Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
मुख्यमंत्र्यांकडून इस्पितळांबाबत संवाद; तर मोदी थाळी-टाळी आणि आता दिवा-बत्ती
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशात लॉकडाऊनची घोषणा केली त्यावेळी त्यांनी २९ मार्च रोजी संध्याकाळी ५ वाजता लोकांना थाळी, टाळी आणि घंटानाद करुन आरोग्य कर्मचारी जे कोरोनाच्या संकटात जीव धोक्यात घालून रुग्णांची सेवा करत आहे त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करावी असं आवाहन केलं होतं तेव्हा मोदींच्या आवाहनाला लोकांनी प्रतिसाद दिल्याचं पाहायला मिळालं. परंतु त्यावेळी काही लोकांनी घराबाहेर पडून, रस्त्यावर एकत्र जमून थाळीनाद, रॅली काढून सोशल डिस्टेंसिंगच्या नियमांना हरताळ फासला. याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले त्यामुळे लॉकडाऊन उद्देशावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आता याबाबत खबरदारी घेतल्याचं दिसून आलं. त्यानंतर आता रविवारी पुन्हा दिवा-बत्ती आणि मोबाईल फ्लॅशचा मार्केटिंग कार्यक्रम आखला आहे.
5 वर्षांपूर्वी -
कोरोना विषाणू पूर्णपणे नष्ट होईल असे सध्या तरी दिसत नाही: डॉ. डेव्हिड नबारो
जगभरातील देशांनी जारी केलेल्या आकडेवारी आणि वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायजेशनच्याआकड्यांच्या आधारावर worldometers.info नं दिलेल्या माहितीनुसार, करोना व्हायरसनं आतापर्यंत ५३ हजार दोनशे ३८ जणांचा बळी घेतला आहे. तर दहा लाख १६ हजार ४१३ जणांना या रोगाचा संसर्ग झाला आहे. तर आतापर्यंत जगभरात दोन लाख १३ हजार ३५ जण कोरानामुक्त झाले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
डॉक्टर भक्तांनी उत्साहाने हाॅस्पिटल्सच्या लाइट्स घालवू नये; पेशंट्स व्हेंटीलेटरवर आहेत
कोरोना विषाणूच्या महामारीमुळे जगात अंधकार पसरला आहे, हा अंधार आपल्याला निरंतर प्रकाशानं दूर करायचा आहे. यासाठी रविवारी ५ एप्रिलला प्रत्येक भारतवासीयांनी ९ मिनिटांचा वेळ द्यायचा आहे. यासाठी रात्री नऊ वाजता सर्वांनी आपल्या घराचे दिवे बंद करायचे आहेत. या नऊ मिनिटांत प्रत्येकांनी दरवाज्यात किंवा बालकनीत उभं राहून मेणबत्ती, दिवा लावून किंवा टॉर्च, मोबाइलची फ्लॅशलाइट सुरु करून अंधकार दूर करायचा आहे, असं आवाहन मोदींनी केलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
घंटा झाली, आता दिवे; चेतन भगत यांचा मोदींना टोला?
कोरोना विषाणूच्या महामारीमुळे जगात अंधकार पसरला आहे, हा अंधार आपल्याला निरंतर प्रकाशानं दूर करायचा आहे. यासाठी रविवारी ५ एप्रिलला प्रत्येक भारतवासीयांनी ९ मिनिटांचा वेळ द्यायचा आहे. यासाठी रात्री नऊ वाजता सर्वांनी आपल्या घराचे दिवे बंद करायचे आहेत. या नऊ मिनिटांत प्रत्येकांनी दरवाज्यात किंवा बालकनीत उभं राहून मेणबत्ती, दिवा लावून किंवा टॉर्च, मोबाइलची फ्लॅशलाइट सुरु करून अंधकार दूर करायचा आहे, असं आवाहन मोदींनी केलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
खुशखबर! देशातील १५६ रुग्ण कोरोनामुक्त झाले; इस्पितळातून डिस्चार्ज
