Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
GST on Rented Home | आता भाड्याच्या घरात राहणाऱ्यांना भरावा लागणार 18% GST, मोदी सरकारचे नवे नियम लक्षात ठेवा
आता निवासी मालमत्ता भाड्याने घेऊन राहणाऱ्या भाडेकरूंना भाड्यासह १८ टक्के जीएसटी भरावा लागणार आहे. गेल्या महिन्यात १८ जुलैपासून हा निर्णय लागू झाला आहे. मात्र या निर्णयात हा कर केवळ व्यवसायासाठी जीएसटी अंतर्गत नोंदणीकृत असलेल्या आणि जीएसटी पेइंग कॅटेगरीमध्ये मोडणाऱ्या भाडेकरूंनाच दिला जाईल, असे सांगण्यात आले आहे.
3 वर्षांपूर्वी -
GST on Rented Home | भाड्याच्या घरात राहणाऱ्यांचे ऐतिहासिक अच्छे दिन सुरु | मोदी सरकारला 18 टक्के GST द्यावा लागणार
केवळ स्वयंपाकघराचे बजेटच नव्हे, तर नवीन जीएसटीत घर भाडेही अस्थिर करण्याच्या तयारीत मोदी सरकार आहे आहे. अर्थ मंत्रालयाच्या महसूल विभागाने 18 जुलैपासून देशभरात निवासी भाड्यावर 18 टक्के जीएसटी लागू केला आहे. अधिसूचनेनुसार, जीएसटी अंतर्गत नोंदणीकृत व्यक्तीला भाड्याने दिलेल्या निवासी घराला 18 टक्के कर आकारला जाईल. शिवाय, भाडेकरूला कायदेशीर जबाबदाऱ्यांपासून दूर ठेवून, कर भरणे आवश्यक असेल. मालकावर घर भाड्याने दिल्यावर जीएसटी आकारल्यास मालक त्याची वसुली भाडोत्र्याकडून करणार हे साहजिक आहे आणि त्यामुळे दोन्ही बाजूला प्रचंड आर्थिक फटका बसणार आहे.
3 वर्षांपूर्वी