Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
फेरपडताळणी: कोविड मृत्यूंची संख्या १३२८ ने वाढली, फडणवीस सरकारवर बरसले
कोरोनामुळे राज्यात नेमके किती मृत्यू झाले आहेत याची संख्या दडवण्यात येत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना केला होता. यासंबंधी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्रही लिहिलं होतं. त्यानंतर २४ तासांच्या आत ठाकरे सरकारने फेरपडताळणी करत COVID-19 च्या मृत्यूंची वस्तुस्थिती सांगणारे आकडे जाहीर केले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
कोरोनावर अत्यंत प्रभावी ठरतंय ‘डेक्सामेथासोन’ औषध....सविस्तर
डॉक्टरांना कोरोना विषाणूवरच्या उपचारांसाठी प्रभावी औषधाची माहिती मिळाली आहे. बीबीसीच्या वृत्तानुसार, हे एक जुने आणि स्वस्त औषध आहे. या औषधाच्या मदतीनं कोरोना विषाणूमुळे गंभीर आजारी असलेल्या लोकांचे जीव वाचविण्यात यश आले आहे.
5 वर्षांपूर्वी -
वेळेवर निर्णय घेतल्यामुळे भारतात कोरोनाचा प्रसार मर्यादित ठेवण्यात यश - पंतप्रधान
आपण कोरोनाच्या प्रादुर्भावाला जितक्या लवकर आळा घालू तेवढ्या लवकर आपल्याला अर्थव्यवस्था रुळावर आणता येईल. कोरोनाला लवकर रोखले तर बाजार, कार्यालये आणि वाहतुकीची साधने सुरु करता येतील. त्यामुळे पुन्हा रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील, असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. मोदींनी मंगळवारी २१ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. या बैठकीत त्यांनी म्हटले की, आपण वेळेवर निर्णय घेतल्यामुळे भारतात कोरोनाचा प्रसार मर्यादित ठेवण्यात यश आले.
5 वर्षांपूर्वी -
पुढील २ आठवडे दररोज १ लाखांपेक्षा अधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळतील - WHO
जगभरात कोरोनाचे थैमान सुरूच आहे. मात्र आता ही परिस्थिती आणखी गंभीर बनणार आहे. कारण पुढील दोन आठवडे दररोज १ लाखांपेक्षा अधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळतील, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे. मागील १५ दिवसांत अशीच परिस्थिती दिसून आली आहे.
5 वर्षांपूर्वी -
भाजपचे माजी खासदार हरिभाऊ जावळेंचं कोरोनामुळे मुंबईतील इस्पितळात निधन
महाराष्ट्रात काल दिवसभरात 2 हजार 786 नव्या रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 1 लाख 10 हजार 744 वर पोहोचला आहे. तर दिवसभरात तब्बल 178 कोरोनाबाधितांनी आपला जीव गमावल्याने राज्यातील कोरोनाबळींची संख्या 4 हजार 128 इतकी झाली आहे.
5 वर्षांपूर्वी -
कोरोनाग्रस्त कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर कोकण रेल्वेचे ५२ कर्मचारी क्वारंटाईन
मागील २४ तासांत राज्यात कोरोनामुळे सर्वाधिक रुग्णांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. आजच्या आकडेवारीनुसार राज्यात २७८६ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर १७८ जणांचा मृत्यू झाला. मृतांचा हा आतापर्यंतचा सर्वाधिक आकडा आहे. यामध्ये मुंबईतील ५८ जणांचा समावेश आहे. त्यामुळे आता मुंबईसह राज्यातील आरोग्य यंत्रणेसमोरील आव्हान आणखी बिकट झाले आहे.
5 वर्षांपूर्वी -
सत्ताधाऱ्यांनो सत्तेच्या खाटेची चिंता नंतर आधी पेशंटच्या खाटेचं बघा - आ. राम कदम
‘खाट कितीही कुरकुरली तरी कुणी चिंता करु नये’, अशा शब्दात शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’च्या अग्रलेखातून काँग्रेसच्या नाराजीनाट्यावर निशाणा साधण्यात आला आहे. यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी प्रतिक्रिया दिली. ‘आम्ही आघाडीसोबत आहोत. उद्धव ठाकरेंसमोर भूमिका मांडू. आमचे मुद्दे जनतेच्या हिताचे आहेत’, असे त्यांनी म्हटले.
