Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
FIFA World Cup 2022 | पराभवानंतर रोनाल्डोला अश्रू अनावर, तर मोरोक्कोच्या खेळाडूचा आईसोबत मैदानात डान्स
FIFA World Cup 2022 | ईश्वराने निर्माण केलेल्या सर्व निर्मितींपैकी सर्वात सुंदर म्हणजे आई. जगाने हे पुन्हा एकदा मान्य केले आहे. काल रात्री फिफा विश्वचषक 2022 मध्ये मोरोक्कोने पोर्तुगालविरुद्ध शानदार विजय मिळवत इतिहास रचला. मोरोक्कोने पोर्तुगालचा १-० असा पराभव करत स्पर्धेच्या उपांत्य फेरीतील आपले स्थान निश्चित केले आहे. या काळात फुटबॉलच्या मैदानावर आईचं प्रेम साऱ्या जगानं पाहिलं.
2 वर्षांपूर्वी -
FIFA World Cup 2022 | सौदी अरेबियाचा शक्तिशाली अर्जेंटिनाला धक्का, अर्जेंटीना टीमचा पराभव
FIFA World Cup 2022 | फिफा वर्ल्डकपच्या मंगळवारी तिसऱ्याच दिवशी सौदी अरेबियाने धक्कादायक विजय मिळवत अर्जेंटिनावर २-१ अशी मात केल्याने मोठा पेच निर्माण झाला होता. स्टार खेळाडू लिओनेल मेस्सीने दहाव्या मिनिटाला अर्जेंटिनाला आघाडी मिळवून दिली. त्याने सौदी अरेबियाविरुद्ध पेनल्टी मारली. या गोलमुळे अर्जेंटिनाचा संघ सामन्यात 1-0 ने आघाडीवर आहे. अर्जेंटिनाकडून लोटारो मार्टिनेझने दुसरा गोल केला खरा, पण तो रेफ्रीने नाकारला.
2 वर्षांपूर्वी -
FIFA World Cup 2022 | गतविजेत्या फ्रान्सला मोठा धक्का, बेंझेमा वर्ल्ड कपमधून बाहेर
FIFA World Cup 2022 | फिफा विश्वचषकापूर्वीच गतविजेत्या फ्रान्सला मोठा धक्का बसला आहे. संघाचा स्टार फॉरवर्ड करीम बेन्झेमा दुखापतीमुळे विश्वचषक स्पर्धेतून बाहेर पडला आहे. बेंझेमा मांडीच्या दुखापतीमुळे त्रस्त आहे, असे फ्रेंच फुटबॉल फेडरेशनने रविवारी सांगितले. प्रशिक्षणादरम्यान त्याला ही दुखापत झाली. प्रशिक्षक डिडियर डेसचॅम्प्स म्हणाले, “बेंझेमासाठी मी खूप दु:खी आहे. त्याने या विश्वचषकाला आपले लक्ष्य बनवले. मात्र, या दुखापतीनंतरही माझा माझ्या संघावर पूर्ण विश्वास आहे. आमच्यासमोरील आव्हानाला तोंड देण्यासाठी आम्ही पूर्णपणे तयार आहोत.
2 वर्षांपूर्वी