Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
VIDEO | शिंदे गटाच्या सरकारचं काय चाललंय?, मंत्रालयात शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न, तर मराठा क्रांती मोर्चाचा कार्यकर्ता सुद्धा त्याच प्रयत्नात
VIDEO | शिंदे-फडणवीस सरकारचे पावसाळी अधिवेशन मुंबईत सुरू आहे. अधिवेशन सुरू असतानाच मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते मंत्रालयाच्या छतावर चढले आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी कार्यकर्त्यांनी मंत्रालयाच्या छतावर जाऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. युवराज चौहान असं या कार्यकर्त्याचं नाव आहे.
3 वर्षांपूर्वी -
शिंदेंचं बंड स्वबळावर नव्हे तर भाजप पुरस्कृत | कोर्टाच्या निकालानंतर महाराष्ट्रात निवडणुका होतील
आज शिवसेनेचे माजी खासदार अनंत गितेंनी मोठं वक्तव्य केलं होतं. छगन भुजबळ आणि नारायण राणे यांनी जे बंड केलं ते बंड स्वबळावर केलं होतं. एकनाथ शिंदे यांचं बंड भाजप पुरस्कृत आहे अशी घणाघाती टीका शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार अनंत गीते यांनी रत्नागिरीत केली आहे. एवढंच नाही तर शिवसेनेने यापुढील सर्व निवडणुका स्वबळावर लढवाव्यात असंही त्यांनी म्हटलं आहे.
3 वर्षांपूर्वी -
शिंदेजी! या नीच, लबाड राक्षसी वृत्तीच्या व्यक्तीपासून सावध रहा | अनिल गोटेंचा मुख्यमंत्री शिंदेंना पत्रातून सल्ला
महाराष्ट्राच्या राजकारणात एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ झाली. २९ जूनला उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. ३० जूनला राज्यात नवं सरकारही आलं. दुपारी ३ वाजेपर्यंत हीच चर्चा होती की देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी हे जाहीर केलं की एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री होतील.
3 वर्षांपूर्वी -
एकनाथ शिंदेंनी बंडखोर आमदारांना या 'गेम प्लॅन' पासून ठेवलंय अंधारात | शिंदे आणि भाजपचा गेम प्लॅन बाहेर येतोय
विधान परिषदेच्या निर्णयाच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे २१ जून रोजी एकनाथ शिंदे यांनी बंड केले. या बंडखोरीमुळे राज्यात आणि महाविकास आघाडीत प्रचंड उलथापालथ झाली आहे. आम्ही बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आहोत, असे सांगून एकनाथ शिंदे गट बाहेर पडला असल्याने सरकार तसेच शिवसेना पक्ष वाचवण्याचे आव्हान उद्धव ठाकरे यांच्यासमोर आहे. हिंदुत्वासाठी आम्ही पुढे आलो आहोत, असंही त्यांनी म्हटलं आहे.
3 वर्षांपूर्वी -
उच्च न्यायालयात न गेल्याने सुप्रीम कोर्टाने शिंदे गटाला फटकारले | कायदेशीर लढाई ११ जुलै पर्यंत लांबली
महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाचा आता नवीन अंक सुरू झाला आहे. शिवसनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र सर्वोच्च न्यायालयाने एकनाथ शिंदे गटाला फटकारले आहे. न्यायालयाने एकनाथ शिंदे गटाला मुंबई उच्च न्यायालयात का गेला नाही, अशी विचारणा केली आहे. तसंच, उपाध्यक्षांवर प्रश्न कसे उपस्थितीत करू शकता, असा सवालही केला आहे.
3 वर्षांपूर्वी -
Maharashtra Political Crisis | सर्वोच्च न्यायालयाचा निकाल विरोधात गेल्यास भाजपाचा पॉलिटिकल प्लॅन तयार
एकनाथ शिंदेंसह जवळपास ३८ ते ४० आमदारांनी बंडखोरी केल्यानं राजकीय वादळ निर्माण झालं आहे. दिवसेंदिवस दोन्ही बाजूंनी आक्रमक भूमिका घेतल्या जात असल्याचं दिसत आहे. शिवसेनेनं १६ आमदारांचं सदस्यत्व रद्द करण्याची मागणी केलीये. यावरूनच आता हे बंड सर्वोच्च न्यायालयात जाऊन पोहोचलं आहे. एकनाथ शिंदेंसह १६ आमदारांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून, त्यावर आज सुनावणी होणार आहे.
3 वर्षांपूर्वी -
शिंदे फसले? | शिंदेंसहित बंडखोर आमदारांची राजकीय विकेट जाणार? | कायदेतज्ज्ञ ठामपणे सांगत आहेत
एकनाथ शिंदे यांचे बंड प्रकरण आता धक्कादायक वळणावर पोहचले आहे. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करा, अशी मागणी या बंडखोर आमदारांनी केल्याची माहिती समोर आली आहे. गुवाहाटीत झालेल्या बंडखोऱांच्या बैठकीत ही मागणी करण्यात आली आहे. एकनाथ शिंदेंसह गेलेल्या ५० आमदारांनी ही एकमुखाने ही मागणी केल्याचे समजते. मात्र, आता बंडोखोरांचा गट कायदेशीर लढाईत अडकण्याची शक्यता आहे. यामुळे या संपूर्ण गटाचे भवितव्यच टांगणीला लागले आहे.
3 वर्षांपूर्वी