Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
VIDEO | दिशा सालियान प्रकरणी CBI'ची 72 दिवसांनी एंट्री झाल्याचे नितेश राणेंनी म्हटलेले, 24 मार्चची ती राजकीय नौटंकी होती?
Disha Salian Death Case | दिशा सालियान प्रकरणात राज्य सरकारने एसआयटी चौकशीची घोषणा केली आहे. सुशांत सिंह राजपूत आणि दिशा सालियान प्रकरण एकमेकांशी जोडलेलं असल्याचा आरोप राणे कुटुंबाकडून करण्यात येत होता, तसंच सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूची चौकशी करताना सीबीआयने दिशा सालियानच्या मृत्यूचीही चौकशी केल्याचा दावा केला गेला, पण याबाबत आता सीबीआयने स्पष्टीकरण दिलं आहे.
2 वर्षांपूर्वी -
दिशा सालियनच्या आई-वडिलांना माध्यमांना भेटण्यास बंदी, सुरक्षा वाढवली, टोकाचं पाऊल उचलल्यास शिंदे-फडणवीसांना भोवणार?
BIG BREAKING | दिशा सालियन मृत्यू प्रकरणात आज सत्तांधाऱ्यांनी अनके प्रश्न उपस्थित केले. त्यानंतर या सगळ्या प्रकरणाची चौकशी एसआयटीच्या माध्यमातून होईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. दिशा सालियनच्या कुटुंबियांची सुरक्षा वाढवण्यात आलीय. दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणावर आज विधानसभेत मुद्दा आला. त्यानंतर दिशाच्या आई-वडिलांना प्रसारमाध्यमांना भेटण्यास बंदी घालण्यात आली आहे. कारण, आम्हालाही आत्महत्या करावीशी वाटतेय असं सांगताना, जर हे थांबलं नाही तर आम्हीही टोकाचं पाऊल उचलू. यासाठी राजकारणीच जबाबदार असतील असं दिशाच्या आईनं यापूर्वीच प्रसार माध्यमांसमोर सांगितलं होतं.
2 वर्षांपूर्वी -
BMC इलेक्शन फिल्डिंग | मुख्यमंत्री शिंदे भ्रष्टाचार आरोपाच्या कचाट्यात अडकताच तुम्ही चौकशीची मागणी करा, मी चौकशी लावतो हे ठरलेलं?
Disha Salian Case | भाजप आमदार अमित साटम यांनी दिशा सालियन प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी करण्याची मागणी विधानसभेत केली होती. त्यानंतर इतर सदस्यांनी साटम यांची ही मागणी उचलून धरली. भाजपच्या महिला आमदारांनीही या प्रकरणाचं सत्य बाहेर आलंच पाहिजे, अशी मागणी केली होती. त्यामुळे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सदस्यांची ही मागणी मान्य करत हे प्रकरण एसआयटीकडे सोपवत असल्याचं जाहीर केलं. दिशा सालियन प्रकरणाची एसआयटीकडून चौकशी केली जाईल. ज्यांच्याकडे या प्रकरणाचे काही पुरावे असतील तर त्यांनी ते पोलिसांना द्यावेत, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. मात्र सत्ताधाऱ्यांच्या बैठकीत हे सर्व आधीच ठरलं होतं असा आरोप करण्यात येतं आहे.
2 वर्षांपूर्वी