Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
कोरोना आपत्ती: देशहिताचा, 'गांधी विचार' देशात पोहोचवायला हवा – शिवसेना
‘काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी करोनाबाबत घेतलेली भूमिका विधायक आहे. संकटकाळातील विरोधी पक्ष कसा असावा, त्यानं काय करावं, हे त्यांनी दाखवून दिलंय. सरकारनं त्यांच्या या चिंतनाचा आदर केला तर देशाला फायदाच होईल, अशा शब्दांत शिवसेनेनं राहुल गांधी यांच्या भूमिकेचं कौतुक केलं आहे. पंतप्रधान मोदी आणि राहुल गांधी यांच्यात करोनासंदर्भात एखादी चर्चा थेट व्हावी, असंही म्हटलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
टप्प्याटप्याने अर्थव्यवस्थेला गती देणार; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी टाळेबंदीची मुदत तीन मेपर्यंत वाढवली असून रेल्वे, मेट्रो, सार्वजनिक वाहतूक, सण, उत्सव, जाहीर कार्यक्रमासारखे बहुतांश व्यवहार यापुढेही बंद राहणार आहेत. राज्यात टाळेबंदीचे काटेकोर पालन यापुढेही सुरु राहील, त्याचबरोबर नागरिकांच्या जीवनावश्यक गरजा पूर्ण व्हाव्यात, जनतेला आरोग्य सुविधा मिळाव्यात, शेतीची, मशागतीची कामे वेळेवर सुरु व्हावीत, अर्थव्यवस्थेला चालना मिळावी यासाठी कोरोनासंदर्भातील मार्गदर्शक नियमावली व आदेशांचे काटेकोर पालन करण्याच्या अटींवरच काही बाबींना मर्यादित स्वरुपात परवानगी देण्यात आली आहे. सोमवारी, २० एप्रिलपासून त्याची अंमलबजावणी होईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिली.
5 वर्षांपूर्वी -
वुहानच्या विषाणू प्रयोगशाळेतूनच कोरोना पसरला, अमेरिकी माध्यमाचे वृत्त
चीनच्या वुहान शहरातील एका प्रयोगशाळेतून करोना व्हायरस बाहेर आला अशी जगभरात चर्चा आहे. वुहानची ‘ती’ प्रयोगशाळा आता इंटेलिजन्स एजन्सींच्या रडारवर असून तिथे नेमकं काय काम चालायचं, नोव्हेंबरमध्ये नेमकं काय घडलं त्यासंदर्भात माहिती गोळा करण्याचे काम सुरु झाले आहे. फॉक्स न्यूजने हे वृत्त दिलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
भारतीय नौदलातील किमान २१ जणांना कोरोनाची लागण
करोना व्हायरसने आता भारतीय नौदलातही शिरकाव केला आहे. मुंबईतील नौदलाच्या तळावरील १५ ते २० नौसैनिकांना करोना व्हायरसची लागण झाली आहे. त्यांचे करोना चाचणीचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. मुंबईतीलच नौदलाच्या रुग्णालयात या नौसैनिकांना क्वारंटाइनमध्ये ठेवण्यात आले आहे. एनडीटीव्हीने हे वृत्त दिले आहे.
5 वर्षांपूर्वी -
गुजरात: अहमदाबादमध्ये ५ दिवसांत दर २४ मिनिटाला एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण
कोरोना व्हायरसचा प्रादुर्भावावर अद्याप नियंत्रण मिळवण्यात यश आलेले नाही. मात्र, काही प्रमाणात कोरोनावर मात करण्यात यश आहे. गेल्या २४ तासात ८२६ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर २८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आतापर्यंत १३ हजारांच्या घरात कोरोनाबाधित भारतात आहेत. तर कोरोनामुळे देशभरात ४२० जणांचा मृत्यू झाला आहे. करोनाबाधितांची सर्वाधिक संख्या ही महाराष्ट्र, दिल्ली, तामिळनाडू आणि राजस्थानात आहे.
