Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
पाकिस्ताननं भारताविरोधात आक्रमक होण्यापेक्षा दहशतवादावर कारवाई करावी: अमेरिका
भारतानं कलम ३७० हटवल्यानंतर त्याचे तीव्र पडसाद पाकिस्तानात उमटले आहेत. पाकिस्तान भारताविरोधात आक्रमक झाला असून, पाकिस्तानने बुधवारी (७ ऑगस्ट) भारतासोबतचे द्विपक्षीय व्यापारी संबंध तोडले आहेत. याशिवाय भारतासोबतचे मुत्सद्दी संबंध सुद्धा डाऊनग्रेड केले आहेत. त्यानंतर आता अमेरिकेनंही त्यांना इशारा दिला आहे. पाकिस्ताननं भारताविरोधात आक्रमक होण्याऐवजी दहशतवादावर कारवाई करावी, असे खडे बोल पाकिस्तानला सुनावले आहेत.
6 वर्षांपूर्वी -
अमेरिकेच्या टेक्सासमध्ये झालेल्या गोळीबारात २० जणांचा मृत्यू
अमेरिकेच्या टेक्सास शहरात शनिवारी एका अज्ञात हल्लेखोराने बेछूट गोळीबार केला. या गोळीबारात २० लोकांचा मृत्यू झाला. टेक्सासच्या एल पासो परिसरात वॉलमार्टमध्ये ही घटना घडली. या गोळीबारात २४ पेक्षा अधिक जण जखमीदेखील आहेत. हा हल्ला २१ वर्षीय तरुणाने केला असून सीएनएनच्या वृत्तानुसार संशयित व्यक्तीचा फोटो मिळाला आहे.
6 वर्षांपूर्वी -
विरोधक मनसेलाचं नाही, तर डोनाल्ड ट्रम्प यांना देखील सोबत घेतील: संजय राऊत
राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या तारखा जसजशा जवळ येत आहेत तशी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये टोलेबाजी सुरु झाली आहे. राज्यातील राजकीय वर्तुळात सध्या विधानसभा निवडणुकीचे वारे जोरात वाहत आहे. सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकीची जय्यत तयारी सुरु केली आहे. सत्ताधारी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेला पायउतार करण्यासाठी कॉंग्रेसकडून इतर पक्षांसोबत आघाडी करण्यासाठी हालचाल केली जात आहे. यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कॉंग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतल्याने कॉंग्रेस आघाडीत महाराष्ट्र नवनिर्माण सेने सहभागी होणार असल्याची जोरदार चर्चा आहे.
6 वर्षांपूर्वी -
जी-२० परिषद: मोदी-ट्रम्प भेटीत चार महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर चर्चा
जपानच्या ओसाकामध्ये सुरू असलेल्या जी-२० परिषदेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनल्ड ट्रम्प यांची भेट झाली. यावेळी ट्रम्प यांनी लोकसभा निवडणुकीतील विजयाबद्दल नरेंद्र मोदींचं अभिनंदन देखील केलं. तर नरेंद्र मोदींनी या भेटीत एकूण ४ महत्वाच्या मुद्द्यांचा उल्लेख केला. यानंतर या दोन्ही नेत्यांनी जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांच्याशी देखील अनेक विषयांना अनुसरून चर्चा केली.
