Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
शाळेने फी भरण्यासाठी सतावलं | दहावीच्या विद्यार्थ्याने केली आत्महत्या
लॉकडाऊनमध्ये सर्व शाळा बंद आहेत. देशात सर्वत्र सध्या ऑनलाईन अभ्यास सुरु असून विद्यार्थ्यांच्या साधन सामुग्रीचाच वापर करून शिक्षण सुरु आहे. शाळांना देखील कोणत्याही ऑनलाईन पेड प्लॅटफॉर्मचा खर्च उरलेला नाही. त्यात अनेक शाळांनी तर फी घेऊन देखील पुस्तकांचं वितरण केलेलं नाही. देशात सर्वत्र सध्या आर्थिक चणचण सुरु असून सर्वच घरं त्यात भरडली गेली आहेत. त्यामुळे पालकांना देखील शाळेच्या फी भरण्यात अडचणी येत आहेत.
5 वर्षांपूर्वी -
नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात व्यावसायिक शिक्षणावर जोर, १०वी-१२वीचं महत्त्व कमी होणार
महाराष्ट्र बोर्डाच्या दहावीच्या परीक्षेचा निकाल लागला त्याच दिवशी दिल्लीत मोदी सरकारने शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल करण्याचं घोषित केलं आहे. यापुढे दहावी, बारावी बोर्डाची परीक्षा नसेल किंवा फारशी महत्त्वाची नसेल, असंच या शिक्षण सुधारणा धोरणातून स्पष्ट होतं. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर आणि रमेश पोखरियाल यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीतले महत्त्वाचे निर्णय जाहीर केले.
5 वर्षांपूर्वी -
गुडन्यूज: आता कला, संगीत, शिल्प, खेळ, योग, समाजसेवा विषय अभ्रासक्रमातच सामिल
केंद्र सरकारने बुधवारी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत दोन मोठे निर्णय घेतले. केंद्र सरकारने आता देशात आता नव्या शैक्षणिक धोरणाला मंजुरी दिली आहे. त्याच बरोबर मनुष्यबळ विकास मंत्रालयाचं नावही बलदण्यात आलं असून त्याला आता शिक्षण मंत्रालय असं म्हटलं जाणार आहे. १९९२ नंतर पहिल्यांदाच शैक्षणिक धोरणात बदल करण्यात आला आहे.
5 वर्षांपूर्वी -
नवीन शैक्षणिक धोरणाला केंद्र सरकारकडून मंजूरी, ३४ वर्षानंतर होतोय बदल
केंद्रीय मंत्रिमंडळानं नव्या शैक्षणिक धोरणाला मंजुरी दिली आहे. १९८६ मध्ये तयार केलेल्या शैक्षणिक धोरणाची जागा आता ‘शैक्षणिक धोरण २०१९’ घेणार आहे. याअंतर्गत देशात शिक्षण व्यवस्थेत मोठ्या प्रमाणात बदल केले जाणार आहेत. नव्या शैक्षणिक धोरणानुसार शिक्षणाचा अधिकार या कायद्याला अधिक व्यापक रूप देण्यात येणार आहे. आता ३ वर्षांपासून १८ वर्षांपर्यंतल्या मुलांना शिक्षणाचा अधिकार या कायद्यांतर्गत आणलं जाणार आहे.
5 वर्षांपूर्वी -
इयत्ता ८वीच्या अभ्यासक्रमातील पुस्तकात कुर्बान हुसेन यांच्या उल्लेखाबाबत बालभारतीचं स्पष्टीकरण
राज्य शिक्षण प्रसारक मंडळाकडून बालभारतीच्या पुस्तकात मोठी चूक झाल्याचं उघडकीस आहे. बालभारतीच्या इयत्ता आठवीच्या अभ्यासक्रमातील पुस्तकात क्रांतिकारक भगतसिंह, राजगुरू यांच्यासह फासावर गेलेल्या सुखदेव यांच्याऐवजी कुर्बान हुसेन या नावाचा उल्लेख केल्यानं एकच खळबळ उडाली आहे. आठवीच्या अभ्यासक्रमात असलेल्या पुस्तकातील एका धड्यात भगतसिंह, राजगुरु यांच्यासह कुर्बान हुसेन फासावर गेल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. दरम्यान राज्य शिक्षण प्रसारक मंडळाकडून ही घोडचूक कशी झाली याबाबत स्पष्टीकरण देण्यात आलं आहे.
5 वर्षांपूर्वी