Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
भारताविरुद्ध युद्धासाठी तयार रहा | पाक लष्करप्रमुखांचे सैन्याला निर्देश
पाकव्याप्त काश्मीरमधील गिलगिट बाल्टिस्तानला पाकिस्तानच्या राज्याचा दर्जा देण्याच्या निर्णयाला सुरू असलेल्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल जावेद बाजवा यांनी पाकव्याप्त काश्मीरचा दौरा केला. यावेळी त्यांनी प्रत्यक्ष नियंत्रण भागाचा दौरा केला. त्यावेळी त्यांनी सैन्याला युद्धास सज्ज राहण्याचे निर्देश दिले.
5 वर्षांपूर्वी -
#VIDEO: भारतानं मारले पाकचे सैनिक, पाकिस्ताननं पांढरं निशाण फडकवलं
जम्मू काश्मीरमध्ये घुसखोरी करणाऱ्यांना भारतीय सैनिकांनी कंठस्नान घातलं होतं. यानंतर पाकचे सैनिक या घुसखोरांचे मृतदेह घेऊन पळून गेले. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात पाकिस्तानी सैनिक पांढरा झेंडा दाखवून घुसखोरांचे मृतदेह घेऊन जाताना दिसत आहेत. मात्र, त्यांचे हे प्रयत्न भारतीय सैन्यानं हाणून पाडले.
6 वर्षांपूर्वी -
जैश-ए-मोहम्मद'चा म्होरक्या मसूद अझहरची पाकड्यांकडून सुटका; भारताविरुद्ध षढयंत्र
भारतात अशांतता पसरवण्याच्या इराद्याने पाकिस्तानने जैश-ए-मोहम्मद या कुख्यात दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अजहरची तुरूंगातून सुटका केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पाकिस्तानच्या तुरूंगातून गुपचूप मसूद अजहरची सुटका करण्यात आल्याची माहिती गुप्तचर विभागाने केंद्र सरकारला दिली आहे. परिणामी, पाकिस्तान पुन्हा एकदा मसूद अझहरचा वापर भारताविरोधात दहशतवादी हल्ल्यासाठी करण्याची शक्यता आहे. त्याच्या सुटकेनंतर पाकिस्तानने राजस्थान सीमेवर अतिरिक्त सैन्यही तैनात केले असल्याचे गुप्तचर यंत्रणांनी म्हटले आहे. हिंदुस्थान टाइम्सने याबाबतचं वृत्त दिलं आहे.
6 वर्षांपूर्वी -
ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान भारत-पाकिस्तान युद्ध होण्याची शक्यता: पाकड्या मंत्री बरळला
जम्मू आणि काश्मीरचा विशेष दर्जा रद्द केल्यावरून पाकिस्तानने भारताबरोबरच्या संबंधांवर आधीच घाव घातला आहे. पाकिस्तानने भारतीय राजदूतांना मायदेशी परतण्यास सांगितले होते आणि त्यांच्या राजनैतिक अधिकाऱ्याला माघारी बोलावले देखील होते. तसेच भारताशी होणारा व्यापार पाकिस्तानने याआधीच रोखला आहे.
6 वर्षांपूर्वी -
टेरर फंडिंग प्रकरणी पाकिस्तानला FATF-APG ने काळ्या यादीत टाकले
आपल्या भूमीवर सातत्याने दहशतवाद पोसणाऱ्या आणि सीमेपलीकडून भारतात दहशतवादी कारवायांना खतपाणी घालणाऱ्या पाकिस्तानला आज मोठा धक्का बसला आहे. आधीच फायनान्शियल अॅक्शन टास्क फोर्स (FATF) च्या संशयितांच्या यादीत समावेश असलेल्या पाकिस्तानची एफएटीएफ आशिया पॅसिफिक गटाने काळ्या यादीत रवानगी केली आहे. एपीजीच्या 11 पैकी दहा निकषांची पूर्तता करू न शकल्याने पाकिस्तानचा काळ्या यादीत समावेश करण्यात आला.
6 वर्षांपूर्वी -
दोन अण्वस्त्र संपन्न देश समोरासमोर असतील तर काहीही होऊ शकते: इम्रान खान
भारताबरोबर आता चर्चा करण्याची आपली इच्छा राहिलेली नाही असे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी म्हटले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याबरोबर फोनवरुन झालेल्या चर्चेनंतर इम्रान खान यांनी द न्यूयॉर्क टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत जम्मू-काश्मीर आणि भारत-पाकिस्तान संबंधांबाबत भाष्य केले.