6 वर्षांपूर्वी -
रशियन एस-४०० खरेदी व्यवहार: ट्रम्प यांची भारताला पुन्हा धमकी
भारत रशियाकडून अत्याधुनिक एस-४०० क्षेपणास्त्र खरेदी करणार आहे. दरम्यान याच पार्श्वभूमीवर अमेरिकेकडून हा व्यवहार थांबवण्याचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. त्यातच अमेरिकेने भारताला पुन्हा एकदा धमकी दिली आहे. भारताचा हा निर्णय दीर्घ कालावाधीसाठी भारताच्याच हिताचा नसेल, असे अमेरिकेकडून सूचित करण्यात आले आहे. तसेच या व्यवहारामुळे दोन्ही देशांच्या परस्पर भागीदारीवर देखील विपरीत परिणाम होऊ शकतो, अशी धमकी देखील अमेरिकेकडून देण्यात आली. दरम्यान, अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माइक पोंपियो यांच्या भारत दौऱ्यापूर्वी ओसाका येथील जी-२० परिषदेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
6 वर्षांपूर्वी -
भारताने अमेरिकन बाइकवरील आयातशुल्क ५०% करून सुद्धा ट्रम्प यांच्याकडून नाराजी
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारत सरकारच्या उद्योगिक संबंधांवर टीका केली आहे. भारत सरकार यापूर्वी अमेरिकेच्या मोटारसायकलवर १०० टक्के आयात शुल्क आकारत होता. आता जरी त्यांनी तो ५०% इतका केला असला तरी देखील तो जास्तच आहे असं सूर लावला आहे. आमच्या सरकारला हे मान्य नाही, असं मत व्यक्त करत डोनाल्ड ट्रम्प यांनी संताप व्यक्त केला आहे.
6 वर्षांपूर्वी -
ट्रम्प यांचा मोदी सरकारला दणका; भारताचा जिएसपी दर्जा हटवणार; निर्यातदार धास्तावले
अमेरिकेतील ट्रम्प प्रशासनाने भारतातील मोदी सरकारला चांगलाच दणका दिला आहे. त्यामुळे आधीच आर्थिक विषयांना अनुसरून चिंतेत असलेली भारतीय अर्थव्यवस्था अजून खाली जाऊ शकते असं म्हटलं जात आहे. कारण अमेरिकेने भारतातील व्यापाराला प्रोत्साहन म्हणून दिलेला जीएसपी (जनरलाईज सिस्टीम ऑफ प्रेफरन्स) दर्जा येत्या ५ जून पासून काढून घेण्याचा निर्णय घेतला आहे.
6 वर्षांपूर्वी -
अमेरिकेत ग्रीन कार्ड ऐवजी बिल्ड अमेरिका व्हिसा
अमेरिकेत मागील अनेक वर्ष विदेशी नागरिकांच्या अमेरिकेतील कायम वास्तव्यासाठी ग्रीन कार्ड दिले जात होते. मात्र आता ती पद्धत बंद करण्यात येणार असून त्याऐवजी ‘बिल्ड अमेरिका व्हिसा’ पद्धत लागू करण्याचे तेथील ट्रम्प प्रशासनाने निश्चित केले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले की, जगातील कोणत्याही माणसाला अमेरिकेत येण्यास बंदी नसेल. तुम्ही कोणत्याही देशात जन्मलेले असा तुमच्याशी कसलाही भेदभाव न करता तुम्हाला अमेरिकेत कायम स्वरूपी राहण्यासाठी ही नवीन व्हिसा पद्धत सुरू केली जाणार आहे.
6 वर्षांपूर्वी -
हुवेई कंपनी विरोधात? सायबर हल्ल्याची भीतीने ट्रम्प यांच्याकडून अमेरिकेत आणीबाणी
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्रीय आणीबाणी घोषीत केली आहे. परकीय शत्रूंपासून अमेरिकेच्या कॉम्प्युटर नेटवर्क्सना वाचवण्यासाठी ट्रम्प यांनी हे तडकाफडकी पाऊल उचललं आहे. यामुळे अमेरिकेच्या स्थानिक कंपन्यांना राष्ट्रीय सुरक्षेत अडचणी आणणाऱ्या परदेशी टेलिकॉम कंपन्यांची सेवा वापरने शक्य होणार नाही. ट्रम्प यांनी याबद्दलच्या आदेशावर स्वाक्षरी केल्याची अधिकृत माहिती व्हाईट हाऊसच्या माध्यम सचिव सारा सँडर्स यांनी दिली.
