Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
फडणवीसांकडून फक्त आकडयांचा भास; पृथ्वीराज चव्हाणांकडून आकडेवारीची पोलखोल
केंद्र सरकारने करोना काळात निधी उपलब्ध करुन दिला नाही असा आरोप केला होतो. आत्तापर्यंत ५ हजार कोटींपेक्षा जास्त पैसे राज्याला दिले आहेत. मात्र केंद्राने काहीही दिलेच नाही असं ठाकरे सरकारकडून भासवलं जातं आहे असा आरोप माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. पीपीई किट, N-95 मास्क यांचाही पुरवठाही केंद्राने केला आहे असंही फडणवीस यांनी स्पष्ट केलं. आत्तापर्यंत २८ हजार १०४ कोटींचा निधी केंद्राने राज्य सरकारला उपलब्ध करुन दिला आहे.
5 वर्षांपूर्वी -
राज्य सरकारला घेरणाऱ्या केंद्राची देशातील कोरोना आकडेवारीवरून जगाशी तुलना
जगाच्या तुलनेत भारतातील कोरोनाचे रुग्ण कमी असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव लव अग्रवाल यांनी दिली आहे. तसंच देशाचा रिकव्हरी रेट हा वाढून आता ४१.६१ टक्क्यांवर आला आहे. आज केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि आयसीएमआरच्या झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली आहे.
5 वर्षांपूर्वी -
महाराष्ट्रात कोरोनाचे ८० टक्के रुग्ण लक्षणं नसलेले आहेत - मुख्य सचिव
महाराष्ट्रात कोरोनाचे ८० टक्के रुग्ण लक्षणं नसलेले आहेत अशी माहिती मुख्य सचिव अजॉय मेहता यांनी दिली आहे. तसंच सध्याच्या घडीला महाराष्ट्रात ३५ हजार १७८ ऍक्टिव्ह केसेस आहेत असंही त्यांनी म्हटलं आहे. तर महाराष्ट्रात कोरोना रुग्ण दुप्पट होण्याचं प्रमाण हे पाचवरुन १४ दिवसांवर आलं आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. एएनआयने या संदर्भातले वृत्त दिले आहे.
5 वर्षांपूर्वी -
आपण २१ दिवसांत कोरोनावर मात करू असं मोदी भाषणात म्हणाले होते - राहुल गांधी
कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग आणि लॉकडाऊनमुळे हातावर पोट असलेल्या गोरगरीब मजुरांचे प्रचंड हाल होत आहे. देशातील विविध राज्यात गेलेले हे मजूर मिळेल त्या साधनाने आपल्या मूळ गावी जात आहेत. दरम्यान, या मजुरांचे होत असलेले हाल पाहून काँग्रेसचे नेते राहुल गांधी कमालीचे व्यथित झाले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
केंद्र सरकारची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न – देवेंद्र फडणवीस
कोरोनाच्या काळात केंद्र सरकार महाराष्ट्राला सर्वतोपरी मदत करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र असं असताना महाराष्ट्रासोबत अन्याय केला जात असल्याची भूमिका तयार केली जात आहे. खोटा प्रचार करून केंद्र सरकराची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर केला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पत्रकार परिषदेत केंद्र सरकारचू भूमिका मांडत सत्ताधाऱ्यांना टोला लगावला आहे.
5 वर्षांपूर्वी -
लॉकडाऊननंतर कोरोनाची मोठी लाट येऊ शकते; WHO चा इशारा
कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी अनेक देशांमध्ये लॉक़ाऊन जाहीर करण्यात आला होता. मात्र अनेक देशांनी हा लॉकडाऊन हटवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र लॉकडाऊन हटवणाऱ्या निर्णय घेतलेल्या देशांना जागतिक आरोग्य संघटनेने महत्त्वाचा इशारा दिला आहे. जर देशांनी लॉकडाऊन उठवण्यात घाई केली तर कोरोनाचा दुसरा टप्पा येण्याची शक्यता जागतिक आरोग्य संघटनेने वर्तवला आहे.