6 वर्षांपूर्वी -
काश्मीरबाबत पाकमध्ये उच्चस्तरीय बैठक सुरु; सैन्य दलाचे अधिकारीही उपस्थित
काश्मीर प्रकरणावरुन सर्व बाजूंनी कोंडी झाल्यानंतर पाकिस्तान सरकारकडून उच्चस्तरीय बैठक बोलविण्यात आली आहे. पंतप्रधान इम्रान खान यांच्या अध्यक्षतेखाली ही उच्चस्तरीय बैठक सध्या पाकिस्तानात सुरु आहे. या बैठकीत काश्मीर प्रश्नावर चर्चा होणार आहे. या बैठकीवर भारताची करडी नजर असणार आहे कारण यामध्ये पाकिस्तानची पुढील रणनीती काय असेल यावर निर्णय होणार आहे. दरम्यान, आज जम्मू-काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यातील नौशेरा सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेवर आज सकाळी पाकिस्तानी सैन्यानं अंदाधुंद गोळीबार केला. यात एक भारतीय जवान शहीद झाला. गोळीबार करणाऱ्या पाकिस्तानी सैन्याला भारतीय जवानांनीही चोख प्रत्युत्तर दिलं.
6 वर्षांपूर्वी -
संयुक्त राष्ट्रात जम्मू-काश्मीरला आंतरराष्ट्रीय मुद्दा करण्यावरून चीन-पाकिस्तान तोंडघशी
भारत सरकारने काश्मीरविषयक घेतलेल्या निर्णयांमुळे काश्मीरमधील परिस्थिती अतिशय धोकादायक असल्याची कागाळी शुक्रवारी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या बंद दरवाजा बैठकीत केली खरी, पण त्या प्रश्नात लक्ष घालण्याचा अधिकारच संयुक्त राष्ट्रांना नसल्याचे सांगून रशियाने चीन व पाकिस्तानचे प्रयत्न उधळून लावले. त्यामुळे चीन सुरक्षा परिषदेत तोंडघशी पडला आहे. त्यानंतर भारतानेही हा आमचा अंतर्गत मामला आहे, त्यात अन्य देशांनी पडण्याचे कारण नाही, अशा शब्दांत बाजू मांडली.
6 वर्षांपूर्वी -
काश्मीरप्रश्नी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची आज बंद खोलीत बैठक
जम्मू-काश्मीर राज्याला विशेष दर्जा देणारे कलम ३७० हटविल्यानंतर पाकिस्तानच्या पायाखालची जमीन सरकली आहे. या मुद्द्यावरून पाकिस्तान भारतावर आंतरराष्ट्रीय स्तरावरून दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहे. जम्मू-काश्मीरचा मुद्दा जागतिक ठरवून युएनकडे हस्तक्षेपाची मागणी पाकिस्तानकडून यापूर्वीच करण्यात आली आहे. तसेच पोलंडसहित अनेक देशांकडे पत्र लिहून समर्थनाची मागणीही करण्यात आली होती. मात्र चीनशिवाय पाकिस्तानच्या या मागणीला अद्याप कुठल्याही देशाने जाहीररीत्या समर्थन दिलेले नाही. चीनच्या मागणीनंतर आज संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत काश्मीर प्रश्नावर बंद खोलीत चर्चा होणार आहे. दरम्यान, हाँगकाँगमध्ये गेल्या १० दिवसांपासून लोकशाहीच्या समर्थनार्थ सुरू असलेल्या आंदोलनाचा मुद्दादेखील संयुक्त राष्ट्रात उपस्थित केला जाणार आहे.
6 वर्षांपूर्वी -
लडाख सीमेवर पाकिस्तानची लढाऊ विमानं तैनात
जम्मू आणि काश्मीरचा विशेष दर्जा रद्द केल्यावरून पाकिस्तानने भारताबरोबरच्या संबंधांवर बुधवारी घाव घातला. पाकिस्तानने भारतीय राजदूतांना मायदेशी परतण्यास सांगितले असून आपल्या राजनैतिक अधिकाऱ्याला माघारी बोलावले आहे. तसेच भारताशी होणारा व्यापार पाकिस्तानने रोखला आहे.
6 वर्षांपूर्वी -
आज २०वा कारगिल विजय दिवस; देशभरात विविध कार्यक्रमांच आयोजन
कारगिल विजय दिवसाची २० वी वर्षपूर्ती आज देशभर साजरी केली जात आहे. २६ जुलै १९९९ रोजी पाकिस्तान विरुद्ध झालेल्या युद्धात भारताने पाकिस्तानवर विजय मिळवला होता. त्याचंच स्मरण म्हणून आज देशभरात ठिकठिकाणी शहिदांना आदरांजली वाहिली जाते.
6 वर्षांपूर्वी -
कुलभूषण जाधव यांचा खटला लढण्यासाठी हरीश साळवेंनी केवळ १ रुपया आकारला
देशातील सर्वाधिक चर्चेचा ठरलेला विषय म्हणजे कुलभूषण जाधव यांचा सुरु असलेला आंतरराष्ट्रीय न्यायालयातील खटला, ज्यावर संपूर्ण जगाचं लक्ष लागून राहिलं होतं. कुलभूषण जाधव प्रकरणात आंतरराष्ट्रीय न्यायालयात बुधवारी भारताला मोठे यश प्राप्त झालं. हेरगिरी आणि दहशतवादाच्या आरोपाखाली जाधव यांना पाकिस्तानच्या न्यायालयाने सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेचा फेरविचार करावा आणि त्यांना राजनैतिक संपर्काची अनुमती द्यावी, असे निर्देश आंतरराष्ट्रीय न्यायालयाने पाकिस्तानला दिले.
