Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
लोकांचा श्वास कोंडतोय अन दोन गुजराती नेत्यांची ऑक्सिजनवरून भिन्न विधानं | राज्याला बदनाम करणं हेच ध्येय?
आज दिवसभरात राज्यात ६८ हजार ६३१ करोनाबाधित वाढले असून, ५०३ रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यू दर १.५८ टक्के एवढा आहे. राज्यात आजपर्यंत ६० हजार ४७३ रूग्णांचा मृत्यू झालेला आहे. तर, राज्यात आज रोजी एकूण ६,७०,३८८ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.
4 वर्षांपूर्वी -
आज राज्यात ५०३ रूग्णांचा मृत्यू तर ६८ हजार ६३१ करोनाबाधित वाढले
आज दिवसभरात राज्यात ६८ हजार ६३१ करोनाबाधित वाढले असून, ५०३ रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यू दर १.५८ टक्के एवढा आहे. राज्यात आजपर्यंत ६० हजार ४७३ रूग्णांचा मृत्यू झालेला आहे. तर, राज्यात आज रोजी एकूण ६,७०,३८८ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.
4 वर्षांपूर्वी -
लस घेतल्यानंतर शरीरात अँटीबॉडीज असल्याने विषाणूचा फार वाईट परिणाम होणार नाही - डॉ. गुलेरिया
देशात कोरोनाच्या वाढत्या संसर्गावर दिल्लीस्थित एम्सचे संचालक रणदीप गुलेरिया यांनी मोठी माहिती दिलीय. कोरोनाच्या दुसर्या लाटेला अनेक घटक कारणीभूत आहेत, मात्र त्यातील दोन प्रमुख कारणे आहेत. पहिलं कारण म्हणजे जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये लसीकरण सुरू झाल्यानंतर संसर्गाची प्रकरणे कमी होऊ लागली आणि लोकांनी कोरोना मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणे थांबवले. याच काळात विषाणूमध्ये बदल झाला आणि कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात पसरला.
4 वर्षांपूर्वी -
दिलासादायक संशोधन | काळजी घ्या, पण कोरोनाची दुसरी लाट वेगाने ओसरणार... कारण?
देशात कोरोनाग्रस्तांचा आकडा दररोज नवनवे विक्रम गाठताना दिसत आहे. गेल्या 24 तासात कोरोनाचे 2 लाख 34 हजार 692 नवीन रुग्ण भारतात आढळले आहेत. 1 लाख 23 हजार 354 जणांना डिस्चार्ज मिळाला, तर 1341 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.
4 वर्षांपूर्वी -
कोरोनाने उत्तर भारत हादरला | उत्तर प्रदेशातील स्थिती चिंताजनक
सध्या देशात कोरोना रुग्णांची संख्ये मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने शुक्रवारी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. यात आयोगाने पश्चिम बंगालमध्ये होत असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावर लगाम कसली आहे.
4 वर्षांपूर्वी -
दुसरी लाट भयानक | लोकांना गांभीर्य कळेना | राज्य कडकडीत लॉकडाऊनच्या दिशेने
मुख्यमंत्र्यांनी राज्यात १ मेपर्यंत कडक निर्बंध लागू केले आहेत. नागरिकांनी त्याला सहकार्य करावे. मागील लॉकडाऊनमध्ये नागरिकांना बऱ्याच अडचणी सहन कराव्या लागल्या. पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या वाढतच आहे. निर्बंध लावूनही काही जागी गर्दी दिसून येत आहे. आता नागरिकांनी निर्बंधांचे पालन केले नाही तर राज्यात पूर्वीप्रमाणे कडक लॉकडाऊन लागू करावा लागेल, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी दिला. दरम्यान, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मागच्या वर्षीची टाळेबंदी आणि सध्याची संचारबंदी यात फरक असून आणखी कठोर निर्बंधांची गरज व्यक्त केली.
