Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
आत्मनिर्भर भारत! देशातील ६ विमानतळांचा लिलाव होणार - अर्थमंत्री
देशातील कोळसा उत्पादन वाढीवर भर दिला जाणार असं निर्मला सीतारामन यांनी स्पष्ट केलं. या कोळसा उत्पादन क्षेत्राच्या सुधारणेसाठी ५० हजार कोटींचं पॅकेज देण्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली आहे. कोळश्याच्या व्यावसायिक उत्पादनावर भर दिला जाणार असंही निर्मला सीतारामन यांनी सांगितलं. कोळशाद्वारे गॅसनिर्मितीला प्राधान्य दिलं जाणार असंही त्यांनी स्पष्ट केलं. कोळसा क्षेत्रातील सरकारचे एकाधिकार कमी केले जाणार असंही त्यांनी सांगितलं. कोळसा उत्पादनासाठी खासगी कंपन्यांना संधी दिली जाईल असंही स्पष्ट करण्यात आलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
पवार साहेबांच्या त्या पत्रात साखर उद्योगासह कुक्कुटपालन व इतर उद्योगांचाही उल्लेख
राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी साखर उद्योगांसाठी पाऊल उचलले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे त्यांनी काही शिफारशी आणि मागण्या केल्या होत्या. याबाबत त्यांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहलेल्या पत्रातील काही तपशीलवार मुद्दे शरद पवार यांनी ट्विटरच्या माध्यमातून शेअर केले होते.
5 वर्षांपूर्वी -
‘लावा’ मोबाईल कंपनी चीनमधून भारतात येणार; ८०० कोटींची गुंतवणूक करणार
मोबाईलचं उत्पादन करणारी ‘लावा’ या कंपनीनं आपला चीनमधील व्यवसाय गुंडाळण्याचा निर्णय घेतला आहे. लावा इंटरनॅशनलकडून शुक्रवारी यासंदर्भातील माहिती देण्यात आली. भारतात करण्यात आलेल्या धोरणात्मक बदलांनंतर कंपनीनं आपला व्यवसाय भारतात आणण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीनं मोबाईल फोन डेव्हलपमेंट आणि उत्पादन वाढीसाठी पुढील पाच वर्षात भारतात ८०० कोटी रूपयांची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे.
5 वर्षांपूर्वी -
महाराष्ट्र हे भारताच्या अर्थव्यवस्थेचं केंद्र आहे, केंद्राने सहकार्य करावं - राहुल गांधी
लॉकडाऊनमध्ये शेतकरी, मजुरांचे हाल होत आहेत, त्यांना कर्ज देणारं पॅकेज नको, त्यांच्या खिशात पैसा द्यायला हवा, लोक रस्त्यावर तहान-भुकेने चालत आहेत, त्यांना दिलासा देण्याची गरज असल्याचं मत काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधींनी व्यक्त केलं आहे. राहुल गांधींनी पत्रकार परिषद घेऊन देशातील कोरोना स्थिती आणि सरकारचं पॅकेज यावर भाष्य केलं.
5 वर्षांपूर्वी -
खरं वादळ अजून बाकी, ते आल्यावर मोठा आर्थिक फटका बसणार - राहुल गांधी
वादळ अजून आलेलं नाही, ते येत आहे. पण ते आल्यावर मोठा आर्थिक फटका बसणार असून अनेकांना तो सहन करावा लागणार असल्याचा इशारा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दिला आहे. यावेळी त्यांनी केंद्र सरकारला जाहीर करण्यात आलेल्या २० लाख कोटींच्या पॅकेजवर पुनर्विचार करावा असा सल्लाही दिला आहे. शेतकरी, मजुरांच्या खिशात पैसे द्या या मागणीचा यावेळी त्यांनी पुनरुच्चार केला. राहुल गांधी यांनी स्थानिक प्रसारमाध्यमांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला.
