Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
ऑर्डर निघाल्यावर कंपनीला १ पैसा अदा केलेला नाही | मग १५०० कोटी घोटाळ्याचा जावईशोध कुठून? - मुश्रीफ
भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी आज कोहापूरला जात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याविरोधात गुन्हा दाखल केलाय. त्याचबरोबर त्यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर तिसरा मोठा आरोप केलाय. मुश्रीफ आणि त्यांच्या जावयाने तब्बल १५०० कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेऊन केलाय. सोमय्या यांच्या या आरोपानंतर आता हसन मुश्रीफांनीही पत्रकार परिषद घेत सोमय्यांना जोरदार (Minister Hasan Mushrif reply to Kirit Somaiya) प्रत्युत्तर दिलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
कार्यकर्त्यांनी शांत राहावं | सोमय्यांनीही संयमाने दौरा करावा, चुकीचं वक्तव्य करु नये - हसन मुश्रीफ
भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि त्यांच्या कुटुंबियांवर कोट्यावधी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप केला आहे. त्या पार्श्वभूमीवर किरीट सोमय्या हे कोल्हापूरला जाणार असताना त्यांना पोलिसांकडून अडणवण्यात आलं होतं. त्यावरुन भाजप नेत्यांनी महाविकास आघाडी सरकार आणि मुख्यमंत्र्यांवर जोरदार हल्ला चढवला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा सोमय्या यांनी कोल्हापूरला जाण्याची घोषणा केली आहे. मंगळवार, 28 सप्टेंबर रोजी सोमय्या कोल्हापूर दौऱ्यावर असतील. त्यावेळी सोमय्या यांनी कोल्हापूरला येऊ द्या. त्यांची कुठल्याही प्रकारे अडवणूक करु नका, असं आवाहन हसन मुश्रीफ यांनी आपल्या कार्यकर्त्यांना केलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
मी कोल्हापूरात भाजप भुईसपाट केली | चंद्रकांत पाटील यांनी पुरुषार्थाप्रमाणे लढावं - हसन मुश्रीफ
भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी 100 कोटींच्या घोटाळ्याच्या केलेल्या आरोपानंतर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषद घेऊन सोमय्यांचे सगळे आरोप फेटाळले आहेत. माझ्याविरोधात सोमय्यांचे आरोप हे भाजपचं षडयंत्र आहे. या सगळ्याचा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील मास्टरमाईंड आहेत. मला त्रास देण्यासाठी, मला कुठेतरी रोखण्यासाठी हे सगळं सुरु आहे, असं सांगत ‘मला भाजपमध्ये येण्याची ऑफर देखील होती’, असा गौप्यस्फोट मंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषदेत केला.
4 वर्षांपूर्वी -
एखाद्याविरुद्ध तक्रार करायची, मग तिथे जाऊन पर्यटन आणि प्रसिद्धी मिळवायची ही सोमैयांची सवयच आहे - हसन मुश्रीफ
सर्व कार्यकर्त्यांनी संयम बाळगावा. माझी तब्येत उत्तम आहे व काळजीचे काहीही कारण नाही, असे स्पष्टीकरण ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले आहे. गेल्या काही दिवसांपासून हसन मुश्रीफ यांची तब्येत बिघडली असून त्यांना रुग्णालयात दाखल केले असल्याच्या चर्चा सुरू होत्या. त्या पार्श्वभूमीवर हसन मुश्रीफ यांनी एक पत्रक काढून कार्यकर्त्यांना आवाहन केलं आहे.मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वी थंडी वाजून ताप आला होता. बैठक सुरू असताना ताप वाढतच असल्याचे माझ्या निदर्शनास आल्यामुळे मी तात्काळ बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल झालो.
4 वर्षांपूर्वी -
हायब्रीड अन्यूईटी रस्ते घोटाळा प्रकरण | चंद्रकांत पाटलांविरोधात लाचलुचपत विभागाकडे FIR दाखल करणार - हसन मुश्रीफ
भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या यांनी राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. मुश्रीफ यांनी सोमय्यांच्या या आरोपांवर पलटवार केला आहे. सोमय्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या सांगण्यावरूनच आपल्यावर आरोप केल्याचा दावा करतानाच रस्ते घोटाळ्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागामध्ये पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल करणार असल्याचं हसन मुश्रीफ यांनी स्पष्ट केलं.
4 वर्षांपूर्वी -
सोमय्यांना काही माहिती नसावी | चंद्रकांत पाटील आणि समरजीत घाटगेंच्या सांगण्यावर केलं असेल - हसन मुश्रीफ
भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांविरोधात आरोप करणं सुरूच ठेवलं आहे. यापूर्वी 11 जणांवर थेट आरोप केल्यानंतर सोमय्यांनी यामध्ये आता आणखी एका मंत्र्यांचं नाव घेतलं आहे. राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर सोमय्यांनी मनी लाँडरिंगचे आरोप केले आहेत. हसन मुश्रीफांच्या कुटुंबाने बेनामी संपत्ती गोळा केल्याचा आरोप केला आहे. इतकंच नाही तर सोमय्यांनी 2700 पानांचे पुरावे इन्कम टॅक्सला दिले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
ती कागदपत्र IOC वेबसाईटवर उपलब्ध | सोमय्यांवर 100 कोटींचा अब्रू नुकसानीची दावा ठोकणार - हसन मुश्रीफ
भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांविरोधात आरोप करणं सुरूच ठेवलं आहे. यापूर्वी 11 जणांवर थेट आरोप केल्यानंतर सोमय्यांनी यामध्ये आता आणखी एका मंत्र्यांचं नाव घेतलं आहे. राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर सोमय्यांनी मनी लाँडरिंगचे आरोप केले आहेत. हसन मुश्रीफांच्या कुटुंबाने बेनामी संपत्ती गोळा केल्याचा आरोप केला आहे. इतकंच नाही तर सोमय्यांनी 2700 पानांचे पुरावे इन्कम टॅक्सला दिले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
कोल्हापूर आंबेओहोळ प्रकल्प | चंद्रकांत पाटलांना लाज वाटली पाहिजे | हसन मुश्रीफ यांची टीका
आंबेओहोळ प्रकल्पाचे काम गेली दहा वर्ष रखडले होते. मी मंत्री असताना हा प्रकल्प मंजूर केला. मात्र, आज याचे कोणीतरी श्रेय घेत असल्याचे मी पाहिले. जे श्रेय घेत आहेत, तेच लोक घळ भरणीच्या वेळी न्यायालयात गेले. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना या गोष्टीची लाज वाटली पाहिजे, अशी टीका ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली.