4 वर्षांपूर्वी -
Alert | एकूण रुग्णांपैकी 10% रुग्ण 11 ते 19 वयोगटातील तर 4.42% रुग्ण 10 वर्षांपेक्षा कमी वयाचे
कोरोनाची दुसरी लाट भारतात जीवघेणी ठरत आहे. काल म्हणजे 15 एप्रिलला देशात सर्वाधिक मृत्यू झाले. ज्या वेगाने रुग्णसंख्या वाढत आहे, त्यामुळे आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण आला आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा रुग्णसंख्या वाढीचा वेग जास्त आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी परिस्थिती नियंत्रणाबाहेर आहे. नव्या माहितीनुसार कोरोना रुग्णाच्या संपर्कात आल्यानंतर आता अवघ्या 1 मिनिटाच्या आत कोरोनाची बाधा होते. आता तर कोरोनाची नवी लक्षणे समोर येत आहेत.
4 वर्षांपूर्वी -
उत्तराखंडात कोरोना रुग्णांमध्ये 8814% वाढ | हरिद्वारमध्ये 30 साधू संक्रमित | महामंडलेश्वरांचा मृत्यू
उत्तराखंडमध्ये आस्थेच्या महाकुंभदरम्यान आता कोरोनाचा कुंभही सुरु झाला आहे. एका महिन्याच्या आत राज्यात कोरोना रुग्ण सापडण्याच्या वेगात 8814% ची वाढ झाली आहे. फेब्रुवारीपर्यंत येथे एका दिवसात केवळ 30-60 लोक कोरोना संक्रमित आढळत होते. आता ही संख्या वाढून 2,000 ते 2,500 झाली आहे. यावरुनच कोरोनाच्या भयावह परिस्थितीचा अंदाज लावला जाऊ शकतो. आकड्यांमध्ये एनालिसिस केले तर असे वाटते की, सध्या सुरुवात आहे. येणाऱ्या काळात परिस्थिती यापेक्षा जास्त भयावह होऊ शकते.
4 वर्षांपूर्वी -
मध्य प्रदेश | वॉर्ड बॉय ऑक्सिजन सपोर्ट काढून घेऊन गेला | कोरोना रुग्णाचा तडफडून मृत्यू
कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे महाराष्ट्रावर लॉकडाऊनची वेळ ओढावली असली तरी देशातील परिस्थितीही फारशी वेगळी नाही. संपूर्ण देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी भर पडताना दिसत आहे. त्यामुळे अवघ्या 10 दिवसांत देशातील कोरोना रुग्णवाढीचा वेग दुप्पट झाला आहे. दहा दिवसांपूर्वीच देशात 1 लाख नव्या रुग्णांची नोंद झाली होती. मात्र, आता हा आकडा थेट 2,00,739 वर जाऊन पोहोचला आहे.
4 वर्षांपूर्वी -
कुंभमेळ्यामध्ये कोरोनाचा विस्फोट | महाराष्ट्रात परतणाऱ्यांचा शोध सुरू
हरिद्वारमधील कुंभमेळ्यामध्ये कोरोनाचा विस्फोट झाल्याचं चित्र समोर आलंय. कुंभमेळ्यात 10 ते 14 एप्रिलदरम्यान 1700 हून अधिक लोकांना कोरोना विषाणूची लागण झालीय. जगातील सर्वात मोठा धार्मिक मेळावा कोरोनाचा हॉटस्पॉट होण्याची भीती आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांनी मेळाव्यात पाच दिवसांत 2,36,751 जणांच्या कोविड चाचण्या केल्या, त्यापैकी 1701 जणांच्या रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेत.
