Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
माध्यमांची मुस्कटदाबी, राज्यात अघोषित आणीबाणीसदृश्य परिस्थिती; भाजपचा आरोप
राज्यपालांचं निवासस्थान असलेल्या राजभवनावर हालाचाली वाढू लागल्या आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाजप नेत्यांसोबत राजभवनावर जाऊन राज्यपालांची भेट घेतली. माध्यमांची मुस्कटदाबी आणि अभिव्यक्तीची गळचेपी थांबवा, असं निवेदन भाजप नेत्यांनी राज्यपालांना दिलं. देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर विनोद तावडे, प्रविण दरेकर, आशिष शेलार आणि मंगलप्रभात लोढा उपस्थित होते.
5 वर्षांपूर्वी -
त्या अफवेमुळे इराणमध्ये ७२८ लोकांचा मृत्यू, अनेक जण अंध; सरकारची कबुली
जगभरात करोनाचा प्रादुर्भाव वाढत असून रुग्णांची व मृतांची संख्या वाढतच आहे. इटलीशिवाय स्पेन, अमेरिका, फ्रांस आणि इराणमध्ये देखील कोरोना आपत्तीमुळे भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे.
5 वर्षांपूर्वी -
भाजपाची सत्ता असलेल्या उत्तर प्रदेशात दोन साधूंची क्रूर हत्या; मृतदेह मंदिरात आढळले
महाराष्ट्रातील पालघर येथील साधूंच्या हत्येची घटना ताजी असतानाच उत्तर प्रदेशातील बुलंदशहर जिल्ह्यात पुन्हा दोन साधूंची हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना घडली आहे. गावातील मंदिरात दोन साधूचे मृतदेह आढळून आल्यानंतर हा प्रकार समोर आला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
पोलिसांसाठी राखीव नाही; पोलीस कर्मचारी व कुटुंबीयांमध्ये सरकार विरोधात खदखद...सविस्तर रिपोर्ट
कालच कुर्ला वाहतूक विभागाचे पोलीस हवालदार शिवाजी नारायण सोनावणे (५६) यांचे कोरोनाव्हायरसशी झुंज देत असताना दुःखद निधन झाले आहे, मुंबई पोलिसांच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरून त्याबद्दल माहिती देण्यात आली. तत्पूर्वी जे घडलं त्याबद्दल धक्कादायक माहिती त्यांच्या जवळच्या लोकांनी दिली होती.
5 वर्षांपूर्वी -
अमेरिका चीनकडून नुकसान भरपाई घेण्याच्या तयारीत...ट्रम्प यांचं वक्तव्य
कोरोनाची जीवघेणी साथ जगभरात फैलावण्यास चीनच कारणीभूत आहे असा आरोप सातत्यानं करणाऱ्या अमेरिकेनं आता चीनकडून नुकसानीची भरपाई घेण्याचे संकेत दिले आहेत. ‘आमच्या नुकसानीची चीनकडून आम्ही मजबूत वसुली करणार आहोत. मात्र, त्याचा अंतिम आकडा अद्याप ठरलेला नाही,’ असं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
देशातील एकूण कोरोनाबाधितांपैकी ४१ टक्के रुग्ण महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये
लॉकडाउनमुळे करोनाच्या प्रसारावर काही प्रमाणात परिणाम झाला असल्याचं वेगवेगळ्या अहवालातून समोर आलं आहे. मात्र, आता देशासमोर करोनामुळे होणाऱ्या मृत्यूची चिंता उभी ठाकली आहे. गेल्या २४ तासात देशात आतापर्यंत सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. देशभरात ६० जणांचा मृत्यू झाला असून, देशभरातील रुग्णांची संख्या २९ हजारांच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे.
5 वर्षांपूर्वी -
सरकारी अनास्था! मृत्यू पूर्वी त्या पोलिसाला ४-५ सरकारी रूग्णालयात फिरवण्यात आलं
कुर्ला वाहतूक विभागाचे पोलीस हवालदार शिवाजी नारायण सोनावणे (५६) यांचे कोरोनाव्हायरसशी झुंज देत असताना दुःखद निधन झाले आहे, मुंबई पोलिसांच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरून त्याबद्दल माहिती देण्यात आली आहे.
