Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
२४ तासांत कोरोनाचे देशात ४७ मृत्यू, १९७५ नवीन रुग्ण
देशात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. गेल्या २४ तासांत देशात १९७५ नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर ४७ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता देशात एकूण कोरोनाबाधितांची संख्या २६ हजार ९१७ इतकी झाली आहे. देशात आतापर्यंत ५ हजार ९१४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर ८२६ लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती, केंद्रीय आरोग्य मंत्रायाकडून देण्यात आली आहे.
5 वर्षांपूर्वी -
महाराष्ट्राला १ लाख कोटीची मदत द्यावी, पवारांची पंतप्रधानांकडे मागणी
कोरोनामुळे आणि लॉकडाऊनमुळे मोठ्या आर्थिक अडचणीत आलेल्या महाराष्ट्राला केंद्र सरकारने एक लाख कोटी रुपयांचे पॅकेज द्यावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. यासंदर्भात राज्याची खालावलेली आर्थिक परिस्थिती आणि केंद्राकडून हवी असलेली मदत याबाबत शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना सविस्तर पत्र लिहलं आहे. आपल्या पत्रात शरद पवारांनी सुरुवातीला देशाच्या खालावलेल्या आर्थिक स्थितीचा लेखाजोखा मांडला आहे.
5 वर्षांपूर्वी -
येस बँक गैरव्यवहारप्रकरणी धीरज आणि कपिल वाधवान सीबीआयच्या ताब्यात: गृहमंत्री
येस बँक गैरव्यवहारप्रकरणी वाधवान बंधूंना सीबीआयने ताब्यात घेतलं आहे. कपिल आणि धीरज वाधवान यांच्या अटकेची प्रक्रिया सुरू झाली आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ही माहिती दिली आहे. येस बँकेत कपिल वाधवान आणि धीरज वाधवान यांनी गैरव्यवहार केले होते. या प्रकरणी त्यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे. तसेच त्यांनी महाबळेश्वरला केलेल्या प्रकरामुळे देखील त्यांच्यावर कारवाई होणार आहे.
5 वर्षांपूर्वी -
WHO कोणत्या धुंदीत? बरे होणाऱ्या रुग्णांच्या अँन्टीबॉडीज संबंधित ट्विट डिलीट
चीनचा वुहान प्रांत कोरोना विषाणूचा केंद्रबिंदू होता. इथून कोरोना विषाणूच्या प्रसारास सुरुवात झाली, वुहानमध्ये कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यात यश आलंय, इथल्या दैनंदिन गोष्टी हळहळू पूर्वपदावर येत आहेत मात्र इथे नवी समस्या समोर आली होती. Sars-CoV-2 virus पासून पूर्णपणे बरे झाल्यानंतर काही रुग्णांमध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे न दाखवता त्यांच्या चाचण्या या ५० ते ७० दिवसांनतरही पॉझिटिव्ह येत होते. यामागचं कोडं चिनी डॉक्टरांनाही उलगडत नाहीये.
5 वर्षांपूर्वी -
संकटाच्या काळातही काही जणांकडून राजकारण, मुख्यमंत्र्यांची टीका
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज जनतेशी संवाद साधला. लॉकडाऊनच्या काळात सहकार्याबद्दल सर्वधर्मियांनांचे आभार मानले आहेत. आपले सण आपापल्या घरात राहूनच साजरे करा. आता रमजानचा महिना आहे. घरात राहूनच नमाज पडा अशी विनंती व्यक्त केली आहे. मुख्यमंत्र्यांनी मुस्लिम बांधवांना आवाहन केलं आहे. सण बाजूला ठेवून देशाला प्राधान्य दिलं जातंय हे समाधानकारक आहे.
