Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
धनुष्यबाण चिन्ह गोठवलं तरी गुलाबराव पाटील म्हणाले, बाळासाहेबांची शिवसेना आम्ही वाचवली... संतापाची लाट तीव्र होणार
Shivsena Party Symbol | केंद्रीय निवडणूक आयोगाने शनिवारी मोठा निर्णय घेत शिवसेनेचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण गोठवलं. त्याशिवाय शिवसेना हे नाव वापरण्यास ठाकरे गट आणि शिंदे गटाला अंतरीम मनाई केली. निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीदेखील आपली प्रतिक्रिया व्यक्त केली असून पुढील संघर्षास सज्ज असल्याचे सांगितले. दरम्यान, यावर शिंदे गटाकडून ज्या प्रतिक्रिया येतं आहेत त्यावर जनतेत तीव्र असंतोष वाढणार असा अंदाज व्यक्त होतं आहे.
3 वर्षांपूर्वी -
उद्धव ठाकरेंनी तो निर्णय का घेतला? शिंदे गटातील नेत्याने केली होती फडणवीसांची पोलखोल, गुलाबराव पाटलांनी थेट मोदींकडे तक्रार केली होती
Gulabrao Patil Video | यावर्षी शिवसेनेच्या इतिहासात पहिल्यांदाच दोन दसरा मेळावे पार पडत आहेत. शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरेंचा मेळावा पार पडणार आहे. तर बीकेसी मैदानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मेळावा पार पडणार आहे. आपलाच दसरा मेळावा कसा बरोबर आहे हे सांगण्यासाठी दोन्ही गट प्रयत्न करत आहेत. आता शिंदे गटाने उद्धव ठाकरेंना त्यांच्याच काँग्रेस-राष्ट्रवादी विरोधी वक्तव्यांची आठवण करून देत विसर न व्हावा कँपेन सुरू केलं आहे.
3 वर्षांपूर्वी -
अजब! स्वतःच राज्य सोडून गुवाहटीला पळाले | आता म्हणतात उद्धव ठाकरेंनी आम्हाला सोडलं
शिवसेनेने एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदारांना अपात्रता ठरवण्याची मागणी विधानसभा उपाध्यक्षांकडे केली आहे. विधानसभा उपाध्यक्षांनी या प्रकरणी नोटीसही बजावली आहे. या नोटिशीविरोधात शिंदे गटाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. त्यावर सुप्रीम कोर्टात पुढील सुनावणी 11 जुलै रोजी आहे. तर, दुसरीकडे विधानसभा उपाध्यक्षांनी बजावलेल्याा नोटिशीविरोधात आपलं म्हणणं मांडण्यासाठी 12 जुलैपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. शिंदे गटाने दाखल केलेल्या याचिकेत अपात्रतेला आव्हान देण्यासह पक्ष विधीमंडळ गटनेता आणि प्रतोदाला मान्यता देण्याचा मुद्दा आहे. तत्पूर्वी दोन्ही बाजूने राजकीय टीकास्त्र सोडलं जातं आहे.
3 वर्षांपूर्वी