Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नगरसेवक दत्ता साने यांचं कोरोनामुळे निधन
माजी विरोधी पक्षनेते, राष्ट्रवादीचे नगरसेवक दत्ता साने यांचं हृदय विकाराच्या झटक्यानं निधन झालं आहे. दत्ता साने यांना कोरोनाची लागण झाल्यानं त्यांच्यावर उपचार सुरू होते. पहाटे 5 वाजताच्या सुमारास चिंचवड इथल्या खासगी रुग्णालयात निधन झालं आहे. साने यांना 25 जून रोजी कोरोनाची लागण झाली होती.
5 वर्षांपूर्वी -
धक्कादायक! एक्टिव्ह कोरोना रुग्ण संख्येत ठाणे जिल्ह्याने मुंबईला मागे टाकलं
महाराष्ट्रात ६ हजार २३४ नवे करोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर मागील २४ तासात १९८ मृत्यू करोनामुळे झाले आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांच्या या संख्येमुळे महाराष्ट्रातील करोना एकूण करोना रुग्णांची संख्या १ लाख ९२ हजार ९९० इतकी झाली आहे. ज्यापैकी १ लाख ४ हजार ६८७ रुग्णांना आत्तापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आत्तापर्यंत महाराष्ट्रात ८ हजार ३७६ रुग्णांचा मृत्यू करोनाची बाधा झाल्यामुळे झाला आहे. सध्याच्या घडीला महाराष्ट्रात ७९ हजार ९११ अॅक्टिव्ह केसेस आहेत. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.
5 वर्षांपूर्वी -
कल्याण डोंबिवलीत कोरोनाचा वेग अजून वाढला, आज ५६४ नवे रुग्ण
महाराष्ट्रात ६ हजार २३४ नवे करोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर मागील २४ तासात १९८ मृत्यू करोनामुळे झाले आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांच्या या संख्येमुळे महाराष्ट्रातील करोना एकूण करोना रुग्णांची संख्या १ लाख ९२ हजार ९९० इतकी झाली आहे. ज्यापैकी १ लाख ४ हजार ६८७ रुग्णांना आत्तापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आत्तापर्यंत महाराष्ट्रात ८ हजार ३७६ रुग्णांचा मृत्यू करोनाची बाधा झाल्यामुळे झाला आहे. सध्याच्या घडीला महाराष्ट्रात ७९ हजार ९११ अॅक्टिव्ह केसेस आहेत. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.
5 वर्षांपूर्वी -
आज महाराष्ट्रात ६३६४ नवे रूग्ण आढळले, १९८ रुग्णांचा मृत्यू
मागच्या २४ तासांत राज्यात कोरोनाग्रस्त रूग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. सर्वात मोठा आकडा म्हणजे आज राज्यात ६३६४ नवे रूग्ण आढळले आहेत. राज्यात आज १९८ कोरोनाबाधित रूग्णांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तर आज राज्यात ३५१५ रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
NEET आणि JEE परीक्षा पुन्हा पुढे ढकलली; या दिवशी होणार परीक्षा
NEET व JEE Main परीक्षांना पुन्हा एकदा करोना संकटाचा फटका बसला आहे. केंद्रीय मनुष्यबळ मंत्रालयानं जुलै महिन्यात या परीक्षा घेण्याचा कार्यक्रम घोषित केला होता. मात्र, देशातील परिस्थितीत अजूनही सुधारणा होत नसल्यानं, त्याचबरोबर वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमी परीक्षा दोन महिन्यांनी पुढे ढकलण्याचा निर्णय केंद्रीय मनुष्यबळ मंत्रालयानं घेतला आहे.