5 वर्षांपूर्वी -
भाड्याच्या घरात राहणाऱ्यांकडून घरभाडे वसुली ३ महिने पुढे ढकला; सूचना प्रसिद्ध
कोरोनामुळे देशभरात लॉकडाऊन सुरु असून उद्योग-व्यवसाय ठप्प झाले आहेत. या काळात अनेकांचे आर्थिक उत्पन्नही थांबले आहे. अनेकांच्या नोकऱ्या जाण्याचीही भीती आहे. अशा परिस्थितीत आर्थिक चणचण असल्याने लोकांसमोर मोठं संकट उभं राहणार आहे. भाड्याच्या घरात राहणाऱ्या लोकांनाही घरभाडे भरणे कठीण होणार आहे. त्यामुळे राज्य सरकारनं या लोकांसाठी एक महत्वपूर्ण निर्णय जाहीर केला आहे. त्यासाठी राज्याच्या गृहनिर्माण मंत्रालयातून एक पत्रकच निर्गमित करण्यात आले आहे.
5 वर्षांपूर्वी -
केंद्र सरकार दिवाळखोरीत निघालंय यावर कुणीही विश्वास ठेवणार नाही - पंजाबचे मुख्यमंत्री
कोरोना साथीला आटोक्यात आणण्यासाठी लॉकडाउन हा उपाय असूच शकत नाही. लॉकडाउन उठले की विषाणूू पुन्हा त्याचे काम सुरु करेल, असे मत काँग्रेस नेते, खासदार राहुल गांधी यांनी गुरुवारी येथे व्यक्त केले. यावर मात करण्यासाठी जास्तीत जास्त लोकांच्या लवकरात लवकर चाचण्या करायला हव्यात, असेही त्यांनी सुचविले.
5 वर्षांपूर्वी -
आनंदवार्ता! देशात कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांच्या आकडेवारीत मोठी वाढ
कोरोना विषाणू संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या देशात १३५०० च्या घरात गेलेली असतानाच एक दिलासादायक माहिती पुढे आली आहे. कोरोना संसर्गातून मुक्त झालेल्या रुग्णांची संख्याही गेल्या आठवड्याच्या तुलनेत वाढली आहे. याचाच अर्थ रुग्ण कोरोनातून बरे होत असल्याचे प्रमाणही वाढले आहे.
5 वर्षांपूर्वी -
Fact Check | UPSC परीक्षा रद्द संदर्भातील वृत्त चुकीचं असल्याचं स्पष्ट
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भारतात लॉकडाऊन वाढवण्यात आलं आहे. त्यानंतर सुरक्षेच्या करणास्थाव सरकारी पातळीवर अनेक निर्णय घेण्यात येतं आहेत. त्याच अनुषंगाने राज्यात देखील शाळा-महाविद्यालयांचं गणित बिघडल्याने काही निर्णय घोषित करण्यात आले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
केंद्रीय गृहमंत्रालयाने या क्षेत्रांना लॉकडाऊनमधून वगळले, सविस्तर यादी
भारतामध्ये कोरोना विषाणूचा वेग हळूहळू मंदावत चालला आहे. देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येतील वाढ कमी झाली आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, गेल्या १२ तासांमध्ये कोरोनाचे ६२८ नवीन रुग्ण आढळले आहेत. तर १७ रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. तर गुरुवारी २२ जणांचा मृत्यू झाला होता. अशात शुक्रवारी जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार कोरोनाबाधितांचा आकडा कमी झाला आहे.
5 वर्षांपूर्वी -
लॉकडाउन: कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामींच्या मुलाचे लग्न थाटामाटत
भारतामध्ये कोरोना विषाणूचा वेग हळूहळू मंदावत चालला आहे. देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येतील वाढ कमी झाली आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, गेल्या १२ तासांमध्ये कोरोनाचे ६२८ नवीन रुग्ण आढळले आहेत. तर १७ रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. तर गुरुवारी २२ जणांचा मृत्यू झाला होता. अशात शुक्रवारी जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार कोरोनाबाधितांचा आकडा कमी झाला आहे.