4 वर्षांपूर्वी -
मोदींच्या खोट्या १५ लाखांपेक्षा...संकटकाळात प्रत्यक्ष मिळणारे १५०० रुपये लाखमोलांचे - भाई जगताप
महाराष्ट्रातील दररोज वाढणारा कोरोनाबाधितांचा आकडा मोठा असल्याने राज्य सरकारची चिंता चांगलीच वाढली आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज (१४ एप्रिल) जारी केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यात आज ५८ हजार ९५२ नव्या कोरोना बाधीत रुग्णांची नोंद झाली आहे. तर याच गेल्या २४ तासांत नवीन ३९ हजार ६२४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
कोरोना जगात दिर्घकाळ राहणार | 78 कोटी लोकांच्या लसीकरणानंतरही वाढता प्रभाव - WHO
कोरोना महामारीचा संसर्ग जगामध्ये झपाट्याने वाढत चाललेला आहे. याच पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रोस ॲडनोम गॅबियिसस यांनी कोरोनाचा संसर्ग जगात दिर्घकाळ टिकून राहण्याचा इशारा दिला आहे. टेड्रोस यांनी जगातील आशिया आणि मध्य पूर्व देशांमध्ये वाढत्या कोरोनाच्या प्रकरणावर चिंता व्यक्त केली. पुढे बोलताना ते म्हणाले की, जगात आजघडीला 78 कोटी लोकांचे लसीकरण झाले असून तरीदेखील कोरोनाचा संसर्ग कमी होत नाही आहे.
4 वर्षांपूर्वी -
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची तीव्रता प्रचंड | २४ तासांत १०२७ मृत्यू | १,८४,३७२ नवे बाधित
कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेची तीव्रता प्रचंड असल्याचं दररोज येणाऱ्या आकडेवारीतून दिसून येत आहे. दररोज नवनवे विक्रम नोंदवले जात असून, देशात मंगळवारी आतापर्यंतची विक्रमी रुग्णवाढ नोंदवली गेली आहे. यात सर्वांना काळजीत टाकणारी बाब म्हणजे वाढत्या रुग्णसंख्येबरोबरच देशात करोनामुळे होणाऱ्या मृत्यूची संख्याही वाढली असून, गेल्या २४ तासांत देशात १ हजारपेक्षा जास्त मृत्यूची नोंद झाली आहे.
4 वर्षांपूर्वी -
राज्यात 1 मेपर्यंत कडक निर्बंध लागू | संचारबंदीत काय सुरू आणि काय बंद?
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी ब्रेक द चेन अंतर्गत मंगळवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात १ मे पर्यंत कठोर निर्बंध लागू केले. यानुसार बुधवार, १४ एप्रिल रोजी रात्री 8 वाजेपासून १ मे २०२१ सकाळी ७ वाजेपर्यंत १४४ कलमांन्वये संपूर्ण संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे विनाकारण सार्वजनिक ठिकाणी जाण्यासाठी कोणास परवानगी असणार नाही. सर्व काही आस्थापने, सार्वजनिक स्थाने, उपक्रम, सेवा बंद राहतील. कोविड नियमांचे उल्लंघन केल्यास व्यक्तीस १ हजार आणि आस्थापनांना १० हजार दंड करण्यात येईल.
4 वर्षांपूर्वी -
मुंबई दादर मार्केटमध्ये खचाखच गर्दी | लोकांचा बेजबाबदारपणा तर आरोग्य यंत्रणा हतबल
राज्यात सोमवारी एकूण ५१,७५१ नवे रुग्ण, तर २५८ रुग्णांचा मृत्यू झाला. यातील १३३ रुग्ण एकट्या विदर्भातील आहेत. मराठवाड्यात ८७ रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत ३४ लाख ५८,९९६ रुग्णांची नोंद झाली असून २८,३४,४७३ रुग्ण बरे झाले.