5 वर्षांपूर्वी -
ट्रम्प पत्रकारांच्या प्रश्नांना घाबरले? ट्रम्प सुद्धा मोदींप्रमाणे थेट पत्रकार परिषद टाळण्याची शक्यता
शरीरामध्ये जंतुनाशक द्रव्ये (डिसइन्फेक्टन्ट) टोचून कोरोना विषाणू नष्ट करता येतील का किंवा त्याला मारण्यासाठी शरीराच्या आत अल्ट्रा व्हायोलेट (यूव्ही) किरणांद्वारे उपचार करता येतील का या गोष्टींचा अभ्यास करावा, तसे प्रयोग करावेत, अशी अजब सूचना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे. ट्रम्प यांच्या या वक्तव्यावर अमेरिकेतल्या वैद्यकीय तज्ज्ञांनी टीकेची झोड उठविली आहे. तसेच, राष्ट्राध्यक्षांचे वक्तव्य गांभीर्याने घेऊ नका, असे आवाहन जंतुनाशक द्रव्यांच्या उत्पादकांनी जनतेला केले आहे. आर्द्र्रता व सूर्यप्रकाशाच्या सान्निध्यात आल्यास कोरोना विषाणू इतर वेळेच्या तुलनेत अधिक वेगाने नष्ट होतात, असे अमेरिकेच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे मंत्री बिल ब्रायन यांनी म्हटले आहे.
5 वर्षांपूर्वी -
आपल्यापर्यंत कोरोना पोहचणार नाही या अतिआत्मविश्वासात फसू नका
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’मधून आज जनतेशी संवाद साधला. भारतात कोरोनाविरोधाची लढाई जनता लढत आहे. शासन आपल्या सोबत आहे. आज पूर्ण देश, प्रत्येक नागरिक या लढाईचा शिपाई आहे. या लढाईचे नेतृत्व करत आहे. पूर्ण जग या कोरोनाशी लढतोय. भविष्यात कोरोनाविरोधातील लढाईचा वेध घेतला जाईल तेव्हा भारतातील नागरिकांच्या लढाईचा गौरव होईल असे ते म्हणाले.
5 वर्षांपूर्वी -
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच राहतील, हे वैभल्यग्रस्त विरोधी पक्षाने लक्षात ठेवावे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नामनियुक्त विधान परिषद सदस्यतेबाबत राज्यपालांना जो निर्णय घ्यायचा आहे तो घेऊ द्या. पण घटना आणि कायद्याची चौकट कोणालाच मोडता येणार नाही. राजभवनाच्या भिंतीवर कितीही डोके फोडले तरी २७ मे नंतरही सरकार हेच राहील आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच राहतील. हे वैभल्यग्रस्त विरोधी पक्षाने लक्षात ठेवावे, असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपला खडसावले आहे. शिवसेनेचे मुखपत्र सामनातील रोखठोक या लेखातून त्यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.
5 वर्षांपूर्वी -
कोरोना विरोधी लढ्यात अजून एका पोलिसाचं बलिदान
राज्यात करोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत असून शनिवारी एका दिवसातील आतापर्यंतची सर्वाधिक रुग्णवाढ नोंदवली गेली. शनिवारी ८११ नागरिक बाधित आढळल्यामुळं राज्यातील करोनाग्रस्तांचा आकडा ७६२८ झाला आहे. तर, आतापर्यंत २३२ जणांचा मृत्यू झाला आहे.
5 वर्षांपूर्वी -
जगभरात कोरोनाबळींची संख्या दोन लाखांवर
कोरोना विषाणूने जगभरात थैमान घातले आहे. या विषाणूने आतापर्यंत दोन लाखांपेक्षा जास्त नागरिकांचा बळी घेतला आहे. जगभरात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांपैकी दोन तृतीयांश नागरिकांचा मृत्यू एकट्या युरोपमध्ये झाला आहे. तर एक चतुर्तांश नागरिकांचा मृत्यू अमेरिकेत झाला आहे. तर अमेरिकेत कोरोनाचे एक तृतीअंश रुग्ण आढळले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
देशातील कोरोनाबाधितांची संख्या २६ हजार ४९६ वर पोहचली
देशभरातील विविध राज्यांमध्ये करोनाच्या रुग्णांची संख्या वाढताना दिसतेय.आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, देशात करोना व्हायरसबाधित रुग्णांची संख्या २६ हजार ४९६ वर पोहचलीय. यातील ५८०४ जणांवर उपचार यशस्वी ठरलेत. तर करोनाला बळी पडणाऱ्यांची संख्या ८२४ वर पोहचलीय.