5 वर्षांपूर्वी -
शुभ वार्ता! पुणे विभागातील २३० कोरोना बाधित रुग्ण बरे
मुंबईपाठोपाठ पुणे जिल्हाही कोरोनाच्या विळख्यात सापडला आहे. पुण्यात गेल्या आठवड्यात कोरोनाबाघितांच्या संख्येत दुपटीने वाढ झाली आहे. रुग्णसंख्या ६०६ वरुन थेट १३१९ वर पोहोचली आहे. म्हणजेच पुणे जिल्ह्यात दिवसाला सरासरी १०० रुग्ण आढळून येत आहे.
5 वर्षांपूर्वी -
निर्णय चुकला, आपत्तीत चिनी रॅपिड अॅंटीबॉडी टेस्ट किट्स ऑर्डर रद्द करण्याची वेळ
रॅपिड अॅंटीबॉडी टेस्ट किट्सच्या पुरवठयाची चीनला देण्यात आलेली ऑर्डर रद्द करण्यात आली आहे. आरोग्य मंत्रालयाने सोमवारी ही माहिती दिली. करोना व्हायरसची जलदगतीने चाचणी करुन निदान करता यावे, यासाठी चीनमधून हे किट्स मागवण्यात आले होते. पण किट्सच्या खराब दर्जामुळे ऑर्डर रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. खरेदीच्यावेळी सर्व प्रक्रियांचे पालन करण्यात आले होते. त्यामुळे एक पैसाही वाया जाऊ देणार नाही असे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
5 वर्षांपूर्वी -
कोरोनामुळे कुर्ला वाहतूक विभागाचे पोलीस हवालदार शिवाजी सोनावणे यांचं निधन
कुर्ला वाहतूक विभागाचे पोलीस हवालदार शिवाजी नारायण सोनावणे (५६) यांचे कोरोनाव्हायरसशी झुंज देत असताना दुःखद निधन झाले आहे, मुंबई पोलिसांच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरून त्याबद्दल माहिती देण्यात आली आहे.
5 वर्षांपूर्वी -
लॉकडाउन वाढला तर लाखो भारतीय गरीबीच्या चक्रात अडकतील: RBI माजी गव्हर्नर
‘लॉकडाउनचा कालावधी वाढला तर लाखो भारतीय गरीबीच्या चक्रामध्ये अडकू शकतात’ अशी शक्यता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे माजी गव्हर्नर दुव्वूरी सुब्बाराव यांनी रविवारी व्यक्त केली. “करोना व्हायरसचे संकट संपल्यानंतर भारतीय अर्थव्यवस्था पुन्हा ‘व्ही’ शेपमध्ये येईल. अन्य देशांच्या अर्थव्यवस्थांच्या तुलनेत भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये चांगली सुधारणा दिसून येईल” अशी अपेक्षा सुब्बाराव यांनी व्यक्त केली.
5 वर्षांपूर्वी -
सगळं जग लॉकडाउन अन चीनमध्ये शाळा-कॉलेजेस सुरू
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध देशांमध्ये लागू करण्यात आलेले लॉकडाउन आता शिथिल करण्यात येत आहेत. मात्र, कोरोनाचा फैलाव पुन्हा डोके वर काढण्याची भीतीही व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे व्यवसाय पुन्हा सुरू करण्याआधी व्यावसायिकांकडून सावधानता पाळण्यात येत आहे.
5 वर्षांपूर्वी -
रेड, ऑरेंज, ग्रीन झोननिहाय लॉकडाऊनबाबत राज्यांना धोरण ठरवावे लागणार
देशावर कोरोनाची आपत्ती ओढावल्यापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चौथ्यांदा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला आहे. प्रत्येक कॉन्फरन्समध्ये काही राज्यांना बोलण्याची संधी मिळत आहे. जी राज्ये राहिली होती त्यांच्या मुख्यमंत्र्यांना कोरोनाविषयक त्यांच्या राज्यात काय काय उपाययोजना सुरु आहेत ते सांगण्याची संधी आज दिली. महाराष्ट्राने यापूर्वीच्या तीन कॉन्फरन्समध्ये आपल्या उपाययोजनांची माहिती दिली होती.
