Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
देशात कोरोनाचा आकडा २ लाखांपर्यंत पोहोचला
देशात कोरोना विषाणूच्या रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. एकूण कोरोना रूग्णांची संख्या दोन लाखांच्या जवळपास पोहोचली आहे. त्याचबरोबर, गेल्या २४ तासात पुन्हा एकदा ८ हजारांहून अधिक कोरोना रूग्ण समोर आले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
महाराष्ट्रात कोरोनाचे नवे २३६१ रुग्ण, तर ७६ रुग्णांचा मृत्यू
महाराष्ट्रात करोनाचे २३६१ रुग्ण आढळले आहेत. तर ७६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रातील रुग्णांची संख्या ७० हजार १३ इतकी झाली आहे.२४ तासात ७७९ करोना रुग्ण बरे झाले आहेत. आत्तापर्यंत ३० हजार १०८ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
निमलष्करी दलाच्या कँटीनमध्ये विदेशी नव्हे तर स्वदेशी वस्तू वगळल्या
भारतीय निमलष्करी दलाने स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यानुसार आजपासून निमलष्करी दलाच्या कँटीनमध्ये विदेशी उत्पादनांवर बंदी घालण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात १ हजार विदेशी उत्पादनावर बंदी घालण्यात आली आहे. केंद्रीय पोलीस कल्याणद्वारे चालविले जाणाऱ्या सीडीएस कँटीनमध्ये आता फक्त स्वदेशी साहित्य मिळेल.
5 वर्षांपूर्वी -
सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा; रेल्वेत प्रचंड गर्दी; कर्मचाऱ्यांचा रेलरोको
कोरोना प्रादुर्भावाच्या काळातही काम करणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्यांवर आज आंदोलन करण्याची वेळ आली. या कामगारांची ने-आण करण्यासाठी शटल सेवा सुरू करण्यात आली आहे. मात्र या रेल्वेत प्रचंड गर्दी होत असून चढायलाही जागा मिळत नसल्याने या कामगारांनी अखेर आज रेल्वे रोको केला.
5 वर्षांपूर्वी -
पावसाच्या ओलाव्यामुळे कोरोना आणखी पसरु शकतो, जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठातील शास्त्रज्ञ
मान्सून भारतात दाखल झाला आहे. हवामान खात्यानेही याची माहिती दिली आहे. पण आता कोरोना विषाणूवर पावसाचा काय परिणाम होतो हे पाहावं लागेल. २०२० चा पाऊस हा कोरोना व्हायरसला सोबत घेऊन जाईल की कोरोना विषाणूला आणखी वाढवेल हे पाहावं लागेल. कोरोना विषाणूवरील पावसाच्या परिणामाबद्दल जगभरातील शास्त्रज्ञ निरनिराळ्या प्रतिक्रिया देत आहेत.
5 वर्षांपूर्वी -
त्यांना 'कोरोना ग्रॅज्युएट' तर संबोधले जाणार नाही ना? - आ. आशिष शेलार
आम्हाला ‘कोरोना ग्रॅज्युएट’ तर संबोधले जाणार नाही ना? आम्हाला अशा नव्या बिरुदावलीने तर ओळखले जाणार नाही ना? ATKT असलेल्या 40% विद्यार्थ्यांना नापास करणार का? पदवी अंतिम वर्षे विद्यार्थ्यांच्या मनात भयगंड निर्माण केलेल्या अशा प्रश्नांकडे लक्ष वेधत भाजपा नेते, माजी शिक्षणमंत्री आमदार ऍड आशिष शेलार यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे.
5 वर्षांपूर्वी -
तर आंदोलनकर्त्यांना दहशतवादी घोषित करणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा
कोरोना संकटाशी झगडत असताना अमेरिकेत कृष्णवर्णीय व्यक्ती जॉर्ज फ्लॉइडच्या मृत्यूनंतर देशातील अनेक भागात हिंसाचार भडकला आहे. अमेरिकेच्या मिनियापोलिस व्यतिरिक्त फ्लोरिडा, जॅक्सनविले, लॉस एंजेलिस, पिट्सबर्ग, न्यूयॉर्कसह अनेक ठिकाणी लोक आंदोलन करत आहेत. मिनियापोलिसमध्ये पोलिसांच्या अमानुष मारहाणीत जॉर्ज फ्लॉइडचा मृत्यू झाला. फ्लॉइडच्या मृत्यूनंतर हिंसाचार उफाळून आला आहे. अमेरिकेच्या ५ मोठ्या शहरांमध्ये हिंसाचार सुरू आहे.