5 वर्षांपूर्वी -
शिवसेनेचा पेशंट कार्यकर्ता रात्री R R हॉस्पिटलला येतो त्यानंतर कट शिजतो - सविस्तर
आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, कल्याण-डोंबिवलीत २३ एप्रिलपर्यंतच्या आकेडवारीनुसार करोनाचे १२४ रुग्ण असून तीन मृत्यू झाले आहेत. मात्र सध्या राजकीय दृष्ट्या मनसेचे आमदार यांना मिळत असलेली प्रसिद्धी विरोधकांना पाहावत नसल्याची चर्चा रंगली आहे. रुग्णालय आणि महापालिकेत झालेल्या सामंजस्य करारानुसार (MoU) महापालिकेने ही सुविधा BAJ Symbiotic Pvt Ltd. कडून भाडेतत्वावर घेतली आहे. जोपर्यंत कोरोनावर नियंत्रण मिळवलं जात नाही तोपर्यंत हा करार वैध असणार आहे असं स्पष्ट करण्यात आलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
मुंबई पोलिस दलातील ५७ वर्षीय पोलीस कॉन्स्टेबलचा कोरोनामुळे मृत्यू
देशातील सर्वात जास्त करोना रुग्ण महाराष्ट्रात असून परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य सरकार आणि आरोग्य विभाग सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. मात्र करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात अद्यापही यश मिळालेलं नाही. राज्यात गेल्या गेल्या २४ तासात १८ मृत्यूंची नोंद झाली असून ३९४ नवे रुग्ण आढळले आहेत. यासोबत करोनाबाधित रुग्णांची संख्या ६८१७ झाली आहे. तर मृतांची संख्या ३०० च्या पुढे गेली असून ३०१ झाली असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.
5 वर्षांपूर्वी -
नाशिक: भीषण आगीमुळ लॉकडाउनदरम्यान अनेक कुटुंब बेघर
नाशिकच्या भीमवाडी झोपटपट्टीला आज सकाळी अचानक भीषण आग लागली असून या आगीत २५ ते ३० झोपड्या जळून खाक झाल्या आहेत. आग लागल्यानंतर एकामागोमाग एक सात गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने आगीने रौद्ररुप धारण केले. त्यामुळे एकच हाहाकार उडाला. आग आणि धुराचे लोळ पसरल्याने येथील रहिवाश्यांमध्ये एकच धावपळ उडाली. तब्बल दीड तासांपासून ही आग विझवण्याचे काम सुरू असून आग लवकर आटोक्यात येत नसल्याने येथील संतप्त रहिवाश्यांनी दोन अग्निशमन दलाच्या जवानांवर दगडफेक केल्याचे वृत्त आहे.
5 वर्षांपूर्वी -
ती सूचना होती, या रडत राऊतांच्या रिकाम्या डोक्यात शिरलेले दिसत नाही - अमेय खोपकर
राज ठाकरेंनी जी सूचना केली ती ताकाला जाऊन भांडे न लपवता केली आहे. सरकारी तिजोरीत खडखडाट असताना आता नैतिकतेच्या मायाजालात न अडकता वैधानिक मार्गाने काही उपाय अवलंबण्याची आवश्यकता आहे. त्यात तळी उचलून धरण्याचा प्रश्न कुठे येतो? आणि केवळ दारूच नव्हे, तर उपाहारगृहे आणि अन्य व्यवहारदेखील सुरू करण्याचीही सूचना केली, हे या रडत राऊतांच्या रिकाम्या डोक्यात शिरलेले दिसत नाही. त्यामुळेच मनसेच्या विधायक सूचनेची खिल्ली उडवण्याचा विचार आला असावा असंही अमेय खोपकर म्हणाले.
