Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
हातावर चुंबन देऊन कोरोनातून बरे करणार्या बाबाचा कोरोनाने मृत्यू, २६ भक्तांना कोरोना
मध्य प्रदेशमध्ये एक भोंदू बाबा भक्तांना त्यांच्या हातावर पप्पी घ्यायचा आणि त्यामुळे भक्त बरे व्हायचे असा दावा करायचा. या बाबाला कोरोनाची लागण होऊन त्याचा मृत्यू झाला आहे. जाता जाता बाबामुळे २६ भक्तांनाही कोरोनाची लागण झाली आहे.
5 वर्षांपूर्वी -
कोरोना रुग्णांना जनावरांपेक्षाही वाईट वागणूक; सुप्रीम कोर्टाची केंद्र, महाराष्ट्र व या राज्यांना नोटीस
कोरोना रुग्णांना मिळणारे उपचार आणि मृतदेहांची होणारी हेळसांडप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने केंद्र आणि राज्य सरकारांना नोटीस पाठवली आहे. तसंच चाचण्यांची संख्या कमी होत असल्याचीही दखल घेतली आहे. न्यायमूर्ती अशोक भूषण, संजय किशन कौल आणि एम आर शाह यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी पार पडली. न्यायालयाने केंद्र सरकारसबोत दिल्ली, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू सरकारला नोटीस पाठवली आहे.
5 वर्षांपूर्वी -
पंजाबमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताच शनिवार-रविवार, सुट्टीच्या दिवशी लॉकडाऊन
पंजाबमधील कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव आणि संकट पाहून सरकारने कडक पाऊल उचलले आहे. पंजाब सरकारने पुन्हा कोरोनापासून सुरक्षित राहण्यासाठी लॉकडाऊन जाहीर केले आहे. परंतु हे लॉकडाऊन-१ या प्रमाणे इतके कठोर असणार नाही.
5 वर्षांपूर्वी -
धक्कादायक! कोरोना रुग्ण संख्येच्या यादीत भारत चौथ्या स्थानावर
कोरोना व्हायरसने भारतात हाहाकार माजवला आहे. देशातील कोरोनाबाधितांची संख्या तीन लाखांच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे. आज सकाळी ९ वाजता आलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत भारतात तब्बल १० हजार ९५६ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. या वाढीसह देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या २ लाख ९७ हजार ५३५ वर पोहोचली आहे.
5 वर्षांपूर्वी -
VIDEO - मृत्यूनंतर देखील हाल, कोरोना रुग्णांचे मृतदेह फरफटत टेम्पोत भरले
कोरोना व्हायरसने भारतात हाहाकार माजवला आहे. देशातील कोरोनाबाधितांची संख्या तीन लाखांच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे. आज सकाळी ९ वाजता आलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत भारतात तब्बल १० हजार ९५६ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. या वाढीसह देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या २ लाख ९७ हजार ५३५ वर पोहोचली आहे. तर काल गेल्या २४ तासांत ३९६ जणांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला.
5 वर्षांपूर्वी -
कोरोनाचा चिंताजनक रेकॉर्ड; गेल्या २४ तासांत तब्बल १०,९५६ नवे रुग्ण
कोरोना व्हायरसने भारतात हाहाकार माजवला आहे. देशातील कोरोनाबाधितांची संख्या तीन लाखांच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे. आज सकाळी ९ वाजता आलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत भारतात तब्बल १० हजार ९५६ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. या वाढीसह देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या २ लाख ९७ हजार ५३५ वर पोहोचली आहे.
