Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
मुळ घरी परतण्यासाठी वांद्रे स्थानकाबाहेर हजारोंच्या संख्येने कामगारांची गर्दी
देशभरात लॉकडाऊन सुरु असताना आणि कोरोना व्हायरसची दहशत असताना मुंबईतील वांद्रे स्थानकाबाहेर मात्र दुपारनंतर हजारोंच्या संख्येने कामगारांनी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं. मुळचे उत्तर प्रदेश, बिहार येथील हे कामगार त्यांच्या मुळ ठिकाणी पोहोचण्यासाठी येथे जमले होते.
5 वर्षांपूर्वी -
पुण्यात काही तासांतच ४ करोनाग्रस्तांचा मृत्यू; पण इतर कारणही समोर
राज्यात सर्वात आधी करोनानं शिरकाव केलेल्या पुण्यात आता मृत्यूचं सत्र सुरू झालं आहे. आधी रुग्णांची संख्या वाढत असताना काही रुग्ण बरे होऊन घरी परतल्यानं पुणेकरांना दिलासा मिळाला होता. मात्र, मागील आठवडाभरापासून करोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यू होण्याचं प्रमाण वाढलं आहे. मंगळवारी ससूनमध्ये उपचार घेत असलेल्या चौघांचा रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर आणखी चार जणांना संसर्ग झाल्याचं समोर आलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
रिपब्लिकन पक्षाच्या खासदारांकडून चीनवरील अवलंबत्व कमी करण्यासाठी विधेयक
कोरोना विषाणूबाबत जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ) आणि आंतरराष्ट्रीय समुदायाला चुकीची माहिती देण्याचे परिणाम भोगावे लागतील, अशा शब्दांत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनला इशारा दिला आहे. या विषाणूचा फैलाव वुहान शहरातून सुरु झाला होता आणि यामुळे आतापर्यंत १,१९,६६६ जणांचा बळी गेला आहे. तर २० लाख लोकांना याची लागण झाली आहे.
5 वर्षांपूर्वी -
मुंबई पोलिसांकडून वरळी आणि धारावीत ड्रोनद्वारे सूचना देण्यास सुरुवात
१२१ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण नव्याने आढळल्याने महाराष्ट्राची रुग्णसंख्या २४५५ इतकी झाली आहे. महाराष्ट्र सरकारच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.काल उशिरापर्यंत महाराष्ट्रातील रुग्णसंख्या २३३४ होती. त्यामध्ये १२१ रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे ही संख्या २४५५ झाली आहे. महाराष्ट्राच्या चिंते भर घालणारीच ही बातमी ठरली आहे. महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईत कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत.
5 वर्षांपूर्वी -
धक्कादायक! चीनमध्ये ६ आठवड्यांनंतर मोठ्या प्रमाणात नवे रुग्ण सापडले
चीनमध्ये सहा आठवड्यांनंतर पुन्हा एकदा कोरोनाचे नवे रुग्ण मोठ्या संख्येने आढळले आहेत. त्यामध्ये विदेशातून चीनमध्ये परतलेल्यांची संख्या सर्वाधिक आहे. या नागरिकांकडून होणाऱ्या संसर्गामुळे आता चीनमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. चीनमध्ये रविवारी कोरोनाचे १०८ नवे रुग्ण आढळून आले. याआधी सहा आठवड्यांपूर्वी ५ मार्च रोजी चीनमध्ये एकाच दिवसात कोरोनाचे १४३ नवे रुग्ण आढळले होते. या देशातील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या आता ८२ हजारांवर पोहोचली असून ३,३४१ जण मरण पावले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
चिंता वाढली! राज्यात कोरोना बाधित रुग्णांचा आकडा अडीच हजारांवर
राज्यातील करोना रुग्णांची संख्या दिवसागणिक कमी होताना दिसत नाहीत. राज्यात रोज सरासरी शंभर करोनाचे रुग्ण सापडत असल्याने आरोग्य यंत्रणेसमोरचं आवाहन वाढलं आहे. गेल्या १२ तासांत राज्यात १२१ करोना बाधित आढळले असून राज्यातील रुग्णांची संख्या २४५५वर गेली आहे.