5 वर्षांपूर्वी -
दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन रुग्णालयात दाखल, ताप व श्वसनास त्रास
दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ताप आणि श्वसनासाठी होत असलेल्या त्रासाच्या तक्रारीनंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सत्येंद्र जैन यांनी ट्विटरच्या माध्यमातून याची माहिती दिली.
5 वर्षांपूर्वी -
मॅग्नेटिक महाराष्ट्र २.०, राज्यात येणार तब्बल १६ हजार कोटींची गुंतवणूक
एकीकडे कोरोनाशी लढत असताना महाराष्ट्राने उद्योग उभारणीत दमदार पाऊल टाकून, तब्बल १६ हजार कोटींच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार सोमवारी केले. उद्योग स्थापण्यात कोणत्याही अडचणी येऊ दिल्या जाणार नाहीत, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.
5 वर्षांपूर्वी -
महाराष्ट्रात एकाच दिवशी ५०७१ रुग्णांना घरी सोडण्यात आले - आरोग्यमंत्री
राज्यात पंधरा दिवसांच्या अंतराने दुसऱ्यांदा विक्रमी संख्येत कोरोनाच्या बरे झालेल्या रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. आज राज्यभरात ५ हजार ७१ रुग्णांना दवाखान्यातून सोडण्यात आले असून मुंबई मंडळात सर्वाधिक ४२४२ एवढे रुग्ण एकाच दिवशी घरी सोडण्यात आले. आतापर्यंत ५६ हजार ४९ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
5 वर्षांपूर्वी -
मुंबईत कोरोनामुळे झालेले ९५० मृत्यू दडवून का ठेवले; फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांना सवाल
आयसीएमआरच्या दिशानिर्देशांचे पालन न करता मुंबईतील ९५० हून अधिक करोना मृत्यू का दडविण्यात आले ? इतके अक्षम्य दुर्लक्ष का ? आणि असे करणार्यांवर राज्य सरकार काय कारवाई करणार ? असे सवाल माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केले आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना यासंबंधी पत्र लिहिले आहे.
5 वर्षांपूर्वी -
तामिळनाडू: चेन्नईसह ४ जिल्ह्यांमध्ये १९ जून ते ३० जूनपर्यंत लॉकडाउन
भारतातील कोरोनाचा विळखा दिवसागणिक घट्ट होत आहे. मागील २४ तासांत देशात तब्बल ११ हजार ५०२ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांचा आकडा ३ लाख ३२ हजार ४२४ वर पोहोचला आहे. तर गेल्या २४ तासांत ३२५ जणांनी कोरोनामुळे आपला जीव गमावल्याने देशातील कोरोनाबळींची संख्या ९ हजार ५२० इतकी झाली आहे.
5 वर्षांपूर्वी -
दिल्लीतील प्रत्येक नागरिकासाठी कोरोना टेस्टची सुविधा उपलब्ध करुन देणार - अमित शहा
सर्व राजकीय पक्षांनी मतभेदांना मूठमाती देऊन कोरोनाविरुद्धचे युद्ध एकत्र लढावे, असे आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केले. ते सोमवारी दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या सर्वपक्षीय बैठकीत बोलत होते. यावेळी त्यांनी म्हटले की, सर्व राजकीय पक्ष एकत्र आल्यास लोकांचा विश्वास वाढेल. जेणेकरून दिल्लीवरील कोरोनाचे संकट लवकरात लवकर परतवता येईल, असे शहा यांनी सांगितले.
5 वर्षांपूर्वी -
१५ जून २०२० पासून ऑनलाइन माध्यमातून शैक्षणिक वर्षाची सुरुवात
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शाळांचे शैक्षणिक वर्ष सुरू करण्यास मान्यता दिली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शालेय शिक्षण विभागाच्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमध्ये १५ जून २०२० पासून ऑनलाइन तसंच डिजिटल माध्यमातून शैक्षणिक वर्षाची सुरुवात करण्यास मान्यता दिली आहे. तर कोरोनाचा प्रादुर्भाव नसलेल्या तसंच ग्रामीण आणि तुलनेने दूरच्या शाळांमध्ये पुरेशी काळजी घेऊन प्रत्यक्ष शाळा सुरू करण्यात येणार आहे.
