Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
शहाणपण सुचलं | केंद्र सरकारने रेमडेसीवर’ची निर्यात थांबवली
वाढत्या कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी औषधांचा तुटवडा भासत असल्यामुळे केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या रेमेडेसिव्हीर इंजेक्शनची निर्यात थांबवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतलाय. जोपर्यंत देशातील कोरोना परिस्थिती नियंत्रणात येत नाही, तोपर्यंत रेमेडेसिव्हीरचे इंजेक्शन बाहेर देशात निर्यात केले जाणार नाही; असं केंद्र सरकारने म्हटलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
महाभारत मालिकेतील इंद्रदेव आणि अभिनेते सतीश कौल यांचं कोरोनामुळे निधन
बीआर चोप्रा यांच्या अत्यंत लोकप्रिय ‘महाभारत’मध्ये इंद्र देवाची भूमिका साकारणारे हिंदी आणि पंजाबी अभिनेते सतीश कौल यांचे कोरोनामुळे निधन झाले. एका आठवड्यापूर्वी कोरोना पॉझिटिव्हवर आल्यानंतर त्यांना लुधियाना येथील श्री रामा चॅरिटेबल ट्रस्ट हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. ते 72 वर्षांचे होते.
4 वर्षांपूर्वी -
वीकेंड लॅाकडाऊन | काय सुरू, काय बंद ? - सविस्तर
राज्यात कोरोनाचा उद्रेक झाला आहे. दररोज हजारोंच्या संख्येने रुग्ण सापडत असून, शेकडोंच्या संख्येने मृत्यू होत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा एकदा कडक लॉकडाऊन लागण्याची शक्यता आहे. आज मुख्यमंत्र्यांची सर्व पक्षांच्या नेत्यांशी चर्चा झाली. त्यात लॉकडाऊन बाबत मत जाणून घेण्यात आले.
4 वर्षांपूर्वी -
कोरोना वाढतोय | मुंबई लोकल सामान्यांसाठी पुन्हा थांबणार?
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. काल अर्थात गुरुवारी तब्बल ६० हजारांच्या घरात नवे कोरोना रुग्ण आढळले. मुंबईत तर परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे. एकट्या मुंबईत रोज १० हजारांच्या आसपास नवे कोरोना रुग्ण आढळत आहेत. या पार्श्वभूमीवर मदत आणि पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवर यांनी मोठे वक्तव्य केले आहे.
4 वर्षांपूर्वी -
केंद्राकडून वेळेत लस पुरवठा न झाल्यास ३ दिवसांमध्ये लसीकरण बंद पडेल - आरोग्यमंत्री
महाराष्ट्राने लसीकरणाबाबतीत देशात आघाडी घेतली आहे. पण केंद्र सरकारकडून पुरविण्यात येणाऱ्या लशींचा पुरवठा कमी पडतोय, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. लशीच्या पुरवठ्या संदर्भात टोपे यांनी यावेळी केंद्रावर संताप देखील व्यक्त केला.
4 वर्षांपूर्वी -
८ रुग्णांना एकाच चितेवर अग्नी | परिस्थिती बिकट | विरोधकांकडून लॉकडाऊन शिथिल करण्यावरून राजकारण
सध्या राज्यात ५ दिवस कडक निर्बंध तर शनिवार आणि रविवारी कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. त्याला कारण ठरलं आहे ते लोकं न समजून घेणारे गांभीर्य असं सांगितलं गेलं. मृतांचा आकडा वाढत असताना विरोध मात्र याचं भावनिक राजकारण करून राज्य सरकारला लॉकडाऊन शिथिल करण्यासाठी दबाव वाढवत आहेत. एका बाजूला राज्य सरकारच्या निर्णयाला समर्थन देऊ असं म्हणणारे भाजप आणि मनसेचे पदाधिकारी आता निर्णय झाल्यानंतर पलटल्याचं चित्रं पाहायला मिळतंय. त्यामुळे सरकारला कोंडीत पकडण्याचा एककलमी कार्यक्रम सुरु झाला आहे.
