Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
मुंबई हायकोर्टाच्या निकालाला राज्य सरकार सुप्रीम कोर्टात आव्हान देणार - गृहमंत्री
सध्याचा काळ अत्यंत अवघड आणि चॅलेंजिंग आहे. परंतु, गृहमंत्रीपदाची जबाबदारी मी पार पाडण्याचं काम करेन, असं सांगतानाच प्रशासकिय कामात कोणताही राजकीय हस्तक्षेप करणार नाही, अशी ग्वाही राज्याचे नवे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिली.
4 वर्षांपूर्वी -
अनिल देशमुख यांचा राजीनामा | दिलीप वळसे पाटील होणार राज्याचे नवे गृहमंत्री
महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी गृहमंत्र्यांवर केलेल्या वसुलीच्या आरोपांच्या चौकशीचे आदेश हायकोर्टाने सीबीआयला दिले. सीबीआयला यासंदर्भात 15 दिवसांत अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. यानंतर अडचणीत सापडलेल्या अनिक देशमुख यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला. राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.
4 वर्षांपूर्वी -
नोंदणीकृत बांधकाम कामगारांसाठी खुशखबर | राज्यातील १० लाख कामगारांना लाभ मिळणार
कोरोनाने घातलेले थैमान पाहता देशातील लॉकडाऊन वाढतच गेला. त्यामुळे उद्योगधंदे, कामगारांवर याचा परिणाम झाला आहे. लॉकडाऊन कालावधीत राज्यातील इमारत आणि इतर बांधकामे बंद झाली होती. बांधकाम कामगारांना काम नसल्याने दररोज रोजगार मिळत नाही. त्यामुळे दैनंदिन जीवनातील मूलभूत गरजा भागविण्यासाठी त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. पण आता बांधकाम कामगारांना यातून दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारने एप्रिल महिन्यात घेतलं होता आहे. बांधकाम कामगारांच्या खात्यात थेट २ हजार रुपये देण्याचा निर्णय झाला होता.
5 वर्षांपूर्वी