Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
भीषण! निवडणुकांना अर्थ काय? सूरतमध्ये भाजपवर अपहरणाचा आरोप झालेल्या आप'च्या उमेदवाराने अर्ज मागे घेतला, काय घडतंय पहा
Gujarat Assembly Election 2022 | सुरत पूर्व विधानसभा मतदारसंघातील आम आदमी पार्टीच्या उमेदवार कांचन जरीवाला यांनी आज आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. कांचन जरीवाला तेच उमेदवार आहेत, ज्यांच्या अपहरणाचा आरोप भाजपवर होत होता. दिल्लीचे मुख्यमंत्री आणि ‘आप’चे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी भाजपवर अनेक गंभीर आरोप केले होते, त्यात कांचन जरीवाला यांच्या अपहरणाचाही समावेश होता.
2 वर्षांपूर्वी -
गुजरात भाजपचे उमेदवार मुलुभाई बेरा यांचा उमेदवारी अर्ज भरताना रिलायन्स ग्रुपच्या डिरेक्टरची उपस्थिती, अनेकांना आश्चर्य
Gujarat Assembly Election 2022 | गुजरातमधील खंभलिया मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे (भाजप) उमेदवार मुलू बेरा यांनी आपल्या दाव्यासाठी अर्ज दाखल केला. त्यांच्या उमेदवारी अर्जाला आंध्र प्रदेशातील वायएसआर काँग्रेस पक्षाच्या राज्यसभा खासदार युवजना श्रमिका रायथू आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे (आरआयएल) कॉर्पोरेट अफेअर्सचे संचालक परिमल नाथवाणी उपस्थित होते. भाजप उमेदवाराच्या उमेदवारी अर्जात रिलायन्स इंडस्ट्रीजचे अधिकारी आणि वायएसआर काँग्रेसचे नेते आल्याबद्दल प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Gujarat Election 2022 | गुजरात भाजपच्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर, बंडखोरीमुळे 16 उमेदवार जाहीर केले नाहीत
Gujarat Election 2022 | आगामी गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. या यादीत एकूण 6 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. धोराजी विधानसभा मतदारसंघातून महेंद्रभाई पाडलिया, खंभालियामधून मुलुभाई बेरा, कुटियानामधून ढेलीबेन मालदेभाई ओडेदारा, भावनगर (पूर्व) सेजल राजीव कुमार पंड्या, देडियापाडा (अनुसूचित जमातीसाठी राखीव जागा) मधून हितेश देवजी वसावा आणि चोर्यासीमधून संदीप देसाई यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. विधानसभेच्या 182 जागांपैकी 166 जागांसाठी भाजपने उमेदवारांची नावं आधीच जाहीर केली असून त्यात 16 महिलांचा समावेश आहे. भाजपने पहिल्या यादीत १४ महिलांना तर दुसऱ्या यादीत दोन महिलांना तिकीट दिले आहे.
2 वर्षांपूर्वी -
Gujarat Election 2022 | भाजपकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर, माजी मुख्यमंत्री आणि 38 आमदारांचा पत्ता कट
Gujarat Election 2022 | आगामी गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. विधानसभेच्या १८२ जागांपैकी १६० जागांसाठी भाजपने आपल्या उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल हे घाटलोडिया विधानसभा मतदारसंघातून उमेदवार असतील. त्याचबरोबर पक्षाने मोरबी मतदारसंघातून विद्यमान आमदार ब्रजेश मेर्जा यांना डावलून त्यांच्या जागी कांतीलाल अमृतिया यांच्यावर पैज लावली आहे.
2 वर्षांपूर्वी