4 वर्षांपूर्वी -
कोरोना आपत्ती | देशासाठी पुढील चार आठवडे अत्यंत महत्त्वाचे - केंद्र सरकार
महाराष्ट्रात १६ मार्च २०२० रोजी मुंबईत कोरोनाचा पहिला बळी गेला. मार्च २०२० ते पाच एप्रिल २०२१ या काळात राज्यात कोरोनामुळे ५६,०३३ मृत्यू झाले आहेत. याच काळात राज्यातील १४ जिल्हे असे आहेत, जेथे कोरोनाने झालेल्या मृत्यूंची संख्या एक हजाराहून जास्त आहे. सर्वाधिक ११,८०० मृत्यू मुंबई जिल्ह्यात झाले आहेत. त्यापाठोपाठ पुणे जिल्ह्यात ८४४० कोरोना बळी असून ठाणे जिल्ह्यात ६१३६ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला.
4 वर्षांपूर्वी -
कोरोनामुळे परिस्थिती गंभीर | राज्यातील ‘या’ निवडणुका पुढे ढकलण्याचा राज्य सरकराचा निर्णय
महाराष्ट्रात १६ मार्च २०२० रोजी मुंबईत कोरोनाचा पहिला बळी गेला. मार्च २०२० ते पाच एप्रिल २०२१ या काळात राज्यात कोरोनामुळे ५६,०३३ मृत्यू झाले आहेत. याच काळात राज्यातील १४ जिल्हे असे आहेत, जेथे कोरोनाने झालेल्या मृत्यूंची संख्या एक हजाराहून जास्त आहे. सर्वाधिक ११,८०० मृत्यू मुंबई जिल्ह्यात झाले आहेत. त्यापाठोपाठ पुणे जिल्ह्यात ८४४० कोरोना बळी असून ठाणे जिल्ह्यात ६१३६ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला.
4 वर्षांपूर्वी -
राज्यात कडक निर्बंध लागू | पण काय आहेत कडक निर्बंध? - सविस्तर
मागील काही दिवसांत करोनानं अक्षरक्षः थैमान घातल्यानं राज्य सरकारची झोप उडाली आहे. प्रचंड वेगानं होत असलेल्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य सेवेवर ताण येण्यास सुरूवात झाली असून, रुग्णांचे हाल टाळण्यासाठी आणि विषाणू संक्रमणाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारकडून लॉकडाउन संदर्भात चाचपणी सुरू होती. सर्वच क्षेत्रातील प्रतिनिधी आणि विरोधी पक्षांच्या नेत्यांशी चर्चा केल्यानंतर मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज लॉकडाउन/ कडक निर्बंध लागू करण्याचा निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
पुणे महापालिका | कोरोनाने घरी मृत्यू झाल्यास नातेवाईकच अंत्यसंस्कार करतील
कोरोना रुग्णांच्या संदर्भात पुणे महानगरपालिकेनं एक नवा नियम आणला आहे. त्यानुसार घरात उपचार घेताना एखाद्या कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला, तर कुटुंबीयांनाच सर्व नियम पाळून त्यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करावे लागणार आहेत. त्यासाठीची सर्व प्रक्रिया नातेवाईकच पूर्ण करतील. फक्त गाडीची सुविधा पुरवली जाईल. महापालिकेच्या या नव्या नियमाची माहिती एका वृत्तामुळे समोर आली आहे.
4 वर्षांपूर्वी -
औरंगाबदमध्ये लाॅकडाऊनचा निर्णय मागे | मात्र रात्रीची संचारबंदी कायम
सामान्य नागरिकांमधून व्यक्त हाेणारा तीव्र राेष, आमदार-खासदार, व्यापाऱ्यांसह विविध संघटनांकडून हाेणाऱ्या विराेधापुढे झुकत अखेर जिल्हा प्रशासनाने बुधवारपासून (३१ मार्च) औरंगाबादेत लागू हाेणारा कडक लाॅकडाऊनचा निर्णय मागे घेतला. मंगळवारी रात्री साडेदहाच्या सुमारास जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेऊन हा निर्णय जाहीर केला. खासदार इम्तियाज जलील यांनी प्रशासनाच्या या निर्णयाचे स्वागत केले असून बुधवारी काढण्यात येणारा माेर्चाही रद्द करण्यात आल्याची घाेषणा पत्रकारांशी बाेलताना केली.