देशामध्ये कोरोनाचा संसंर्ग झालेल्यांची संख्या २५६६ वर पोहोचली आहे. त्यापैकी १९१ लोक कोरोनामुक्त झाले आहेत. तर ५३ लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. मागील २४ तासांमध्ये ३२८ नवी रूग्ण समोर आले आहेत. महाराष्ट्रात ३३९, केरळमध्ये २८६, तामिळनाडूमध्ये ३०९, दिल्लीमध्ये २१९, आंध्र प्रदेशमध्ये १३५, राजस्थानमध्ये १३३, तेलंगणामध्ये १२७, कर्नाटकामध्ये १२१, उत्तरप्रदेशमध्ये १२१, मध्यप्रदेशात ९८ रूग्ण आढळून आले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
त्या तबलिगीकडून महिला वैद्यकीय कर्मचाऱ्यांबरोबर अश्लील कृत्य; मुद्दाम नग्न फिरत आहेत
दिल्लीतील निजामुद्दीन येथील मरकजमधून निघालेले तबलिगी जमातीचे लोक देशातील अनेक भागात कोरोना विषाणूचे संक्रमण करण्यासाठी जबाबदार धरले जात आहेत. आता या लोकांनी वैद्यकीय कर्मचाऱ्यांबरोबर गैरवर्तणूक केल्याचे नवे प्रकरण समोर आले आहे. गाझियाबाद येथील एमजीएम रुग्णालयात क्वारंटाइनमध्ये ठेवलेल्या जमातीतील १३ रुग्णांनी महिला वैद्यकीय कर्मचाऱ्यांबरोबर अश्लील कृत्य केल्याचा आरोप करण्यात आला आहे. हे लोक विवस्त्र फिरत आहेत. त्यामुळे महिला नर्स आणि इतर लोकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
5 वर्षांपूर्वी -
रविवारी रात्री ९ वाजता ९ मिनिटे लाइट बंद ठेऊन, मेणबत्ती, फ्लॅशलाइट लावा
कोरोना विषाणूच्या महामारीमुळे जगात अंधकार पसरला आहे, हा अंधार आपल्याला निरंतर प्रकाशानं दूर करायचा आहे. यासाठी रविवारी ५ एप्रिलला प्रत्येक भारतवासीयांनी ९ मिनिटांचा वेळ द्यायचा आहे. यासाठी रात्री नऊ वाजता सर्वांनी आपल्या घराचे दिवे बंद करायचे आहेत. या नऊ मिनिटांत प्रत्येकांनी दरवाज्यात किंवा बालकनीत उभं राहून मेणबत्ती, दिवा लावून किंवा टॉर्च, मोबाइलची फ्लॅशलाइट सुरु करून अंधकार दूर करायचा आहे, असं आवाहन मोदींनी केलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
राजकारण बाजूला ठेवून राष्ट्रहिताचा विचार करा, अमित शहा काँग्रेसवर बरसले
कोरोना विषाणूचे वेगाने होणारे संक्रमण रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या लॉकडाऊनच्या निर्णयावर काँग्रेसने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. काँग्रेस अंतरिम अध्यक्ष सोनिया गांधी यांनी केलेल्या वक्तव्यानंतर आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काँग्रेसवर पलटवार केलाय. सध्याच्या घडीला राजकारण बाजूला ठेऊन राष्ट्रहिताचा विचार करणे गरजेचे आहे. देशातील जनतेमध्ये कोणताही संभ्रम पसरवण्याचे प्रयत्न करु नका, अशा शब्दांत अमित शहा यांनी काँग्रेसला सुनावले. अमित शहा यांनी ट्विट्च्या माध्यमातून सोनिया गांधी यांनी केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे.
5 वर्षांपूर्वी -
९६० तबलीगी परदेशी नागरिकांचे पर्यटन व्हिसा रद्द; काळ्या यादीत समावेश
दिल्लीतील निजामुद्दीन परिसरातील तबलीगी समाजाच्या मुख्यालयात आयोजित कार्यक्रमात सहभागी झालेल्या ९६० परदेशी नागरिकांना काळ्या यादीत घालण्यात आले असून त्यांचा पर्यटन व्हिसा रद्द करण्यात आला आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने यासंदर्भात माहिती दिली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनची परिस्थिती असताना नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी संबंधितांवार परदेशी कायद्याअंतर्गत कारवाई करण्याचे आदेशही दिल्ली पोलिसांना देण्यात आले आहे.
