Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
लॉकडाऊनंतर पंतप्रधान कार्यालयातून देशाचा कारभार चालवायचा हट्ट सोडा
भारतासमोर आधीच आर्थिक संकट गोंगावत असताना कोरोना व्हायरसने धडक दिली. कोरोनाच्या व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊन करण्यात आले. त्यामुळे आधीच आर्थिक संकटाच्या दिशेने जाणाऱ्या भारताला मोठा फटका बसला आहे. अशातच आता रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर आणि ज्येष्ठ अर्थतज्ञ रघुराम राजन यांनी देशाला एका गंभीर धोक्याची जाणीव करून दिली आहे.
5 वर्षांपूर्वी -
९ वाजता ९ प्रश्न; आपत्तीत खऱ्या गरजा समजणाऱ्या जागृत तरुणांचा प्रचार; राज्य सरकार सतर्क
जगभरातील अनेक देशांमध्ये हाहाकार माजवणाऱ्या करोना विषाणूचा भारतातील विविध राज्यांमध्ये झापाट्याने प्रसार होत आहे. याचा परिणाम म्हणून पीपीई अर्थात पर्सनल प्रोटेक्टीव्ह इक्विपमेंट आणि टेस्टिंग किटची मागणी वाढत आहे. हे पाहता पुढील दोन महिन्यांत भारताला २.७ कोटी एन-९५ मास्क, १.५ कोटी पीपीई, १६ लाख टेस्टिंग किट आणि ५० हजार व्हेंटिलेटरची गरज भासणार आहे.
5 वर्षांपूर्वी -
लढाई संपवायची आहे; लपून बसू नका, स्वत:हून पुढं या - उपमुख्यमंत्री अजित पवार
कोरोनाविरुद्धच्या लढ्यातील महत्त्वाचा, निर्णायक टप्पा सुरु झाला असून ज्या नागरिकांमध्ये कोरोनाची लक्षणे आहेत किंवा कोरोनाच्या दृष्टीने संशयित आहे, त्यांनी आतातरी लपून न राहता आरोग्य यंत्रणांशी तात्काळ संपर्क साधावा. कोरोनाविरुद्धचा लढा लवकर संपला पाहिजे, त्यासाठी संशयितांनी पुढे यावे. अन्य नागरिकांनी घरातच थांबून सहकार्य करावे, संशयित व्यक्तींची माहिती शासकीय यंत्रणेला त्वरित कळवावी, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.
5 वर्षांपूर्वी -
पिंपरी-चिंचवडमध्ये ४२ डॉक्टर्स आणि ५० कर्मचारी क्वारंटाइन
पिंपरी-चिंचवड शहरात एक धक्कादायक प्रकार समोर आला असून यामुळे ४३ डॉक्टर आणि ५० वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना क्वारंटाईन करण्यात आलं आहे. ३१ मार्चला अपघातग्रस्त व्यक्तीच्या पोटाची शस्त्रक्रिया खासगी वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरने केली होती. त्यानंतर त्या रुग्णाला ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळली. तातडीने त्याचा चाचणी अहवाल पाठवण्यात आला तेव्हा तो करोना पॉझिटिव्ह असल्याची धक्कादायक बाब समोर आली.
5 वर्षांपूर्वी -
त्यांचे राष्ट्राध्यक्ष सुरक्षा वस्त्र घालून डॉक्टर-रुग्णांच्या भेटीला इस्पितळात; भारतात फेसबुक-ट्विटवर
सध्या जगभरात करोनामुळे मृत्यूंचे तांडव सुरु आहे. अमेरिका, इटली, स्पेन, ब्रिटेन आणि फ्रांस सारखे प्रगत देश देखी होरपळून निघाले आहेत. जगातील सर्वोत्तम आरोग्ययंत्रणा असताना देखील हे देश हतबल झाल्याचं पाहायला मिळत आहे. अमेरिकेत तर लाखाच्या घरात मृत्यू होण्याचा अंदाज सरकारी पातळीवरच व्यक्त केला आहे.
5 वर्षांपूर्वी -
कोरोना आपत्ती: अमेरिकेत २४ तासांत १२०० जणांचा मृत्यू
जगभरात कोरोना विषाणूचा विळखा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. अमेरिकेत कोरोनाचा सर्वात जास्त प्रादुर्भाव असून याठिकाणी मृतांच्या आकड्यात वाढ होत चालली आहे. अमेरिकेत गेल्या २४ तासांमध्ये कोरोनाने १२०० नागरिकांचा बळी घेतला आहे.