5 वर्षांपूर्वी -
एका व्हायरसने सुरू केलेल्या या रोगाचा प्रसार सरकारनेच अधिक केला - राजीव बजाज
कोरोनामुळे करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे अर्थव्यवस्थेला खीळ बसली असून त्याची गरज नसल्याचे मत बजाज ऑटोचे व्यवस्थापकीय संचालक राजीव बजाज यांनी व्यक्त केले. एका व्हायरसने सुरू केलेल्या या रोगाचा प्रसार सरकारनेच अधिक केल्याचेही ते म्हणाले.
5 वर्षांपूर्वी -
अर्थव्यवस्थेचा सुद्धा विचार करा, दीर्घकाळ लॉकडाऊन परवडणारं नाही - रघुराम राजन
रघुराम राजन यांनी देखील केंद्राला आर्थिक स्थितीवरून सतर्कतेचा इशारा दिला आहे. करोनामुळे होणारे आर्थिक नुकसान कमी करण्यासाठी आता सरकारने तातडीने पावले उचलायला हवीत, असे मत रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर डाॅ. रघुराम राजन यांनी व्यक्त केले आहे. दीर्घकाळ लाॅकडाऊन भारताला परवडणारे नाही. सरकारने आता जीवनावश्यक गरजा भागवण्याला प्राधान्य दिले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
5 वर्षांपूर्वी -
लॉकडाउनमध्ये वाईन शॉपला परवानगी नाहीच, केंद्रीय गृहमंत्रालयाचे स्पष्टीकरण
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर देशव्यापी लॉकडाउनच्या कालावधीत ग्रामीण भागात थोड्याप्रमाणात शिथिलता देण्यात आली आहे. त्यामुळे अनेक छोटी मोठी दुकाने खुली होण्याचा मार्ग मोकळा झालाय. दरम्यान लॉकडाउनच्या कालावधीत मद्य विक्रीची दुकाने खुली करावी, अशी मागणी होत होती. केंद्र सरकारने यावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. लॉकडाउनच्या काळात मद्य विक्रीच्या दुकानांना कोणतीही मुभा मिळणार नाही, असे गृहमंत्रालयाने शनिवारी स्पष्ट केले.
5 वर्षांपूर्वी -
चीनची कोंडी करण्यासाठी अमेरिकेकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरु
अमेरिकेमध्ये कोरोना विषाणूंच्या संसर्गाचा प्रकोप दिवसेंदिवस वाढत चालला असून, या भयावह आजाराने आतापर्यंत ५० हजार ३१६ जणांचा बळी घेतला आहे. यापैकी सर्वाधिक म्हणजे १५ हजार ७४० मृत्यू एकट्या न्यूयॉर्कमधील आहेत. न्यूयॉर्कखेरीज न्यू जर्सी, मिशिगन, मॅसेच्युएट्स आणि कॅलिफोर्निया या शहरांत आणि प्रांतांमध्येही कोरोनाचे रुग्ण आणि मृत्यू यांची संख्या वाढत चालली आहे. या पाच ठिकाणी मिळून आतापर्यंत सुमारे ३० हजार लोक मरण पावले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
देशात ५०६३ रुग्ण ठणठणीत बरे; पण कोरोनाग्रस्तांची संख्या २४,५०६ वर
देशात गेल्या २४ तासांत १ हजार ४२९ नव्या कोरोनाग्रस्त रुग्णांची नोंद झाली आहे तर ५७ जण मृत्युमुखी पडले आहेत. आरोग्य मंत्रालयानं शनिवारी सकाळी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार आता देशांत कोरोना विषाणू बाधितांचा आकडा हा २४ हजार ५०६ वर पोहोचला आहे. या आकडेवारीपैकी भारतात सध्या १८ हजार ६६८ रुग्ण हे कोरोनावर उपचार घेत आहेत तर ५ हजार ६३ लोक कोरोनाच्या संसर्गातून बरे झाले आहेत.
5 वर्षांपूर्वी