Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
डॉक्टर झाले आता चीनमधील कोरोनासंबंधित वास्तव मांडणारे तीन पत्रकार गायब
अमेरिकेत कोरोनाचा विळखा वाढत चालला आहे. कोरोनाने अमेरिकेत सर्वात जास्त थैमान घातले आहे. कोरोना विषाणूमुळे मृतांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. अमेरिकेत कोरोना विषाणूने गेल्या २४ तासांमध्ये २६०० नागरिकांचा बळी घेतला आहे. जो अमेरिकेत एका दिवसात मृत्यू झालेल्यांच्या आकड्यापेक्षा सर्वात जास्त आहे. तत्पूर्वी अमेरिकेतून वारंवार चीनवर आरोप करताना वूहानचा दाखला देण्यात आला होता, तसेच चीनने जगापासून मोठ्याप्रमाणावर माहिती लपविल्याचा देखील आरोप केला आहे.
5 वर्षांपूर्वी -
VIDEO - महाराष्ट्रातील स्थिती गंभीर बनत असल्याने केंद्रीय आरोग्य मंत्र्यांकडून चिंता
कोरोनाचा फैलाव रोखण्याचा प्रयत्न सुरु असताना परिस्थिती अद्यापही नियंत्रणात आली नसल्याचं चित्र आहे. महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांची संख्या २९१६ वर पोहचली आहे. बुधवारी महाराष्ट्रात दिवसभरात करोनाची लागण होऊन ९ जणांचा मृत्यू झाला. तर २३२ रुग्ण करोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. यापैकी १९०० पेक्षा जास्त रुग्ण हे मुंबईतले आहेत तर उर्वरित इतर महाराष्ट्रातले आहेत. महाराष्ट्रात १८७ जणांचा मृत्यू झाला आहे.
5 वर्षांपूर्वी -
मुंबईतील दोन पोलिस अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण; इस्पितळात दाखल
कोरोनाचा फैलाव रोखण्याचा प्रयत्न सुरु असताना परिस्थिती अद्यापही नियंत्रणात आली नसल्याचं चित्र आहे. महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांची संख्या २९१६ वर पोहचली आहे. बुधवारी महाराष्ट्रात दिवसभरात करोनाची लागण होऊन ९ जणांचा मृत्यू झाला. तर २३२ रुग्ण करोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. यापैकी १९०० पेक्षा जास्त रुग्ण हे मुंबईतले आहेत तर उर्वरित इतर महाराष्ट्रातले आहेत. महाराष्ट्रात १८७ जणांचा मृत्यू झाला आहे.
5 वर्षांपूर्वी -
मुंबई मरोळ पाइप लाइनमध्ये झोपडपट्टीतील दूधवाल्याला कोरोनाची लागण
दुसरीकडे मुंबईच्या मरोळ पाइप लाइनमधील एका झोपडपट्टीतील दूधवाल्याला कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहितीसमोर आली आहे. त्यामुळे आरोग्य आणि पालिका प्रशासनाची झोप उडाली असून मरोळ पाइपलाइन परिसरात मोठ्या प्रमाणावर तपासण्या करण्यात येत आहेत.
5 वर्षांपूर्वी -
पिझ्झा होम डिलिव्हरी व्यक्तीला कोरोनाची लागण; ७२ ठिकाणी होम डिलिव्हरी केली
भारतामध्ये कोरोना विषाणूचा विळखा वाढत चालला आहे. कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णात दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. अशात आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी संध्याकाळपासून ३९ कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील मृतांचा आकडा ४१४ वर पोहचला आहे. तर देशात आणखी १ हजार ११८ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा १२,३८० वर पोहचला आहे.
5 वर्षांपूर्वी -
देशात कोरोनाबाधितांचा आकडा १२,३८० वर, ४१४ रुग्णांचा मृत्यू
भारतामध्ये कोरोना विषाणूचा विळखा वाढत चालला आहे. कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णात दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. अशात आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी संध्याकाळपासून ३९ कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील मृतांचा आकडा ४१४ वर पोहचला आहे. तर देशात आणखी १ हजार ११८ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा १२,३८० वर पोहचला आहे.