5 वर्षांपूर्वी -
कोरोना आपत्ती: अमेरिकेने १ लाख शव बॅगेची मागणी केल्याने धास्ती वाढली
जगात अमेरिका आणि कोरोनाचं मुख्य केंद्र झालं आहे. अमेरिकत न्यूयॉर्क शहर कोरोनामुळे कोलमडून पडलंय. मृतांची संख्या एवढी आहे की हॉस्पिटल्समधल्या सगळ्या जागा कमी पडत आहेत. इतर शहरांमध्येही हीच परिस्थिती असल्याने मृतदेह झाकायला आणि ठेवायला शवपेट्या आणि ‘बॉडी बॅग’ कमी पडत आहेत. त्यामुळे मृतदेहांची विल्हेवाट लावायची कशी असा प्रशासनापुढे प्रश्न पडलाय. एकट्या न्यूयॉर्क शहरात ११३९ जणांचा मृत्यू झाला आहे. तर अमेरिकेत ही संख्या ५११५ एवढी झालीय. अमेरिकेत पुढच्या काही महिन्यांमध्ये तब्बल २ लाख लोकांचा मृत्यू होऊ शकतो अशी भीती काही तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
5 वर्षांपूर्वी -
महाराष्ट्रात कोरोना रुग्णांचा आकडा ४१६'वर पोहोचला
राज्यात करोनाग्रस्तांची संख्या वेगानं वाढत आहे. आज दिवसभरात राज्यात ८१ नव्या करोनाच्या रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळं करोना रुग्णांचा आकडा ४१६वर गेला आहे. एकट्या मुंबईत आज दिवसभरात ५७ रुग्णांना करोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. तर आतापर्यंत १९ जणांचा मृत्यू झाला आहे.
5 वर्षांपूर्वी -
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पुन्हा नागरिकांशी संवाद साधणार
शुक्रवारी सकाळी म्हणजेच उद्या सकाळी ९ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी देशवासीयांना एक विशेष संदेश देणार आहेत. एएनआयने या संदर्भातले वृत्त दिले आहे.आजच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला आणि देशांमधल्या राज्यांमध्ये करोनाची काय स्थिती आहे ते जाणून घेतले. आता उद्या सकाळी ९ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधित करणार आहेत. ते काय बोलणार हे पाहणे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.
5 वर्षांपूर्वी -
राज्यातील ३० शासकीय 'कोविड-१९ रुग्णालय' म्हणून घोषीत
कोरोनाला रोखण्यासाठी आरोग्य विभागाने राज्यातील ३० शासकीय रुग्णालये कोरोना उपचारासाठी विशेष रुग्णालये म्हणून घोषित केली आहेत. या रुग्णालयांत केवळ कोरोना रुग्णांवर उपचार केले जातील. त्यासाठी अधिसूचना काढण्यात आली असून २ हजार ३०५ खाटा करोनाबाधीतांच्या उपचारासाठी उपलब्ध झाल्या आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली आहे.
5 वर्षांपूर्वी -
कोरोनाची लागण झाली की गोळ्याचं घालतोय; म्हणे उत्तर कोरिया कोरोनमुक्त
चीनमधील हुबेई प्रातांतून सुरू झालेल्या करोना व्हायरस संसर्ग हळूहळू जगभरात पसरला आहे. जगातील जवळपास ६० देशांमध्ये करोना व्हायरस पसरला आहे. करोनामुळे हजारो लोकं मृत्यूमुखी पडले आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने देखोल करोना हा जगासाठी धोकादायक असल्याचे म्हटले आहे. चीनमध्ये जवळपास २९१२ जणांचा मृत्यू झाला होता. हुबेई प्रांतात करोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळले होते. दक्षिण कोरियात देखील अनेकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. युरोपमध्येही करोनाचा संसर्ग मोठ्याप्रमाणावर पसरला आहे.
5 वर्षांपूर्वी -
चिंता वाढली! पोलीस कुटुंबीय देखील कोरोनाच्या कचाट्यात; वरळी पोलीस वसाहत
मुंबई महानगर पालिकेनं बुधवारी एकाच दिवशी शहरातील ४५ नवे परिसर सील करुन टाकले आहेत. या परिसरांचा समावेश‘no-go zones’मध्ये करण्यात आला आहे. ज्या भागात कोरोना विषाणूचा संसर्ग झालेले रुग्ण आढळतात किंवा बाधा झालेले रुग्ण या परिसरातील लोकांच्या संपर्कात आल्यानं ज्या भागातील लोकांना विषाणूचा संसर्ग होण्याचा धोका अधिक असतो असे भाग ‘no-go zones’मध्ये येतात. तो परिसर पूर्णपणे बंद करण्यात येतो. या आठवड्यात एकूण १९१ परिसर सील करण्यात आले आहेत.बुधवारी नव्यानं सील करण्यात आलेले बहुतांश परिसर हे उपनगरातले आहेत. पोलिसांनी परिसरात बॅरिकेट्स लावले असून येथील नागरिकांना बाहेर पडण्यास आणि बाहेरच्या व्यक्तीला आत जाण्यास मनाई करण्यात आली आहे.