5 वर्षांपूर्वी -
कोरोना आपत्ती: दिल्लीच्या मरकजवरुन देशात धार्मिक राजकारणाचा प्रयत्न - शरद पवार
शरद पवार यांनी फेसबुकच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारने दिलेल्या सूचनांचं योग्य पालन करा असं आवाहन केलं. शरद पवारांनी यावेळी बोलताना सांगितलं की, “सध्याच्या घडीला देशात ४०६७ करोनाच्या केसेस आहेत. तसंच ११८ मृत्यू झाले आहेत. ३२८ रुग्ण बरे होऊन घऱी गेले आहेत. हे प्रमाण दुर्लक्ष करण्यासारखं नाही. करोनाचा रुग्ण बरा होऊ शकतो ही स्थिती निर्माण होऊ शकते त्यामुळे सूचनांचं पालन केलं पाहिजे. ही आजची गरज आहे”.
5 वर्षांपूर्वी -
देशात कोरोनाग्रस्तांचा आकडा ४००० पार, तर राज्यात देखील परिस्थिती गंभीर
भारतात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांचा संख्या वाढत चालली आहे. सोमवारी आरोग्य मंत्रालयाकडून दिलेल्या माहितीनुसार देशात कोरोनाच्या रुग्णांचा संख्या ४ हजारहून अधिक झाली आहे. भारतात कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत १०९ लोकांचा मृत्यू झाला असून ४०६७ लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर २३२ रुग्ण या आजारातून बरे झाले आहेत. मागील २४ तासांत ३२ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ६९३ कोरोनाचे नवे रुग्ण आढळले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
मोदींच्या आवाहनाला देशवासियांचा प्रतिसाद; काही ठिकाणी फटाक्यांचे आवाज व समूहाने...
अनेक ठिकाणी लोकांना यासाठी घरातील मेणबत्त्या काढून ठेवल्या होत्या. जिथे थोड्याफार प्रमाणात दुकाने सुरू होते तेथे दिवाळीच्या पणत्या विकायला आल्या होत्या. रात्री ९ वाजेपासून अनेक घरांमध्ये दिव्यांची आरास दिसत होती. नियमित लाइट्स बंद ठेवून जनतेने मोदींच्या आवाहनाला उत्तम प्रतिसाद दिला.
5 वर्षांपूर्वी -
मुंबईत एकाच दिवशी १०३ पॉझिटिव्ह रुग्ण वाढले, राज्याचा आकडा ७४८ वर
कोरोना विषाणूचा विळखा दिवसेंदिवस वाढताना दिसतोय. मुंबईसाठी तर धोक्याची घंटा वाजत आहे. आजच्या एकाच दिवशी मुंबईत तब्बल १०३ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. महाराष्ट्राचा आकडा ७४८ वर पोहोचला आहे. देशातील सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रात आढळून आले आहेत. तर राज्यात सर्वाधिक रुग्ण हे एकट्या मुंबईत आहेत. महाराष्ट्रात मुंबईसह एकूण ११३ रुग्ण आढळून आले आहेत. आतापर्यंत ५६ रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
5 वर्षांपूर्वी -
कोरोना आपत्ती: देश तिसऱ्या टप्प्याजवळ; चिंता वाढली; सर्व विरोधकांशी फोनवर संपर्क
पंतप्रधान मोदींनी कोरोना विषाणूविरोधात सुरु असलेल्या लढाईदरम्यान माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, प्रतिभा पाटील आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंह, एचडी देवेगौडा यांच्याशी फोनवर चर्चा केली. त्याचबरोबर त्यांनी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशीही चर्चा केली. पंतप्रधान कार्यालयातील खात्रीलालक सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मोदींनी समाजवादी पक्षाचे नेते मुलायमसिंह यादव, अखिलेश यादव, तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी, बीजेडीचे नवीन पटनाईक, अकाली दलाचे प्रकाशसिंह बादल यांच्याशिवाय दक्षिण भारताील मोठे नेते के चंद्रशेखर राव, एमके स्टॅलिन यांच्याशी पंतप्रधान मोदींनी संवाद साधला.
5 वर्षांपूर्वी -
कोविड उत्सव २०२०, साऊंड चेक-लाईट चेक, R U रेडी मित्रो?...मोदींची खिल्ली उडवली
देशात करोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून तो आता ३३७४ वर पोहोचला आहे. तर यामुळे ७७ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. एकूण ३३७४ रुग्णांपैकी ३०३० रुग्ण हे पॉझिटिव्ह आहेत. तर २६७ रुग्णांचे चाचण्या निगेटिव्ह आल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच ७७ जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, भारतात गेल्या १२ तासांमध्ये ३०२ नव्या रुग्णांची वाढ झाली आहे, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. एका बाजूला अशी गंभीर परिस्थिती उद्भवल्याचं पाहायला मिळत आहे.
5 वर्षांपूर्वी -
कोरोना आपत्ती: अमेरिकेत झटपट इस्पितळांच्या उभारणीसाठी लष्कर सज्ज
जगभरातील करोना बळींची संख्या आता साठ हजारांवर गेली असून अमेरिकेत एकाच दिवशी पंधराशे बळी गेले आहेत. जगात ११,३३,८०१ करोनाबाधित रुग्ण असून, बळींची संख्या ६०,३९८ झाली आहे. अमेरिका ७४०६, स्पेन ११,७४४, इटली १४,६८१, जर्मनी १२७५, फ्रान्स ६५०७, चीन ३३२६, इराण ३४५२ या प्रमाणे मृतांची संख्या आहे. चीनमधील करोना साथीचा सर्वोच्च कालखंड संपला असला, तरी तेथे पुन्हा दुसऱ्या लाटेचा धोका वर्तवला जात आहे.