5 वर्षांपूर्वी -
ठाणे: राष्ट्रवादीच्या माजी खासदाराला कोरोनाची लागण
देशात करोनामुळे होत असलेल्या मृत्यूंच्या तुलनेत महाराष्ट्रातील करोना मृत्यूंचे प्रमाण अधिक आहे. ही बाब ध्यानात घेऊन राज्य सरकारने हे प्रमाण कमी करण्यासाठी पावले उचलली आहेत. त्यानुसार मुंबई आणि परिसरासाठी एक आणि उर्वरित महाराष्ट्रासाठी एक अशा तज्ज्ञांच्या दोन समिती स्थापन करण्यात आल्या आहेत. करोनामुळे होणाऱ्या मृत्यूंचे विश्लेषण करून मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी उपाययोजना सुचविण्यत आहे, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.
5 वर्षांपूर्वी -
कोरोना व्हायरस वटवाघुळांमधून माणसांमध्ये संक्रमित होत नाही: ICMR
कोरोना विषाणूला थोपवण्यासाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकार संगनमताने योग्य ते निर्णय घेत आहेत, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना दिली. सध्याच्या परिस्थितीत देशातील कोरोनाग्रस्तांच्या आकडेवारीवरुन जिल्हानिहाय तीन गटात वर्गवारी करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. देशातील १७० जिल्ह्यांचा हॉटस्पॉटमध्ये तर जवळपास २७० जिल्हे हे नॉन हॉटस्पॉट ठिकाणे म्हणून घोषित करण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे, अशी माहिती लव अग्रवाल यांनी दिली.
5 वर्षांपूर्वी -
यूपीत वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर हल्ले सुरूच; मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ संतापले
कोरोनाविरुद्धच्या लढाईत डॉक्टर्स आणि पोलीस आघाडीवर जाऊन लढत आहेत. मात्र या मंडळींना अनेकदा हल्ल्यांना सामोरं जावं लागत आहे. अशा अनेक घटना वारंवार पुढे येत आहेत. त्यामुळे डॉक्टर्स आणि पोलिसांच्या मनोधर्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. अशीच एक उत्तर प्रदेशातली घटना समोर येत आहे. मुरादाबाद जिल्ह्यातल्या नागफनी भागात नवाबपूरा मस्जिद हाजी नेब या भागात संशयीत रुग्णांना घेण्यासाठी गेलेल्या पथकावर हल्ला झाला. या हल्ल्यात एक डॉक्टर आणि दोन पोलीस जखमी झालेत.
5 वर्षांपूर्वी -
जगभरात कोरोनामुळे १,२७,१४७ बळी, तर रुग्णांची संख्या २० लाखांवर
चीनच्या वुहान शहरापासून वेगानं संसर्ग होत गेलेला कोरोना व्हायरस आता थांबण्याचं नाव घेत नाहीय. एप्रिल महिन्यात कोरोनाचा प्रादूर्भाव दुप्पट वेगानं वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे. २०० हून अधिक देशांमध्ये याचा मोठा फटका बसला आहे. सर्वात जास्त धोका युरोपीय देशांना असून आतापर्यंत या व्हायरसमुळे युरोपमध्ये बाधित झालेल्या ७० टक्के लोकांचा मृत्यू झाला आहे. मागच्या २४ तासात अमेरिकेत तब्बल २२२८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
5 वर्षांपूर्वी -
११७ रुग्ण वाढल्याने राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या २८०० पार
महाराष्ट्रात कोरोना विषाणूचा विळखा आणखी वाढत चालला आहे. राज्यात बुधवारी कोरोनाचे आणखी ११७ रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा २८०१ वर पोहचला आहे, अशी माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिला आहे. आज आढळलेल्या ११७ कोरोनाबाधितांपैकी ६६ रुग्ण मुंबईचे आहेत तर ४४ रुग्ण हे पुण्याचे आहेत.
