Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
कोरोना आपत्ती | अखेर पहिली ऑक्सिजन एक्सप्रेस महाराष्ट्रात दाखल
विशाखापट्टणम येथून ऑक्सिजनचे ७ टँकर भरून निघालेली रेल्वेची पहिली ऑक्सिजन एक्प्रेस अखेर काल (२३ एप्रिल) रात्री ८ वाजता महाराष्ट्रातील नागपूर स्थानकात दाखल झाली आहे. १९ एप्रिलला कळंबोली येथून ही ऑक्सिजन एक्प्रेस विशाखापट्टणम येथे रवाना झाली होती.
4 वर्षांपूर्वी -
हुशार केंद्रीय मंत्री स्मृती इराणी | प्रचाराच्या गर्दीत मास्क हातात अन व्हिडिओकॉल बैठकीत मास्क तोंडाला
जगभरात कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेमुळे रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. जगभरातील प्रत्येक सरकार या महामारीला रोखण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना राबवत आहे. दरम्यान, जगातील कित्येक देशांनी लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेतला आहे. यासोबतच मास्क आणि सामाजिक अंतर पाळण्याचे आवाहन करत आहे.
4 वर्षांपूर्वी -
Zydus Cadila विराफीन औषधाला आपत्कालीन वापरासाठी मंजुरी | ७ दिवसांत पेशंट निगेटिव्ह होण्याचा दावा
अहमदाबादमधील फार्मा कंपनी झायडस कॅडिलाच्या पेगिलेटेड इंटरफेरॉन अल्फा 2b, वीराफिन (इंजेक्शन) औषधाला कोरोना रुग्णांना देण्यासाठी ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DGCI) कडून शुक्रवारी मंजुरी मिळाली आहे. या औषधामुळे सात दिवसात आरटी-पीसीआर चाचणी निगेटिव्ह येणार असल्याचा दावा कंपनीने केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
BREAKING | हरयाणा'मध्ये ऑक्सिजन टँकर चोरीला, पोलीस ठाण्यात तक्रार | गचाळ व्यवस्थापन
कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची हाय लेव्हल मीटिंग सुरू झाली आहे. ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे त्रस्त असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान मोदींना हात जोडले आहे. केजरीवाल म्हणाले की, ऑक्सिजनचा पुरवठा तर वाढवला आहे, आता हा पुरवठा दिल्लीपर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था करा. राज्यात आमचे ट्रक रोखले जातात, त्यांना तुम्ही एक फोन करा. केजरीवाल म्हणाले – मुख्यमंत्री असुनही काहीच करु शकत नाहीये. काही वाईट घडले तर आम्ही स्वतःला कधीच माफ करु शकणार नाही.
4 वर्षांपूर्वी -
कोरोना आपत्ती | दिलासादायक... एका दिवसात 1.98 लाख लोक कोरोनामुक्त झाले
भारतात कोरोना महामारीचा उद्रेक दिवसेंदिवस वाढतच आहे. गेल्या चोवीस तासांत देशात 3 लाख 32 हजार 320 नवीन रुग्ण आढळून आले आहे. विशेष म्हणजे सलग दुसऱ्या दिवशी कोरोनाबाधितांचा आकडा 3 लाखांवर पोहचला आहे. दरम्यान, यामध्ये एका 2 हजार 256 लोकांचा मृत्यू झाला आहे. यापूर्वी बुधवारी देशात 2 हजार 101 लोकांचा मृत्यू झाला असून त्यादिवशीचा कोरोना संक्रमितांचा आकडा 3 लाख 15 हजारांवर होता. भारत देश कोरोना महामारीचे नवीन सक्रीय रुग्ण आढळण्यात जगात पहिल्यानंबर आला असून त्यानंतर अमेरिका आणि ब्राझीलचा नंबर येत आहे.
4 वर्षांपूर्वी -
जनतेत अतिराष्ट्रवाद आणि येथील राजकीय नेत्यांच्या लोकानुनयातून आजचे गंभीर संकट निर्माण झाले - तज्ज्ञांची परखड मतं
भारतात करोनाचा कहर वाढत असून गेल्या २४ तासांत तीन लाखांहून अधिक करोना रुग्णांची नोंद झाली आहे. देशात पहिल्यांदाच तीन लाखांहून अधिक रुग्ण आढळले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे भारतात नोंद झालेली रुग्णसंख्या ही जगातील सर्वाधिक दैनंदिन रुग्णसंख्या आहे.
