Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
INDIA Vs NDA | अजब दावा! 'इंडिया' या नावामुळे हिंसा होऊ शकते, विरोधकांच्या आघाडीविरोधात दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल
INDIA Vs NDA | इंडियन नॅशनल डेव्हलपमेंट इन्क्लूसिव्ह अलायन्स (INDIA) या नावाच्या संक्षिप्त स्वरूपाविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे निवडणुकीच्या काळात देशातील कायदा व सुव्यवस्थेवर परिणाम होऊ शकतो, असा अजब दावा याचिकाकर्त्याने याचिकेत केला आहे. निवडणूक आयोगाकडून (ईसीआय) उत्तर न मिळाल्याने याचिकाकर्त्याने न्यायालयात धाव घेतल्याचे समजते. या याचिकेवर शुक्रवारी सुनावणी होणार आहे. सदर याचिकाकर्ता भाजप पुरस्कृत असावा याची देखील त्यानंतर चर्चा रंगलेली असताना दुसऱ्या बाजूला भाजपने किती राजकीय धास्ती घेतली आहे याची देखील चर्चा सुरु झाली आहे.
2 वर्षांपूर्वी -
INDIA Vs NDA | नितीशकुमार नाराज नाहीत, गोदी मीडियाला हाताशी धरून भाजप नेते पसरवत आहेत अफवा, JDU ने हवाच काढली
INDIA Vs NDA | बेंगळुरूमध्ये २६ विरोधी पक्षांच्या संयुक्त बैठकीनंतर केवळ अनेक बातम्या येत आहेत. विशेष म्हणजे भाजप पेक्षा गोदी मीडिया अधिक आदळआपट करताना दिसत आहेत आणि त्यासाठी अफवांचा आसरा घेतल्याची चर्चा सुरु झाली आहे. विरोधकांच्या आघाडीमुळे आणि त्यांच्या रणनीतीमुळे मोदी देखील अस्वस्थ असल्याचं स्पष्ट जाणवू लागलं आहे. काल तर एका सरकारी कार्यक्रमाला त्यांनी राजकीय रूप देतं थेट राजकीय भाषण सुरु केलं आणि त्यातील त्यांचे हावभाव त्यांचा त्रागा स्पष्ट करत होता.
2 वर्षांपूर्वी