Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
गोव्यात सत्ता टिकवणे हेच फडणवीसांसमोर आव्हान | भाजपच्या आमदारांच्या घरी स्नेहभोजनाचे कार्यक्रम
महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते फडणवीस यांची गोवा राज्याच्या निवडणूक प्रभारीपदी निवड करण्यात आली होती. निवड झाल्यानंतर फडणवीस सोमवारी गोव्यात दाखल होऊन त्यांनी दिवसभरात राज्यातील मंत्री, नेते व विविध पदाधिकारी यांच्या बैठका घेतल्या, दरम्यान सोमवारच्या विविध चर्चात फडणवीसांना राज्यातील अनेक नेते नाराज असल्याचे दिसून आले. तर काही नेते त्यांच्यासमोरच टोकाची भूमिका घेऊन हातघाईस आल्याचे चित्र दिसून आले. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत सत्तेची मोट बांधण्यासाठी आधी भाजपातल्या नाराज आमदारांना एकत्र आणण्यासाठी मंगळवारी देवेंद्र फडणवीस यांनी गोव्यात भेटीगाठी घेण्यास सुरुवात केली.
4 वर्षांपूर्वी -
गोव्यात भाजप सरकारकडून परप्रांतीयांना हुसकावण्यास सुरुवात
महाराष्ट्रात परप्रांतियांचं राजकारण यापूर्वी अनेकवेळा पाहिलं असेल, मात्र त्याच मुद्द्याने सध्या गोव्यात पेट घेतला आहे. गोव्याच्या विविध भागात थेट पोलिसांनाच कारवाईचे आदेश गोव्यातील भारतीय जनता पक्षाच्या सरकारने दिले आहेत. त्यानुसार अनेक महत्वाच्या ठिकाणांवरून तसेच सामान्यांना त्रासदायक ठरणाऱ्या ठिकाणावरून परप्रांतीयांना पोलिसच पळवून लावत आहेत. गोवा सरकारच्या या धडक कारवाईचं स्थानिक लोकांनी देखील कौतुक केल्याचे पाहायला मिळत आहे.
6 वर्षांपूर्वी -
भाजप पक्षात आता विश्वास व वचनबद्धता सारखे शब्द संपले आहेत: उत्पल पर्रीकर
गोव्यात काँग्रेसच्या तब्बल १० आमदारांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्यावरुन राज्याचे माजी मुख्यमंत्री तसेच माजी संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांचा मुलगा आमदार उत्पल पर्रीकर यांनी भारतीय जनता पक्षावर जोरदार निशाणा साधला आहे. माझ्या वडिलांच्या निधनानंतर पक्षाने पक्षविस्तारासाठी भलताच मार्ग स्विकारला असल्याची बोचरी टीका केली आहे. भारतीय जनता पक्षातून आता विश्वास आणि वचनबद्धता असे शब्द संपले आहेत अशी थेट टीका उत्पल पर्रीकर यांनी काँग्रेस आमदारांच्या फोडाफोडीवरून केली आहे.
6 वर्षांपूर्वी -
गोव्यात शिवसेना आक्रमक, राष्टपती राजवटीची मागणी
गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर उपचारासाठी अमेरिकेत गेले असताना गोव्यात घटनात्मक आणि राजकीय पेच निर्माण झाला आहे.
7 वर्षांपूर्वी