ ते कोल्हापुरात बोलत होते.
5 वर्षांपूर्वी -
राज्यात आज ७८२७ नव्या रुग्णांची नोंद तर ३३४० रुग्णांना डिस्चार्ज
राज्यात दररोज रुग्णांची संख्या वाढत आहे. चिंतेची बाब म्हणजे राज्यात आज ऍक्टिव्ह रुग्णांच्या संख्येने १ लाखांचा ट्प्पा पार केला. आज नवे ७८२७ रुग्ण आढळले. त्यामुळे राज्याची एकूण संख्या २५४४२७ एवढी झाली आहे. तर ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या १ लाख ३ हजार ५१६ एवढी झाली आहे. आज ३३४० जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. एकूण मृत्यूची संख्या १०२८९ एवढी झाली आहे. मुंबईत १२४३ नवे रुग्ण आढळून आले. त्यामुळे मुंबईतल्या एकूण रुग्णांची संख्या ९२९८८ एवढी झालीय. तर ४४ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे एकूण मृत्यूची संख्या ५२८८ एवढी झाली आहे.
5 वर्षांपूर्वी -
धारावीत RSS च्या स्वयंसेवकांमुळेच कोरोना नियंत्रणात, चित्रा वाघ यांनी फोटो शेअर केले
धारावीत आरएसएसच्या स्वयंसेवकांनी जीव धोक्यात घालून प्रत्येक घरात जाऊन स्क्रिनिंग केलं. सगळं श्रेय सरकारने घेण्याचं काही कारण नाही. तर कोरोना विरुद्ध लढाई करताना सरकारने भ्रष्टाचार केला, असं म्हणतं चंद्रकांत पाटील यांनी सरकारवर आरोप केले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
कोरोना लस बनविण्यात रशियाच्या सेचेनोव्ह विद्यापीठाची बाजी, सर्व चाचण्या यशस्वी
जगभरात कोरोनाचा कहर वाढत असताना दुसरीकडे लसीचे उत्पादनही काही देशांमध्ये सुरू होत आहे. भारतातही कोरोना लसीच्या ह्युमन ट्रायलला सुरुवात झाली आहे. चीनमध्येही मोठ्या प्रमाणात चाचण्या आणि कोरोना लस तयार करण्याची तयारी सुरू आहे. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, कॅन्सिनो बायोलॉजिक्स नावाची कंपनी परदेशात लसीची मोठी चाचणी घेण्यासाठी रशिया, ब्राझील, चिली आणि सौदी अरेबियाशी चर्चा करीत आहे.
5 वर्षांपूर्वी -
अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन आणि मुलगी आराध्या कोरोना पॉझिटिव्ह
बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन आणि अभिनेता अभिषेक बच्चन या दोघांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांच्या कुटुंबातील सर्वांच्या चाचण्या घेण्यात आला. या चाचण्यांचा अहवाल आला असून अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन आणि अभिषेक-ऐश्वर्याची आठ वर्षांची मुलगी आराध्या यांनाही कोरोनाची लागण झाल्याचं समोर आले आहे. सुदैवाने जया बच्चन यांचा अहवाल निगेटीव्ह आला आहे.
5 वर्षांपूर्वी -
कोरोना औषधांचा काळाबाजार रोखणार, औषध वितरकांचे विभागवार फोन नंबर जाहीर
एका बाजूला कोरोनाचा धुमाकूळ वाढत असतानाच दुसऱ्या बाजूला कोरोनावरील औषधांचा काळाबाजार होत असल्याच्या बातम्यांची राज्य सरकारनेही आता दखल घेतली असून औषधांचा हा काळाबाजार रोखण्यासाठी आता सरकारने थेट औषध वितरकांचेच विभागवार फोन नंबर जाहीर केले आहेत. त्यामुळे कोरोनाच्या रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना दिलासा मिळला आहे. अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी हे फोन नंबर जाहीर केले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
RSS स्वयंसेवकांनी धारावीत जीव धोक्यात घालून काम केल्याने यश मिळतंय
धारावीत आरएसएसच्या स्वयंसेवकांनी जीव धोक्यात घालून प्रत्येक घरात जाऊन स्क्रिनिंग केलं. सगळं श्रेय सरकारने घेण्याचं काही कारण नाही. तर कोरोना विरुद्ध लढाई करताना सरकारने भ्रष्टाचार केला, असं म्हणतं चंद्रकांत पाटील यांनी सरकारवर आरोप केले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
कोरोना रुग्णाचा मृतदेह ऑटो रिक्षाने स्मशानभूमीत
देशभरात कोरोना रुग्णांचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. कोरोना रूग्णांची अनेक हृदयद्रावक छायाचित्रे समोर आली आहेत. प्रशासनाच्या दुर्लक्षाचे आता आणखी एक चित्र समोर आले आहे. हे चित्र तेलंगणातील आहे. तेलंगणाच्या निजामाबाद शहरात कोरोना रुग्णाचा मृतदेह ऑटो रिक्षाने स्मशानभूमीत नेण्यात आला. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे हा मृतदेह रुग्णालय प्रशासनाच्या देखरेखेविनाच नेण्यात आला.
5 वर्षांपूर्वी