4 वर्षांपूर्वी -
कोरोनाचं वास्तव आणि भाजपचं राजकारण | काय आहे पूर्ण सत्य | राज्य सरकार अंधारातच
सध्या राज्यातील एकूण वातावरण कोरोनाच्या स्थितीवरून तापतंय की तापवलं जातंय याचा संपूर्ण विषय सखोलपणे समजून घेतल्यास अनेक अंदाज येतील यात महाराष्ट्र विरोधी षडयंत्र तर नाही ना? त्याला एकूण कारणं देखील तशीच आहेत. नुकतंच नागपुरात देवेंद्र फडणवीस यांनी सरकार लोकडाऊन करण्याचा निर्णय घेणार असेल तरी आम्ही त्याला टोकाचा विरोध करणार नाही असं वक्तव्य केलं. मात्र दुसऱ्याबाजूला इतर राज्यांमध्ये निवडणुका असताना तेथे कोरोना वाढत नाही आणि महाराष्ट्रात का वाढतो आहे असं पिल्लू सोडून इथे सरकार आणि आरोग्य यंत्रणा काहीच करत नाही असा अप्रत्यक्ष संदेश दिला. त्यानंतर संजय राऊतांनी देखील प्रसार माध्यमांशी बोलताना कोरोनासंबंधित विषयावर भाष्य केलं.
4 वर्षांपूर्वी -
पुणे | कोरोनामुळे लॉकडाउन नाही | पण 31 मार्च पर्यंत केवळ कडक निर्बंधांची घोषणा
पुण्यात लॉकडाउनच्या चर्चा सुरू असतानाच विभागीय आयुक्तांनी लॉकडाउन लागणार नाही असे गुरुवारी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुण्याच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. यामध्ये भाजप नेते चंद्रकांत पाटील यांचीही उपस्थिती होती. त्यामध्ये सरसकट लॉकडाउन न लावता केवळ कडक निर्बंध लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
4 वर्षांपूर्वी -
अमरावतीत आठवडाभरासाठी लॉकडाऊन जाहीर | जीवनावश्यक वस्तूंची सेवा सुरू राहणार
राज्याच्या महिला आणि बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी मोठी घोषणा केली आहे. अमरावतीत येत्या आठवड्यात लॉकडाऊन असणार आहे. हा लॉकडाऊन सोमवारी ( 22 फेब्रुवारी) संध्याकाळी आठ वाजेपासून अमरावती शहर, अचलपूर शहर आठवड्याभरासाठी घोषित करण्यात आला आहे. हा लॉकडाऊन सात दिवसांसाठी असणार आहे. विशेष म्हणजे राज्यात अनलॉकनंतर हा पहिलाच लॉकडाऊन असेल.
4 वर्षांपूर्वी -
मुंबईत कोविड-19 चा वाढता प्रादुर्भाव | BMC ने 1,305 इमारती सील केल्या
मागील काही दिवसांपासून मुंबईत कोरोना बाधितांचा आकडा मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसत आहे. यामुळे मुंबई पालिका अधिक सतर्क झाली असून काही नियमही लागू करण्यात आले आहेत. त्याचबरोबर नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईही करण्यात येणार आहे. काल मुंबईत 823 नवे कोरोना बाधित रुग्ण आढळून आले. त्यामुळे नव्या नियमानुसार बीएमसीने शहरातील तब्बल 1305 इमारती सील केल्या आहेत. दरम्यान, 5 हून अधिक कोरोनाग्रस्त आढळलेल्या इमारती सील करण्याचा नवा नियम पालिकेने लागू केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
कोरोना नव्या स्ट्रेनचा परिणाम | ऑस्ट्रेलियात निर्बंध लागू | जपानमध्ये आणीबाणी
राज्यासह देशभरात कोरोना लसीकरणाचा दुसरा सराव (ड्राय रन) शुक्रवारी घेतला जात आहे. देशात कोरोना लसीकरणाची तयारी अंतिम टप्प्यात आहे. याबाबत गुरुवारी केंद्राने सर्व राज्ये, केंद्रशासित प्रदेशांना पत्र लिहिले आहे. त्यात म्हटले आहे की, ‘राज्यांनी आपली सज्जता ठेवावी. लसीची पहिली खेप लवकरच उपलब्ध करून दिली जाणार आहे.’ केंद्रीय आरोग्य मंत्रालयानुसार, केंद्रशासित प्रदेशासंह १९ राज्यांना पुरवठादारांच्या माध्यमातून तर इतर १८ राज्यांना सरकारी मेडिकल स्टोअर डेपोतून कोरोना लस मिळेल. लसीच्या वाहतुकीसाठी भारतीय वायुदल आणि व्यावसायिक विमान कंपन्यांच्या विमानांचा वापर केला जाईल.