5 वर्षांपूर्वी -
फ्रान्समधील बिघडलेल्या कोरोना परिस्थितीची जवाबदारी स्वीकारून पंतप्रधानांचा राजीनामा
फ्रान्सचे पंतप्रधान एडवर्ड फिलिप यांनी कोरोना व्हायरसमुळे राजीनामा दिला आहे. इमॅन्युअल मॅक्रॉन यांच्या सरकारमध्ये ते मागील ३ वर्षांपासून पंतप्रधान होते. फ्रान्समधील कोरोना व्हायरसमुळे आलेल्या आर्थिक संकटाच्या कारणामुळे त्यांनी राजीनामा दिला असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून अशी चर्चा सुरू आहे की, फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन हे मंत्रिमंडळात फेरबदल करू शकतात. हे फेरबदल अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉनची स्वतःची विश्वासार्हता वाढवणार होते आणि पुन्हा निराश झालेल्या मतदारांची मने जिंकतील. कोरोना संकटाच्या वेळी पंतप्रधान एडवर्ड फिलिप यांच्यावर जोरदार टीका देखील झाली होती.
5 वर्षांपूर्वी -
महाराष्ट्रनामा इफेक्ट: कोरोनाने मृत्यू झालेल्या पोलिसांच्या वारसांना भरपाई धनादेश वितरणाचे आदेश
महाराष्ट्रात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असून रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस मोठी वाढ होतं आहे. त्यात मुंबईतील मोठी लोकसंख्या आणि दाट लोकवस्ती असलेल्या शहरांसहित ठाणे, कल्याण डोंबिवली, पुण्यासहीत कोरोनाचं थैमान सुरु आहे. त्यात जीवावर उदार होऊन पूर्ण क्षमतेने रस्त्यावर कर्तव्य निभावणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणावर कोरोनाची लागण झाली असून अनेकांचे जीव कोरोनामुळे गेले आहेत. मात्र राज्य सरकारने यावर मोठ्या आर्थिक मदतीची घोषणा देखील केली होती, जी फसवी असल्याची भावना पोलीस कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या मनात निर्माण झाली होती.
5 वर्षांपूर्वी -
कोरोना विषाणूची साथ नैसर्गिकरीत्याच संपुष्टात येईल - संसर्गरोगतज्ज्ञ सुनेत्रा गुप्ता
देशात करोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या काही दिवसांपासून करोनाबाधितांच्या संख्ये मोठी वाढ होताना दिसत आहे. अशा परिस्थितीत एक दिलासादायक माहिती समोर आली आहे. करोनावरील आजारासाठी तयार करण्यात आलेली पूर्ण भारतीय बनावटीची पहिली लस COVAXIN ही १५ ऑगस्ट रोजी लाँच होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. भारत बायोटेकनं आयसीएमआर आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ विरोलॉजी (एनआयव्ही) यांच्यासोबत मिळून ही लस तयार केली आहे.
5 वर्षांपूर्वी -
राज्यात रुग्ण संख्येने ओलांडला नवा उच्चांक, २४ तासांत ६३३० नवे रुग्ण
राज्यात आज कोरोना रुग्णांच्या संख्येने नवा उच्चांक निर्माण केला आहे. आत्तापर्यंतचे सर्व विक्रम मोडत गेल्या 24 तासांत तब्बल 6330 रुग्ण आढळून आलेत. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या 186626 झाली आहे. तर फक्त मुंबईत 80,699 रुग्ण झाले आहेत. तर आत्तापर्यंत 4689 जणांचा मृत्यू झाला आहे. आज मुंबईत 1554 नवे रुग्ण आढळून आलेत. तर आज 8 हजारांपेक्षा जास्त रुग्णांना सुट्टी देण्यात आली आहे.
5 वर्षांपूर्वी -
कल्याण डोंबिवलीत आज ५६० नवे रुग्ण, रुग्णांची रुग्णवाहिकेतून गुरांप्रमाणे वाहतूक
कल्याण डोंबिवलीत कोरोनाचा कहर सुरुच आहे. आजची रुग्णसंख्या ५६० झाली आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेने ही माहिती दिली आहे. सध्याच्या घडीला कल्याण डोंबिवलीत उपचार घेत असलेल्यांची संख्या ४ हजार २६८ आहे. आत्तापर्यंत ३०९० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात आत्तापर्यंत १२७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे.
