Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
EVM Machine | मी टेक्नॉलॉजिस्ट आहे, EVM मशीनने निवडणुकीत घोटाळा करता येतो, ही यंत्रे विशिष्ट ठिकाणी वापरली जातात
EVM Machine | जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलन मस्क यांनी निवडणूक प्रक्रियेत मतपत्रिकेचा वापर करण्याचे समर्थन केले आहे. अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक होत असताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे. मस्क यांनी अमेरिकेतील मतदान यंत्रांच्या (EVM) कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत म्हटले आहे की, यामुळे निवडणुकीत घोटाळा होऊ शकतो.
6 महिन्यांपूर्वी -
त्यांचं ठरलं आहे? निवडणुका ईव्हीएम'वरच; बॅलेट बॉक्स आणणार नाही: मुख्य निवडणूक आयुक्त
इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांविरोधात (ईव्हीएम) विरोधी पक्षांकडून देशभरात आवाज उठवला जात असतानाच या मतदान यंत्रांऐवजी पुन्हा कागदी मतपत्रिका वापरण्याची मागणी मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी शुक्रवारी स्पष्ट फेटाळून लावली. या निर्णयामागे सर्वोच्च न्यायालयाने गतकाळात दिलेल्या काही आदेशांचा आधार असल्याचेही त्यांनी सांगितले. ईव्हीएमशी छेडछाड केली जाऊ शकते असे सांगत, मतदानासाठी पुन्हा मतपत्रिका वापरल्या जाव्यात अशी मागणी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासह अनेक विरोधी पक्षनेत्यांनी केली आहे.
6 वर्षांपूर्वी -
पुन्हा मतपत्रिकांच्या युगात नेणार नाही : मुख्य निवडणूक आयुक्त
लंडनमधील हॅकेथॉनमध्ये सय्यद शुजा नामक हॅकरने ईव्हीएम हॅकिंगबाबत केलेल्या धक्कादायक दाव्यांमुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. दरम्यान, ईव्हीएम’वरून देशभरात राजकीय वातावरण ढवळून निघालेले असताना आज मुख्य निवडणूक आयुक्त सुनिल अरोरा यांनी आगामी निवडणुका या ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटच्या माध्यमांतूनच पार पडतील हे स्पष्ट केले आहे. देशाला पुन्हा मतपत्रिकांच्या युगात घेऊन जाण्याचा आमचा विचार नाही असे त्यांनी म्हटले आहे.
6 वर्षांपूर्वी -
निवडणूक प्रक्रियेत बदल, ईव्हीएम मशीन हद्दपार होणार ?
देशातील निवडणूक प्रक्रियेत मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे. कारण भारतातील लोकशाही अबाधित ठेवण्याचे मोठे काम निवडणूक प्रक्रिया निभावत असते. त्याचाच भाग म्हणून देशातील निवडणूक प्रक्रियेतून ईव्हीएम मशीन हद्दपार होऊ शकतात.
7 वर्षांपूर्वी