6 वर्षांपूर्वी -
आम्हाला मोदींचे दोन चेहरे पाहायला मिळणार, एक निवडणुकीपूर्वीचा व एक निवडणुकीनंतरचा
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा सत्तेत आल्यास भारत आणि पाकिस्तानमध्ये पुन्हा शांततेवर चर्चा होण्याची शक्यता आहे असं म्हटलं आहे. यावेळी त्यांनी सध्या विरोधी बाकावर असणारा काँग्रेस पक्ष सत्तेत आल्यास पुन्हा चर्चा होणं अशक्य असल्याचंही मत व्यक्त केलं आहे. राजकीय पक्षांकडून टीका होईल या भीतीने भारतातील काँग्रेस शांततेवर चर्चा करणार नाही असं इम्रान खान यांनी मत व्यक्त केलं आहे. गुरुवारपासून भारतात लोकसभा निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात होणार आहे. लोकसभेच्या ९१ जागांसाठी ११ एप्रिलला मतदान होणार आहे. २३ मे रोजी निकाल जाहीर होणार आहे.
6 वर्षांपूर्वी -
पाकच्या गोळीबारात ५ नागरिक जखमी
भारताविरुद्ध पाकिस्तानकडून केल्या जाणाऱ्या कुरापती काही केल्या कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. जम्मू-कश्मीरच्या पुंछ भागात शाहपुर सेक्टर आणि राजौरी जिल्ह्यातील नौशेरा सेक्टर परिसरात पाकिस्तानकडून गोळीबार आणि तोफांचा मारा करण्यात आला आहे. या गोळीबारात पाच नागरिक जखमी झाले आहेत.
6 वर्षांपूर्वी -
जम्मू: शोपियानमध्ये ३ दहशतवाद्यांना कंठस्नान
जम्मू काश्मीरमधील शोपियान जिल्ह्यात भारतीय लष्करात आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत ३ दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आलं आहे. केलारा भागातील येरवान येथे सुरक्षा दलाची शोधमोहिम सुरू असताना जोरदार गोळीबार झाला. सध्या लष्कराकडून शोधमोहीम सुरू आहे.
6 वर्षांपूर्वी -
पाकिस्तानच्या कुरापती सुरूच; पूंछ व राजौरीमध्ये पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन
सीमारेषेवर पाकिस्तानच्या नापाक कुरापती सुरूच आहेत. जम्मू काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यातील सुंदरबनी भागात पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं आहे. मागील चोवीस तासांमधील ही तिसरी घटना आहे.
6 वर्षांपूर्वी -
हल्ल्यानंतर किती ठार झाले ते मोजण्याचे काम हवाई दलाचे नाही, ते सरकारचे काम
भारतीय वायुदलाने बालकोट येथील जैश-ए-मोहम्मदच्या तळावर केलेली कारवाई कितपत परिणामकारक ठरली यावर अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. त्यावर वायुदल प्रमुख बीरेंद्र सिंग धनोआ यांनी ध्येयावर थेट प्रहार केल्यानंतर त्यात किती जण मारले गेले ते मोजण्याचे काम वायुदल करत नाही. ते काम सरकारचे असते त्यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
6 वर्षांपूर्वी -
मसूद अझहर जिवंत, पाकिस्तानी माध्यमं
पुलवामा हल्ल्याचा मास्टरमाईंड आणि जैश ए मोहम्मदचा म्होरक्या मौलाना मसूद अझहर हा भारतीय हवाईदलाने चढविलेल्या हल्ल्यात ठार झाल्याच्या वृत्ताने रविवारी खळबळ माजली. मात्र, आता पाकिस्तानी माध्यमांनी मसूदच्या नातेवाईकांचा हवाला देत मसूद जिवंत असल्याचा दावा केला आहे. तसेच जैश ए मोहम्मदने देखिल हे वृत्त फेटाळले आहे.
6 वर्षांपूर्वी -
पाककडून पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन, ३ नागरिक ठार
पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या विंग कमांडर अभिनंदन वर्धमान शुक्रवारी रात्री भारतात परतले. मात्र, सीमेवर भारत-पाकिस्तान दरम्यान अद्याप तणावाचे वातावरण आहे. पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन सुरुच आहे.
6 वर्षांपूर्वी -
बिकट आर्थिक परिस्थिती व आंतरराष्ट्रीय दबावानंतर इम्रान खान यांची शांततेची भाषा
बिकट आर्थिक परिस्थिती व आंतरराष्ट्रीय दबावानंतर इम्रान खान आणि पाकिस्तानची खुमखुमी कमी होताना दिसत आहे. पुलवामा हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारताकडून प्रत्युत्तराची कारवाई होऊ शकते त्यामुळे पाकिस्तान सरकार खडबडून जागा झाला आहे आणि शांततेच्या बाता करू लागला आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी शांततेची एक संधी द्या असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींना केले आहे. आपण आपल्या शब्दावर ठाम असून भारताने पुलवामा हल्ल्यासंबंधी ठोस पुरावे दिले तर तात्काळ कारवाई करु असे इम्रान खान यांनी म्हटले आहे.
6 वर्षांपूर्वी