4 वर्षांपूर्वी -
महाराष्ट्रातील 8 प्रवाशांमध्ये नवीन कोरोनाची लक्षणे | आरोग्यमंत्र्यांची माहिती
कोरोना विषाणूच्या नव्या स्ट्रेनने अखेर महाराष्ट्रात एंट्री केली आहे. ब्रिटनमधून परतलेल्या महाराष्ट्रातील 8 प्रवाशांमध्ये नवीन कोरोनाची लक्षणे आढळून आल्याची माहिती खुद्द आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. त्यामुळे महाराष्ट्राची चिंता पुन्हा वाढली आहे.
4 वर्षांपूर्वी -
कोव्हॅक्सिनवरून राजकारण | भारत बायोटेकच्या प्रमुखांचं स्पष्टीकरण
भारतात दोन कोरोना लशींना मंजुरी देण्यात आली आहे. त्यापैकी एक लस स्वदेशी लस COVAXIN आहे. तिसऱ्या टप्प्यातील ट्रायल पूर्ण होण्याआधीच या लशीला मंजुरी दिल्यानं अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या लशीच्या सुरक्षितेबाबत आणि प्रभावाबाबत शंका व्यक्त केल्या जात आहेत. याबाबत आता भारत बायोटेकनंच सडेतोड उत्तर दिलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
कोव्हॅक्सिनवर अद्याप तिसऱ्या टप्प्यातील चाचणी अपूर्ण | तरी मान्यता मिळाल्याने आक्षेप
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन देशात कोरोना लशीच्या आपत्कालीन वापराला परवानगी दिल्याचा आनंद व्यक्त केला. तसेच, भारत देश आत्मनिर्भर होत आहे, याचं हे पहिलं पाऊल असल्याचंही मोदींनी म्हटलं. देशात कोरोना लसीच्या परवानगीची आनंदी बातमी मराठमोळ्या डॉक्टरने अधिकृतपणे दिली, देशवासियांसाठी आणि महाराष्ट्रासाठी हा अभिमानाचा क्षण आहे. त्यामुळे, मोदींनीही आनंद व्यक्त करत वैज्ञानिकांनी देशवासीयांचं स्वप्न पूर्ण केल्याचं म्हटलंय.
4 वर्षांपूर्वी -
कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमचा पर्याय निवडता येणार | केंद्र सरकारकडून ड्राफ्ट जारी
कोरोना आपत्ती जाहीर झाल्यानंतर भारत सरकारने लॉकडाउन जाहीर केला आणि सामान्य कर्मचाऱ्यांसोबतच कंपन्यांवर संकट ओढवलं आहे. लॉकडाउनमुळे कर्मचाऱ्यांना घराबाहेर पडणं अशक्य झालं आणि त्यावर तोडगा म्हणून शेकडो कंपन्यांनी वर्क फ्रॉम होमचा पर्याय खुला केल्याने इंटरनेट आधारित कामं करणं शक्य झालं. विशेष म्हणजे त्यामुळे कंपन्यांच्या एकूण ऑपरेटिंग कॉस्टमध्ये देखील घाट झाल्याचं पाहायला मिळालं. त्याचा सर्वाधिक फायदा आयटी क्षेत्रातील कंपन्यांना झाला.
4 वर्षांपूर्वी