5 वर्षांपूर्वी -
गुजरात-मध्यप्रदेशात L स्ट्रेन कोरोना व्हायरस; परिणामी मृत्युदर अधिक: संशोधन
भारतामध्ये कोरोना विषाणूचा विळखा वाढत चालला आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत चालली आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, भारतामध्ये कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा २७ हजारांवर पोहचला आहे. तर आतापर्यंत ८७२ कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त कोरोनाचे रुग्ण आहेत.
5 वर्षांपूर्वी -
समस्त पृथ्वीवरच नैसर्गिक रोगराईचं संकट, भेंडवळचं भाकित
इतर देशांपेक्षा भारतातील कोरोनाव्हायरस घातक नाही, असं तज्ज्ञांनी म्हटलं होतं. मात्र काही राज्यांमधील कोरोनाव्हायरसची परिस्थिती पाहता या राज्यांमध्ये कोरोनाव्हायरसचा घातक स्ट्रेन सक्रिय झाल्याची शक्यता वर्तवली जाते आहे. यामध्ये गुजरात आणि मध्य प्रदेश या राज्यांचा समावेश आहे.
5 वर्षांपूर्वी -
राष्ट्रवादीपुढे भाजपनीती फिकी? उद्धव ठाकरेंचा विधानपरिषदेवरील मार्ग मोकळा होणार?
राज्यावर कोरोनाचे महासंकट उभे ठाकले आहे. या संकटाशी तोंड देताना राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर आमदारकीचा प्रश्न निर्माण झाला आहे. उद्धव ठाकरे यांचं मुख्यमंत्री जाईल की राहील अशी राजकीय चर्चा रंगली आहे. राज्यपालांनी जर याबद्दल कोणताही निर्णय घेतला नाहीतर महाविकास आघाडी सरकार नवीन पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे.
5 वर्षांपूर्वी -
गुजरातमध्ये २४ तासात कोरोनाचे २३० नवे रुग्ण; कोरोनाबाधितांचा आकडा ३,३०१ वर
आरोग्य मंत्रालयाने रविवारी सकाळी प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार गेल्या २४ तासात देशात कोरोनाचे १९९० रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाच्या रुग्णांमध्ये लक्षणीय वाढ होऊन ती २६ हजार ४९६ पर्यंत पोहोचली आहे. तर या २४ तासात देशभरात कोरोनामुळे ४९ जणांचा मृत्यू झाला आहे. तर याच काळात ७४१ रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत देशात ५ हजार ८०४ कोरोनाबाधित पूर्णपणे बरे झाले आहेत. देशातील कोरोनाबाधित मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांची संख्या ८७२ वर पोहोचली आहे.
5 वर्षांपूर्वी -
कोरोना लढ्यात पोलिसांचं बलिदान; त्या पोलीस कुटुंबीयांना ५० लाख तर वारसाला सरकारी नोकरी
कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झालेले हेड कॉन्स्टेबल चंद्रकांत पेंदूरकर आणि संदीप सुर्वे यांच्या कुटुंबीयांना ५० लाख रुपये आणि त्यांच्या वारसांना सरकारी नोकरी देण्याची घोषणा राज्य सरकारकडून करण्यात आली. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विटरवरून यासंदर्भात माहिती दिली. त्यांनी कोरोनामुळे पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याबद्दल दु:ख व्यक्त केले. मात्र, सरकार या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांच्या पाठिशी ठामपणे उभे राहील, असे आश्वासन देशमुख यांनी दिले.
5 वर्षांपूर्वी -
अमेरिका कोरोनासमोर हतबल, आतापर्यंत ५४,००० जणांचा मृत्यू
जगात कोरोनाचा कहर सुरु असताना दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची वाढती धक्कादायक आकडेवारी समोर येत आहे. जगभरात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा २ लाख ५ हजार ९६५ वर पोहचला आहे. तर जगात आतापर्यंत २९ लाख ७२ हजार ५५ जणांना कोरोनाची लागण झाली आहे.
5 वर्षांपूर्वी -
राजकारणी सुद्धा विळख्यात; गुजरातमध्ये वरिष्ठ काँग्रेस नेत्याचा कोरोनामुळे मृत्यू
देशात कोरोनाचा विळखा वाढत चालला असून दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत चालली आहे. अशात गुजरातमध्ये एका वरिष्ठ काँग्रेस नेत्याचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि अहमदाबाद महानगरपालिकेतील काँग्रेसचे नगरसेवक असलेले बदरुद्दीन शेख यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
5 वर्षांपूर्वी