5 वर्षांपूर्वी -
१७ सरकारी तर १५ खाजगी VDRL लॅब्स; देशात सर्वाधिक कोरोना चाचण्या महाराष्ट्रात
देशात पुकारण्यात आलेल्या लॉकडाऊनचे २१ दिवस उलटून गेल्यानंतरही करोनाचा संसर्ग थांबेनासा झाला आहे. महाराष्ट्रातील परिस्थिती अधिकच बिकट असून येथील रुग्णांची संख्या आतापर्यंत २८०१ वर पोहोचली आहे. राज्यात आज ११७ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यात एकट्या मुंबईतील ६६ रुग्णांचा समावेश आहे. तर, पुण्यातही आकडा वाढत असून आज आणखी ४४ रुग्ण कोविड पॉझिटिव्ह आढळले आहेत. याशिवाय, ठाणे ३, मीरा-भाईंदरमधील २, वसई-विरार व पिंपरी-चिंचवडमधील प्रत्येकी एकाला करोनाची लागण झाली आहे.
5 वर्षांपूर्वी -
बैठक झालेल्या आमदाराची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह; गुजरातचे मुख्यमंत्री होम क्वारंटाईन
मंगळवारी काँग्रेसचे आमदार इम्रान खेडावाला यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यामुळे गुजरातमध्ये एकच खळबळ उडाली. तसेच, मुख्यमंत्री विजय रुपाणी आणि उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांच्यासोबत इम्रान खेडावाला यांची बैठक झाली होती. त्यामुळे विजय रुपाणी यांची कोरोनाची चाचणी करण्यात आली.
5 वर्षांपूर्वी -
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष संतापले; कोरोना आपत्तीत डब्ल्यूएचओचा निधी रोखला
अमेरिकेकडून जागतिक आरोग्य संघटनेला (डब्ल्यूएचओ) देण्यात येणारा निधी रोखण्याचे निर्देश राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रशासनाला दिले आहेत. डब्ल्यूएचओने कोविड-१९ बाबत चुकीचे व्यवस्थापन केले आणि त्याची माहिती लपवल्याचा आरोप ट्रम्प यांनी केला आहे. मंगळवारी व्हाईट हाऊस येथे आयोजित नियमित पत्रकार परिषदेत त्यांनी डब्ल्यूएचओचा निधी रोखण्याचे निर्देश दिल्याचे सांगितले. त्याचबरोबर कोविड-१९ बाबतच्या डब्ल्यूएचओच्या भूमिकेचे समीक्षण केले जाणार असल्याचेही ते म्हणाले.
5 वर्षांपूर्वी -
अफवांवर विश्वास ठेवू नका, विशेष रेल्वे सोडणार नाही: रेल्वे मंत्रालय
कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ३ मेपर्यंत लॉकडाऊन वाढवल्याची घोषणा केली. देशव्यापी लॉकडाऊनमुळे रेल्वे आणि विमान सेवाही ३ एप्रिलपर्यंत स्थगित करण्यात आल्या आहेत. अशामध्ये विशेष ट्रेन चालवण्यात येणार असल्याच्या अफवेमुळे मुंबईत स्थलांतरीत मजुरांनी वांद्रे स्थानकाबाहेर मोठी गेर्दी केली होती. या घटनेनंतर रेल्वे मंत्रालयाने ट्विट करत अफवांवर विश्वास ठेवू नका, कोणतीही विशेष ट्रेन सोडण्यात येणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
5 वर्षांपूर्वी -
वांद्रे गर्दी प्रकरण: उत्तर भारतीय महापंचायतीचा अध्यक्ष विनय दुबेला अटक
वांद्रे गर्दी प्रकरणी पोलिसांनी उत्तर भारतीय महापंचायतीचा अध्यक्ष विनय दुबेला अटक केली आहे. मजुरांना आपापल्या गावी जाण्यासाठी १८ एप्रिलपर्यंत रेल्वेची सोय करुन दिली नाही तर देशव्यापी आंदोलनाचा इशारा विनय दुबेने दिला होता. मुंबई पोलिसांनी आंदोलनाचा इशारा आणि अफवा पसरवल्याप्रकरणी विनय दुबे याला मंगळवारी रात्री उशिरा अटक केली.