5 वर्षांपूर्वी -
कोरोना नियंत्रण उपाय, मुंबईच्या धर्तीवर राज्यातील सर्व जिल्ह्यात टास्कफोर्स नियुक्त होणार
महाराष्ट्रात कोरोनाने अक्षरश: थैमान घातले आहे. काल एका दिवसात राज्यात कोरोनाच्या तब्बल 5 हजार 537 नव्या रुग्णांची भर पडली, तर 198 कोरोना रुग्णांनी आपला जीव गमावला. त्यामुळे महाराष्ट्रातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 1 लाख 80 हजार 298 इतकी झाली असून कोरोनाबळींचा आकडा 8 हजार 053वर पोहोचला आहे.
5 वर्षांपूर्वी -
कोरोना रुग्णांची आकडेवारी पाहता भारत काही दिवसात रशियाला मागे टाकणार
गेल्या २४ तासांमध्ये देशात १९ हजार १४८ करोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर दिसरभरात ४३४ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, यानंतर करोनाबाधितांची एकूण संख्या ६ लाख ४ हजार ६४१ इतकी झाली आहे. आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार सध्या देशात २ लाख २६ हजार ९४७ अॅक्टिव्ह केसेस असून आतापर्यंत ३ लाख ५९ हजार ८५९ जणांना उपचारानंतर रुग्णालयातून सोडण्यात आलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
मागच्या २४ तासात राज्यात कोरोनाचे ५,५३७ नवे रुग्ण, १९८ रुग्णांचा मृत्यू
रुग्णसंख्येच्या बाबतीत राज्यासाठी कालचा दिवस काहीसा दिलासादायक ठरल्यानंतर आज पुन्हा चिंता वाढवली आहे. एका दिवसात आढळून आलेल्या रुग्णसंख्येचा आलेख पुन्हा वर गेला आहे. राज्यात पाच हजारांहून अधिक रुग्णांची नव्यानं भर पडली. त्यामुळे एकूण आकडा १ लाख ८० हजार २९८ इतका झाला आहे. तर दिवसभरात २ हजार २४३ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.
5 वर्षांपूर्वी -
कोरोना विशेष टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. संजय ओक यांना कोरोनाची लागण
महाराष्ट्रात मागील २४ तासांमध्ये ४ हजार ८७८ नवे करोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. २४ तासांमध्ये ज्या २४५ मृत्यूंची नोंद झाली त्यातले ९५ मृत्यू हे मागील ४८ तासांमधले आहेत. तर १५० मृत्यू हे मागील काळातील आहेत. आज जी करोना बाधितांची संख्या समोर आली आहे त्यामुळे महाराष्ट्रातील एकूण रुग्णांची संख्या आता १ लाख ७४ हजार ७६१ इतकी झाली आहे. एकूण केसेसपैकी ७५ हजार ९७९ केसेस या अॅक्टिव्ह आहेत. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.
5 वर्षांपूर्वी -
राज्य लॉकडाऊन की अनलॉक? पुनश्च हरी ओम झाले पाहिजे म्हणणारे हे भ्रमित ठाकरे सरकार
महाराष्ट्रात कोरोना अजूनही मोठ्या प्रमाणावर पसरतो आहे आणि त्यात देशात सर्वाधिक कोरोना रुग्ण हे महाराष्ट्रात आहेत. तर मुंबईतील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. आज मध्यरात्रीपासून मुंबईत कलम १४४ लागू करण्यात येणार आहे. १५ जुलै रात्री १२ वाजेपर्यंत मुंबईत संचारबंदी लागू असेल. पहाटे ५ ते रात्री ९ पर्यंत केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच प्रवासाची मुभा असेल. तर सर्वसामान्यांना फक्त आवश्यक कामांसाठी केवळ २ किलोमीटरपर्यंत बाहेर पडता येईल. मुंबई पोलीस आयुक्तालायाने पत्रकाद्वारे यासंदर्भातील माहिती दिली आहे.