5 वर्षांपूर्वी -
कोरोना डॅशबोर्ड लाँच | बेड्स संख्या | कोविड टेस्ट लॅब्स | कंटेनमेंट झोन | हेल्पलाइन्स | Install App
देशात अनलॉकनंतर कोरोनाचा संसर्ग अजून वाढताना दिसत असून, तज्ज्ञांच्या मते आगामी काळात त्याची अनेकांना लागण होण्याची शक्यता अभ्यासातून पुढे आली आहे. देशात सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रात असून, नव्या रुग्णांची संख्या देखील वेगाने वाढत आहे. मात्र अशा परिस्थिती राज्य सरकारने तयार ठेवलेल्या आयसोलेशन सेंटर तसेच कोरोना केअर सेंटर, ICMR’ने मान्यता दिलेल्या राज्यभरातील कोविड १९ टेस्ट लॅब्सची माहिती तसेच सामान्य नागरिकांपासून ते पोलिस कर्मचाऱ्यांना या परिस्थितीत गरजेची असलेली माहिती देणारा एकमेव डॅशबोर्ड महाराष्ट्रनामा न्यूजने लाँच केला आहे.
5 वर्षांपूर्वी -
जून-जुलै नव्हे तर नोव्हेंबरमध्ये कोरोना उत्पात माजवणार - ICMR चा अंदाज
देशात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेला लॉकडाउन हळूहळू शिथिल करण्यात येत असला, तरी कोरोनाचं संकट अजूनही कायम आहे. नोव्हेंबर महिन्याच्या मध्यावधीमध्ये देशातील कोरोना रुग्णांची संख्या उच्चांक गाठण्याची शक्यता आहे. त्यामुळे देशात आयसीयू बेड व व्हेटिंलेटर्सचा तुटवडा जाणवू शकतो. भारतीय संशोधन परिषदेनं (आयसीएमआर) एका अभ्यास गटाच्या माध्यमातून पाहणी केली, त्यातून ही गोष्ट समोर आली आहे.
5 वर्षांपूर्वी -
देशात अनलॉकनंतर कोरोनाचे थैमान; २४ तासांत ३२५ मृत्यू, ११,५०२ नवे रुग्ण
भारतातील कोरोनाचा विळखा दिवसागणिक घट्ट होत आहे. मागील २४ तासांत देशात तब्बल ११ हजार ५०२ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांचा आकडा ३ लाख ३२ हजार ४२४ वर पोहोचला आहे. तर गेल्या २४ तासांत ३२५ जणांनी कोरोनामुळे आपला जीव गमावल्याने देशातील कोरोनाबळींची संख्या ९ हजार ५२० इतकी झाली आहे.
5 वर्षांपूर्वी -
आनंदाची बातमी! जगात कोरोनातून बऱ्या होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली
जगात धुमाकूळ घालणाऱ्या कोरोना व्हायरसच्या जगातील एकूण रुग्णांपैकी निम्म्यापेक्षा जास्त रुग्ण बरे झाले असून नव्या रुग्णांच्या तुलनेत बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण वाढत असल्याचे यावर देखरेख करणार्या जागतिक पोर्टल वर्ल्डमीटर या संस्थेने म्हटले आहे.
5 वर्षांपूर्वी -
नायर रुग्णालयात ३०० कोरोना बाधित मातांची सुखरुप प्रसूती, वैद्यकीय कर्मचाऱ्यांचं कौतुक
मुंबई महानगरपालिकेच्या नायर रुग्णालयात ‘कोरोना कोविड १९’ बाधित मातांच्या सुखरुप प्रसूतिने ३०० चा टप्पा काल रात्री ओलांडून कोविड विरोधातील मानवाच्या लढ्यास एका वेगळ्या शुभवर्तमानाची जोड दिली आहे. आज सकाळपर्यंत प्रसूतींची एकूण संख्या ३०२ झाली आहे. एप्रिल महिन्यात ‘कोविड रुग्णालय’ म्हणून घोषित झालेल्या नायर रुग्णालयात दिनांक १४ एप्रिल २०२० रोजी पहिल्या कोविडबाधित मातेची सुखरूप प्रसूती झाली होती.
5 वर्षांपूर्वी -
मध्य रेल्वेकडून लोकल ट्रेन पुन्हा सुरू होण्याबाबत स्पष्टीकरण
गेल्या काही दिवसांपासून अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी मुंबईची लाईफलाईन मानली जाणारी लोकल सेवा पुन्हा सुरू करण्यात येणार असल्याची चर्चा सुरू आहे. परंतु लोकल सेवा पुन्हा सुरू करण्याबाबत कोणतीही अधिकृत सूचना मिळाली नसल्याचे रेल्वेकडून सांगण्यात आले आहे. शनिवारी रात्री उशीरा मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी ट्विटरच्या माध्यमातून माहिती दिली.
5 वर्षांपूर्वी