5 वर्षांपूर्वी -
कोरोना आपत्ती: जगभरात ११ लाखांहून अधिक रुग्ण; ६२ हजार बळी
जगातील सुमारे २०० देशांमधील विविध रुग्णालयांमध्ये ८ लाख, ५० हजारांहून अधिक लोकांवर सध्या उपचार सुरू असून त्यातील ४० हजार जणांची प्रकृती चिंताजनक आहे. मात्र दिलासादायक बाब म्हणजे, ८ लाख, ११ हजार रुग्णांमध्ये कोरोनीची लक्षणे अतिशय सौम्य आहेत, असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे.
5 वर्षांपूर्वी -
सावधान! देशात करोनाग्रस्तांचा आकडा पोहोचला ३,३७४वर, ७७ जणांचा मृत्यू
भारतात कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी आवश्यक ती सर्व खबरदारी घेतली जात आहे, मात्र दिवसेंदिवस देशात कोरोना विषाणू बाधितांचा आकडा वाढतच चालला आहे. गेल्या १२ तासांच देशात या विषाणू बाधितांचे ३०२ रुग्ण आढळले आहेत, अशी माहिती आरोग्यविभागानं दिली आहे.
5 वर्षांपूर्वी -
मोदींच्या उद्याच्या दिवा-बत्ती घोषणेमुळे वीज कर्मचाऱ्यांच्या डोक्याला ताप
देशात गेल्या २४ तासांत ६०१ करोनाचे रुग्ण वाढले असून १२ जणांचा मृत्यू झाला आहे. करोनामुळे आतापर्यंत देशात एकूण ६८ जण दगावलेत. तर करोनाच्या रुग्णांची देशातील एकूण संख्या ही २९०२ इतकी झाली आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. देशात १८३ जणांना उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे. देशभर सध्या चिंतेचं आणि भीतीचं वातावरण असल्याचं पाहायला मिळत आहे.
5 वर्षांपूर्वी -
५० कोटी भारतीयांना COVID 19 चाचणी उपचार मोफत
करोनाचं संकट गहिरं होत असताना एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. मोदी सरकारने करोनाची चाचणी आणि उपचार हे आयुष्मान भारत योजने अंतर्गत आणणण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे देशभरातल्या ५० कोटी लोकांची चाचणी किंवा उपचार हे मोफत होऊ शकणार आहेत. नॅशनल हेल्थ अथॉरिटी अर्थात NHA ने यासंदर्भातली माहिती दिली आहे.
5 वर्षांपूर्वी -
सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण २१ ते ४० वयोगटात, आरोग्य मंत्रालय
करोनाचं संकट गहिरं होत असताना एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. मोदी सरकारने करोनाची चाचणी आणि उपचार हे आयुष्मान भारत योजने अंतर्गत आणणण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे देशभरातल्या ५० कोटी लोकांची चाचणी किंवा उपचार हे मोफत होऊ शकणार आहेत. नॅशनल हेल्थ अथॉरिटी अर्थात NHA ने यासंदर्भातली माहिती दिली आहे.
5 वर्षांपूर्वी -
आधीच उद्धव ठाकरेंसमोर कोरोनाचं संकट; त्यात हा राजकीय पेच...
जगभरातील देशांना चिंतेत टाकणाऱ्या कोरोना व्हायरसने महाराष्ट्रालाही धडक दिली आहे. राज्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. अशा स्थितीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे लोकांसमोर वारंवार संयमाचं आवाहन करत आहेत आणि कठोर निर्णयही घेत आहेत. मात्र एकीकडे हे संकट सुरू असतानाच उद्धव ठाकरेंसमोर थेट मुख्यमंत्रिपद जाण्याचाच धोका निर्माण झाला आहे.
5 वर्षांपूर्वी -
धारावीत कोरोनाचा चौथा रुग्ण, मुंबईसाठी धोक्याची घंटा
कोरोना व्हायरसनं महाराष्ट्रात थैमान घातलं आहे. त्यातही सर्वात जास्त धोका मुंबईला निर्माण झाला आहे. असं असतानाही आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून प्रसिद्ध असलेल्या धारावीमध्ये आतापर्यंत तीन कोरोना पॉझिटिव्ह केसेस सापडल्या आहेत. त्यापैकी पहिल्या रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. त्याचं थेट कनेक्शन दिल्लीत निजामुद्दीन इथे पार पडलेल्या तबलिगी जमासोबत असल्याचं समोर येत आहे.
5 वर्षांपूर्वी