5 वर्षांपूर्वी -
मे अखेरपर्यंत पुण्यात ५ हजारांपर्यंत कोरोना रुग्णसंख्या असेल - महापालिका आयुक्त
कोरोना रुग्णांचा आकडा दिवसा गणिक वाढत आहे. त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे. राज्य सरकारने भविष्यात कोरोना विषाणू बाधितांचा आकडा वाढण्याचा धोका लक्षात घेऊन कोविड रुग्णांलयाची उभारणी करण्यावर भर दिली आहे. तसेच राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी पावसाळ्यात जूनमध्ये रुग्ण संख्येत वाढ होण्याची शक्यता वर्तविली आहे.
5 वर्षांपूर्वी -
झूम एपवरुन कर्मचाऱ्यांशी संवाद साधत उबरने ३५०० कर्मचाऱ्यांना बेरोजगार केलं
कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊनचा अनेक कंपन्यांवर फरक पडत आहे. नुकतीच अमेरिका आणि जगातील सर्वात मोठी जिम कंपनी Gold Gym ने या काळात आपलं दिवाळ निघाल्याच घोषित केलं आहे. यानंतर जगातील सर्वात मोठी कॅब सर्व्हिस कंपनी उबर’वर देखील संकट कोसळलं आहे. कंपनीने जाहिर केलं होतं की, आर्थिक संकटामुळे अनेक कर्मचाऱ्यांना कामावरून काढावं लागेल.
5 वर्षांपूर्वी -
अमेरिका भारताला व्हेंटिलेटर्सचा पुरवठा करणार – डोनाल्ड ट्रम्प
चीनच्या वुहानमधून जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसचं थैमान अद्यापही सुरूच आहे. त्यावर अद्याप ठोस असं वॅक्सीन मिळालेलं नाही. अनेक देशांकडून त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. भारतातही कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे. कोरोनाच्या या महासंकटाविरुद्ध लढण्यासाठी आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मैत्रीपूर्वक मदतीचा हात पुढे केला आहे. भारत आणि अमेरिका मिळून या अदृश्य शत्रूचा सामना करून असंही ट्रम्प म्हणाले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
केंद्र सरकारच्या गाइडलाइनमध्ये धरसोडवृत्ती, त्यामुळेच कोरोना अधिक वाढला - अमोल कोल्हे
देशातील करोना रुग्णांचा आकडा ८१ हजारहून अधिक झाला असून शुक्रवारी तो ८१,९७० इतका होता. गेल्या चोवीस तासांमध्ये ३,९६७ नव्या रुग्णांची भर पडली असून १०० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण मृत्यू २,६४९ झाले आहेत. जगभरात मृत्यूचे प्रमाण ६.९२ टक्के इतके असले तरी भारतात ते सध्या ३.२३ टक्के आहे. एकूण २७,९२० रुग्ण बरे झाले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
शरद पवारांकडून मुंबईतील एमएमआरडीए मैदानातील क्वारंटाईन केंद्राची पाहणी
देशभरात कोरोना विषाणूने घातलेलं थैमान पाहता आता, संपूर्ण देश हा लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्याच्या दिशेने वाटचाल करत आहेत. सध्या सुरु असणारा टाळेबंदीचा तिसरा टप्पा हा अवघ्या काही दिवसांतच संपून औपचारिकरित्या देश या नव्या टप्प्यात प्रवेश करणार आहे. १८ मे पासून सुरु होणारा चौथा लॉकडाऊन हा काही अंशी वेगळ्या स्वरुपाचा असेल.
5 वर्षांपूर्वी -
मुख्यमंत्र्यांकडून गोरेगाव नेस्को मैदानावरील १००० खाटांच्या कोरोना केंद्राची पाहणी
देशभरात कोरोना विषाणूने घातलेलं थैमान पाहता आता, संपूर्ण देश हा लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्याच्या दिशेने वाटचाल करत आहेत. सध्या सुरु असणारा टाळेबंदीचा तिसरा टप्पा हा अवघ्या काही दिवसांतच संपून औपचारिकरित्या देश या नव्या टप्प्यात प्रवेश करणार आहे. १८ मे पासून सुरु होणारा चौथा लॉकडाऊन हा काही अंशी वेगळ्या स्वरुपाचा असेल.