5 वर्षांपूर्वी -
मोठ्या उद्योगांसह फेरीवाले, दुकानदारांनाही कर्ज देणार; मोदी सरकारची घोषणा
देशात कोरोनाचं संकट गहिरं होत जातंय. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळात रुतलेलं आर्थिक चक्र पुन्हा वर आणण्यासाठी केंद्र सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत केंद्रीय मंत्रीमंडळाची आज बैठक झाली. या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. या निर्णयाची माहिती, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, नितीन गडकरी आणि नरेंद्र सिंह तोमर यांनी पत्रकार परिषदेमार्फत दिली.
5 वर्षांपूर्वी -
ठाणे मनपाकडून गृहसंकुलांतील विक्री झालेल्या घरांचा ताबा घेण्याचा प्रयत्न; लोकांमध्ये संताप
जिल्ह्यात रविवारी एकाच दिवशी सर्वाधिक ४८६ इतके नवे कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. या नव्या रुग्णांमुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णांचा आकडा आठ हजार २६७ एवढा झाला आहे. जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी १६ जणांचा मृत्यू झाला असून एकूण मृतांचा आकडा हा २५६ इतका झाला आहे. रविवारी ठाणे महानगरपालिका हद्दीत सर्वात जास्त १३१ रुग्ण सापडले.
5 वर्षांपूर्वी -
धक्कादायक! कोरोनाचा संसर्ग झालेल्या नर्सकडून चाईल्ड वॉर्डमधील मुलांवर उपचार
नितेश राणे यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना जिल्हा रुग्णालयातील या भोंगळ कारभारावर ताशेरे ओढले आहेत. नितेश राणे म्हणाले की, संबंधित परिचारिकेला स्वॅब घेतल्यानंतर रिपोर्ट येईपर्यंत क्वारेंटाइन करणे आवश्यक होते. मात्र रिपोर्ट येण्यापूर्वीच संबंधित नर्सला चाईल्ड वॉर्डमध्ये ड्युटी देऊन तेथील लहान मुलांचे आरोग्य सिव्हील सर्जननी धोक्यात घातले आहे.
5 वर्षांपूर्वी -
लॉकडाऊन नियम शिथिल केल्यास कोरोना पुन्हा गंभीर रूपात समोर येईल - शास्त्रज्ञांना शंका
नुकतेच अमेरिकेच्या हॉवर्ड युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांचे संशोधन सायन्स जर्नल या जर्नलमध्ये प्रकाशित झाले. विद्यापीठाच्या टीएच चॅन स्कूल ऑफ पब्लिक हेल्थच्या शास्त्रज्ञांना गंभीर शंका आहे की, या काळात लॉकडाऊन नियम थोडेसे शिथिल केले तर विषाणूचा परिणाम पुन्हा गंभीर रूपात समोर येऊ शकतो. त्याचा मानवी जीवनाला धोका निर्माण होईल. त्यामुळे कोरोनाचं संकट पुन्हा उभं राहिलं असं म्हटलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
सावधान! देशातील अनेक भागात मोठ्या प्रमाणात कोरोनाचा समूह संसर्ग - ICMR तज्ञ डॉक्टर
जगभरातील दोनहून अधिक देशांमध्ये कोरोनाने हाहाकार माजवला आहे. भारतातील कोरोना परिस्थिती दिवसेंदिवस अधिकच गंभीर होत आहे. जगभरात कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या देशांच्या यादीत फ्रान्सला मागे टाकून भारत सातव्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्यामुळे आता चिंता अधिकच वाढली आहे.
5 वर्षांपूर्वी -
आखाती देशांमध्ये अडकलेल्या ३ हजार भारतीयांसाठी मराठी उद्योजकाचा पुढाकार
कोरोना संकटामुळे जगभरात विविध देशांमध्ये भारतीय अडकून पडले आहेत. त्यांना केंद्र सरकार एअर इंडियाच्या साहाय्याने वंदे भारत अभियान सुरू केले आहे. असेच सुमारे अडीच लाख भारतीय आखाती देशांमध्ये अडकून पडले आहेत. त्यातील १८०० ते दोन हजार मराठी नागरिकांचा समावेश आहे. आखाती देशात अडकलेले भारतीय देशातील अन्य विमानतळांवर या अभियानांतर्गत दाखल होत आहेत. पण मुंबईसाठी एकही विमानसेवा नाही.
5 वर्षांपूर्वी -
केईएम रूग्णालय कोविड ICU कक्ष, नर्स-वॉर्डबॉय बराच वेळ गायब, रुग्णांचे प्रचंड हाल
केईएम रुग्णालयाती आणखी एक खळबळनजक प्रकार समोर आला आहे. केईएमच्या कोवीड अतिदक्षता विभागातील नर्स आणि वॉर्डबॉय तासोनतास गायब असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे अतिदक्षता विभागातील रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत.