6 वर्षांपूर्वी -
अमेरिकेत चीनी वस्तूंवर तब्बल २५% कर आकारला जाणार
अमेरिकेशी चीनची चर्चा फिस्कटली असून अमेरिका आणि चीनमधील व्यापारी युद्ध आता अधिकच विकोपाला जाण्याची शक्यता आहे. व्यापार व्यवहार वाचविण्यासाठी झालेल्या अंतिम बैठकीदरम्यान अमेरिकेने २०० अब्ज डॉलरच्या चीनी उत्पादनांवरील आयात कर १० टक्क्यांनी वाढवून तो तब्बल २५ टक्के इतका वाढवला आहे. त्यामुळे आता चीनमधून आयात होणाऱ्या वस्तूंवर २५ टक्के आयातकर आकारला जाणार आहे. मात्र चीननेदेखील यावर योग्य ती कारवाई केली जाईल अशी थेट धमकी ट्रम्प प्रशासनाला दिली आहे.
6 वर्षांपूर्वी -
ट्रम्प यांचा मोदी सरकारला झटका; 'व्यापार संधी' तोडली
अमेरिकेने भारत आणि तुर्कस्तानशी असलेली व्यापार संधी (GSP) तोडली असून विशेष व्यापारी सूट देण्याचा दर्जा काढून घेतला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज सिनेटमध्ये ही अधिकृत माहिती दिली. ट्रम्प यांच्या या निर्णयाचा मोठा परिणाम भारतावर जाणवणार असून अधिसूचना जारी झाल्यानंतर २ महिन्यांनी हा बदल लागू होणार आहे. GSP अंतर्गत अमेरिकेमध्ये भारताला करासंदर्भात विशेष सूट दिली जात होती. ठराविक रकमेच्या आयात मालावर अमेरिका आयातकर आकारत नव्हती.
6 वर्षांपूर्वी -
भारत-पाकिस्तान शत्रुत्त्वामुळे अनेक लोकांना आपले जीव गमवावे लागतील: डोनाल्ड ट्रम्प
पुलवामा जिल्ह्यातील भ्याड हल्ल्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील परिस्थिती चिघळताना दिसत आहे. जागतिक बलाढ्य देश असलेल्या अमेरिकेतून देखील सतर्कतेचे इशारे दिले जात आहेत. भारत आणि पाकिस्तानमधील परिस्थिती अतिशय भयानक आहे, असे अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. १४ फेब्रुवारी रोजी झालेल्या पुलवामा दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. तसेच भारत आता मोठ्या कारवाईच्या तयारीत आहे, असे ट्विटदेखील त्यांनी केले आहे. त्यांनी पाकिस्तानला सज्जड दम दिला असून १३० कोटी रुपयांची मदत रोखली आहे. पाकिस्तानने अमेरिकेचा विश्वासघात केला असेही ते म्हणाले. दरम्यान, पाकिस्तान आर्थिक अडचणीत असताना ट्रम्प यांनी उचलेलं हे पाऊल म्हणजे भारतासाठी एक प्रकारे मदत समजली जात आहे.
6 वर्षांपूर्वी -
अमेरिकेत राष्ट्रीय आणीबाणी जाहीर करण्याचे डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
अमेरिकेत अवैधरीत्या घुसणाऱ्या लोकांना रोखण्यासाठी देशाच्या दक्षिण मेक्सिको सीमेवर मोठी भिंत उभारण्यासाठी आपण लवकरच राष्ट्रीय आणीबाणी घोषित करण्याच्या विचारापर्यंत पोहोचलो आहोत, असे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अप्रत्यक्ष संकेत दिल्याचे वृत्त आहे.
6 वर्षांपूर्वी -
डोनाल्ड ट्रम्प यांचा अमेरिकेत आणीबाणी लादण्याचा इशारा
अमेरिका-मेक्सिको सीमेवर भिंत बांधण्यासाठीचा निधी अमेरिकी काँग्रेसने अनेक दिवसांपासून रोखून धरला आहे. त्यामुळे अमेरिकेत ‘शटडाउन’ सुरू आहे. दरम्यान, त्याअनुषंगाने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिका-मेक्सिको सीमाभागाचा दौरा केला. त्यानंतर केलेल्या पाहणीत त्यांनी देशात थेट आणीबाणी लादण्याचा इशारा पुन्हा एकदा पत्रकारांशी संवाद साधताना दिला आहे.
