Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
सद्याच्या स्थितीत तरी शाळा लगेच सुरु करणं अत्यंत अवघड - मुख्यमंत्री
देशात सर्वाधिक कोरोना रुग्णांची ही महाराष्ट्रात आहे आणि विशेष म्हणजे त्यात दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. त्यात मुंबई आणि पुण्यासारख्या शहरांमध्ये अत्यंत बिकट परिस्थिती आहे. त्यामुळे लॉकडाउनमध्ये राज्यातील शाळा बंद असून त्या पुन्हा सुरु होणार की नाही ? याबाबत पालकांच्या अनेक संभ्रम आहे. याबाबत स्पष्ट करताना राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शाळा लगेच पुन्हा सुरु करणं सध्यातरी अवघड दिसत असल्याचं म्हटलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
राज्यातील सुमारे ५ IAS, IPS अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण
राज्यातील काही मंत्र्यांना, पोलिसांना कोरोनाची लागण झाल्याचं ताजं असताना आता प्रशासकीय अधिकाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाल्याचं उघड झालं आहे. राज्यातील सुमारे ५ आयएएस, आयपीएस अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण झाली, या अधिकाऱ्यांवर सध्या विविध रुग्णालयात उपचार सुरु आहे. कोरोना संकट काळात पोलीस, डॉक्टर्स याप्रमाणे प्रशासकीय अधिकारीही जीव धोक्यात घालून काम करत आहे.
5 वर्षांपूर्वी -
मुंबईतील कोरोनाचा मोठा हॉटस्पॉट असलेल्या धारावीत सरकारच्या प्रयत्नांना यश येतंय
धारावीसह आसपासचा परिसर कोरोनाचा हॉटस्पॉट बनला आहे. मात्र दिलासा देणारी बाब अशी की, आता धारावीतील कोरोना प्रकरणांमध्ये किंचित सुधारणा झाली आहे. बुधवारी एका दिवसात किमान १८ संक्रमित रुग्ण आढळून आले आहेत. त्याच वेळी, कोरोनाची दुप्पट वाढ आणि सरासरी वाढीचा दर देखील कमी झाला आहे.
5 वर्षांपूर्वी -
पुण्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढतच असल्याने प्रशासनाची चिंता वाढली
कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत आहे. पुणे जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. पुण्यात नव्याने ७५ रुग्ण सापडल्याने बाधितांचा आकडा सात हजाराच्या घरात पोहोचण्यास मदत झाली आहे. तर मृतांची एकूण संख्या ३०० वर पोहोचली आहे.
5 वर्षांपूर्वी -
३१ मे नंतरही लॉकडाऊन उठवणार नसल्याचे संकेत - सविस्तर वृत्त
लॉकडाऊनचा चौथा टप्पा ३१ मे रोजी संपत असताना त्यानंतर लॉकडाऊन पूर्णपण उठवला जाणार नाही, असे स्पष्ट संकेत मुख्य़मंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेत. काल मुख्यमंत्र्यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांकडून राज्यातील स्थितीचा आढावा घेतला. राज्यातील अर्थचक्र सुरु करण्यासाठी ३१ मेनंतर लॉकडाऊनध्ये आणखी शिथिलता दिली जाईल असे त्यांनी स्पष्ट केलंय. ग्रीन झोनमध्ये बऱ्यापैकी व्यवहार सुरु करण्याचा राज्याचा विचार आहे. मात्र, यासाठी काही निमय व अटी निश्चित घालण्यात येणार आहेत. नियम व अटींचे उल्लंघन केल्यास हे व्यवहार बंद केले जातील याची कल्पना नागरिकांना देण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्यात.
5 वर्षांपूर्वी -
राहुल गांधी आणि आदित्य ठाकरेंचा फोनवरून संवाद; सेना-काँग्रेस जवळीक वाढली
राज्यात सत्ताधारी महाविकास आघाडीमधील पक्ष विशेषतः काँग्रेस नाराज असल्याने सारे काही आलबेल नसल्याची चर्चा सुरु असतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यात बुधवारी फोनवरून चर्चा झाली. त्यामुळे महाविकास आघाडीतील तणाव निवळला असल्याचे समजते. तर मुख्यमंत्र्यांपाठोपाठ राहुल गांधी यांनी महाराष्ट्र सरकारमधील मंत्री आदित्य ठाकरे यांच्याशीही फोनवरून संवाद साधला. यावेळी राहुल गांधी यांनी महाराष्ट्र सरकारच्या कामाचे कौतुक केले.