5 वर्षांपूर्वी -
...आणि राज आहे म्हणत मुख्यमंत्र्यांनी आपत्तीत सर्व एकत्र असल्याचा संदेश दिला
राज्यातलं लॉकडाऊन ३० एप्रिलपर्यंत वाढविण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी दोन दिवसांपूर्वीच केली होती. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी काल पुन्हा जनतेशी संवाद साधला होता. त्यावेळी ते म्हणाले, कोरोनाविरुद्धचा लढा गांभीर्याने घेतला पाहिजे. लॉकडाऊन वाढवला त्याबद्दल पंतप्रधानांचे आभार. मी त्याबद्दल पंतप्रधानांकडे मागणी केली होती. महाराष्ट्रात चाचण्या सर्वात जास्त होत आहे. त्यामुळे आपले आकडेही वाढत आहे. आम्ही अतिशय खंबीरपणे याचा सामना करतोय आणि पुढेही करत राहू असंही त्यांनी सांगितलं.
5 वर्षांपूर्वी -
देशावर संकट असताना राजकारण करू नका; पवारांचा सबुरीचा सल्ला
कोरोनावर मात करताना सर्वांनी एकत्र राहुया, कोरोनावर मात करणं हे महत्त्वाचं असून राजकीय पक्षांनी राजकारण करु नये अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी व्यक्त केली आहे. फेसबुक लाईव्हद्वारे जनतेशी संवाद साधताना ते बोलत होते. मंगळवारी वांद्र्यात घडलेला प्रसंग दुर्देवी असल्याचंही पवार म्हणाले. कोणीतरी अफवा पसरवल्याने गर्दी झाली. वांद्र्यासारखा प्रकार पुन्हा घडू नये, संभ्रम वाढेल अशा सूचना करु नका असंही ते म्हणाले.
5 वर्षांपूर्वी -
१४ तारखेनंतर ट्रेन सोडतील असं पिल्लू कुणी तरी सोडलं असावं - मुख्यमंत्री
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी २१ दिवसांचं लॉकडाऊन आज संपलं. आता 3 मेपर्यंत हा लॉकडाऊन वाढविण्यात आला आहे अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली होती. तर राज्यातलं लॉकडाऊन ३० एप्रिलपर्यंत वाढविण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी दोन दिवसांपूर्वीच केली होती. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी आज पुन्हा जनतेशी संवाद साधला. ते म्हणाले, कोरोनाविरुद्धचा लढा गांभीर्याने घेतला पाहिजे. लॉकडाऊन वाढवला त्याबद्दल पंतप्रधानांचे आभार. मी त्याबद्दल पंतप्रधानांकडे मागणी केली होती. महाराष्ट्रात चाचण्या सर्वात जास्त होत आहे. त्यामुळे आपले आकडेही वाढत आहे. आम्ही अतिशय खंबीरपणे याचा सामना करतोय आणि पुढेही करत राहू असंही त्यांनी सांगितलं.
5 वर्षांपूर्वी -
स्टार्टअपमध्ये कर्मचारी आणि वेतन कपातीची तयारी सुरु - गुंतवणूकदार रंगास्वामी
टप्प्याटप्प्याने लॉकडाऊन मागे घेणं ही भारतीय कंपन्यांसाठी डोकेदुखी ठरू शकते, असं वरिष्ठ अधिकाऱ्यांचं मत आहे. ‘ईटी’ला काही कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, लॉकडाऊन हळूहळू मागे घेतल्यामुळे कंपन्यांसमोर नवी आव्हाने उभी राहणार आहेत. अर्थव्यवस्थेची चाकं असलेल्या १६ प्रकारच्या कंपन्यांना निर्मितीची परवानगी द्यावी, अशी शिफारस उद्योग विभागाने केली आहे. एका शिफ्टमध्ये काम सुरू होण्याचीही शक्यता निर्माण झाली आहे. या शिफ्टमध्ये कर्मचाऱ्यांची सुरक्षा आणि आरोग्य यावर भर देण्यात येईल.
5 वर्षांपूर्वी