Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
Gulabrao Patil | ED ब्रह्मास्त्र वारंवार वापरू नये, अन्यथा पुराणकालातील ब्रम्हास्त्राप्रमाणेच बोथट होईल - गुलाबराव पाटील
ईडीकडून होत असलेल्या कारवायांवर जळगावचे पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांनी जोरदार निशाणा साधला आहे. आज ईडीचा वापर होत आहे. मात्र ब्रह्मास्त्र हे वारंवार वापरता कामा नये याचे पुराणकालापासून दाखले आहेत. याच प्रमाणे ईडचे ब्रह्मास्त्र वापरले की, ते बोथट होणारच, अशा शब्दात गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) टोला लगावला.
4 वर्षांपूर्वी -
आरोपांमध्ये कोणत्याही प्रकारचे तथ्य नसल्यानेच न्यायदेवतेने त्यांना निर्दोष सोडले - गुलाबराव पाटील
छगन भुजबळ यांना दिल्लीतील कथित महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात क्लीन चीट मिळाली आहे. महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणाच्या आरोपातून छगन भुजबळ मुक्त झाले आहेत. या प्रकरणातून छगन भुजबळांचं नाव वगळण्यात आलं आहे. मुंबईतील सत्र न्यायालायाने आज हा सर्वात मोठा निर्णय दिला.
4 वर्षांपूर्वी -
काय बोलावे याचे भान राहत नसेल तर त्यांना वेड्यांच्या इस्पितळात दाखल करून शॉक द्यायला पाहिजे - गुलाबराव पाटील
नारायण राणे हे गरिमा नसलेले भूत आहे. त्यांना काय बोलावे, याचे भान राहत नसेल तर ठाण्यातील वेड्यांच्या इस्पितळात दाखल करून शॉक द्यायला पाहिजे. मला तर त्यांची कीव येते’, अशी शब्दांत शिवसेना नेते आणि राज्याचे सार्वजनिक पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी भाजप नेते नारायण राणे यांच्यावर जहरी टीका केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
आधी शिवसेनेत अस्वस्थ, मग काँग्रेसमध्ये अस्वस्थ, मग भाजपने सूक्ष्म खाते दिल्याने डोकेही सूक्ष्म झाले - गुलाबराव पाटील
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना सूक्ष्म उद्योग खाते मिळाले आहे, त्यामुळे त्यांचे डोकेही सूक्ष्म झाले आहे. त्यामुळे ते एकनाथ शिंदे शिवसेनेवर नाराज असल्याचे म्हणत आहेत, अशी खरमरीत टीका शिवसेना नेते आणि पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केली. शिवसेना नेते एकनाथ शिंदे हे शिवसेनेत अस्वस्थ असून ते लवकरच भारतीय जनता पक्षात येतील असे मत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी व्यक्त केले होते.
4 वर्षांपूर्वी -
प्रसाद लाडांसारख्या व्यापाऱ्याच्या मुखातून असे शब्द शोभत नाहीत | तरी त्यांनी तारीख कळवावी - गुलाबराव पाटील
वेळ पडल्यास शिवसेना भवन देखील फोडू’ या विधानावरुन भाजप आमदार प्रसाद लाड यांनी सारवासारव करायला सुरुवात केली आहे. हे विधान केल्यानंतर त्यावर राज्यभरातून प्रतिक्रिया येऊ लागल्या होत्या. त्यानंतर लाड यांनी रात्री उशीरा आपल्या विधानावरुन स्पष्टीकरण दिले आहे.
4 वर्षांपूर्वी -
राज्यपालांच्या डोक्यात काय आहे तेच माहीत होत नाही – गुलाबराव पाटील
मागील अनेक महिन्यांपासून विधानपरिषदेतील राज्यपाल नियुक्त आमदारांचा प्रश्न प्रलंबित आहे. राज्य सरकारने एकूण 12 नियोजित आमदारांची यादी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे पाठवून कित्येक महिने झाले आहेत. मात्र, अद्याप कोश्यारी यांनी महाविकास आघाडी सरकारने दिलेल्या यादीला मान्यता दिलेली नाही. दरम्यान यावरून महाविकास आघाडीने सातत्याने राज्यपाल व भाजपला यामुळे घेरण्याचा प्रयत्न केला असल्याचे आपल्याला अनेकदा पाहायला मिळाले आहे.
4 वर्षांपूर्वी -
स्वपक्षीय आमदार फुटू नयेत म्हणून भाजपकडून बनाव, गुलाबराव पाटील बरसले
बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्या प्रकरणाच्या तपासावरून ठाकरे सरकारवर गंभीर आरोप करण्यात येत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र आणि कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांना वाचवण्यासाठी या प्रकरणात योग्य तपास करण्यात येत नसल्याचा आरोप भाजपकडून करण्यात येत आहे. तसंच याच मुद्द्यावरून ठाकरे सरकार अडचणीत येईल, असाही दावा कऱण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनी भाजपवर प्रतिहल्ला केला आहे.
5 वर्षांपूर्वी -
फडणवीसांनी मुख्यमंत्री पदासाठी मुंगेरीलालची सुंदर स्वप्नं पाहावीत - गुलाबराव पाटील
देवेंद्र फडणवीस यांनी दिल्ली दौरा केल्यापासून महाराष्ट्रातील सरकार सुद्धा पडणार अशी चर्चा समाज माध्यमांवर पाहायला मिळाली. मात्र स्वतः फडणवीसांनी देखील आम्हाला सरकार पाडण्यात काहीच रस नसल्याचं म्हटलं आहे. मात्र त्यानंतर देखील महाविकास आघाडी सरकारमधील नेतेमंडळींकडून प्रतिकिया येतंच आहेत.
5 वर्षांपूर्वी