5 वर्षांपूर्वी -
स्थलांतरित मजुरांसाठीचे १२२ कोटी आणि GST'चा परतावा केंद्राकडून मिळालेला नाही - अनिल परब
महाविकास आघाडी सरकारची आज संयुक्त पत्रकार परिषद पार पडली. राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील त्यांनी ही पत्रकार परिषद घेतली. यावेळी विरोधकांनी ठाकरे सरकारवर केलेल्या आरोपांना महाविकास आघाडीकडून चोख प्रत्युत्तर दिलं देण्यात आलं. केंद्र सरकारने केलेल्या मदतीचा आकडा हा आभासी असून प्रत्यक्षात तितकी मदत राज्याला मिळालेली नाही, असं स्पष्टीकरण अनिल परब यांनी दिलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
राज्यातील युवकांवर फडणवीसांचा अविश्वास..मग केंद्राच्या स्किल इंडीयातून काय साधलं? - जयंत पाटील
मुंबईत १० हजार वेगळे बेड्स उपलब्ध होतील. रुग्णांची संख्या वाढली तर तशी व्यवस्था सज्ज आहे. महाराष्ट्राच्या प्रश्नांविषयी चिंता व्यक्त करताना राज्य सरकारने केलेल्या कामावर केवळ टीका करण्याचे काम फडणवीसांनी केले. सर्व मजुर बाहेर गेले आहेत आणि आपल्या अर्थव्यवस्थेवर त्याचा परिणाम होईल. महाराष्ट्रातील तरुणांमध्ये हे स्किल नाही असे फडणवीस म्हणाले.
5 वर्षांपूर्वी -
दहावीचा रद्द झालेल्या भूगोल पेपरचे गुण कसे देणार? बोर्डाकडून स्पष्टीकरण
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे इयत्ता दहावीचा भुगोलाचा पेपर रद्द करण्यात आला होता. पण दहावीचा निकाल लावताना रद्द झालेल्या भुगोलाच्या पेपरचे गुण कसे देणार असा प्रश्न पालकांना पडला होता. त्यावर राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक बोर्डाने महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांना भूगोल विषयाचे सरासरी गुण देण्यात येणार आहेत.
5 वर्षांपूर्वी -
नोकियाच्या तामिळनाडूतील प्लान्टमध्ये ४२ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण...प्लान्ट बंद
मोबाईल बनवणाऱ्या प्रसिद्ध नोकिया कंपनीच्या तामिळनाडूमधील श्रीपेरंबुदूर येथील मॅन्युफॅक्चरिंग प्लान्टमध्ये ४२ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. सध्या या कंपनीचा प्लान्ट बंद ठेवण्यात आला आहे. नोकिया कंपनीने गेल्या आठवड्यात तामिळनाडूच्या श्रीपेरंबुदूर येथील प्लान्ट बंद करण्याचा निर्णय घेतला होता.
5 वर्षांपूर्वी -
खासगी लॅबमधील कोरोना चाचणीचं शुल्क ठरवा; ICMR'चे राज्यांना निर्देश
खासगी लॅबमध्ये कोरोना चाचणीसाठी मोजावं लागणार जास्तीचं शुल्क लवकरच कमी होण्याची चिन्ह आहेत. करोनाचं निदान करणाऱ्या आरटी-पीसीार (The Real Time Polymerase Chain Reaction) चाचणीसाठी आकारलं जाणाऱ्या शुल्काबद्दल धोरणं ठरवण्याचे निर्देश भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनं (आयसीएमआर) राज्यांना दिले आहेत. परिषदेनं सध्या आकारण्यात येणार ४५०० रुपये शुल्कही रद्द केलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
चिनी लष्कराला अध्यक्ष शी जिनपिंग यांच्याकडून थेट युद्धांच्या तयारीचे आदेश
चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी युद्धाची तयारी करावी, सैनिकांचे प्रशिक्षण वाढवावे. कुठल्याही परिस्थितीचा त्वरीत आणि प्रभावीपणे सामना करण्याची तयारी ठेवावी असे आदेश सैन्याला दिले आहेत. तसेच देशाचे सार्वभौमत्व, सुरक्षा आणि विकासाच्या हितांचे रक्षण करावे, अशा सूचना सैन्याला दिल्या आहेत. सेंट्रल मिलिट्री कमिशनच्या बैठकीत बोलतांना त्यानी या सूचना केल्या.
5 वर्षांपूर्वी -
महाराष्ट्रातील संकटाच्या काळात काँग्रेस प्रत्येक निर्णयात सरकारसोबत; राहुल गांधीची ग्वाही
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेसच्या भूमिकेबद्दल नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी यांच्यामध्ये फोनवर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.