5 वर्षांपूर्वी -
इस्पितळात सुद्धा त्यांनी सोशल डिस्टन्सिंग नियम धुडकावला; समूहाने नमाज पठण
देशात गेल्या २४ तासांत करोनाचे ३८६ रुग्ण आढळले. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या १६३७ वर पोहोचली असून, आतापर्यंत १३२ रुग्ण बरे झाले आहेत. एका दिवसातील नव्या रुग्णांचा हा सर्वात मोठा आकडा असला तरी तो मुख्यत्वे तबलिगी जमातच्या अनुयायांना झालेल्या बाधेमुळे वाढला आहे. हा देशव्यापी आलेख नसल्याची माहिती बुधवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली. आत्तापर्यंत ४७,९५१ वैद्यकीय चाचण्या झाल्या असून, सरकारी वैद्यकीय प्रयोगशाळांमध्ये ४५६२ चाचण्या करण्यात आल्या आहेत.
5 वर्षांपूर्वी -
१४ एप्रिलनंतरच्या रिझर्व्हेशनला कोणतीही स्थगिती देण्यात आलेली नाही
देशात लॉकडाऊन करण्यात आल्यामुळे अनेक सेवा ठप्प झाल्यात आहे. लोकल रेल्वे, मेल एक्स्प्रेस गाड्या बंद करण्यात आलेल्या आहेत. रस्ते वाहतूकही बऱ्यापैकी थांबलेली आहे. अनेकांनी एप्रिल आणि मे महिन्याचं आधीपासूनच आरक्षण करून ठेवलेलं आहे. परंतु रेल्वेच बंद असल्यानं ते आरक्षणही स्थगित झालं आहे. १४ एप्रिलपर्यंत आरक्षण रद्द करण्यात आलं होतं. पण रेल्वेनं आणखी एक आनंदवार्ता दिली आहे. अशातच आरक्षण सुविधा १४ एप्रिलनंतरही बंदच ठेवणार असल्याच्या अफवा पसरवण्यात आल्या होत्या, त्यावर आता रेल्वेनंच स्पष्टीकरण दिलं आहे. १४ एप्रिलनंतर रिझर्व्हेशनला कोणतीही स्थगिती देण्यात आलेली नाही.
5 वर्षांपूर्वी -
जिल्हा नियोजन निधीतून ५० लाख उपलब्ध; आ. राजू पाटील कल्याण-डोंबिवलीसाठी तत्पर
कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रात असलेल्या कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. कोरोनाचे प्रादुर्भाव रोखण्यासाठी तातडीने ५० लाखांचा निधी मंजूर करण्याची मागणी आमदार राजू पाटील यांनी जिल्हा नियोजन अधिकारी (ठाणे) यांच्याकडे केली होती. कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. त्यातच महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले असताना कल्याण डोंबिवली परिसरात रुग्णांचा आकडा वाढत चालला आहे. त्यामुळे कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वैद्यकीय यंत्रसामुग्री आणि साहित्यासाठी तातडीने निधी उपलब्ध करून देण्याची मागणी मनसे आमदार राजू पाटील यांनी केली होती.
5 वर्षांपूर्वी -
डोंबिवलीत कोरोना रुग्णांचा आकडा १९ वर
मुंबईमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. तर दुसरीकडे मुंबईच्या उपनगरातही कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहे. डोंबिवली आणि कल्याण परिसरात आज आणखी ५ नवे रुग्ण आढळून आले आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आज ५ नविन रूग्ण आढळून आले आहे. यामुळे महापालिका क्षेत्रातील कोरोनाबाधित रूग्णसंख्या आता १९ वर पोहोचली आहे. नवीन रूग्णांपैकी ४ रूग्ण हे डोंबिवली पूर्व भागातील असून ०१ रूग्ण कल्याण पुर्व भागातील आहे.
5 वर्षांपूर्वी -
माझ्यासाठी व्हेंटीलेटर वापरण्यापेक्षा तो तरुण रुग्णांसाठी वापरा; अन त्या आजीने प्राण सोडले
बेल्जियममधील एका ९० वर्षीय करोनाग्रस्त महिलेने उपचार करण्यास नकार दिल्याने तिचा मत्यू झाला आहे. डॉक्टरांनी माझ्यासाठी व्हेंटीलेटर वापरण्याऐवजी तरुण रुग्णांसाठी तो ठेवावा असं सांगत या महिलेने उपचारांना नकार दिल्याचे फॉक्स न्यूजने म्हटलं आहे.
5 वर्षांपूर्वी