5 वर्षांपूर्वी -
कोरोनाचा अनुभव सांगणारं शिल्पा पटवर्धन यांचं मनोगत; तुमचा आत्मविश्वास वाढवेल
सध्या समाज माध्यमांवर कोरोनासंबंधित समोर येणाऱ्या गोष्टी या सामान्यांचा आत्मविश्वास ढासळवणाऱ्या आहेत हे नक्की. अशा परिस्थतीत सामान्यांचा कोरोनाविरुद्ध लढ्यात आत्मविश्वास वाढेल असा गोष्टी जवळपास नसल्यात जमा आहेत. मात्र सध्या समाज माध्यमं आणि व्हाट्सअँप’वर मुंबई दादर येथील पटवर्धन कुटुंबीयांचा व्हयरल होणारा अनुभव तुमचा कोरोनाविरुद्ध आत्मविश्वास नक्कीच वाढवेल…स्वतः पटवर्धन कुटुंबातील शिल्पा पटवर्धन यांनी सांगितलेला अनुभव अगदी जसाच्या तसा आम्ही देत आहेत.
5 वर्षांपूर्वी -
लॉकडाउन संपल्यावर कोरोनाच्या समूह संसर्गचा धोका; तज्ज्ञांचं मत
कोरोनामुळे देशात मृत्यूंचा आकडा २६०० पार गेला आहे. तर जगात तीन लाखांचा आकडा पार झाला आहे. कोरोना व्हायरस हा केवळ ६० नॅनोमीटर एवढ्याच आकाराचा आहे. तरीही त्याने जगाला बेजार करून सोडले आहे. भारतात केवळ २६४९ लोकांनीच कोरोनामुळे जीव गमावलेला नाहीय, तर ४१८ जण असे आहेत ज्यांना लॉकडाऊनमुळे प्राण गमवावे लागले आहेत. हा आकडा ११ मे पर्यंतचा आहे.
5 वर्षांपूर्वी -
शेतीच्या पायाभूत सुविधांसाठी १ लाख कोटींचं पॅकेज - अर्थमंत्री निर्मला सीतारामन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या विषयी माहिती देण्याकरता आज तिसऱ्या दिवशी अर्थमंत्री निर्मला सीतारामन पत्रकार परिषद घेत आहेत. यावेळी अर्थ राज्यमंत्री अनुराग सिंह ठाकुर देखील उपस्थित आहेत. या पॅकेजअंतर्गत शेती आणि शेतीशी निगडीत इतर उद्योगधंद्याना काय दिलासा मिळणार आहे, यासंदर्भात आज घोषणा केल्या जात आहेत.
5 वर्षांपूर्वी -
आर्थिक प्रोत्साहनपर पॅकेज शेअर बाजारावर परिणाम करण्यात अपयशी
मागणीच्या बाबतीत चिंता कायम असल्याने सरकारने जाहीर केलेले २० लाख कोटी रुपयांच्या आर्थिक प्रोत्साहनपर पॅकेज शेअर बाजारावर परिणाम करण्यात अपयशी ठरल्याचे एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे प्रमुख सल्लागार श्री अमर देव सिंह यांनी सांगितले. परिणामी एस अँड पी बीएसई सेन्सेक्स आणि निफ्टी ५० निर्देशांकात शेवटच्या ट्रेडिंग सेशनमध्ये २ टक्क्यांची घसरण झाली. दिवस पुढे जाऊ लागला, तशी घसरण वाढत गेली. ३० शेअर सेन्सेक्सचा निर्देशांक ८८५.७२ अंक किंवा २.७७% नी घसरला. तो ३१,१२२.८९ अंकांवर बंद झाला. निफ्टी ५० चा निर्देशांक २४०.८० अंक किंवा २.५७% नी कमी झाला. तो ९,१४२.७५ अंकांवर बंद झाला.
