Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
खात्री न करता व्हॉइस ओव्हर दिला, नंतर ऐतिहासिक संदर्भ शोध आणि पदाधिकाऱ्यांची 'फिल्मी मोड' रिऍक्शन, राज ठाकरेच फसले
Har Har Mahadev Movie | हर हर महादेव या शिवरायांवरील चित्रपटानंतर मोठं राजकीय वादळ निर्माण झाल्याचं उभ्या महाराष्ट्राने पाहिलं. मात्र हळहळू यातील कुहेतू आणि इतिहासाची चिरफाड सत्य असल्याचं समोर येतंय. विशेष म्हणजे वाचनाची प्रचंड आवड असणाऱ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याभूमिकेवर देखील आता समाज माध्यमांवर मोठा संशय आणि संताप व्यक्त होतं आहे. राज ठाकरे यांनी स्वतःच्या पक्षातील चित्रपट सेनेतील पदाधिकाऱ्यांच्या विनंतीवरून व्हॉइस ओव्हर देण्याचं ठरवलं का? आणि तसं असेल किंवा नसेल तरी राज ठाकरेंनी व्हॉइस ओव्हर देण्यापूर्वी चित्रपटाची कथा किंवा विषय समजून घेतला होता का अशी शंका निर्माण झाली आहे. कारण, सर्व घडून गेल्यावर राज ठाकरे इतिहास तज्ज्ञांना भेटत आहेत आणि त्यामुळे याला घोड्यामागून वरात म्हणावं का अशी टीका सुद्धा होऊ लागली आहे.
2 वर्षांपूर्वी -
बाजीप्रभू देशपांडे आणि शिवाजी महाराजांमध्ये लढाई झाल्याचं जनतेला प्रथमच समजलं, देशपांडेंनी सर्वकाही सेन्सॉर बोर्डावर ढकललं
Har Har Mahadev | हर हर महादेव चित्रपटातील अनेक प्रसंग आतापर्यंत सांगितल्या गेलेल्या घटनांप्रमाणे नाहीत, अशी टीका अनेक संघटनांकडून करण्यात येतेय. विशेषतः बाजीप्रभू देशपांडे आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामधील युद्धाचा एक प्रसंग या चित्रपटात दाखवण्यात आलाय. मुळात या दोहोंमध्ये युद्ध झालंच नव्हतं, असा संघटनांचा दावा आहे. मात्र चित्रपटाचे लेखक आणि दिग्दर्शक अभिजित देशपांडे यांनी या आक्षेपांना उत्तर दिलं आहे.
3 वर्षांपूर्वी -
नव्या निवडणुका नवे सवंगडी, मनसेकडून संभाजीराजे-शिवेंद्रराजेंच्या भूमिकेकडे दुर्लक्ष आणि राष्ट्रवादी लक्ष
Har Har Mahadev Movie | झी स्टुडिओच्या हर हर महादेव आणि महेश मांजरेकर यांच्या वेडात मराठे वीर दौडले सात या चित्रपटांच्या विरोधात सध्या वातावरण तापलेलं दिसून येतं आहे. या चित्रपटांमध्ये चुकीचा इतिहास दाखविण्यात येत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. याबाबतं संभाजीराजे छत्रपती यांनी छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचं अराध्य दैवत आहे. त्यांच्या आयुष्यावर सिनेमा येणं ही चांगलीच बाब आहे मात्र इतिहासाची मोडतोड झाल्यास गप्प बसणार नाही असा इशारा दिला आहे. संभाजीराजे यांनी रविवारी पत्रकार परिषद घेऊन वेडात मराठे वीर दौडले सात आणि हर हर महादेव या चित्रपटांवरून संताप व्यक्त केला होता.
3 वर्षांपूर्वी -
Har Har Mahadev | चित्रपटगृहांमध्ये पुन्हा गरजणार 'शिवगर्जना', 'हर हर महादेव'चा दुसरा ट्रलेर आऊट
Har Har Mahadev | गेल्या काही दिवसांपासून मराठी सिनेमांनी जबरदस्त चित्रपटांचा तडखा चाहत्यांना चाखला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांवरील प्रत्येक मराठी चित्रपट हा गाजचाल आहे आणि त्या चित्रपटाने आपला इतिहास स्वत: लिहीला आहे. दरम्यान, अभिनेता शरद केळकरच्या ‘हर हर महादेव’ या चित्रपटाचा दुसरा टीझर रिलीज झाला आहे. तर हा चित्रपट मूळचा मराठीमध्ये असणार आहे. हिंदी, तमिळ, तेलगू आणि कन्नड भाषांमध्ये एकाच वेळी प्रदर्शित होणारा हा पहिला मराठी चित्रपट असणार आहे. तसेच या चित्रपटात शरद केळकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे सेनापती बाजी प्रभू देशपांडे यांची भूमिका साकारली आहे. त्यांना शिवाजी महाराजांचे स्वराज्याचे स्वप्न पूर्ण करायचे आहे तर हा टीझर तुम्हाला गूजबंप देण्यासाठी पुरेसा आहे.
3 वर्षांपूर्वी