4 वर्षांपूर्वी -
ज्या अदर पूनावालांनी लस बनवून नागरिकांमध्ये एक आशा निर्माण केली | त्यांना भाजप आमदार डाकू म्हणाला
देशात 18 आणि यापेक्षा जास्त वयाच्या लोकांच्या व्हॅक्सीनेशनसाठी रजिस्ट्रेशन 24 एप्रिलपासून सुरू होणार आहे. व्हॅक्सीनचा डोस घेण्यासाठी Co-Win पोर्टलच्या माध्यमातून रजिस्ट्रेशन केले जाऊ शकते. एक मेपासून या एज ग्रुपच्या लोकांचे लसीकरण करण्यास सुरुवात होईल. Co-Win चीफ आर शर्मा यांनी गुरुवारी ही माहिती दिली.
4 वर्षांपूर्वी -
कोरोनाची तीव्रता | तरुण मुलंही वृध्द आईवडिलांच्या कुशीत प्राण सोडत आहेत... केंद्र सरकार विरोधात रोष वाढतोय
देशभरामध्ये करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे ऑक्सिजनची टंचाई निर्माण झाली आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा करणारी यंत्रणा कोलमडली आहे. असं असतानाच दिल्ली उच्च न्यायालयानेही बुधवारी केंद्र सरकारला चांगलंच फेलावर घेत, “भीक मागा, उधार घ्या, चोरी करा पण ऑक्सिजन द्या”, असं उद्वेगाने सुनावलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
हिंदू-मुस्लिम नव्हे माणुसकी | 22 लाखांची SUV विकून मुंबईकरांसाठी 'ऑक्सिजन मॅन' झालाय शहनवाज शेख
देशात बुधवारी ३.१४ लाख नवे कोरोना रुग्ण आढळले. १५ महिन्यांच्या कोरोना काळात एखाद्या देशात एक दिवसात आढळलेल्या रुग्णांच्या तुलनेत ही संख्या सर्वात मोठी आहे. एवढेच नव्हे, बुधवारी देशात २,१०१ रुग्णांचा मृत्यू झाला. ही देशातील आतापर्यंतची सर्वात मोठी संख्या असली तरी अमेरिकेच्या तुलनेत ती निम्मी आहे. देशात नव्या रुग्णांची संख्या १ वरून ३ लाख होण्यासाठी फक्त १५ दिवस लागले. या काळात महाराष्ट्रासह इतर राज्यांतही संसर्ग वेगाने वाढला. ६ एप्रिलला देशात १ लाख रुग्ण आढळले तेव्हा त्यात महाराष्ट्रातील ४८% रुग्ण होते.
4 वर्षांपूर्वी -
परिस्थितीत वेगाने बदल | महाराष्ट्रच नव्हे आता देशातील 80 टक्के कोरोना रुग्ण इतर राज्यात
देशात बुधवारी ३.१४ लाख नवे कोरोना रुग्ण आढळले. १५ महिन्यांच्या कोरोना काळात एखाद्या देशात एक दिवसात आढळलेल्या रुग्णांच्या तुलनेत ही संख्या सर्वात मोठी आहे. एवढेच नव्हे, बुधवारी देशात २,१०१ रुग्णांचा मृत्यू झाला. ही देशातील आतापर्यंतची सर्वात मोठी संख्या असली तरी अमेरिकेच्या तुलनेत ती निम्मी आहे. देशात नव्या रुग्णांची संख्या १ वरून ३ लाख होण्यासाठी फक्त १५ दिवस लागले. या काळात महाराष्ट्रासह इतर राज्यांतही संसर्ग वेगाने वाढला. ६ एप्रिलला देशात १ लाख रुग्ण आढळले तेव्हा त्यात महाराष्ट्रातील ४८% रुग्ण होते.