5 वर्षांपूर्वी -
७ दिवस शांत राहून शी जिनपिंग यांनी व्हायरस चीनमध्ये पसरू दिला; एसोसिएटेड प्रेसचं वृत्त
जगभरात २० लाखांहून अधिक लोकांना लागण झालेला आणि १ लाख ४१ हजारांवर बळी घेणारा कोरोना व्हायरस विषाणू प्रयोगशाळेत बनवला गेला असल्याची चर्चा पुन्हा पुन्हा होतं आहे. विशेष म्हणजे ही चर्चा होते तेव्हा प्रत्येक वेळी चीनकडे संशयाची सुई जाते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी पुन्हा एकदा या वादाला तोंड फोडले आणि चीनला पुन्हा एकदा त्यावर खुलासा करावा लागला.
5 वर्षांपूर्वी -
लॉकडाऊनमुळे भारतात अडकलेल्या ३७०० विदेशी नागरिकांना मायदेशी पाठवलं
कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊनमध्ये ३ मेपर्यंत वाढ करण्यात आली आहे. अशामध्ये मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून २० विमान उड्डानाद्वारे सुमारे ३७०० परदेशी नागरिकांना त्यांच्या देशात पाठविण्यात आले आहे. बुधवारी विमानतळावरील एका अधिकाऱ्याने ही माहिती दिली. कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी घोषीत करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या काळात आंतरराष्ट्रीय आणि देशव्यापी विमानसेवा बंद करण्यात आल्या आहेत.
5 वर्षांपूर्वी -
कोरोना आपत्ती: RBI नुकसान रोखण्याच्या मोहिमेवर काम करत आहे - शक्तिकांत दास
कोरोना विषाणूच्या संक्रमणामुळे आर्थिक परिस्थितीवर परिणाम झालेला असला तरी चालू आर्थिक वर्षात भारताचा विकासदर १.९ टक्के राहिल. भारत कोणत्याही स्थितीत नकारात्मक विकासदराच्या दिशेने जाणार नाही, असे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी म्हटले आहे. सध्याच्या स्थितीत अर्थव्यवस्थेला पुन्हा चालना देण्यासाठी रिझर्व्ह बँकेकडून विविध निर्णय घेतले जात आहेत. त्याची माहिती देण्यासाठी त्यांनी शुक्रवारी सकाळी संवाद साधला. यामध्ये त्यांनी रिझर्व्ह बँकेने घेतलेल्या नव्या निर्णयांची माहिती दिली.
5 वर्षांपूर्वी -
वर्ष २०२०'मध्ये भारताच्या GDP वृद्धीची गती शून्य राहण्याचा अंदाज - Barclays अहवाल
ब्रिटिश ब्रोकरेज कंपनी Barclays यांच्या अहवालाप्रमाणे लॉकडाऊन वाढवल्यामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेला १७.५८ लाख कोटींचे नुकसान सहन करावे लागणार आहे. कॅलेंडर वर्ष २०२० मध्ये जीडीपीची वाढ देखील खुंटणार आहे. यावर्षी आर्थिक वृद्धीची गती शून्य राहील अशी शंका या कंपनीने व्यक्त केली आहे. आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये जिडीपी वृद्धीची गती ०.८ टक्के राहील असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. कोरोना व्हायरसचे संक्रमण रोखण्यासाठी लॉकडाऊनचा दुसरा टप्पा ३ मेपर्यंत वाढवण्यात आला आहे.
