Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
नेत्यांनी बोलताना काही पथ्य पाळायला हवीत | भाजप खासदारांचा घरचा आहेर | राणेंची ब्राह्मण टिपणी टोचली?
आम्ही नारायण राणेंच्या वक्तव्याचं अजिबात समर्थन करत नाही. पण भारतीय जनता पक्ष त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे, असं विधान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं. त्यानंतर आता पुण्यातील भारतीय जनता पक्षाचे नेते गिरीश बापट यांनी राणेंना अप्रत्यक्षरीत्या सुनावलं आहे. राजकीय पक्षांमध्ये राजकीय मतभेद असतात. पण नेते मंडळींनी बोलताना पथ्य पाळलं पाहिजे, अशा शब्दात खासदार गिरीश बापट यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणेंना घरचा आहेर दिला.
4 वर्षांपूर्वी -
भाजप OBC व मराठ्यांना फसवतंय? | 50 टक्क्यांची आरक्षण मर्यादा न हटवल्याने आरक्षण अशक्य - घटनातज्ञांचा दावा
127 व्या विधेयकानुसार आणि 104 व्या घटनादुरुस्तीनुसार राज्यांना आरक्षणाचे अधिकार मिळाले तरी मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा प्रश्न सुटणार नाही, असं मोठं विधान घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांनी केलं आहे. 50 टक्क्यांची आरक्षण मर्यादा ओलांडता येणार नाही तसंच घटनादुरुस्ती करुनही हे शक्य नाही, असा मोठा दावा त्यांनी केला आहे. भविष्यात 50 टक्क्यांच्या आतच आरक्षण वाटून घ्यावं लागेल. राजकीय पक्ष फसवण्याचं काम करतायत.
4 वर्षांपूर्वी