5 वर्षांपूर्वी -
जनतेची आर्थिक स्थिती बिकट असताना LPG'च्या दरांत वाढ
एक जून २०२० पासून देशात अनेक मोठे बदल आणि नियम बदलणार आहेत. याचा थेट परिणाम आपल्या आयुष्यावर पडणार आहे. काही नव्या नियमांचा थेट फायदा होणार आहे तर काहींना फटका सहन करावा लागणार आहे. यातील काही गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यास आर्थिक नुकसानही होऊ शकते. रेल्वे, गॅस सिलिंडर, पेट्रोल-डिजल यांची भाववाड.. तसेच रेशन कार्ड आणि रेल्वेच्या नियमातील बदलांचाही यात समावेश आहे.
5 वर्षांपूर्वी -
मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्ष ट्विटर सेलमधील ८ पोलिस कोरोना पॉझिटिव्ह
महाराष्ट्रात कोरोनाचे थैमान सुरूच आहे. रविवारी दिवसभरात २ हजार ४८७ नव्या रुग्णांची भर पडल्याने राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या आता ६७ हजार ६५५ वर पोहोचली आहे. तर काल दिवसभरात ८९ रुग्णांचा मृत्यू झाला असून राज्यातील कोरोनाबळींची संख्या २ हजार २८६ इतकी झाली आहे.
5 वर्षांपूर्वी -
वरळीचा कंटेनमेंट झोन ते डी- कंटेनमेंट होण्यापर्यंतचा प्रवास सोपा नव्हता - आदित्य ठाकरे
महाराष्ट्रात कोरोनाचे थैमान सुरूच आहे. रविवारी दिवसभरात २ हजार ४८७ नव्या रुग्णांची भर पडल्याने राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या आता ६७ हजार ६५५ वर पोहोचली आहे. तर काल दिवसभरात ८९ रुग्णांचा मृत्यू झाला असून राज्यातील कोरोनाबळींची संख्या २ हजार २८६ इतकी झाली आहे.
5 वर्षांपूर्वी -
केंद्राच्या कबुलीने फडणवीसांचा खोटारडेपणा उघड! श्रमिक रेल्वेचा खर्च राज्य सरकारकडूनच
‘खोटे बोल पण रेटून बोल’ या खाक्याने सतत खोटे बोलणारे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा तोंडघशी पडले आहेत. परप्रांतीय मजुरांना त्यांच्या त्यांच्या राज्यात घेऊन जाणाऱ्या श्रमिक ट्रेन्सचा खर्च केंद्र सरकार करीत आहे, असे फडणवीसांनी खोटे सांगितले होते. मात्र आता त्यांच्याच केंद्रातील मोदी सरकारचे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सर्वोच्च न्यायालयात प्रांजळ कबुली दिली आहे की, श्रमिक रेल्वेचा खर्च राज्य सरकारे करत आहेत. त्यामुळे देवेंद्र फडणवीस सपशेल तोंडघशी पडले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
अमेरिका-चीनमधील कोल्ड वॉरपासून दूर राहा...चीनची भारताला धमकी
चीनमधील ग्लोबल टाइम्स या वृत्तपत्रानूसार, अमेरिका आणि चीनमध्ये सुरु असलेल्या कोल्ड वॉरपासून भारताने दूर राहण्याचा सल्ला चीनने दिला आहे. भारताने अमेरिका आणि चीनमध्ये सुरु असलेल्या प्रकरणांपासून दूर राहिल्यास चांगले होईल. भारताने अमेरिकेला साथ देत चीनच्या विरोधात काहीही पाऊल उचलंल तर कोरोनासारख्या महामारीसोबतच आर्थिक परिणाम देखील खूप खराब होतील, असा इशारा चीनने भारताला दिला आहे.
5 वर्षांपूर्वी -
केरळवरून मुंबईत ५० डॉक्टर्स आणि नर्सेसचं पथक दाखल
राज्यातील काही भागात करोनाची परिस्थिती अजूनही नियंत्रणात आलेली नसल्याचं चित्र आहे. राज्यातील एकूण रुग्णांची संख्या आणि रुग्णालयातून सुटी देण्यात आलेल्या रुग्णांविषयीची माहिती दररोज राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे ट्विटरवरून देतात. दिवसेंदिवस आकडेवारीत वाढ होतं असल्याचं समोर आलं आहे आणि त्यात पावसाळा तोंडावर आल्यामुळे सरकार वैद्यकीय सेवांच्या बाबतीतही कात्रीत अडकलं आहे.
5 वर्षांपूर्वी