Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
ED Director Sanjay Mishra | संजय मिश्रा यांना ईडीच्या संचालकपदी कायम ठेवण्यावर सरकार ठाम का आहे? सुप्रीम कोर्टात दिली कारणं
ED Director Sanjay Mishra | सक्तवसुली संचालनालयाचे संचालक संजयकुमार मिश्रा यांच्या सेवेला मुदतवाढ मिळावी यासाठी केंद्र सरकारने पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. खरे तर ११ जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयाने एक निकाल दिला होता, ज्यात ३१ जुलैपर्यंत नवीन संचालक नेमण्याचे सांगण्यात आले होते. फायनान्शिअल अॅक्शन टास्क फोर्सच्या (एफएटीएफ) पुनरावलोकनामुळे मिश्रा यांची नियुक्ती महत्त्वाची असल्याचे सरकारने बुधवारी सर्वोच्च न्यायालयाला सांगितले. सध्या सरकारच्या याचिकेवर गुरुवारी दुपारी सुनावणी होणार आहे.
2 वर्षांपूर्वी -
३१ जुलैपर्यंत कार्यालय खाली करा! ईडीचे संचालक संजय कुमार मिश्रा यांची मुदतवाढ बेकायदेशीर, सुप्रीम कोर्टाचा मोदी सरकारला धक्का
ED Director Sanjay Mishra | सक्तवसुली संचालनालयाचे संचालक संजय कुमार मिश्रा यांचा कार्यकाळ वाढवल्याप्रकरणी केंद्र सरकारला मोठा धक्का बसला आहे. सर्वोच्च न्यायालयाने त्यांची मुदतवाढ बेकायदेशीर ठरवत त्यांना पद सोडण्यासाठी ३१ जुलैपर्यंतची मुदत दिली आहे. त्यांना तिसरी मुदतवाढ देणे बेकायदेशीर असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. तथापि, न्यायालयाने डीएसपीई आणि सीव्हीसी कायद्यातील सुधारणा कायम ठेवल्या, ज्यानुसार सरकार सीबीआय आणि ईडी च्या संचालकांना दोन वर्षांच्या निश्चित कार्यकाळानंतर तीन वर्षांपर्यंत मुदतवाढ देऊ शकते.
2 वर्षांपूर्वी