4 वर्षांपूर्वी -
लोकांचे जीव केंद्र सरकारसाठी महत्त्वाचे नाहीत का? | ऑक्सिजनचा पुरवठा ही केंद्र सरकारची जबाबदारी | न्यायालयाने झापले
कोरोना रुग्णांच्या झपाट्याने वाढणाऱ्या संख्येमुळे महाराष्ट्र आणि दिल्लीसह अनेक राज्यांमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर दिल्ली हायकोर्टाने बुधवारी झालेल्या सुनावणीदरम्यान मोदी सरकारला चांगलेच फटकारले. तुम्ही कोणासमोरही गयावया करा, उधार घ्या किंवा चोरी करा पण दिल्लीत कुठूनही ऑक्सिजन घेऊन या. आम्ही रुग्णांना अशाप्रकारे मरताना बघू शकत नाही. ऑक्सिजनचा पुरवठा करणे ही केंद्र सरकारची जबाबदारी आहे, असे उच्च न्यायालयाने म्हटले.
4 वर्षांपूर्वी -
मध्य प्रदेश | BSF जवानाची आपल्या पत्नीला बेड मिळावा म्हणून दिवसभर वणवण | जवानाला अश्रू अनावर
देशात कोरोनाचा कहर प्रचंड वाढत असून चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. देशात गेल्या २४ तासांत २ लाख ९५ हजार ४१ नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत तर २०२३ जणांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत १ लाख ६७ हजार ४५७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. देशात आतापर्यंत १ कोटी ३२ लाख ७६ हजार ३९ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. देशात सध्याच्या घडीला २१ लाख ५७ हजार ५३८ एक्टीव्ह रुग्ण आहेत.
4 वर्षांपूर्वी -
मुख्यमंत्री लॉकडाऊनबाबत निर्णय घेणार हे जाहीर होताच अचानक मोदींनी जनतेला संबोधित केलं? - सविस्तर वृत्त
काेरोनावर मात करताना अर्थव्यवस्था ढासळू नये म्हणून केंद्र ३० एप्रिलनंतर मोठे निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. प. बंगाल विधानसभा व उप्र पंचायत निवडणुका २९ रोजी संपत आहेत. यानंतर तत्काळ निर्णय लागू होऊ शकतात. गेल्या लॉकडाऊनचा अनुभव पाहता यासाठी नवीन मॉडेल तयार केले जात आहे. ४० कोटी लोकांना लसीचे कवच देऊन वाहतुकीचे निर्णय मंत्रालये घेतील. २९ एप्रिलपासूनच याची अंमलबजावणी होऊ शकते.
4 वर्षांपूर्वी -
कोरोना आपत्तीत यंत्रणांना सहकार्य करा | देशात आजपर्यंत 1,31,08,582 रुग्ण उपचारानंतर बरे झाले
देशात कोरोनाचा कहर पाहायला मिळत असून रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 1,53,21,089 पोहोचली आहे. तर कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 1,80,530 वर पोहोचला आहे. देशातील कोरोनाग्रस्तांपैकी 20,31,977 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 1,31,08,582 रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. याच दरम्यान केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी लसीकरण आणि कोरोना रुग्णांबाबत माहिती दिली आहे.
4 वर्षांपूर्वी -
Corona Pandemic | पुढचे ३ आठवडे निर्णायक, केंद्र सरकारकडून सर्व राज्यांना सावधतेचा इशारा
सलग तिसऱ्या दिवशी सोमवारी 2.50 लाखांपेक्षा जास्त नवीन रुग्ण आढळले आहेत. खरेतर चांगली गोष्ट म्हणजे रविवारच्या तुलनेत यामध्ये घट झाली आहे. गेल्या 24 तासांच्या आत देशात 2 लाख 56 हजार 828 लोक संक्रमित झाले आहेत. रविवारी 1.75 लाखपेक्षा जास्त लोक पॉजिटिव्ह आढळले होते. पहिल्यांदाच विक्रमी 1 लाख 54 हजार 234 लोकही बरे झाले. यापूर्वी एका दिवसात सर्वात जास्त 18 एप्रिलला 1.43 लाख लोक रिकव्हर झाले होते.
