Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
EPFO | नोकरी सोडल्यानंतर PF अकाऊंटवर किती मिळतं व्याज? | सविस्तर माहिती
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना आर्थिक वर्ष 2019-20 साठी ईपीएफवर निश्चित 8.5 टक्के व्याज एकरकमी देत आहे. अर्थ मंत्रालयाने याबाबत माहिती दिली होती. या निर्णयामुळे ईपीएफओच्या जवळपास 6 कोटी सब्सक्रायबर्सवर परिणाम होणार आहे.
4 वर्षांपूर्वी -
EPF वरील 8.5% व्याजाची रक्कम | डिसेंबर अखेरपर्यंत तुमच्या खात्यात जमा होऊ शकते
ईपीएफओच्या (EPFO) तब्बल सहा कोटी ग्राहकांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना डिसेंबर 2020 च्या अखेरपर्यंतच्या आर्थिक वर्ष 2019-20 साठी सुमारे सहा कोटी भागधारकांच्या कर्मचार्यांच्या भविष्य निर्वाह निधीमध्ये (Employees’ Provident Fund Organization) 8.5 टक्के व्याज (Total Interest) जमा करण्याची शक्यता आहे. यापूर्वी सप्टेंबरमध्ये, ईपीएफओने दोन हप्त्यांमध्ये हे व्याज देण्याचे ठरविले होते. पहिल्या हप्त्यात 8.15 टक्के आणि दुसर्या हप्त्यात 0.35 टक्के व्याज दिले जाणार होते. मात्र प्रसार माध्यमांच्या हाती आलेल्या माहितीनुसार कामगार मंत्रालयाने एकत्रच व्याज देण्याचा प्रस्ताव वित्त मंत्रालयाकडे पाठविला आहे. अर्थ मंत्रालय काही दिवसांत हा प्रस्ताव मंजूर करू शकेल. अशा प्रकारे, या महिन्याभरात संपूर्ण व्याज दिले जाऊ शकते.
4 वर्षांपूर्वी