5 वर्षांपूर्वी -
१४ जूनच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंचं महाराष्ट्र सैनिकांसाठी पत्र
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा १४ जूनला वाढदिवस असतो. पण कोरोनाच्या परिस्थतीमुळे यंदा वाढदिवस साजरा करणं अजिबात उचित नाही, असं म्हणत राज ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना शुभेच्छा द्यायला येऊ नये, असा आदेश दिला आहे. त्याऐवजी आहे तिथेच जनतेला मदत करा, अशा सूचना देणारं जाहीर पत्रच कार्यकर्त्यांना उद्देशून राज यांनी लिहिलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
राज ठाकरे यांचे ३ सुरक्षा रक्षक कोरोनामुक्त होऊन सुखरूप घरी परतले
लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणल्यानंतर महाराष्ट्रासह देशभरातील कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. राजकीय क्षेत्रातील व्यक्तींपर्यंतही कोरोनाचा प्रादुर्भाव पोहोचला आहे. त्यातच आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या तीन सुरक्षा रक्षकांनाही काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली. उपचारानंतर हे तीनही सुरक्षा रक्षक कोरोनामुक्त झाले असून त्यांना घरी सोडण्यात आलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
धक्कादायक! राज्यात ३६०७ नवे रुग्ण, तर १५२ रुग्णांचा मृत्यू
राज्यात लॉकडाऊन नंतर रुग्णांच्या संख्येत धक्कादायक वाढ होत आहे. आज राज्यात ३६०७ नवे रुग्ण सापडले. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या ९७ हजार ६४८ म्हणजेच लाखाच्या जवळ गेली आहे. तर आज १५२ नव्या मृत्युची नोंद करण्यात आली. त्यामुळे मृत्यूचा आकडा ३५९० वर गेला आहे. आज १५६१ रुग्णांना सुट्टी देण्यात आली. आत्तापर्यंत राज्यात ४६०७८ जण कोरोनामुक्त झाले आहेत. आज झालेली रुग्णांची वाढ ही आत्तापर्यंतची सगळ्यात जास्त वाढ आहे.
5 वर्षांपूर्वी -
खासगी लॅबमध्ये ३५ जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह, NIV'कडून निगेटिव्ह असल्याचं उघड
देशात कोरोनाचे रुग्ण दररोज वाढत आहेत. या रुग्णवाढीचा प्रचंड ताण आरोग्य व्यवस्थेवर पडत आहे. त्यामुळे देशभरात कोरोना टेस्टसाठी खासगी लॅब्सना परवानगी देण्यात आली. मात्र या लॅब्सचा लुटारूपणा उघड होत आहे. दिल्ली जवळच्या नोएडामध्ये तर एका खासगी लॅबने ३५ जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह दिला. मात्र ते सर्व जण निगेटिव्ह असल्याचं स्पष्ट झालं.
5 वर्षांपूर्वी -
कोकणाला मागच्या ९ दिवसांत कोणतीही मदत मिळालेली नाही - फडणवीस
राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सध्या कोकण दौऱ्यावर आहेत. यावेळी ते म्हणाले की, एनडीआरएफसोबतच राज्यानेही नुकसानग्रस्तांना मदत करणं गरजेचं आहे. एनडीआरएफ प्रत्येक आपत्तीत मदत करतं. मात्र यावेळेस राज्यानेही मदत करायला हवी. केंद्र सरकारकडून नंतर मदत होईलच, पण आता राज्याने मदत करायला हवी, असं ते म्हणाले. तसेच, राज्याने केलेला खर्च केंद्र सरकारच देतं, असंही ते म्हणाले.
5 वर्षांपूर्वी -
नोमुराच्या अभ्यासातील निष्कर्षानुसार भारत ‘डेंजर झोन’मध्ये; पुन्हा लॉकडाउनची शक्यता
जगापेक्षा भारतात प्रति लाख लोकसंख्येच्या तुलनेत कोविड १९ रूग्णांची संख्या आणि मृत्यूदर सर्वात कमी आहे पण लॉकडाऊनच्या साडेपाच आठवड्यांनंतर ३० एप्रिलपर्यंत हीच स्थिती आहे हे लक्षात ठेवा. तथापि, त्यांनी असंही म्हटलं आहे की, अद्यापही आपली मोठी लोकसंख्या धोक्यात आहे, त्यामुळे संसर्ग झपाट्याने पसरू शकेल.
5 वर्षांपूर्वी -
पुण्यात कोरोनाची सौम्य किंवा अतिसौम्य लक्षणे असणाऱ्या रुग्णांवर घरीच उपचार
मुंबईपाठोपाठ पुण्यातील कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढतेय. कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलेल्या पुण्यात कोरोनाबाधितांवर आता रुग्णालयाऐवजी घरीच उपचार केले जाणार आहेत. पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी याबाबतची माहिती दिली.