5 वर्षांपूर्वी -
कोरोना आपत्ती: मुंबईतील जीएसबी मंडळाकडून यंदाचा गणेशोत्सव रद्द
महाराष्ट्रावरील कोरोनाचे संकट दिवसेंदिवस चिंताजनक होत आहे. त्यातच बाप्पाच्या आगमनाची ओढ लागली आहे. मात्र गणेशोत्सवात बाप्पाच्या दर्शनासाठी लाखोंच्या संख्येने गणेशभक्त येत असतात. कोरोनाच्या परिस्थितीत या गर्दीवर नियंत्रण कसे मिळवायचे आणि सोशल डिस्टन्सिंग कसे राखायचे, असा पेच सर्व गणेशोत्सव मंडळांमध्ये निर्माण झाला आहे.
5 वर्षांपूर्वी -
राज्यात १५ हजार ७८६ रुग्णांची कोरोनावर मात; तर ३५,१७८ रुग्णांवर उपचार सुरू
देशासह राज्यात कोरोनाचा कहर सुरुच आहे. सोमवारी राज्यात नव्या २ हजार ४३६ रुग्णांची भर पडली. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या आता ५२ हजार ६६७ वर पोहोचली आहे. तर काल दिवसभरात १ हजार १८६ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे आतापर्यंत राज्यात १५ हजार ७८६ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर सध्या ३५ हजार १७८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
5 वर्षांपूर्वी -
पवार आणि मुख्यमंत्र्यांमध्ये मातोश्रीवर महत्वाची बैठक; विरोधक-सत्ताधारी बैठका
एकीकडे राज्यावरील कोरोनाचे संकट अधिक गडद होत असताना दुसरीकडे लवकरच एक राजकीय भूकंप होणार अशा चर्चांना उधाण आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यात झालेल्या गुप्त बैठकीनंतर अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.
5 वर्षांपूर्वी -
भारतातला कोरोना व्हायरस शक्तिशाली झाल्याने तरुणांच्या मृत्यूत वाढ - द वॉशिंग्टन पोस्ट
जगभरात थैमान घालणाऱ्या करोना विषाणुचा प्रादुर्भाव देशात दिवसेंदिवस अधिकच वाढत आहे. मागील चोवीस तासांत देशभरात ६ हजार ९७७ नवे करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर, १५४ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. करोना रुग्ण संख्या वाढीतील हा आतापर्यंतचा उच्चांक मानला जात आहे. यामुळे देशभरातील करोनाबाधितांची एकूण संख्या १ लाख ३८ हजार ८४५ वर पोहचली आहे.
5 वर्षांपूर्वी -
मुंबई पोलीस सोमैयांना म्हणाले, तो व्हिडिओ जुना आहे आणि कोरोनाशी संबंध नाही
मुंबईमध्ये रविवारी एक हजार ७२५ जणांना करोनाची बाधा झाली असून बाधितांची संख्या ३० हजार ३५९ वर पोहोचली आहे. तर दिवसभरात ३९ जणांचा मृत्यू झाला असून मृतांची एकूण संख्या ९८८ वर पोहोचली आहे. आतापर्यंत रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या संशयित रुग्णांची संख्या २५ हजार १३१ इतकी झाली आहे. विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेऊन बऱ्या झालेल्या ५९८ जणांना रविवारी घरी पाठवण्यात आले.
5 वर्षांपूर्वी -
पुणे: कोविड सेंटरमध्ये कोरोना रुग्णासाठी डब्यातून जेवणासोबत दारू सुद्धा पाठवली
देशात महाराष्ट्र अद्यापही पहिल्या क्रमांकावर असून याठिकाणी काल दिवसभरात ३,०४१ नव्या रुग्णांची नोंद झाली. तर एकट्या मुंबईत कोरोनाचे १७२५ नवे रुग्ण आढळले. यासोबत राज्याने ५० हजारांचा टप्पा ओलांडला आहे. तर मुंबईतील करोना रुग्णांची संख्या ३० हजाराच्या पुढे गेली आहे. राज्यात ५८ नव्या मृत्यूंची नोंद झाली असून मृतांची संख्या १६३५ झाली आहे.
5 वर्षांपूर्वी -
भारत निर्मित कोरोना लस येण्यास कमीतकमी वर्ष लागणार - ICMR
भारतात आयसीएमआर इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च आणि भारत बायोटेक इंटरनॅशनल लिमिटेड मिळून कोरोनाला रोखणारी लस विकसित करत आहेत. कोरोना व्हायरसमधून बाजूला करण्यात आलेल्या स्ट्रेन इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या पुण्यातील नॅशनल इन्स्टियुट ऑफ वायरोलॉजी लॅबमध्ये ठेवण्यात आल्या होत्या.
