Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
अनेक देशात मोठ्या संख्येने कोरोना रुग्ण समोर येतील, सरकारांनी सज्ज रहावं - WHO
जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) शुक्रवारी जगाला कोरोना विषाणूच्या साथीच्या नव्या आणि धोकादायक अवस्थेविषयी इशारा दिला आहे. ज्यामध्ये लॉकडाऊन असूनही कोरोना वेगाने पसरत आहे. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात इटलीत हा विषाणू असल्याचे उघडकीस आले तेव्हा असा इशारा देण्यात आला.
5 वर्षांपूर्वी -
दाट वस्तीतील रुग्णांना होम आयसोलेशनसाठी परवानगी देऊ नये - केंद्राची सूचना
केंद्रिय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी सर्व राज्यांना पत्र पाठवून कोरोना रुग्णांच्या होम आयसोलेशनबाबत महत्वाच्या नव्या सूचना जारी केल्या आहेत. त्यामध्ये दाट वस्तीतील अशा रुग्णांना होम आयसोलेशनसाठी परवानगी देऊ नये असे म्हटले आहे. दरम्यान, खास दिल्लीच्या मुख्य सचिवांना पत्र पाठवून अशा रुग्णांना आयसोलेशनमध्ये ठेवण्यापेक्षा रुग्णालय किंवा सरकारी आयसोलेशन सेंटरमध्ये ठेवण्याचा सल्ला दिला आहे.
5 वर्षांपूर्वी -
गेल्या २४ तासांत देशात कोरोना रुग्णसंख्येचा उच्चांक; ३७५ जणांचा मृत्यू
मागील २४ तासांत देशात कोरोनाचे तब्बल १४ हजार ५१६ नवे रुग्ण आढळेल आहेत. देशातील कोरोना रुग्णांच्या एका दिवसातील संख्यने आतापर्यांतच मोठा उच्चांक गाठल्याचे नोंदवण्यात आले आहे. त्यामुळे देशात कोरोनाबाधितांची एकूण संख्या ३ लाख ९५ हजार ४८ वर पोहचली आहे. तसंच एका दिवसात ३७५ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने दिली आहे.
5 वर्षांपूर्वी -
महाराष्ट्रात ३८२७ नवे कोरोना रुग्ण, १४२ जणांचा मृत्यू
महाराष्ट्रात आज ३८२७ नवे करोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर मागील २४ तासांमध्ये १४२ रुग्णांचा करोनाची लागण होऊन मृत्यू झाला आहे. तर मागील २४ तासांमध्ये १९३५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात सध्याच्या घडीला ५५ हजार ६५१ रुग्ण अॅक्टिव्ह आहेत तर ६२ हजार ७७३ करोनाबाधित रुग्ण हे बरे होऊन घरी गेले आहेत. मागील चोवीस तासांतील आकडेवारीनंतर महाराष्ट्रातली करोनाग्रस्तांची एकूण संख्या ही १ लाख २४ हजार ३३१ इतकी झाली आहे.
5 वर्षांपूर्वी -
ठाकरे सरकारची नाचक्की, रुग्णांच्या कोव्हिड टेस्ट रिपोर्टबाबतच्या त्या निर्णयाला स्थगिती
लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर महाराष्ट्रासह देशभरातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. राज्यातील मुंबई, पुणे, नागपूर अशा महत्त्वाच्या शहरांमध्ये कोरोनाबाधितांमध्ये दिवसेंदिवस होणारी वाढ चिंतेचा विषय ठरत आहे. त्यामुळे राज्य सरकारची डोकेदुखी वाढलेली असतानाच सुप्रीम कोर्टाने आता राज्य सरकारला दणका दिला आहे.
5 वर्षांपूर्वी -
कोरोनाचं सावट...राम कदम यांचा दहीहंडी रद्द करण्याचा निर्णय
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. मोठ्या प्रमाणात लोकांनी गर्दी करणं टाळलं जात आहे. गणेशोत्सवापाठोपाठ आता दहीहंडीवर देखील कोरोनाचं सावट आलं आहे. भाजप नेता राम कदम यांनी यंदा दहीहंडी उत्सव रद्द केला आहे. कोरोनाचं संकट पाहता दहीहंडीला हजारो लोकांची गर्दी जमा होणार आहे. हे टाळण्यासाठी यंदा दहीहंडी उत्सव रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
5 वर्षांपूर्वी -
लॉकडाउनमुळे ९ चिनी अधिकारी पुण्यात अडकले, त्यातील एक कोरोना पॉझिटिव्ह
महाराष्ट्रातील कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होतेय. काल (गुरुवारी) एका दिवसात राज्यात कोरोनाच्या 3 हजार 752 नव्या रुग्णांची नोंद झाली, तर 100 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 1 लाख 20 हजार 504वर पोहोचली असून कोरोनाबळींचा आकडा 5 हजार 751 इतका झाला आहे.
