Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
'ते' ट्विट: सचिनला ट्रोल करणाऱ्या फिल्मी देशभक्तानी भारत-पाकिस्तान मॅचचा मनसोक्त आनंद लुटला
जम्मू काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात सीआरपीएफ’च्या जवानांवर भ्याड दहशतवादी हल्ला झाला आणि त्यात तब्बल ४० हुन अधिक जवान शहीद झाले होते. त्यानंतर लोकसभा निवडणुका तोंडावर आल्याने सत्ताधारी पक्षाने समाज माध्यमांच्या आडून मोठं राजकीय भांडवल केल्याचे दिसले. देशात जर त्यानंतर नैसर्गिक देशभक्ती उफाळून आली असती तर उत्तम झालं असतं. मात्र तसं होता, पाकिस्तानला अनुसरून कोणी एखादा विषयावर मत व्यक्त केल्यास त्यांना ट्रॉलर्स’ने झोडपून काढणं म्हणजे समाज माध्यमांवरील एक कलमी कार्यक्रम झाला होता.
6 वर्षांपूर्वी -
खरंच आपलं देशप्रेम क्षणिक झालं आहे? पुलवामा हल्ला ते क्रिकेट वर्ल्ड कप २०१९
भारत आणि पाकिस्तान हे पारंपरिक कट्टर प्रतिस्पर्धी येत्या रविवारी म्हणजे १६ जूनला मॅंचेस्टर येथील ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर एकमेकांविरोधात खेळणार आहेत. वर्ल्ड कप स्पर्धेत हे सख्खे शेजारी राष्ट्र; पण पक्के वैरी सातव्यांदा एकमेकांच्या समोर उभे ठाकणार आहेत. इतिहास आणि भारतीय संघाची सध्याची कामगिरी पाहता विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणारा संघ बाजी मारेल हे नक्की आहे. पण, १४ फेब्रुवारी २०१९ रोजी पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर हा सामना होऊ नये, भारताने पाकिस्तानविरुद्ध खेळू नये, स्पर्धेवरच बहिष्कार घालावा अशी मागणी अनेक क्रिकेट चाहते करत होते. लोकसभेच्या निमित्ताने प्रत्येकाच्या मनात देशभक्ती जागवली असंच म्हणावं लागेल. कारण देश, ध्वज आणि सैनिकांप्रती असणारी नैसर्गिक देशभक्ती ही कधीच क्षणिक नसते आणि कोणी आपल्यात जागृत करण्याची गरज नसते.
6 वर्षांपूर्वी -
चीनकडून पाकिस्तानला तब्बल २ अब्ज डॉलर्सचे कर्ज
आर्थिक संकटात सापडलेल्या पाकिस्तानला चीनकडून तब्बल 2 अब्ज डॉलर्सचे कर्ज देणार आहे. चिनी सरकारकडून याबाबतच्या सर्व प्रक्रिया पूर्ण केल्या असून २५ मार्चपर्यंत स्टेट बँक ऑफ पाकिस्तानच्या खात्यात २.१ अब्ज अमेरिकी डॉलर्स (१५ अब्ज यूआन) जमा होतील असे पाकच्या वित्त विभागाचे प्रवक्ते खकान नजीब खान यांनी सांगितले.
6 वर्षांपूर्वी -
पाकड्यांकडून पुन्हा शस्त्रसंधीच उल्लंघन, एक भारतीय जवान शहीद
संपूर्ण देशभरात आज होळी मोठ्या उत्साहात साजरी होत असताना दुसरीकडे सीमेवर भारत-पाकिस्तान यांच्यातील तणाव कायम आहे. होळीच्या दिवशी पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात येत आहे. जम्मू काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यातील सुंदरबनी सेक्टरमध्ये पाकिस्तानच्या सैन्याकडून जोरदार गोळीबारी करण्यात येत आहे.
6 वर्षांपूर्वी -
VIDEO: अमेरिकन प्लॅनेट लॅब्जने बालाकोट मदरसा संकुलाचे सॅटेलाईट व्हिडिओ प्रसिद्ध केले, भारतीय माध्यमं तोंडघशी?
पाकिस्तानच्या बालाकोटमध्ये जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी तळ हवाई हल्ल्यात उद्ध्वस्त केल्याचे आणि अनेक दहशतवाद्यांना मारल्याचे भारतीय जनता पक्षाचे नेते खुलेआम दावे करत आहेत. भारतीय वायुदलाने कोण आणि किती जण मृत्युमुखी पडले ते आमचं काम नाही असा अप्रत्यक्ष संदेश दिला होता. तर दुसरीकडे भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे मुख्य सचिव विजय गोखले यांनी ती ‘बिगर लष्करी कारवाई’ तसेच ‘प्रतिबंधात्मक कारवाई’ असा शब्दप्रयोग करून सामान्यांना बरंच काही सांगितलं होतं. परंतु. भारतीय प्रसार माध्यमांनी विषय वेगळ्या पद्धतीने चिघळवुन सत्ताधाऱ्यांसाठी लोकसभेच्या अनुषंगाने हवानिर्मिती करण्यास मदत केल्याचं पाहायला मिळालं.