5 वर्षांपूर्वी -
दिवा-बत्ती नव्हे, कोरोनावर उत्तम नियोजन करणाऱ्या देशाला चीनमधील उद्योगांची पसंती
जगाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात कोरोनाव्हायरसने आपले हातपाय पसरलेले आहेत. सर्वात जास्त कोरोनाव्हायरसची प्रकरणं असलेल्या देशांच्या यादीत अमेरिका पहिल्या स्थानावर आहे तर भारताचा सहावा क्रमांक आहे. जगात आता असा कोणता देश आहे जो कोरोनाच्या संकटातही सुरक्षित आहे, असा प्रश्न आपल्या प्रत्येकाला पडला आहे. तर त्याचं उत्तर आहे स्वित्झर्लंड.
5 वर्षांपूर्वी -
कोरोनाच्या संकटाला टर्निंग पाँईंट ठरवूया - पंतप्रधान
आज आपल्याला अनेक वस्तूंची परदेशातून आयात करावी लागते. आपल्याला त्या वस्तू भारतात कशा तयार होतील याचा विचार करावा लागणार आहे. तसंच त्या आपण कशा निर्यात करू शकू हेदेखील पाहवं लागंल. लोकलसाठी व्होकल होण्याची हीच वेळ आहे. आत्मनिर्भर भारत अंतर्गत मोठ्या बदलांची घोषणा करण्यात आली आहे आणि आता त्या प्रत्यक्षात साकारण्यात येत आहेत,” असं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं.
5 वर्षांपूर्वी -
पावसाळ्यात मुंबईमध्ये कोरोना विषाणूचे प्रमाण अधिक वाढेल - आयआयटी अहवाल
दरम्यान आणखी एक वाईट बातमी समोर येत आहे. आयआयटी मुंबईने नुकत्याच सादर केलेल्या अहवालात असे म्हटले आहे की, येत्या पावसाळ्यात मुंबईत कोरोना विषाणूचे प्रमाण अधिक वाढेल. आयआयटी मुंबईच्या अभ्यासानुसार पावसाळ्यात कोरोना विषाणूची लागण होण्याची तीव्रता अधिक वाढेल. अभ्यासाचा असा दावा आहे की आर्द्रता वाढल्यामुळे कोरोना विषाणू दीर्घकाळ वातावरणात जिवंत राहू शकतो.
5 वर्षांपूर्वी -
राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ९४ हजार ४१ वर
महाराष्ट्रात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ९४०४१ पर्यंत वाढली आहे. गेल्या २४ तासांत महाराष्ट्रात ३४३८ नवीन प्रकरणे नोंदली गेली आहेत. महाराष्ट्रातील कोरोना येथे गेल्या २४ तासांत १४९ मृत्यू झाले आहेत. महाराष्ट्रातील कोरोना येथे मृतांचा आकडा आता ३४३८ आहे. महाराष्ट्रात बुधावाारी १८७९ रूग्णांना बरे झाल्यानंतर सुट्टी देण्यात आली.
5 वर्षांपूर्वी -
देशात २४ तासांत १२, ३७५ नवे कोरोनाबाधित, ३८८ रुग्णांचा मृत्यू
देशात कोरोना रूग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. गेल्या २४ तासांत ९९९६ नवीन कोरोना रुग्णांची वाढ झाली असून ३५७ लोकांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात एकूण रूग्णांची संख्या २ लाख ८६ हजार ५७९ वर पोहोचली आहे.
5 वर्षांपूर्वी -
...त्यामुळे फडणवीसांच्या ज्ञानात भर पडेल', शरद पवारांचा टोला
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे सध्या कोकणाच्या दौऱ्यावर आहेत. निसर्ग चक्रीवादळामुळे कोकणात मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी शरद पवार कोकणात आले आहेत. दुसरीकडे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसदेखील कोकणाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. फडणवीसांच्या या प्रस्तावित कोकण दौऱ्यावर पवारांनी निशाणा साधला.
5 वर्षांपूर्वी -
....अन्यथा पुन्हा लॉकडाउन करावा लागू शकतो, मुख्यमंत्र्यांचा इशारा
राज्य सरकारने ‘मिशन बिगिन अगेन’ अंतर्गत लॉकडाउन शिथील करण्यास सुरुवात केली आहे. राज्य सरकारने दुकानं, गार्डन यांच्यासाठी वेळेची मर्यादा देत सुरु करण्याची परवानगी दिली असून खासगी कार्यालयांनाही ठराविक मनुष्यबळासोबत काम करण्यास संमती दिली आहे. त्यामुळे ३० जून नंतर लॉकडाउन पूर्णपणे उठवला जाणार का ? असा प्रश्न विचारला जात आहे.
5 वर्षांपूर्वी