5 वर्षांपूर्वी -
यंदाच्या वर्षी लालबागच्या राजाचं दर्शन नाही; पण आरोग्यत्सव साजरा होणार
गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेला असतानाच मुंबईतील अनेक गणेशोत्सव मंडळांनी या उत्सवातून काढता पाय घेतला आहे. कोरोना व्हायरसचं आव्हान पाहता नाईलाजास्तव आणि समाजहितासाठी म्हणून मानाची मंडळं या निर्णयावर पोहोचली आहेत. यातच आता नवसाला पावणारा गणपती म्हणून ख्याती असणाऱ्या लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाकडून यंदाच्या वर्षी हे पर्व साजरा न करण्याचा निर्णय़ घेण्यात आला आहे.
5 वर्षांपूर्वी -
३० नोव्हेंबरपर्यंत ८० कोटी भारतीयांना मोफत धान्य देणार - पंतप्रधान
नोव्हेंबर महिन्यापर्यंत प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत गरीबांना मोफत धान्य दिलं जाणार आहे, अशी महत्त्वाची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. गेल्या तीन महिन्यात गरिबांच्या 20 कोटी जनधन खात्यांवर 31 हजार कोटी रुपये जमा करण्यात आले आहे. त्यात मोदींनी ही महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे.
5 वर्षांपूर्वी -
पतंजलीचा कोरोनिलवरून यू-टर्न, पण फडणवीसांच्या माजी राजकीय सल्लागाराकडून असा प्रचार
प्रत्येकाच लक्ष करोनावरील औषधाकडे लागलेलं असताना बाबा रामदेव यांच्या पतंजलीनं मागील आठवड्यात करोनावर औषध शोधल्याचा दावा केला. इतकंच नाही, तर त्यांनी हे औषध बाजारातही आणलं. मात्र, औषधावर आक्षेप घेत केंद्र सरकारपासून ते उत्तराखंड सरकारनं पतंजलीच्या औषधावर प्रश्नचिन्ह निर्माण केले होते. उत्तराखंड आयुष विभागानं नोटीस जारी केल्यानंतर पतंजलीनं करोनावरील औषध बनवल्याच्या दाव्यावरून यू-टर्न घेतला आहे.
5 वर्षांपूर्वी -
आमिर खानच्या घरात कोरोनाचा शिरकाव, संपर्कातील लोकांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह
बॉलीवूड अभिनेता आमिर खान याच्या घरामध्ये कोरोनाने शिरकाव केला आहे. त्याच्या संपर्कातील काही लोकांना कोरोनाची बाधा झाली असून याबाबतची माहिती स्वतः आमिरने ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. काही जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती मिळताच सगळे क्वारंटाईन झाले असून आमिर त्याच्या आईसह स्वतःचीही कोरोना चाचणी करणार असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
5 वर्षांपूर्वी -
देशात कोरोनावरील लस तयार, जुलैपासून चाचणी, यापूर्वी अनेक लसची निर्मिती
कोरोना व्हायरसमुळं सातत्यानं वाढणाऱ्या रुग्णसंख्येला आळा घालण्यासाठी आरोग्य यंत्रणा सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. सोबतच संशोधकही या विषाणूचा नायनाट करण्यासाठीची लस शोधण्यात सर्व मार्गांचा अवलंब करत आहेत. प्रयत्नांच्या याच साखळीमध्ये आता संशोधकांना यश मिळाल्याचं कळत आहे. त्यामुळं हा एक मोठा दिलासा असल्याचं म्हटलं जात आहे. भारतात कोरोनावरील ही पहिली लस विकसित करण्यात आली असून, लसीच्या मानवी चाचणीला परवानगी मिळाली आहे. ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियानं या लसीच्या मानवी चाचणीसाठी परवानगी दिली.
5 वर्षांपूर्वी