Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
घरपोच दारु विक्रीसाठी राज्य सरकारची योजना
कोरोनामुळे राज्यात लॉकडाऊन सुरू आहे त्यामुळे काही ठिकाणी खासगी दवाखाने बंद आहेत अशा परिस्थितीत नागरिकांना आरोग्य विषयक तपासणी, सल्ला घेताना येणारी अडचण लक्षात घेऊन ऑनलाईन ई-संजीवनी ओपीडी सेवा सुरू करण्यात आली आहे. राज्यात प्रायोगिक तत्वावर सुरू झालेली ही सेवा पूर्णपणे सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी www.esanjeevaniopd.in या संकेतस्थळाला रुग्णांनी भेट देऊन तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे.
5 वर्षांपूर्वी -
न्यायालयाकडून धक्का! गुजरातच्या कायदा मंत्र्यांची आमदारकीच रद्द
गुजरात सरकारला मंगळवारी गुजरात उच्च न्यायालयाच्या निर्णयानं धक्का बसला. गुजरात उच्च न्यायालयानं गैरवर्तणूक आणि फेरफार केल्याच्या आरोपावरून ढोलका विधानसभा मतदारसंघातील निवडणूक रद्द ठरवली. त्यामुळे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्या मंत्रिमंडळात असलेले कायदामंत्री भूपेंदरसिंह चुडासामा यांची आमदारकी गेली आहे. काँग्रेसचे उमेदवार आश्विन राठोड यांनी दाखल केलेल्या याचिकेवर निर्णय देताना उच्च न्यायालयानं हा निकाल दिला.
5 वर्षांपूर्वी -
अर्णब यांची चौकशी करणाऱ्या पोलिसाला कोरोनाची लागण; मग ते स्टुडिओत कसे? काँग्रेस
वांद्रे येथे जमलेल्या परप्रांतीय मजुरांच्या गर्दीला धार्मिक रंग दिल्याप्रकरणी रिपब्लिकन भारत वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांच्याविरोधात मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. रजा एज्युकेशनल वेल्फेअर सोसायटीचे सचिव इरफान अबुबकर शेख यांनी दिलेल्या तक्रारीवरून पायधुनी पोलिसांनी हा गुन्हा नोंदविला होता.
5 वर्षांपूर्वी -
लॉकडाऊन ४ मध्ये काय आहेत मोदी सरकारच्या योजना? सविस्तर वृत्त
भारतातील वाढता कोरोनाबाधितांचा आकड्यामुळं सध्या देशात तिसऱ्या टप्प्यात लॉकडाऊन आहे. १७ मेपर्यंत या लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्यात आला आहे, मात्र लॉकडाऊनशिवाय इतर कोणताही पर्याय कोरोनाला रोखण्यात असमर्थ असल्याचे मोदींचे मत आहे. त्यामुळं १७ मेनंतरही लॉकडाऊनचा कालावधी वाढवला जाऊ शकतो.
5 वर्षांपूर्वी -
धारावी-वरळीत कोरोनाला रोखण्यासाठी निरोगी लोकांना पालिका देणार औषध
मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं हे औषध धारावी आणि वरळी कोळीवाड्यातील नागरिकांना देण्यात येणार आहे. सध्या धारावी आणि वरळी हे दोन्ही हॉटस्पॉट क्षेत्र आहेत. त्यामुळं येथील निरोगी नागरिकांच्या रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी हे औषध देण्यात येणार आहे. याआधी नागरिकांना हायड्रोक्लोरोक्विन हे औषध देण्यात येणार होते, मात्र त्याचे शरीरावर होणारे विपरित परिणाम लक्षात घेता, हा निर्णय रद्द करण्याता आला.
5 वर्षांपूर्वी -
लॉकडाउन'बाबत पंतप्रधान मोदी आज रात्री ८ वाजता संवाद साधणार
देशात सोमवारी सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली. लॉकडाउनच्या तिसऱ्या टप्प्याच्या अखेरीस एकाच दिवशी इतक्या मोठ्या संख्येनं रुग्ण आढळून आले आहेत. २४ तासांमध्ये ४,२१३ रुग्ण देशात आढळले. लॉकडाउन असतानाही रुग्णांच्या संख्येत वाढ होत असताना दिलासादायक बाब म्हणजे देशात अजूनही समूह संसर्ग झालेला नाही.