5 वर्षांपूर्वी -
देशात २४ तासांत १३,५८६ नवे रुग्ण, एकूण संख्या लवकरच ४ लाखाचा टप्पा गाठणार
देशभरात दररोज दहा हजारांहून अधिक नव्या कोरोना रुग्णांची भर पडत असल्याने चिंता प्रचंड वाढत आहे. देशातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या लवकरच ४ लाखाचा टप्पा गाठेल, अशी भीती व्यक्त केली जात आहे. गेल्या चोवीस तासांत कोरोनाच्या रुग्णांमध्ये सर्वाधिक वाढ झाली असून १३ हजार ५८६ नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे देशभरातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ३ लाख ८० हजार ५३२वर पोहोचली आहे. तर २४ तासांत ३३६ कोरोना रुग्णांनी आपला जीव गमावल्याने देशातील कोरोनाबळींचा आकडा १२ हजार ५७३ इतका झाला आहे.
5 वर्षांपूर्वी -
जगभर कोरोनावरील लस संदर्भात संशोधन, रशिया सर्वात पुढे - सविस्तर वृत्त
चीनच्या नॅशनल बायोटेक ग्रुप म्हणजे सिनोफार्मने केलेल्या लस चाचणीतून अँटीबॉडीज तयार झाल्याचे म्हटले आहे. कोरोना व्हायरस विरोधात या अँटीबॉडीज तयार होणे खूप महत्वाचे आहे. जर्मनीची बायोटेक फर्म क्यूअरवॅकने करोना व्हायरसवर लस बनवली असून त्यांनी मानवी चाचण्या सुरु केल्या आहेत. १६७ तंदुरुस्त स्वयंसेवकांपैकी १४४ जणांना लसीचे इंजेक्शन देण्यात येईल. क्यूअरवॅक ही लस निर्मिती करणारी दुसरी जर्मन कंपनी आहे.
5 वर्षांपूर्वी -
मुख्यमंत्र्यांच्या धाडसामुळेच ८६२ कोरोना मृत्यूंची नोंद - मुंबई पालिका आयुक्त
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातील मुंबईकरांप्रती असलेला प्रामाणिकपणा आणि धाडस यामुळेच मला चार दिवसात नोंद नसलेल्या ८६२ कोरोना मृत्यूंचे विश्लेषण करता आले अशी कबुली मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली. एका खासगी रु्ग्णालयात एकाच दिवशी १६ मृत्यू झाल्याची माहिती मला आकडेवारीवरून दिसली. ६ जूनच्या त्या आकडेवारीमध्ये काहीतरी गडबड असल्याचे माझ्या लक्षात आले.
5 वर्षांपूर्वी -
मुख्यमंत्र्यांकडून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना महत्त्वाचं आवाहन
यंदाचा गणेशोत्सवावर कोरोना विषाणूचं सावट आहे. यंदाचा गणेशोत्सव सामाजिक भान ठेवून व समाजोपयोगी कार्यक्रम राबवून साधेपणाने साजरा करावा आणि जगासमोर उत्सवाचं नवा आदर्श निर्माण करावा, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना केलं आहे. आगामी गणेशोत्सवातील कायदा आणि सुव्यवस्था यासंदर्भात गुरुवारी मंत्रालय येथे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते.
5 वर्षांपूर्वी -
कोरोना रुग्णांवर ‘हायड्रोक्सिक्लोरोक्वीन’ या औषधाच्या ट्रायलवर WHO'कडून बंदी
देशात एकीकडे कोरोनाबधितांचा आकडा वाढत असताना अद्याप लस किंवा औषध मिळालेले नाही. अशातच सध्या सर्वच देश कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी वापरत असलेल्या ‘हायड्रोक्सिक्लोरोक्वीन’ या औषधाच्या ट्रायलवर जागतिक आरोग्य संघटनेने बंदी घातली आहे. सॉलिडॅरिटी ट्रायलवर ही बंदी घालण्यात आली आहे. ब्रिटनमधील रिकव्हरी ट्रायल आणि अन्य पुरावे लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.
5 वर्षांपूर्वी -
भारतीय जवानांना निशस्त्र धोक्याच्या दिशेने कुणी आणि का पाठवले - राहुल गांधी
चीनच्या सैन्यामध्ये झालेल्या झटापटीत भारताच्या २० जवानांना वीरमरण आल्याने सध्या देशभरात संतापाचे वातावरण निर्माण झालेले आहे. दरम्यान, या घटनेवरून आला राजकारणही सुरू झाले आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी जवानांच्या मृत्यूवरून केंद्र सरकारला खरमरीत शब्दात जाब विचारला आहे. देशाच्या वीर जवानांना जवानांना धोक्याच्या दिशेने निशस्त्र कुणी आणि का पाठवले, अशी विचारणा त्यांनी केली आहे.