5 वर्षांपूर्वी -
चिंताजनक! ६० वर्षात पहिल्यांदाच आशियाचा विकासदर शून्यावर जाईल - IMF
चीनमध्ये उत्पन्न झालेल्या करोना विषाणूने संपूर्ण जगाला कवेत घेतले आहे. या विषाणूला रोखण्यासाठी लाॅकडाऊन हाच एकमेव मार्ग आहे. मात्र त्यामुळे अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. आशियाला करोनाचा मोठा दणका बसणार आहे. ६० वर्षात पहिल्यांदाच आशियाचा विकासदर शून्यावर जाईल, अशी भीती आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (IMF) गुरुवारी व्यक्त केली आहे.
5 वर्षांपूर्वी -
६ महिन्याच्या बाळासमोर कोरोना पराभूत...डिस्चार्ज; वाढवला सामान्यांचा आत्मविश्वास
महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. मुंबई आणि उपनगरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असताना कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्याही दिलासादायक आहे. कल्याण आणि डोंबिवलीमध्ये आतापर्यंत ६० रुग्णांपैकी २० जणांनी कोरोनावर मात केली आहे. यात ६ महिन्याच्या बाळाचा समावेश आहे. मागील चार ते पाच दिवसात कल्याण-डोंबिवलीतील जवळपास ९ जणांना डिस्चार्ज मिळाला आहे.
5 वर्षांपूर्वी -
लॉकडाऊन हा केवळ तात्पुरता पर्याय आहे, ते या आजारावर उत्तर नाही - राहुल गांधी
देशभरात कोरोना व्हायरसमुळे तणावाची परिस्थिती असताना मोदी सरकारकडून लागू करण्यात आलेलं लॉकडाऊन आणि येत्या काळात दिसणारे त्याचे परिणाम या मुद्द्यांवर काँग्रेस्या राहुल गांधी यांनी भाष्य केलं. लॉकडाऊनने कोरोनाचा पराभव होणार नाही, हा मुद्दा त्यांनी प्रकर्षाने मांडला.
5 वर्षांपूर्वी -
आपत्तीत भाजप समर्थक मुख्यमंत्र्यांच्या विरोधात तर महाराष्ट्र सैनिक उतरले बचावात
महाराष्ट्रासह देशावर कोरोनाचं संकट घोंघावत असताना राजकीय आरोप-प्रत्यारोपही सुरू आहेत. मुंबईतील वांद्रे परिसरात परराज्यातील मजुरांची गर्दी जमल्यानंतर राज्यातील भाजप नेत्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली होती. तसंच भाजपसमर्थकांनी ट्विटरवरून उद्धव ठाकरे राजीनामा द्या, अशी मागणी करत #UddhavResign हा ट्रेण्ड चालवला होता. या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण ढवळून निघालं असताना राज ठाकरे यांच्या मनसेच्या महिला पदाधिकारी रुपाली पाटील ठोंबरे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
5 वर्षांपूर्वी -
लोकांचा विश्वास वाढावा; कोरोनातून ठणठणीत बरे होणाऱ्यांचा आकडा प्रसिद्ध करा
महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या अजूनही कमी होण्याचं नाव घेत नाही. या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यातील जनतेला एक पत्र लिहिलं आहे. ‘कोरोनाशी निव्वळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील सर्व राज्यातील प्रशासनं दोन हात करत आहेत, बहुसंख्य नागरिक देखील प्रशासनाच्या निर्देशांचं काटेकोर पालन करत आहेत आणि त्यामुळे ह्या आजाराचा जलदगतीने होणारा प्रसार आपण बऱ्यापैकी रोखू शकलो आहोत आणि आजारातून बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या देखील आश्वासक आहे. ह्याबद्दल ह्या लढाईत उतरलेल्या प्रत्येकाचं जेवढं कौतुक करावं ते कमीच आहे,’ असं राज ठाकरे म्हणाले. तसंच यावेळी राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी केलेल्या संभाषणाविषयीही भाष्य केलं आहे.
5 वर्षांपूर्वी