6 वर्षांपूर्वी -
भारत-पाकिस्तानमध्ये ‘समझोता एक्सप्रेस’ ३ मार्चपासून सुरळीत
पुलवामा जिल्ह्यातील सीआरपीएफ’च्या जवानांवरील भ्याड दहशदवादी हल्ला आणि त्यानंतर एअर स्ट्राईकनंतर भारत-पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर स्थगित करण्यात आलेली समझोता एक्सप्रेसची सेवा ३ मार्चपासून सुरळीत सुरु झाली आहे. दोन्ही देशांनी मिळून रेल्वे सेवा पुन्हा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. मागील रविवारी दिल्लीमधून पाकिस्तानसाठी समझोता एक्सप्रेस पुन्हा निघाली होती. रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने ही तशी अधिकृत माहिती दिली प्रसिद्ध केली होती.
6 वर्षांपूर्वी -
कर्तारपूर कॉरिडॉर संदर्भात पाकचे अधिकारी भारत भेटीवर येणार: पाकिस्तान परराष्ट्र मंत्रालय
पुलवामा भ्याड हल्ला आणि एअर स्ट्राईकनंतर भारत पाकिस्तानमधील परिस्थिती नाजूक झालेली असताना आता शांतीवार्ता सुरु होण्याचे अनेक प्रकार पुढे येऊ लागले आहेत आणि तणाव कमी करण्याचे जोरदार प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यामुळेच कर्तारपूर कॉरिडॉर हा एक भारत-पाकिस्तान यांच्यातील तणाव दूर करण्याचा महत्वाचा मार्ग ठरण्याची शक्यता आहे. कारण विषयाला अनुसरून चर्चेसाठी पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांचे एक पथक लवकरच भारत भेटीवर येणार असल्याचे वृत्त आहे.
6 वर्षांपूर्वी -
बिकट आर्थिक परिस्थिती व आंतरराष्ट्रीय दबावानंतर इम्रान खान यांची शांततेची भाषा
बिकट आर्थिक परिस्थिती व आंतरराष्ट्रीय दबावानंतर इम्रान खान आणि पाकिस्तानची खुमखुमी कमी होताना दिसत आहे. पुलवामा हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारताकडून प्रत्युत्तराची कारवाई होऊ शकते त्यामुळे पाकिस्तान सरकार खडबडून जागा झाला आहे आणि शांततेच्या बाता करू लागला आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी शांततेची एक संधी द्या असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींना केले आहे. आपण आपल्या शब्दावर ठाम असून भारताने पुलवामा हल्ल्यासंबंधी ठोस पुरावे दिले तर तात्काळ कारवाई करु असे इम्रान खान यांनी म्हटले आहे.
6 वर्षांपूर्वी -
भारत पाक सीमेवर तणाव वाढतो आहे, पाककडून युद्ध सदृश्य जमवाजमव
पुलवामा जिल्ह्यात दहशवाद्यांच्या भ्याड हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान यांच्यामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. यापार्श्वभूमीवर पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये युद्ध सदृश्य जमवाजमव सुरु असून, पश्चिम सीमेवरून पाकिस्तानी सैन्य कमी करून ते जम्मू-काश्मीरजवळच्या पूर्व सीमेवर तैनात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे भारत-पाक सीमेवर युद्धाचे ढग तयार झाल्याचे वातावरण आहे, एएनआयने यासंबंधी अधिकृत वृत्त दिले आहे.
6 वर्षांपूर्वी -
कुलभूषण जाधवांच्या आई आणि पत्नीची सुषमा स्वराज यांच्याशी भेट.
हेरगिरीच्या आरोपावरून पाकिस्तानच्या अटकेत असलेले भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांची पाकिस्तानात प्रत्यक्ष भेट घेतल्या नंतर आज त्यांच्या आई आणि पत्नींची भारताच्या परराष्ट्रमंत्री श्रीमती. सुषमा स्वराज यांच्याशी त्यांच्या निवासस्थानी भेट झाली.
7 वर्षांपूर्वी -
जाधवांचा पाकिस्तानात छळ, शरीरावर जखमांचे निशाण !
आज केवळ जगाला दाखवण्यासाठी कुलभूषण जाधव यांच्याशी त्यांच्या आई आणि पत्नी सोबत भेट पाकिस्तान सरकार ने घडवून आणली. त्यांच्या भेटी दरम्यान काचेची भिंत होती आणि त्यांच्यात फोनवरून संभाषणं झालं.
7 वर्षांपूर्वी