5 वर्षांपूर्वी -
अर्थव्यवस्थेला तब्बल ७ ते ८ लाख कोटी रुपयांचा फटका बसण्याचा अंदाज
देशात केंद्र सरकारकडून २५ मार्चपासून राबवण्यात येत असलेले २१ दिवसांचे लॉकडाऊन आज, मंगळवारी संपत आहे आणि तो यापुढे देखील ३ मे पर्यंत वाढविण्यात आला आहे. या लॉकडाऊनमुळे देशाची अर्थव्यवस्था पार खिळखिळी झाली असून विश्लेषकांच्या मते, अर्थव्यवस्थेला ७ ते ८ लाख कोटी रुपयांचा फटका बसणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
5 वर्षांपूर्वी -
गरजूंना मदत नक्की करा पण या गोष्टी टाळा...राज ठाकरेंचं आवाहन
‘प्रत्येक माणूस हा मुळात स्वाभिमानी असतो. शक्यतो त्याला मदत घेणं नको असतं. पण आज प्रसंगच बाका असल्यानं नाईलाजानं अनेकांना मदत स्वीकारावी लागत आहे. मात्र, अशावेळी मदतकर्त्यांनी गॉगल लावून स्वत:सह मदत स्वीकारणाऱ्यांचे फोटो काढणं योग्य आहे का? प्रत्येकानं याचा विचार करावा,’ असं आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसे कार्यकर्त्यांसह सर्वांनाच केलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
कणकवलीत रोज १५० लोकांसाठी मोफत कमळ थाळीला सुरुवात
राज्यात दर दिवशी जवळपास ७००-८०० च्या घरात वाढत चाललेली कोरोना रुग्णांची संख्या पाहता उद्या संपणारा केंद्र सरकारचा लॉकडाऊन वाढविण्याची वेळ राज्य सरकारवर आलेली आहे. राज्यात मुंबई-पुणे सर्वाधिक बाधित असले तरीही उपराजधानी नागपूरमध्येही रुग्णांचा आकडा ४९ वर गेलेला आहे. यामुळे राज्यात उद्यापासून पुढील दोन आठवडे म्हणजेच ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन वाढविण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. दरम्यान या लॉकडाउन’मध्ये गरीब नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर जेवणाचे हाल झाले आहेत. त्यानिमित्त महाविकास आघाडी सरकारने शिवभोजन योजना मोठ्याप्रमाणावर कार्यान्वित केली आहे.
5 वर्षांपूर्वी -
मुंबई धारावीत कोरोनाबाधितांचा आकडा ५५ वर, ७ रुग्णांचा मृत्यू
मुंबईतील दाट लोकवस्ती असलेल्या धारावीमध्ये कोरोनाचा विळखा आणखी वाढत चालला आहे. धारावीत दिवसेंदिवस रुग्णांची संख्या आणि मृतांचा आकडा वाढत चालला आहे. मंगळवारी धारावीत कोरोनाचे आणखी ६ रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे धारावीतील कोरोनाबाधितांचा आकडा ५५ वर पोहचला आहे. तर मंगळवारी आणखी दोघांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे धारावीतील मृतांचा आकडा ७ झाला आहे, मुंबई महानगरपालिकेने ही माहिती दिली आहे.
5 वर्षांपूर्वी -
दिल्लीत एका दिवसात कोरोनाचे तब्बल ३५६ नवे रुग्ण
देशात कोरोनाचा विळखा आणखी वाढत चालला आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत देशात कोरोनामुळे ३३९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांचा आकडा १० हजार ३६३ वर पोहचला आहे.
5 वर्षांपूर्वी -
देशातील लॉकडाऊनमध्ये ३ मे पर्यंत वाढ, पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या २१ दिवसांच्या देशव्यापी लॉकडाऊनचा आजचा अखेरचा दिवस आहे. या दिवशी देशवासियांना संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी देशव्यापी लॉकडाऊन ३ मेपर्यंत कायम राहणार असल्याचं जाहीर केलंय. करोना हॉटस्पॉट वाढले नाही तर नियम शिथील करण्यात येतील, असा दिलासाही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांना दिलाय. २० एप्रिलपर्यंत प्रत्येक प्रदेशाचं मूल्यांकन केलं जाणार आहे. जे प्रदेश करोनावर नियंत्रण मिळवण्यात यशस्वी होतील तिथले नियम शिथील केले जातील, असंही त्यांनी म्हटलंय.
5 वर्षांपूर्वी -
आनंदाची बातमी! ५ राज्यातील २५ जिल्ह्यात कोरोनावर नियंत्रण
देशातील करोना रुग्णांची संख्या ९१५२. गेल्या २४ तासांत ७९६ नवे रुग्ण आढळले. तर ३५ जणांचा मृत्यू झालाय. मृतांची देशातील एकूण संख्या ३०८ इतकी झाली आहे, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने माहिती दिलीय. करोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे. आतापर्यंत ८५७ जण बरे झाले असून एका दिवसात १४१ जण बरे झाल्याची एक सकारात्मक बाब समोर आल्याचं आरोग्य मंत्रालयाने सांगितलं. देशातील १५ राज्यांमधील २५ जिल्ह्यांमध्ये गेल्या १४ दिवसांत करोनाचा एकही नवीन रुग्ण आढळलेला नाही. या जिल्ह्यांमध्ये सुरुवातीला करोनाचे अनेक रुग्ण आढळून आले होते, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली.