5 वर्षांपूर्वी -
पक्ष मराठी माणसाच्या उद्धारासाठी स्थापन झाला, पण एकाचाच उद्धार झाला - भाजप
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे किती संपत्ती आहे, याबाबत वारंवार उपस्थित केल्या जाणाऱ्या प्रश्नाला अखेर उत्तर मिळालं आहे. उद्धव ठाकरे यांनी विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी दाखल केलेल्या अर्जाच्या प्रतिज्ञापत्रात आपले उत्पन्न आणि संपत्तीचे तपशील दाखल केले आहेत. त्यानुसार ठाकरे यांच्याकडे १४३ कोटी २० लाख ७४ हजार ७६३ रुपयांचे उत्पन्न दाखवलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
लॉकडाऊनची मदत झाली, पण तो दीर्घकाळ राहिल्यास अर्थव्यवस्थेला मोठा धोका
देशात गेल्या २४ तासांमध्ये ३६०४ नव्या रूग्णांची नोंद झाली आहे. देशातील एकूण करोनाग्रस्तांची संख्या ७० हजार ७५६ झाली आहे. लॉकडाउन असतानाही दिवसागणिक रुग्णांच्या संख्येत होणारी वाढ चिंताजनक आहे. आतापर्यंत करोनानं २२९३ जणांचा बळी घेतला आहे. या सर्वांमध्ये दिलासादाक बाब म्हणजे देशात अजूनही समूह संसर्ग झालेला नाही. देशात आतापर्यंत २२ हजार ४५४ जणांनी करोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. त्यामुळे सध्या उपचार घेत असलेल्या करोनाग्रस्त रूग्णांची संख्या ४६ हजार ८ आहे.
5 वर्षांपूर्वी -
KDMC - त्या ७ गावांतील कोरोना रुग्णांसाठी स्वतंत्र रुग्णालय द्यावं, आ. राजू पाटील यांची मागणी
कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील प्राथमिक आरोग्य केंद्र निळजे अंतर्गत येणाऱ्या निळजे, घेसर, नांदिवली, गोळ्वली, हेदुटणे, काटई, कोळेगाव या ७ महसुली गावांना जिल्हा परिषद आरोग्य विभागामार्फत केवळ आरोग्य सुविधा पुरविण्यात येत आहेत. परंतु सद्यस्थितीत या ७ महसुली गावांची कर वसुली कल्याण डोंबिवली महानगरपालिका करीत आहे. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र आजदे अंतर्गत येणाऱ्या घरीवली, संदीप, मानपाडा, सोनारपाडा, दावडी या गावांची आरोग्यसेवा यापूर्वीच कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेकडे वर्ग करण्यात आली आहे.
5 वर्षांपूर्वी -
यूपीच्या मजुरांचा प्रवास, मुख्यमंत्र्यांऐवजी हेमामालिनी राज्यपालांच्या भेटीला
मुंबईत उपनगरीय रेल्वे सेवा सुरु करावी. मात्र फक्त अत्यावश्यक सेवेतील व्यक्तींसाठीच ती असावी व केवळ ओळखपत्र पाहून प्रवास करण्याची परवानगी द्यावी अशी मागणीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्याशी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ही मागणी केली.
5 वर्षांपूर्वी -
मुंबईत अत्यावश्यक सेवेतील व्यक्तींसाठी उपनगरीय रेल्वे सेवा सुरु करावी - मुख्यमंत्री
मुंबईत उपनगरीय रेल्वे सेवा सुरु करावी. मात्र फक्त अत्यावश्यक सेवेतील व्यक्तींसाठीच ती असावी व केवळ ओळखपत्र पाहून प्रवास करण्याची परवानगी द्यावी अशी मागणीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्याशी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ही मागणी केली.
5 वर्षांपूर्वी -
मजूर घरी परतत आहेत, पण आपल्यासमोर मोठं संकट असणार आहे - पंतप्रधान
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना व्हायरस संकटाच्या पार्श्वभूमीवर पाचव्यांदा देशभरातील मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला. आतापर्यंतच्या परिस्थितीचा आढावा घेऊन पंतप्रधान मोदी यांनी पुढची रणनीती आणि आव्हान मुख्यमंत्र्यांसमोर मांडले. पंतप्रधान मोदी म्हणाले, सर्व राज्य मिळून काम करत आहेत. कॅबिनेट सचिव राज्यांच्या सचिवांशी सतत संपर्कात आहेत. भारत या संकटातून वाचवण्यात मोठ्या प्रमाणात यशस्वी झाला आहे. राज्यांनी त्यांची जबाबदारी पार पाडली आहे.
5 वर्षांपूर्वी -
कोरोनाचा कहर २ वर्ष सुरूच राहणार; अमेरिकन संशोधकांचा दावा
कोरोना व्हायरस महामारीचा हाहाकार पुढील १८ ते २४ महिन्यांपर्यंत असाच सुरू राहणार असल्याची शक्यता अमेरिकन संशोधकांनी व्यक्त केली आहे. त्यांनी एका संशोधनानंतर हा अंदाज वर्तवला आहे. एवढेच नाही, तर पुढील दोन वर्षे कोरोना वेळो-वेळी आपले तोंड वर काढत राहील. त्यामुळे त्याचा सामना करण्यासाठीही तयार रहावे, असा सल्लाही त्यांनी जगभरातील सर्व सरकारांना दिला आहे.