5 वर्षांपूर्वी -
PM केअर्स फंडाला २१ कोटीचं दान देणाऱ्या कंपनीने २००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं
इंडिया बुल्स ही भारतातील विख्यात कंपनी आहे. या कंपनीने नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पीएम केअर्स फंडाला २१ कोटी रुपयांची आर्थिक मदत दिली आहे. त्यानंतर या कंपनीने त्यांच्या २,००० कर्मचाऱ्यांना व्हॉट्सऍप कॉलद्वारे कामावरून काढून टाकले आहे, असा आरोप कर्नाटकातील काँग्रेस पक्षाच्या सोशल मीडियाच्या प्रमुख असलेल्या श्रीवत्सा यांनी केला आहे. श्रीवत्सा यांनी इंडिया बुल्सद्वारे कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याचा हा व्हाट्सऍप कॉलचा व्हिडिओसुद्धा जगजाहीर केला आहे.
5 वर्षांपूर्वी -
खासगी रुग्णालयांमधील ५० टक्के परिचारिकांचे राजीनामे; सरकारच्या अडचणीत वाढ
राज्यातील अनेक रुग्णालयातील परिचारिकांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे परिचारिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसागणीक वाढतच आहे. खासगी रुग्णालयांसाठीदेखील अत्यावश्यक सेवा कायदा (मेस्मा) लागू केला आहे. या पार्श्वभूमीवर खासगी रुग्णालयांमधील परिचारिका काम सोडून जात असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.
5 वर्षांपूर्वी -
मुख्यमंत्र्यांनी बोलावली महाविकास आघाडीच्या मित्रपक्षांची तातडीची बैठक
राज्यात कोरोना विषाणू रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. विशेषतः मुंबई, पुणे शहरांमध्ये रेड झोन भागांमध्ये रुग्णांची संख्या लक्षणीय वाढ होताना दिसत आहे. या रेड झोन एरियामध्ये लॉकडाऊन संपल्यानंतर खबरदारीच्या दृष्टिकोनातून नवीन नियमावली कोणत्या स्वरूपात करता येईल, तसेच सध्याच्या नियमात कोणते बदल करून काही भागांमध्ये रिलॅक्सेशन देता येईल, या उद्देशानं महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांची बुधवारी महत्त्वाची बैठक होणार आहे.
5 वर्षांपूर्वी -
Fact-Check: मुंबई-पुणे पूर्णपणे बंद करण्यात येणार असल्याची अफवा आणि खोटा मेसेज
कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर मुंबई, पुणे पूर्णपणे बंद करण्यात येणार असल्याचा सोशल मीडियावरून व्हायरल झालेला मेसेज खोटा असून ती केवळ अफवा आहे. त्यामुळे नागरिकांनी अशा खोट्या मेसेजवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन राज्य शासनाकडून करण्यात आले आहे. तसेच असे खोटे मेसेज फॉरवर्ड करु नयेत अन्यथा संबंधित सोशल मीडिया ऍडमिनवर कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
5 वर्षांपूर्वी -
Fact-Check: शाळा-कॉलेज सुरु करण्याबाबत केंद्रीय गृहमंत्रालयाची महत्वाची सूचना
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची ताजी आकडेवारी प्रसिद्ध करण्यात आली आहे. ज्यामध्ये मंगळवारी चोवीस तासांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या तब्बल ६३८७ ने वाढली आहे. तर एका दिवसांत एकूण १७० जणांचा कोरोनामुळं मृत्यू झाल्याची माहिती समोर आली.
5 वर्षांपूर्वी -
देशात २४ तासात ६३८७ नवे रुग्ण; तर १७० रुग्णांचा मृत्यू
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची ताजी आकडेवारी प्रसिद्ध करण्यात आली आहे. ज्यामध्ये मंगळवारी चोवीस तासांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या तब्बल ६३८७ ने वाढली आहे. तर एका दिवसांत एकूण १७० जणांचा कोरोनामुळं मृत्यू झाल्याची माहिती समोर आली.
5 वर्षांपूर्वी -
राज्यात कोरोनाचे नवे २०९१ रुग्ण; एकूण ऍक्टिव्ह रुग्ण संख्या ३६००४ - आरोग्यमंत्री
महाराष्ट्रात आज २०९१ नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर ९७ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाग्रस्तांची महाराष्ट्रातली संख्या ५४ हजार ७५८ इतकी झाली आहे. राज्यात सध्या ३६ हजार ४ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.
5 वर्षांपूर्वी