4 वर्षांपूर्वी -
देशात 1.60 लाखांपेक्षा जास्त रुग्णांची भर | 96,727 बरे झाले तर 880 रुग्णांचा मृत्यू
देशात कोरोनाचा वेग सलग वाढवणारा आहे. सोमवारी 1 लाख 60 हजार 694 नवीन रुग्ण आढळले. 96,727 बरे झाले आणि 880 जणांचा मृत्यू झाला. हा सलग दुसरा दिवस होता जेव्हा नवीन रुग्ण 1 लाख 60 हजारांपेक्षा जास्त आढळले. रविवारी 1 लाख 59 हजार 914 रुग्णांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता.
4 वर्षांपूर्वी -
कोरोना आपत्ती, महागाई, बेरोजगारी | ब्राझीलमध्ये 2 कोटी लोक उपासमारीच्या उंबरठ्यावर
ब्राझीलमध्ये कोरोना वाढत आहे. एकीकडे हजारो लोकांचा मृत्यू होत आहे. स्मशानात जागा शिल्लक नाही. दुसरीकडे, दोन कोटी लोक कोरोनामुळे निर्माण स्थितीमुळे भुकेचा सामना करत आहेत. स्थिती अशी आहे की, एकूण २१.१ कोटी लोकसंख्येपैकी जवळपास अर्ध्या लोकांना व्यवस्थित जेवणही मिळत नाहीये. ब्राझीलच्या अन्न सार्वभौमत्व आणि पोषण सुरक्षा संशोधन नेटवर्कच्या अहवालात ही बाब स्पष्ट झाली आहे.
4 वर्षांपूर्वी -
राज्यात 51 हजारांवर नवे कोरोना रुग्ण, 258 मृत्यू | विदर्भात 133 कोरोना रुग्णांचा मृत्यू
राज्यात सोमवारी एकूण ५१,७५१ नवे रुग्ण, तर २५८ रुग्णांचा मृत्यू झाला. यातील १३३ रुग्ण एकट्या विदर्भातील आहेत. मराठवाड्यात ८७ रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत ३४ लाख ५८,९९६ रुग्णांची नोंद झाली असून २८,३४,४७३ रुग्ण बरे झाले.
4 वर्षांपूर्वी -
सातारा | बावधनच्या बगाड यात्रेनंतर पोलिस आणि भाविकांसह ६१ जणांना कोरोना
कोरोनाच्या विस्फोटामुळे महाराष्ट्रात लॉकडाऊन होणार हे जवळपास निश्चित आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे गेल्या दोन दिवसांपासून मॅरेथॉन बैठका घेत आहेत. दोन दिवसापूर्वी त्यांनी सर्वपक्षीय बैठकीत लॉकडाऊनशिवाय पर्याय नसल्याचं म्हटलं होतं. त्याशिवाय काल रविवार 11 एप्रिलला झालेल्या टास्कफोर्सच्या बैठकीत कडक लॉकडाऊनवर चर्चा झाली. त्यामुळे महाराष्ट्रात 8 किंवा 14 दिवसांचा लॉकडाऊन लागणार हे निश्चित आहे. दुसरीकडे मागील सोमवारपासून कडक निर्बंध लागू केल्यापासून पोलीस यंत्रणेवर मोठा ताण आला आहे.
4 वर्षांपूर्वी -
.. तर कोविडचं वाढतं प्रमाण पाहता भारत दुसरा ब्राझील होईल - डॉ. एरिक फीगल-डिंग
देशात २४ तासांत आढळून आलेल्या रुग्णांची आणि मृतांची आकडेवारी जाहीर केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे देशातील सर्वाधिक रुग्णावाढ नोंदवण्यात आली आहे. देशात २४ तासांत १ लाख ५२ हजार ८७९ करोनाबाधित आढळून आले आहेत. तर ९० हजार ५८४ रुग्ण करोनावर मात करून घरी परतले आहेत. चिंतेची बाब देशातील मृतांची संख्याही वाढली आहे. २४ तासांत ८३९ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. तर देशात आतापर्यंत १ लाख ६९ हजार २७५ जणांचा मृत्यू झाला आहे.
4 वर्षांपूर्वी