5 वर्षांपूर्वी -
कोरोनाची फारच कमी लक्षणं असलेल्या रुग्णांना घरीच अलगीकरण करता येणार
कोरोनाची अगदीच कमी लक्षणं असणाऱ्या आणि पूर्वलक्षणं असलेल्या रुग्णांसाठी आता केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयानं नव्या मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. त्यानुसार कोरोनाची फारच कमी लक्षणं असलेल्या किंवा कोरोनाआधीची लक्षणं असलेल्या रुग्णांना घरीच अलगीकरण करता येणार आहे. घरीच अलगीकरण केलेला रुग्ण सुरुवातीची लक्षणं दिसू लागली त्यापासून १७ दिवसांनी अलगीकरण संपवू शकेल. पूर्वलक्षणं असलेल्या रुग्णांसाठी सँपलिंग केल्याच्या दिवसापासून १७ दिवस मोजले जातील.
5 वर्षांपूर्वी -
कोरोना व्हायरसची निर्मिती, वटवाघुळ आणि खवल्या मांजर...वेगळंच संशोधन पुढे
संपूर्ण जगामध्ये थैमान घालणाऱ्या करोना व्हायरसची निर्मिती वटवाघुळ आणि खवल्या मांजराच्या संमिश्रणातून झालेली असू शकते. सार्स-Cov-2 विषाणू Covid-19 च्या जगभरात होत असलेल्या फैलावाला कारणीभूत ठरला आहे. या सार्स-Cov-2 विषाणूची निर्मिती वटवाघुळ आणि खवले मांजरामध्ये आढळणाऱ्या करोना व्हायरसच्या संमिश्रणातून झालेली असू शकते, असे एका नव्या अभ्यासातून समोर आले आहे.
5 वर्षांपूर्वी -
....त्यामुळे आंतरजिल्हा एसटी वाहतुकीचा निर्णय बदलला - अनिल परब
कोरोनाचा फ़ैलाव रोखण्यासाठी सध्या तरी आंतरजिल्हा एसटी वाहतूक बंद रहाणार असल्याची माहिती परिवहनमंत्री अनिल परब यांनी दिली आहे. ही वाहतूक टप्प्याटप्याने सुरु करण्यात येणार आहे. रेड झोनमधून लोकांना आमच्या जिल्ह्यात सोडू नका असा विरोधाचा सूर उमटल्यानंतर हा निर्णय घ्यावा लागल्याचे परब म्हणाले.
5 वर्षांपूर्वी -
कोरोना लस येण्यासाठी २ वर्ष लागतील, कोरोनाशी जुळवून घेत जगायला शिकावं - WHO
कोरोनाने संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. अमेरिका, इटलीसारखे देश कोरोनापुढे हतबल झाले आहे. जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही ४१ लाखांवर गेली आहे. तर दुसरीकडे देशामध्ये कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढत असून, रुग्णांची संख्यादेखील वाढतेच आहे. कोरोनामुळे देशातील स्थिती चिंताजनक आहे. यावर मात करण्यासाठी देशात लॉकडाऊन सुरू आहे.
5 वर्षांपूर्वी -
कोरोना संकटाला एकटे मोदी आणि भाजपा तोंड देऊ शकत नाही - माजी CJI काटजू
दरम्यान देशातील कोरोनाचं संकट, रुग्णांची वाढती संख्या या पार्श्वभूमीवर काटजू यांनी ‘द वीक’साठी एक लेख लिहिला आहे. ‘देशासमोरील समस्या खूप मोठी आहे. या समस्येला एकटे मोदी आणि भाजपा तोंड देऊ शकत नाही. त्यामुळे त्यांनी एक राष्ट्रीय सरकार स्थापन करावं. या सरकारमध्ये सर्वपक्षीय नेते, वैज्ञानिक, प्रशासकीय तज्ज्ञांचा समावेश असावा,’ असा सल्ला काटजू यांनी दिला आहे.
5 वर्षांपूर्वी -
नालासोपारा एसटी आगारात स्थानिकांची गावाला जाण्यासाठी गर्दी
राज्यातील नागरिकांना त्यांच्या घरी जाण्यासाठी आजपासून मोफत एसटी सोडण्यात येणार असल्याची घोषणा परिवहन मंत्री अनिल परब यांनी केली होती. मात्र सरकारच्या या घोषणेचे तीन तेरा वाजले आहेत. नालासोपारा एसटी आगारात जमललेल्या प्रवाशांना तुम्हाला गावाला जाण्यासाठी एसटीतून मोफत प्रवास करता येणार नाही, असं सांगितलं जात आहे.
5 वर्षांपूर्वी -
महाराष्ट्रानंतर गुजरातमध्ये कोरोनाच्या संसर्गात झपाट्याने वाढ
देशात कोरोना रूग्णांची संख्या ६७ हजारांच्या पुढे गेली आहे. गेल्या २४ तासांत ४ हजाराहून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. तर १०० रुग्ण मरण पावले आहेत. ताज्या माहितीनुसार, देशभरात एकूण रुग्णांची संख्या ६७ हजार १५२ इतकी झाली आहे. यांपैकी एकूण २ हजार २०६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, तर २० हजार ९१७ रुग्ण बरे झाले आहेत. देशभरातील सक्रिय प्रकरणांची संख्या ४४ हजार २९ इतकी आहे.
5 वर्षांपूर्वी