Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
काय आहे दीड दिवसांच्या गणेश विसर्जनासाठी नियमावली | जाणून घ्या
यंदा राज्यात गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्यात येत आहे. राज्यात आज दीड दिवसांच्या गणपतीचे विसर्जन केले जाणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी मुंबई महापालिकेकडून थेट समुद्रात मूर्ती विसर्जन न करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच गणेश मूर्तींचे संकलन करा, अशा सूचना पालिकेकडून करण्यात आल्या आहेत.
5 वर्षांपूर्वी -
बाप्पाच्या भक्तांना यंदा मंडपात ना दर्शन, ना हार-फुलेही अर्पण करता येणार
सध्या संपूर्ण जगावर कोरोनाचं सावट आहे. कोरोनामुळे अनेक देशांत लॉकडाऊन करण्यात आला आहे. भारतातही कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. कोरोनामुळे अनेक गोष्टींवर निर्बंध लावण्यात आले आहेत. तर अनेक धार्मिक कार्यक्रम आणि उत्सवही रद्द करण्यात आले. आषाढी वारीही कोरोनाच्या सावटातच पार पडली, तर दहीहंडी कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे रद्द करण्यात आली. यंदाचा गणेशोत्सवावरही कोरोनाचं सावट आहे. त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव साधेपणाने करण्याचा निर्णय अनेक मंडळांनीही घेतला आहे. अशातच यंदाच्या गणेशोत्सवासाठी मुंबई महानगरपालिकेने नियमावली जाहीर केली आहे.
5 वर्षांपूर्वी