5 वर्षांपूर्वी -
देशात कोरोना रुग्णांच्या मृत्यूदरात गुजरात सर्वात पुढे
भारतातील कोरोना विळखा दिवसेंदिवस अधिक घट्ट होत आहे. मागील २४ तासांत देशात तब्बल 12 हजार 881 नवीन रुग्ण आढळले असून 334 जणांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 3 लाख 66 हजार 946वर पोहोचली असून आतापर्यंत 12 हजार 237 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, देशात सध्या 1 लाख 60 हजार 384 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, तर 1 लाख 94 हजार 324 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.
5 वर्षांपूर्वी -
राज्यात आज ३३०७ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद
मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. मुंबईत कोरोना रुग्णांच्या आकडेवारीने ६० हजारांचा टप्पा पार केला आहे. मुंबईत रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी वाढून आता २९ दिवसांवर पोहचला आहे. तर रुग्ण वाढीचा सरासरी दर आणखी कमी होऊन आता 2.43 टक्क्यांवर आहे.
5 वर्षांपूर्वी -
दिल्ली: आरोग्यमंत्र्यांना कोरोनाची लागण, अमित शहांसोबतच्या बैठकीला हजेरी लावली होती
दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांना करोनाची लागण झाली आहे. सत्येंद्र जैन यांचा पहिला रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. पण यानंतर त्यांचा ताप वाढला होता. सत्येंद्र जैन यांच्यात करोनाची लक्षणं दिसल्याने डॉक्टरांनी पुन्हा एकदा त्यांची करोना चाचणी करण्याचा निर्णय घेतला होता. पुन्हा चाचणी केली असता दुसरा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.
5 वर्षांपूर्वी -
मुंबईमध्ये आठवडाभरात ६५० रुग्णवाहिकांची सेवा उपलब्ध होणार - आरोग्यमंत्री
खासगी प्रयोगशाळेत करण्यात येणाऱ्या करोना चाचण्यांसाठी राज्य शासनाने २२०० व २८०० रुपये दर निश्चित केले आहेत. मात्र प्रयोगशाळेत थेट तपासणीसाठी जाणाऱ्यांकडून २८०० रुपये न आकारता त्यांच्याकडून २५०० रुपये घ्यावेत, असा निर्णय राज्य शासनाने घेतला असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. मुंबईमध्ये आठवडाभरात ६५० रुग्णवाहिकांची सेवा उपलब्ध होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
5 वर्षांपूर्वी -
कोरोना रिपोर्ट रुग्णांना मिळणार नाही, आरोग्य मंत्र्यांनी सांगितलं कारण...
कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूच्या संख्येत अचानक वाढ झाली. तब्बल १३२८ मृत्यूंची नव्याने नोंद झाली. त्यात गेल्या २४ तासांत नोंदल्या गेलेल्या ८१ कोरोनाबाधितांची भर पडली. त्यामुळे कोरोना मृत्यूंचा आकडा एकदम १४०९ ने वाढला आहे. त्यामुळे राज्यात नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे. तर जन्म आणि मृत्यू नोंदविण्याचे जे निकष आहेत त्यानुसारच नोंदणी करण्यात येत असल्याचं राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांनी सांगितलं.
5 वर्षांपूर्वी -
दिल्ली: कोरोनाबळींची संख्या वाढल्याने स्मशानभूमीसाठी अतिरिक्त जागेचा शोध सुरु
देशात कोरोनाबाधितांचा आणि मृतांचा आकडा दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. आज सलग चौथ्या दिवशी नवीन रुग्णांचा आकडा हा १० हजारांच्या घरात आहे. गेल्या २४ तासांत १० हजार ९७४ नवीन रुग्णांची नोंद झाली. तर २००३ रुग्णांचा मृत्यू झाला. यासह आता एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 1 लाख ८६ हजार ९३५ झाला आहे. तर एकूण मृतांचा आकडा ११ हजार ९०३ झाला आहे. यासह भारताचा मृत्यूदर २.९% वरून ३.४ झाला आहे.
5 वर्षांपूर्वी -
देशात गेल्या २४ तासांत १० हजार ९७४ नवीन रुग्णांची नोंद , तर २००३ रुग्णांचा मृत्यू
देशात कोरोनाबाधितांचा आणि मृतांचा आकडा दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. आज सलग चौथ्या दिवशी नवीन रुग्णांचा आकडा हा १० हजारांच्या घरात आहे. गेल्या २४ तासांत १० हजार ९७४ नवीन रुग्णांची नोंद झाली. तर २००३ रुग्णांचा मृत्यू झाला. यासह आता एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 1 लाख ८६ हजार ९३५ झाला आहे.
5 वर्षांपूर्वी