6 वर्षांपूर्वी -
ऐन ख्रिसमसमध्ये अमेरिकेत 'शटडाऊन; सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार रखडले
अमेरिका आणि मेक्सिको दरम्यानच्या सीमेवर भिंत उभारण्यासाठी ५ अब्ज अमेरिकी डॉलर मंजूर व्हावेत, ही अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची मागणी अमेरिकी काँग्रेसमध्ये नामंजूर करण्यात आल्याने अमेरिकेच्या कारभाराला सरकारी कामकाजाला मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तविण्यात येते आहे.
6 वर्षांपूर्वी -
अमेरिकेचे संरक्षण सचिव जेम्स मॅटिस यांचा तडकाफडकी राजीनामा
अमेरिकेचे संरक्षणमंत्री जेम्स मॅॅटिस यांनी त्याच्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना केवळ त्यांच्या मातांशी सहमत असणारे लोकं महत्वाच्या पदावर हवे असल्याने मी माझ्या पदाचा राजीनामा देत आहे असे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे.
6 वर्षांपूर्वी -
व्हिडिओ: असा झाला डोनाल्ड ट्रम्प यांचा CNN च्या पत्रकारासोबत वाद
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना CNN चा पत्रकाराचा प्रश्न झोंबल्याने त्यांचा त्या पत्रकारासोबत वाद झाला. विशेष म्हणजे या वादानंतर पत्रकाराचे थेट ओळखपत्र सुद्धा काढून घेण्यात आले. जिम अकोस्टा असे या संबंधित पत्रकाराचे नाव असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याने डोनाल्ड ट्रम्प यांना थेट विस्थापितांबाबतचा प्रश्न विचारला असता ही घटना घडली.
7 वर्षांपूर्वी -
डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का; डेमॉक्रेटीक पक्षाची बहुमताकडे घोडदौड
सध्या अमेरिकेतील मध्यावधी निवडणुकीचे निकाल जाहीर होण्यास सुरुवात झाली असून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाने अमेरिकी सिनेटमध्ये वर्चस्व राखण्यात यश प्राप्त केले आहे. परंतु, अमेरिकी हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटीव्हमध्ये डेमॉक्रेटीक पक्षाने पुन्हा जोरदार मुसंडी मारल्याने तो डोनाल्ड ट्रम्प यांना राजकीय धक्का असल्याचे राजकीय जाणकारांना वाटतं आहे.
7 वर्षांपूर्वी -
मोदींच्या इच्छेला नकार, प्रजासत्ताक दिनी ट्रम्प यांचा भारतात येण्यास नकार
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रजासत्ताक दिनी मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहण्याची मोदींच्या विनंतीला सपशेल नकार दिल्याने पंतप्रधान मोदींना राजकीय धक्का बसला आहे. अर्थात लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर स्वतःला आंतरराष्ट्रीय नैतृत्व म्हणून प्रदर्शन करण्याचा त्यांचा अप्रत्यक्ष हेतू सुद्धा धुळीस मिळाल्याचे अनेक राजकीय विश्लेषकांनी म्हटलं आहे.
7 वर्षांपूर्वी -
एस-४०० करार : भारताला लवकरच CAATSA निर्बंधांबाबतचा कळेल : डोनाल्ड ट्रम्प
काऊंटरिंक अमेरिकाज एडवर्ड्सरीज थ्रू सेक्शन्स अॅक्ट अर्थात CAATSA अंतर्गत अमेरिकेकडून घालण्यात येणाऱ्या निर्बंधांबाबत भारत सरकारला लवकरच माहिती कळेल, असे स्पष्ट संकेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले आहेत. त्यामुळे कालांतराने भारताच्या आर्थिक अडचणी वाढल्यास आश्चर्य वाटायला नको.
7 वर्षांपूर्वी