5 वर्षांपूर्वी -
कोरोनाबाधित मंत्र्यांना अँब्युलन्स, इस्पितळ आणि बेड्स वेळेवर; सामान्यांचा वाली कोण?..सविस्तर
काँग्रेस नेते राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांना करोनाची लागण झाली आहे. रविवारी त्यांना नांदेडमधील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. पण पुढील उपचारासाठी त्यांना मुंबईला हलवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे मुंबईत अशोक चव्हाण यांच्यावर पुढील उपचार होणार आहेत.
5 वर्षांपूर्वी -
सावध राहा! राज्यात ७२% कोरोना रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणं दिसत नाहीत
देशातील सर्वाधिक कोरोनाग्रस्त प्रकरणं महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रामध्ये ७१ टक्के लोकांना कोरोनाव्हायरसची लागण झाली आहे. त्यातही राज्यातील बहुतेक प्रकरणांमध्ये कोरोनाव्हायरसची लक्षणं दिसत नाहीत. अशी माहिती इंडियन काऊन्सिल मेडिकल रिसर्चच्या (ICMR) सूत्रांनी दिली आहे.
5 वर्षांपूर्वी -
रेल्वेमंत्री रात्रभर उगाचच ट्विट करत होते, इथे रात्री ९ नंतर झोप महत्वाची - आ. भातखळकर
स्थलांतरित मजुरांसाठी सोडण्यात येणाऱ्या श्रमिक ट्रेनच्या मुद्द्यावरून आता केंद्र आणि राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. आज दुपारीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रेल्वे मंत्रालय महाराष्ट्राची तयारी असूनही कमी रेल्वेगाड्या सोडत असल्याची तक्रार केली होती. उद्धव ठाकरे यांचा हा आरोप रेल्वेमंत्री पियूष गोयल यांच्या चांगलाच जिव्हारी लागला.
5 वर्षांपूर्वी -
आपत्तीत सत्ताधारी-विरोधकांमधील संघर्ष टोकाला; शरद पवार राज्यपालांच्या भेटीला
राज्य सरकार आणि राज्यपाल यांच्यात शासकीय निर्णय घेण्यावरून वाद पेटला आहे. राज्यपालांनी शासकीय कामकाजात हस्तक्षेप केल्यामुळे मंत्र्यांमध्ये नाराजी आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या भेटीला पोहोचले आहे.
5 वर्षांपूर्वी -
राज्य सरकारकडे डॉक्टर-नर्सेसची कमतरता; मदतीसाठी केरळ सरकारला पत्र
राज्यातील करोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत रविवारी ३ हजार रुग्णांची भर पडली. दिवसभरात ३०४१ जणांना करोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं. त्यामुळे राज्यातील एकूण रुग्णांची संख्या ५०,२३१ इतकी झाली आहे. यात सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या ३३,९८८ इतकी आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली.
5 वर्षांपूर्वी -
मग ह्यापुढे महाराष्ट्रात येताना आमची, महाराष्ट्राची आणि पोलीसांची परवानगी घ्यावी लागेल
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्य सरकार राज्याबाहेर काम करणाऱ्या मजुरांच्या सामाजिक सुरक्षेसाठी कठोर नियमांचा समावेश असलेले धोरण तयार करणार असल्याचे सांगितले आहे. रविवारी योगींनी ही माहिती दिली. यापुढे दुसऱ्या राज्यांना उत्तर प्रदेशमधील व्यक्तींना कामावर ठेवायचे असेल तर त्यासाठी उत्तर प्रदेश सरकारची परवानगी घ्यावी लागेल असं ही योगींनी स्पष्ट केलं. यासंदर्भातील वृत्त हिंदुस्तान टाइम्सने दिलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
देशात कोरोना रुग्णांच्या आकडा झपाट्याने वाढतोय; भारताने इराणला मागे टाकलं
भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात अद्याप यश आलेलं नसून रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. रविवारी भारताने इराणला मागे टाकलं असून कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या देशांच्या यादीत १० व्या क्रमांकावर पोहोचला आहे. गेल्या २४ तासात भारतात ६५६६ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. आतापर्यंत एका दिवसात मिळालेले हे सर्वाधिक रुग्ण आहेत. तर १५३ मृत्यूंची नोंद झाली आहे.
5 वर्षांपूर्वी