5 वर्षांपूर्वी -
पण राज्यात महाविकास आघाडीची शिवभोजन योजना सुरु आहे....मग
राज्यात दर दिवशी जवळपास ७००-८०० च्या घरात वाढत चाललेली कोरोना रुग्णांची संख्या पाहता उद्या संपणारा केंद्र सरकारचा लॉकडाऊन वाढविण्याची वेळ राज्य सरकारवर आलेली आहे. राज्यात मुंबई-पुणे सर्वाधिक बाधित असले तरीही उपराजधानी नागपूरमध्येही रुग्णांचा आकडा ४९ वर गेलेला आहे. यामुळे राज्यात उद्यापासून पुढील दोन आठवडे म्हणजेच ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन वाढविण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. दरम्यान या लॉकडाउन’मध्ये गरीब नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर जेवणाचे हाल झाले आहेत. त्यानिमित्त महाविकास आघाडी सरकारने शिवभोजन योजना मोठ्याप्रमाणावर कार्यान्वित केली आहे.
5 वर्षांपूर्वी -
स्वयंशिस्त, प्रशासनाला मिळालेल्या नागरिकांच्या सहकार्याने केरळात रुग्णसंख्या नियंत्रणात
भारतात सोमवारपर्यंत कोरोना विषाणूची बाधा होऊन ३०८ जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या २४ तासांत भारतात ३५ जण मृत्युमुखी पडल्याची नोंद झाली आहे. तर ६२० नव्या रुग्णांची नोंद झाली आहे, त्यामुळे आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार भारतात रुग्णांची संख्या ही ९ हजार १५२ वर पोहोचली आहे.
5 वर्षांपूर्वी -
कोरोना व्हायरसवर हायड्रॉक्सीक्लोरोक्विन औषध प्रभावी नाही; अमेरिकेतील संशोधकांचा दावा
सर्व जगभर कोरोनाने थैमान घातलं आहे. २०० पेक्षा जास्त देश कोरोनाच्या संकटाने त्रस्त आहेत. जगाची महासत्ता असलेला अमेरिका यात सर्वाधिक भरडला जातोय. अमेरिकेला प्रचंड मोठा फटका बसला असून कोरोना आटोक्यात येण्याची चिन्हे अजुनतरी दिसत नाहीत. कोरोनाविरुद्ध औषध शोधण्यात अमेरिकेने पूर्ण जोर लावला आहे.
5 वर्षांपूर्वी -
पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा देशवासियांना संबोधित करणार
कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव आणि अनेक राज्यांनी लॉकडाउन कायम ठेवण्याची मागणी या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी काय निर्णय घेणार हे मंगळवारी सकाळी १० वाजता कळू शकणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील करोनाची स्थिती आटोक्यात आणण्यासाठी जाहीर केलेला २१ दिवसांचा लॉकडाउन १४ तारखेला संपत आहे. त्याच दिवशी सकाळी १० वाजता पंतप्रधान मोदी देशाला संबोधित करणार आहेत. त्यामुळे ते पुढील निर्णय काय घेतात याकडे देशाचे लक्ष लागले आहे.
5 वर्षांपूर्वी -
टाटा स्टील पगार व कामगार कपात करणार नाही; पण इंडियाबुल्स'कडून पगार कपात
कोरोना व्हायरसमुळे सुरू झालेल्या लॉकडाऊनमुळे देशाची अर्थव्यवस्था थांबली आहे. कोरोनाचा शॉक भारतीय अर्थव्यवस्थेला बसेल आणि विकास दर २.८ टक्क्यांवर येण्याची शक्यता असल्याचा अंदाज जागतिक बँकेने व्यक्त केला आहे. याचा फटका अनेक उद्योगांना बसणार आहे. काही उद्योगांमध्ये कर्मचारी आणि पगार कपात करण्याचे संकेत मिळत आहेत.
5 वर्षांपूर्वी -
आव्हाड कोरोना पॉझिटिव्ह PSI च्या संपर्कात, स्वत:ला करून घेतलं होम क्वारन्टाइन
राष्ट्रवादीचे नेते आणि कॅबिनेट मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी स्वत:ला होम क्वारन्टाइन करून घेतलं आहे. जितेंद्र आव्हाड आणि इतर काही लोक हे कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट आलेल्या पोलीस अधिकाऱ्याच्या संपर्कात आले असल्याची माहिती आहे. त्यानंतर आव्हाड यांनी खबरदारीचा उपाय म्हणून स्वत:ला क्वारन्टाइन करून घेतलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
महाराष्ट्रात १२ तासांत ८२ नवे बाधित; रुग्णसंख्या दोन हजारांवर
महाराष्ट्रात आत्तापर्यंत आणखी ८२ रुग्ण करोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातल्या करोनाग्रस्तांची संख्या ही २ हजार ६४ इतकी झाली आहे. महाराष्ट्र सरकारच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे. ८२ पैकी ५९ रुग्ण मुंबईतले आहेत. महाराष्ट्रात करोनाचे सर्वाधिक रुग्ण मुंबईत तर देशात सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रात लॉकडाउनही ३० एप्रिलपर्यंत वाढवण्यात आला आहे. खबरदारीचे सगळे उपाय योजण्यात आले आहेत. महाराष्ट्रात रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोनही आखण्यात आले आले आहेत.
5 वर्षांपूर्वी