4 वर्षांपूर्वी -
खाकी वेषातील दरोडेखोर परमवीर सिंग यांच्या मुसक्या आवळणं गरजेचंं - हसन मुश्रीफ
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या सीबीआय चौकशीवरुन राज्याच्या राजकारणाचा पारा पुन्हा चढलाय. राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री हसन मुश्रीफ यांनी सीबीआयचे उपअधीक्षक आर एस गुंजाळ यांच्या चौकशी अहवालाची माहिती देत माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर वसुलीचे आरोप करणाऱ्या मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावर हल्लाबोल केलाय.
4 वर्षांपूर्वी -
पवारांसोबत लाव रे तो व्हिडीओचा कार्यक्रम घेतला होता, तेव्हा पवारांबद्दल कळलं नाही का? - हसन मुश्रीफ
राष्ट्रवादीच्या उदयानंतर राज्यात जातीयवाद वाढला, असं विधान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं आहे. त्याचा राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी समाचार घेतला आहे. शरद पवारांसोबत लाव रे तो व्हिडीओचा कार्यक्रम घेतला होता. तेव्हा तुम्हाला पवारांबद्दल कळलं नाही का?, असा सवाल हसन मुश्रीफ यांनी केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
कोल्हापुरात स्वत:ला गाव राखता आलं नाही अन् राऊतांना कसलं आव्हान देताय? | मुश्रीफ यांचा चंद्रकांतदादांना टोला
मुंबई महापालिका निवडणुकीत संजय राऊतांनी निवडणूक लढवून दाखवावी, असं चॅलेंज काल भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊत यांना दिलं होतं. चंद्रकांतदादांच्या चॅलेंजला आज संजय राऊत यांनी जशास तसं प्रत्युत्तर देताना दादांच्या दुखऱ्या नसेवरच बोट ठेवलं. तुम्ही कोल्हापूर सोडून कोथरुडला आले, आम्ही काही बोललो का?, असं म्हणत त्यांनी दादांवर शाब्दिक वार केला.
4 वर्षांपूर्वी -
राज्याला दीड कोटी लस देण्याचं ठरवलं होतं, मोदी सरकारनंच पुनावालांना धमकी दिली | राष्ट्रवादीच्या या नेत्याकडून गंभीर आरोप
कोरोना लस उत्पादन करणाऱ्या सिरम संस्थेचे अदर पुनावाला यांनी धमकी दिल्याचा खुलासा केला होता. त्यामुळे हे प्रकरण हायकोर्टात गेले होते. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पुनावाला यांच्या सुरक्षिततेचा मुद्दा गांभीर्याने घ्या, अशी आठवण मंगळवारी पार पडलेल्या सुनावणीदरम्यान मुंबई उच्च न्यायालयाने केंद्र आणि राज्य सरकारला करून दिली होती.
4 वर्षांपूर्वी -
Lockdown | लॉकडाऊनची घोषणा बुधवारी होऊ शकते | पण अंमलबजावणी २ दिवसांनी? - सविस्तर
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासठी 12 ते 13 दिवसांचा लॉकडाऊन लागण्याची शक्यता आहे, असे वक्तव्य राज्याचे ग्रामविकासमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांनी केले. लॉकडाऊनची घोषणा बुधवारी होऊ शकते. पण लोकांची ऐनवेळी गैरसोय होऊ नये म्हणून लॉकडाऊनची अंमलबजावणी मात्र दोन दिवसांनी होईल, अशी शक्यताही आता वर्तविण्यात येत आहे.
4 वर्षांपूर्वी -
भाजपाच्या काळात मला अडकवण्यासाठी बँकेची चौकशी लावली | पण सत्य उजेडात आलं
राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ तसेच ६५ संचालकांना दिलासा मिळाला आहे. सहकार विभागाच्या अहवालात अजित पवार यांच्यासह 6६५ संचालकांना क्लीन चिट मिळाली आहे. फेब्रुवारी २०२० मध्ये निवृत्त जिल्हा न्यायाधीश पंडितराव जाधव यांची चौकशी समिती नेमण्यात आली होती. या समितीकडून हा चौकशी अहवाल सहकार आयुक्तांना सादर करण्यात आला. चौकशी अहवालात अजित पवारांसह ६५ संचालकांना क्लीन चिट मिळाली आहे.
4 वर्षांपूर्वी -
फडणवीस कुठले पंचांग वापरतात माहिती नाही | मात्र त्यांचे मुहूर्त चुकत आहेत - हसन मुश्रीफ
राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या नियोजित बदल्या पुढे ढकलण्यात आल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधी पक्षात चांगलीच जुंपली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील पोलीस बदल्यांसाठी अर्थपूर्ण बोलणी सुरु असल्याचा गंभीर आरोप शनिवारी पुण्यातील पत्रकारपरिषदेत केला. या टीकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडून फडणवीस यांच्यावर तात्काळ पलटवार करण्यात आला.
5 वर्षांपूर्वी