4 वर्षांपूर्वी -
मला लोकांना घाबरावायचे नाही, मात्र इंग्लंडमधला दुसरा लॉकडाऊन 92 दिवस लांबला होता - डॉ. संजय ओक
राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे, मात्र तरीही कोरोना रुग्णांवर नियंत्रण मिळवता आलेले नाही. गेल्या 24 तासांदरम्यान येथे 58,924 नवीन रुग्ण समोर आले आहेत. या दरम्यान 351 लोकांचा मृत्यू झाला आहे. ज्यानंतर आता मानले जात आहे की, दिल्लीच्या धर्तीवर मुंबईसह संपूर्ण राज्यात टोटल लॉकडाऊन लागू केले जाऊ शकते.
4 वर्षांपूर्वी -
रेमडेसिवीर वाद हायकोर्टात | महाराष्ट्रातील एकूण रुग्ण आणि पुरवठ्यातील तफावतीवरून कोर्टाने केंद्राला झापलं
राज्यात एका बाजूला कोरोना रुग्णांसाठी वैद्यकीय सुविधांचा तुटवडा जाणवत असताना दुसऱ्या बाजूला राजकारण सुरू आहे. रेमडेसिविर इंजेक्शनवरून सत्ताधारी महाविकास आघाडी आणि भारतीय जनता पक्षात सुरू असलेला वाद दोन दिवसांपूर्वी थेट पोलीस ठाण्याक गेला. दमणस्थित ब्रुक फार्मा कंपनीच्या मालकाला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतल्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस प्रविण दरेकर यांनी रात्री पोलीस ठाण्यात धाव घेतली. भाजपचे नेते बराच वेळ पोलीस ठाण्यात ठाण मांडून होते. भाजपच्या या भूमिकेवर राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेसनं देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
राजस्थान सरकार सतर्क | महाराष्ट्राप्रमाणे कडक निर्बंध लागू | १९ एप्रिल ते ३ मे पर्यंत निर्बंध लागू
भारतात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत असून रविवारी रुग्णांचा आकडा दीडकोटीच्या पुढे गेला आहे. आतापर्यंत 1 कोटी 50 लाख 57 हजार 767 संक्रमित झाले आहेत. यामध्ये दिलासादायक बाब म्हणजे 1 कोटी 29 लाख 48 हजार 848 लोक बरे झाले आहेत. संक्रमणामुळे मृयू झालेल्या लोकांचा आकडा 1 लाख 78 हजार 793 झाला आहे. 19 लाख 23 हजार 877 रुग्णांवर संध्या उपचार सुरु आहेत. ऍक्टिव्ह रुग्णांचा हा आकडा अमेरिकेनंतर सर्वात जास्त आहे.
4 वर्षांपूर्वी -
देशात पहिल्यांदाच एका दिवसात 2.74 लाखापेक्षा जास्त लोक संक्रमित | 1620 जणांचा मृत्यू
भारतात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत असून रविवारी रुग्णांचा आकडा दीडकोटीच्या पुढे गेला आहे. आतापर्यंत 1 कोटी 50 लाख 57 हजार 767 संक्रमित झाले आहेत. यामध्ये दिलासादायक बाब म्हणजे 1 कोटी 29 लाख 48 हजार 848 लोक बरे झाले आहेत. संक्रमणामुळे मृयू झालेल्या लोकांचा आकडा 1 लाख 78 हजार 793 झाला आहे. 19 लाख 23 हजार 877 रुग्णांवर संध्या उपचार सुरु आहेत. ऍक्टिव्ह रुग्णांचा हा आकडा अमेरिकेनंतर सर्वात जास्त आहे. मागील चोवीस तासात देशामध्ये 2 लाख 74 हजार 944 लोक कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यासोबतच 1 लाख 43 हजार 701 लोक बरे झाले असून 1620 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
4 वर्षांपूर्वी -
VIDEO | भाजपच्या राजकारणाचा कळस | फुगे, हारतुरे अन फोटो शूटसाठी २ तास ऑक्सिजन टँकर रोखला
देशात करोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. अनेक राज्यांमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी ही बैठका घेत राज्यांना ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. एवढचं नाही तर रुग्णांसाठी ऑक्सिजन आयातही केला जाणार आहे. अशातच आता देशात पहिली ‘ऑक्सिजन एक्स्प्रेस’ (oxygen express ) धावणार आहे.
4 वर्षांपूर्वी