5 वर्षांपूर्वी -
भूमिपुत्रांना नोकऱ्या मिळण्यासाठी राज्य सरकार कामगार ब्यूरोची स्थापना करणार
कोरोनाच्या संकटामुळे राज्यातील लाखो मजूर आपापल्या राज्यात परतले आहेत. त्यामुळे भूमीपुत्रांना महाराष्ट्रात नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध होणार आहेत. या संधी मिळवून देण्यासाठी राज्य सरकार कामगार ब्यूरोची स्थापना करणार आहे.
5 वर्षांपूर्वी -
कोरोनामुळे केवळ शारीरिक नव्हे तर मानसिक आरोग्यावर देखील परिणाम - UNO
सध्या जगभर लॉकडाउन झाल्याने अनेकांचा दिनक्रम आणि आयुष्यात जे कधीच अनुभवलं नाही ते आयुष्य जगण्याची वेळ आली आहे. अर्थव्यवस्था कोलमडल्याने अनेक उद्योग बुडतील आणि करोडो लोकं बेरोजगार होण्याची शक्यता यापूर्वीच अनेक संस्थांनी व्यक्त केली आहे. परिणामी सामान्य माणसाच्या एकूण मानसिक स्थितीत देखील मोठेच बदल होतील अशी शक्यता संयुक्त राष्ट्राने व्यक्त केली आहे. त्यामुळे कोरोनाचा सामना करताना लोकांनी स्वतःच्या मानसिक आरोग्याकडे तितकेच गांभीर्याने लक्ष देणं गरजेचं असल्याचं म्हटलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
अन्यथा पुढील ६ महिने प्रतिदिन ६ हजारहून अधिक मुलांचा मृत्यू होऊ शकतो - युनिसेफ
मात्र त्यानंतर आता युनिसेफने दिलेल्या इशाऱ्यामुळे पालकांची चिंता वाढण्याची शक्यता आहे. कोरोना संकटामुळे आरोग्य यंत्रणांवर आलेल्या दबावामुळे नियमित सेवांवर परिणाम झाला आहे. याचा मोठा फटका लहान मुलांना बसू शकतो, असा धोक्याचा इशारा युनिसेफनं दिला आहे. कोरोना संकटाचा जगभरात आरोग्य व्यवस्थेवर अतिरिक्त ताण आला आहे. त्याचा परिणाम लहान मुलांना मिळणाऱ्या आरोग्य सेवांवर होण्याची शक्यता आहे.
5 वर्षांपूर्वी -
कोरोना संकटात भारताला जागतिक बँकेकडून एक बिलियन डॉलरची मदत
कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर जागतिक बँकेने भारताला मोठा दिलासा दिला आहे. जागतिक बँकेने भारताला एक बिलियन डॉलरचं पॅकेज जाहीर केले आहे. हे सामाजिक संरक्षण पॅकेज आहे. यापूर्वी कोरोनाशी युद्धासाठी ब्रिक्स देशांच्या न्यू डेव्हलपमेंट बँकेने आपत्कालीन मदत म्हणून एक अरब डॉलरची मदत जाहीर केली होती.
5 वर्षांपूर्वी -
अमेरिकेचा चीनवर कोरोनासंबंधित डेटा चोरीचा आरोप; ट्रम्प चीनविरुद्ध आक्रमक
अमेरिकेने चीन विरूद्ध सर्वात मोठ असं आक्रमक रुप धारण केलं आहे. अमेरिकेत वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावाला चीनलाच जबाबदार धरलं आहे. अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी जगभरात कोरोना पसरल्यामुळे चीनशी सर्व संबंध तोडण्याची धमकी दिली आहे. जगभरात तीन लाख लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून यामध्ये ८०,००० अमेरिकेतील नागरिकांचा समावेश आहे.
5 वर्षांपूर्वी