Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
Future Retail Share Price | फ्युचर रिटेल शेअरने 1 महिन्यात 21.67% परतावा दिला, आता एक मोठी अपडेट आली, शेअरवर काय परिणाम?
Future Retail Share Price | फ्युचर रिटेल कंपनीचे शेअर्स मागील काही दिवसांपासून शेअर बाजारातील तज्ज्ञांच्या रडारवर आले आहेत. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्के अप्पर सर्किटमध्ये 3.93 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज हा स्टॉक विक्रीच्या दबावाखाली ट्रेड करत आहे. मागील काही दिवसांपासून फ्युचर रिटेल कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार उलाढाल पाहायला मिळाली आहे. मागील एका महिन्यात हा स्टॉक 21.67 टक्के वाढला आहे. या कंपनीच्या स्टॉकमध्ये अचानक तेजी येण्याचे कारण म्हणजे कंपनीच्या लिलावाला सुरुवात होणार आहे. फ्युचर रिटेल ही कंपनी कर्जबाजारी झाली असून दिवाळखोरीच्या प्रक्रियेला सामोरे जात आहे. आज मंगळवार दिनांक 25 जुलै 2023 रोजी फ्युचर रिटेल कंपनीचे शेअर्स 3.95 टक्के घसरणीसह 3.65 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Future Retail Share Price | 3 रुपये 80 पैशाच्या फ्युचर रिटेल शेअर्सची खरेदी वाढली, नेमकं कारण काय? लेटेस्ट अपडेट जाणून घ्या
Future Retail Share Price | फ्युचर रिटेल कंपनीचे शेअर्स मागील काही दिवसांपासून तेजीत वाढत आहेत. आज देखील स्टॉक अप्पर सर्किटमध्ये अडकला आहे. मागील पाच दिवसांपासून फ्युचर रिटेल कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. या दरम्यान हा स्टॉक 13.43 टक्के वाढला आहे. फ्युचर रिटेल कंपनीच्या शेअर्समध्ये तेजी येण्याचे विशेष कारण म्हणजे, ही कर्जबाजारी कंपनी दिवाळखोरीच्या प्रक्रियेला सामोरे जात आहे, आणि लवकरच या कंपनीचा लिलाव होऊ शकतो, अशी बातमी आली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Future Retail Share Price | अदानी-अंबानी ग्रुपशी नाव पुन्हा जोडलं जाण्याच्या बातम्या, फ्युचर ग्रुपचा शेअर तेजीत, काय घडतंय?
Future Retail Share Price | दिग्गज उद्योगपती गौतम अदानी आणि मुकेश अंबानी फ्युचर रिटेल कंपनी करण्याच्या खरेदी करण्याच्या शर्यतीत सामील आहेत. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये फ्युचर रिटेल कंपनीचे शेअर्स सुरुवातीच्या काही तासात 5 टक्के वाढीसह 3.83 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. सलग दोन ट्रेडिंग सेशनमध्ये हा स्टॉक अपर सर्किटवर ट्रेड करत आहे. सध्या स्टॉक मार्केटमध्ये एक बातमी आली आहे की, मुकेश अंबानी आणि गौतम अदानी या दोघांनी फ्युचर रिटेल कंपनी खरेदी करण्याची तयारी केली आहे.
2 वर्षांपूर्वी